Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाइक आणि सबस्क्राइब चित्रपट
लाइक आणि सबस्क्राइब चित्रपट बघितला. आवडला. सस्पेन्स शेवटपर्यंत टिकवला आहे. अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे सगळ्यांची कामे मस्त. गौतमी पाटीलचे आयटेम गाणे वगळले असते तरी चालले असते. पण बाकी तसा वेगवान आहे. शेवटची १५-२० मिनिटे एकदम अनपेक्षित धक्के देऊन जातात.
फर्स्टक्लास दाभाडे पाहिला
फर्स्टक्लास दाभाडे पाहिला प्राईम वर..
मस्त होता..
अंधश्रद्धा.. लैंगिक शिक्षण.. प्रेम भंगानंतर मूव्ह ऑन करणे.. जे आहे ते स्वीकारणे आणि खुश राहणे असे बरेच विषय आले.. पण सगळे पोहोचले असे वाटले.
अमेय वाघने लाईक आणि सबस्क्राईब नंतर पुन्हा एकदा इंप्रेसिव्ह अभिनय केला. पुन्हा एक वेगळे बेअरिंग मस्त पकडले.
अरे हो, दाभाडे संपल्यावर आपोआप दुसरा चित्रपट सुरू झाला...
पहिल्या दृश्यात सई ताम्हणकर गुड मॉर्निंग म्हणत उठून बेडवर बसते.. आणि म्हणते अश्या उठण्याला काही अर्थ नाही, अंथरुणात पुरुष हवाच.. चित्रपटाचे नाव - कुलकर्णी चौकातला देशपांडे!
झोपतो आता, शुभरात्री
संतोष जुवेकर च्या नावाची
संतोष जुवेकर च्या नावाची चर्चा चालल्याने जुने काही मूवीज आठवायचा प्रयत्न केला.
मराठी क्राईम थ्रिलर - सस्पेन्स मूवीज काही वर्षांपूर्वी आले होते त्यात संतोष जुवेकर होता.
जजमेंट / चेकमेट/ रिंगा रिंगा / गैर / अ परफेक्ट मर्डर (ड्रामा) / लपाछपी इ.
यातल्या बहुतेक रिंगा रिंगा आणि चेकमेट मधे संतोष जुवेकरच्या भूमिका चांगल्या होत्या.
तांदळा नावाचा चित्रपट बघतोय,
तांदळा नावाचा चित्रपट बघतोय, अर्ध्याहून जास्त पाहून झाला आहे, कथा छान वाटतेय, पण संकलन ववाईट आहे.. कामतचे केस एका प्रसंगात मोठे, पुढच्याच प्रसंगात लहान, लगेच पुढल्या प्रसंगात पुन्हा मोठे, पुन्हा लहान... सुरेखा कुडची सुरेख होती, मल्याळम मध्ये हिट झाली असती..
फसक्लास दाभाडे मलाही आवडला
फसक्लास दाभाडे मलाही आवडला (चक्क!)
मस्त काम केलंय सिद्दार्थ अमेय आणि क्षिती जोग ने! चिडका बिब्बा परफेक्ट नाव आहे तिच्यासाठी
वर मी गैरचं नाव लिहीलं आहे पण
वर मी गैरचं नाव लिहीलं आहे पण त्यात संतोष जुवेकर नाही. अंकुश चौधरी आहे. त्या वेळी एकामागोमाग एक असे क्राईम थ्रिलर मराठी सिनेमे आले होते. सतीश राजवाडे आणि संजय जाधव या दोघांचे. आणखीही दोन तीन होते.
गैर मधे अमृत खानविलकर पण आहे. शेवटचा धक्का अचाट आहे पण हिंदीत आपण काय काय चालवून घेतो, तसा चालवून घेतला तर एंगेजिंग आहे.
संतोष जुवेकर >>> गेल्या
संतोष जुवेकर >>> गेल्या वर्षीच्या 'डेट भेट' मधे होता
अगदीच जुनी आठवण हवी असेल तर 'अग्निहोत्र' मालिकेत होता.
संतोष जुवेकर "या गोजिरवाण्या
संतोष जुवेकर "या गोजिरवाण्या घरात" होता. ती बरीच जुनी असावी कारण तेव्हा मी लहान होतो आणि मराठी मालिका आईच्या नादात बघायचो.
अग्निहोत्र ...आवडती मालिका.
अग्निहोत्र ...आवडती मालिका. ही आता कुठे मिळेल पाहायला? माझे शेवटचे काही भाग राहिले होते तेव्हा पहायचे.
या गोजिरवाण्या घरात.... ही पण बघायचो.
अग्निहोत्र >>> ऑलमोस्ट सगळे
अग्निहोत्र >>> ऑलमोस्ट सगळे भाग यूट्यूबवर आले आहेत.
ओह! हे नव्हतं माहीत.
@. rmd
ओह! हे नव्हतं माहीत.
अग्निहोत्र बद्दल ऐकलेले आहे. बघायची तर आहे..
'कुलकर्णी चौकातला देशपांडे'
'कुलकर्णी चौकातला देशपांडे' बघितला.
फारच डिप्रेसिंग आणि मिसोजेनिस्ट सिनेमा वाटला मलातरी.
त्यातले ' अंधाराची गाडी झुकझुक गाडी ' गाणे आवडले मात्र.
मुलांना सोबत घेऊन बघू नका सिनेमा.
दाभाडे प्राईमवर सापडेना मला.
दाभाडे प्राईमवर सापडेना मला. कोणाला सापडला?
रात्र-आरंभ सुरू केलाय.
रात्र-आरंभ सुरू केलाय. इंटरेस्टींग आहे.
पुढेही असाच असावा आणि शेवट लॉजिकल निघावा.)
स्पॉईलर अॅलर्ट
(डिस्क्रीप्शन मधे सायकॉलॉजी थ्रिलर हा शब्द खरं तर स्पॉईलरच आहे. अंदाज येऊ शकतो. )
दाभाडे प्राईमवर सापडेना मला.
दाभाडे प्राईमवर सापडेना मला. कोणाला सापडला? आहे , new मध्ये लगेचच दिसतोय. मी पाहिला नाहीये मात्र अजून.
फस्क्लास दाभाडे बघितला मस्त
फस्क्लास दाभाडे बघितला मस्त आहे. फर्स्टक्लास आहे
एका वेळी अनेक विषयांना हात घातलाय पण कृत्रिमपणा न आणण्यात जवळजवळ पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. सगळ्यांचा अभिनय मस्त! हा थिएटरमध्ये आला होता का?
@ऋन्मेष, आम्हालाही पुढचं सजेशन कुलकर्णी चौकातल्या देशपांड्यांचं आलं! तो गजेंद्र अहिरेचा आहे असं दिसतंय.
हा थिएटरमध्ये आला होता का?>
हा थिएटरमध्ये आला होता का?>>हो मी थेटर लाच पाहिला होता .एका थेटरला आठ लोकं ही जमली नाहीत म्हणून शो कॅन्सल केला मग मी दुसऱ्या थेटरला विकेंड ला गेले तर मोजून आठ लोकं होती लोकांनी उगाच न पाहता वाईट रिव्यु दिलेले त्यामुळे लोकांनी पाहिला नाही एव्हडा चांगला चित्रपट .बाकी चित्रपट मस्तच आहे .याच धाग्यावर मागे पोस्टही आहे माझी .
हा थिएटरमध्ये आला होता का?
हा थिएटरमध्ये आला होता का?
>>>>>
हो आलेला. आणि चांगले रिव्ह्यू सुद्धा आलेले. मला जायची इच्छा निर्माण व्हावी असे वाचलेले. पण काही कारणाने जमले नाही.
पण तेव्हा वाचलेल्या बरेच रिव्ह्यू मध्ये खटकलेली गोष्ट म्हणजे,
चित्रपटात प्रौढांचे विषय/दृश्ये आहेत, मुलांना सोबत नेण्यासारखा नाही असे बरेच रिव्ह्यूमध्ये वाचलेले. पण ते नक्की काय हे कोणीच स्पष्ट लिहिले नव्हते. त्यामुळे उगाच नकारात्मकता तयार झालेली असे वाटले.
अच्छा, म्हणजे आला होता
अच्छा, म्हणजे आला होता थिएटरमध्ये पण चालला नाही.
मुलांबरोबर बघण्याचा नाही हेही खरंच आहे पण.
फस्क्लास दाभाडे बघितला मस्त
फस्क्लास दाभाडे बघितला मस्त आहे. फर्स्टक्लास आहे Lol
एका वेळी अनेक विषयांना हात घातलाय पण कृत्रिमपणा न आणण्यात जवळजवळ पूर्णपणे यशस्वी झालेला आहे>>>>>
येस्स्स्स… बर्याच दिवसांनी चित्रपट पाहताना खदखदुन हसु आले. सगळ्यांनी छान कामे केलीत. मुख्य म्हणजे भाषेचे जे बेअरिंग घेतलेय ते एकाही संवादात सुटलेले नाही.
मुलांबरोबर बघण्याचा नाही हेही
मुलांबरोबर बघण्याचा नाही हेही खरंच आहे पण>>>>
मला तरी असे काही खटकले नाही. सध्याचे हिंदी चित्रपट जर लोक मुलांसोबत पाहु शकतात तर हा खुपच सोबर आहे. शेवटी आलेला विषय प्रौढ आहे खरा पण तो आपणच टॅबु करुन ठेवलाय म्हणुन्प्रौढ वाटतो.
साधना+ 1 अगदी 10 च्या खाली
साधना+ 1
अगदी 10 वर्षाच्या खाली नाही पण लैगिंक शिक्षण देण्याच्या वयात टीनेजर ना दाखवला तर काही हरकत नाही. तसही मुलं आपल्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं शोधत असतातच उगाच चुकीची माहिती मिळण्यापेक्षा असे चित्रपट दाखवले तर मुलं पालकांमधली दरी कमी होते. जसं की बालकपालक माझ्या टीनेज मध्ये आला असता तर किती बरं झालं असतं असं मला अजूनही वाटतं. आता काहींना तोही चित्रपट टॅबु वाटत असेल तर आपण काही करू शकत नाही. कुठेतरी चुकतंय नक्क्की नाहीतर लैगिक शिक्षण इतकं महत्वाचं नसतं.
खटकण्यासारखं काही नाहीये, पण
खटकण्यासारखं काही नाहीये, पण अमेय वाघचा प्रॉब्लेम काय आहे किंवा ती मैत्रीण कोमलला कुठले व्हिडिओ बघायला सांगते किंवा व्हर्जिन म्हणजे काय हे प्रश्न मुलांना चित्रपट बघताना पडू शकतात (मी आठ-दहा-बारा वर्षांच्या मुलांबद्दल बोलतेय). आपल्याला विचारलं तर या वयाच्या मुलांना आपण नक्की काय उत्तर द्यायचं हे मला तरी सुचणार नाही. चौदापंधरा वर्षाच्या मुलाला कदाचित विचार करून नीट उत्तर देता येईल.
बालक-पालक मधली एक मुलगी यात माधुरी आहे ना?
जसं की बालकपालक माझ्या टीनेज
जसं की बालकपालक माझ्या टीनेज मध्ये आला असता तर किती बरं झालं असतं असं मला अजूनही वाटतं
>>>>>
बालक पालक सिनेमा निमित्ताने तेव्हा लिहिलेले... त्याची रिक्षा
बालक पालक आणि मी
https://www.maayboli.com/node/40586
@ दाभाडे, मुलांना प्रश्न पडल्यावर आपण त्यांची उत्तरे देऊ शकतो असे वाटत असेल तर त्यांना सोबत दाखवायला हरकत नाही. ज्याचा त्याचा निर्णय. पण अश्लील बीभत्स वाटावे असे काही नाही हे नक्की..
इथले रेको घेऊन 'फस्सक्लास
साधनांचा आणि इथले इतर रेको घेऊन 'फस्सक्लास दाभाडे' आज पाहिला. आवडला. धन्यवाद.
*स्पॉयलर्स असतील.
सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ व क्षिती जोग तिघे बहिण-भाऊ आहेत. राजन भिसे व निवेदिता जोशी आईबाबा आहेत. उषा नाडकर्णी आत्या आहे. राजसी भावे ( लाईक आणि सबस्क्राईब) ही अमेय वाघची नववधू आहे.
फस्सक्लास दाभाडे नाव का आहे कुणाला माहीत पण साधारण दाभाडे कुटुंबातील दुरावलेल्या नात्यांवर, दुराव्याचे कारणही कुठेतरी एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारे कुटुंबातील सदस्य, एकमेकांकडून बऱ्याच अपेक्षा पर्यायाने अपेक्षाभंग यावर संपूर्ण पटकथा बेतलेली आहे. नंतर हळूहळू दुरावा कमी होत जाऊन नात्यांची खासकरून भाऊबहिणीच्या नात्यातील वीण घट्ट करणारा प्रवास आहे. सर्वांचीच कामं उत्तम झाली आहेत, पण मला क्षिती जोगचे काम सर्वात जास्त आवडलं. ती माहेरी बरीच ढवळाढवळ करणारी, कडाडून भांडणारी पण मुळात प्रेमळ बहिण आहे. तिघाही भावंडांचे सिरियस ईश्यूज आहेत. आई अंधश्रद्ध व वडील मितभाषी दाखवलेत. त्यामुळे आईची सर्वांचे 'अहं' जपताजपता तारेवरची कसरत होत असते.
सिद्धार्थचा घरगुती कारणांमुळे लग्न मोडून तुसडा देवदास झाला आहे. क्षितीच्या निपुत्रिक असण्यावरून तिला हेटाळणी सहन करावी लागत असते व तिची एक आयव्हीएफ सुद्धा अयशस्वी झालेली असते. अमेय वाघ लग्न होऊनही पहिल्या अनेक रात्री काही न घडता गेल्याने हरवलेला असतो. इरेक्टाइल डिस्फन्क्शन (असं स्पष्ट म्हटलेलं नाही) मुळे त्रस्त असताना घरी बाळ व्हावे म्हणून अंगारेधुपारे मनात नसताना करावे लागत आहेत. भाऊ आणि बहीण आईला नातू देऊ शकले नाहीत. त्यामुळे पूर्ण कुटुंबाच्या अगदी लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून अपेक्षा असतात. त्याचा परिणाम होऊन ह्याला पर्फॉर्मन्स ॲन्क्सायटी येते आहे. रोमान्स अतिगोड आणि निरागस आहे. आधी कसलाही लैंगिक अनुभव नसलेलं वयाने लहान नवपरिणित जोडपं आहे.
पण हळूहळू सर्वजण एकमेकांशी बोलत राहतात, काही गोंधळ, काही विनोद, बऱ्याच अंधश्रद्धा वगैरे बघायला मिळतात पण नाती किंवा तंटे अतिताणले नाहीत. त्यामुळे ते सगळं नैसर्गिक वाटतं, रिलेटेबलही वाटतं. चित्रपट एंगेजिंग आहे, संवाद चुरचुरीत आहेत. राजसी भावेच्या मैत्रिणीने धमाल आणली आहे. ती स्वतःचं लग्न ठरलेलं असतानाही मैत्रिणीच्या दिरावर खुशाल लाईन मारतेय. वरवर सामान्य दिसणारी पण एकदम सेक्शुअली इन्डिपिन्डेन्ट किंवा बोल्ड भूमिका आहे. तरीही चित्रपट मला चावट किंवा आगाऊ वाटला नाही. सगळं आपोआपच घडत आहे असं वाटत राहतं. ही मैत्रिणीला 'ट्रेनिंग' देत असते.
निमशहरी भाषा, घर वगैरे सगळे आवडले. कारण साधारण चित्रपटात पुण्यामुंबईचीच पार्श्वभूमी असते नाहीतर एकदम ग्रामीणच असते. असे अधलेमधले भट्टी जमलेले सिनेमे फारसे नसावेत, हा त्यापैकी आहे. मला त्यांचं घर, अंगण, आहेरमाहेर, मुलींना गाड्या भरून सामान देऊन सासरी पाठवणी करणे, रुसवेफुगवे, बोलीभाषा हे सगळंच परिचयाचं वाटलं. त्यामुळे की काय मजा आली बघताना.
** आपली संस्कृती लैंगिक दमन, अज्ञान वा चोरटेपणावर आधारलेली आहे पण बाळ मात्र लवकरात लवकर हवं असतं. अशा काहीतरी 'ऑक्सिमोरॉन' सिनारिओला यात सहजपणे वाचा दिली आहे असे वाटले. विनोदही सवंग पद्धतीने हाताळले आहेत असं मला तरी वाटलं नाही.
मीही आज पाहिला आणि मला
मीही आज पाहिला आणि मला अजिबातच नाही आवडला. तोच तो मराठी सिनेमांचा ‘चवीपुरते प्रॉब्लेम्स आणि अय्या सोप्पी उत्तरं’ फॉर्म्युला वाटला.
*** स्पॉइलर्स ***
एवढ्या घोड्या मुलाने ‘तुम्ही मला सेक्स एज्युकेशन दिलं नाहीत आणि मूल व्हायची सक्ती करता म्हणून मला आता परफॉर्मन्स ॲन्ग्झायटी आली’ असं म्हणणं तर महायेडपट वाटलं. जी माहिती त्याच पिढीतल्या त्याच्या बायकोला आहे, ती याला का मिळवता आलेली नाही? शिवाय लग्नाआधी भेटत बोलत होते - कंफर्ट लेव्हल काही प्रमाणात तरी ऑलरेडी होती.
तितककंच येडपट भावाने ‘समजावल्यावर’ बहिणीचा मेडिकल इन्टरवेन्शनबद्दलचा विचार बदलणं!
मोठ्या मुलात आणि बापात का वितुष्ट आलं आणि त्यांनी कुठल्याश्या गावाच्या पुनर्वसनाला मदत केली म्हणून चुटकीसरशी कसं मिटलं याला काहीही लॉजिक नाही!
ते पुनर्वसन करायला वेळी अवेळी का जात होते आणि त्यात घरच्यांपासून लपवण्यासारखं काय होतं?! उगीचच कैतरी सस्पेन्स!
त्याचं लग्न नेमकं का मोडलं होतं? ते मोडण्यात बहिणीचा नेमका काय रोल होता ते काही मला कळलं नाही - पण मी कंटाळून इकडची तिकडची कामं सुरू केली होती तोवर त्यामुळे मिस केलं असेलही.
येऊन जाऊन त्या मिताली मयेकरचं पात्रच काय ते सॉर्टेड विचार करतं आणि वेळेवर घडाघडा नीट बोलतं तेच तेवढं बघायला बरं वाटलं.
बघू कि नको?
बघू कि नको?

बघा ना, त्याशिवाय साइड कशी
बघा ना, त्याशिवाय साइड कशी घेणार?
&&&&&&&&&&& स्पॉइलर्स&&&&&&&&
&&&&&&&&&&& स्पॉइलर्स&&&&&&&&&
१. आजच्या तरुण पिढीला काय कसे करावे हे माहित असणार आहेच पण या मुलाला अनुभव नसल्याने त्याची प्रोटेक्शन वापरताना गोची होते असे मला वाटले. तो ‘थंड’ असताना ते वापरायला बघतो, ते जमत नाही त्यामुळे त्याला नॉशिया येतो असे काहीसे दाखवलेय. मुलीला गायनॅक प्रोटेक्शन वापरा हा सल्ला देते पण ते कुठल्या टाइमिंगला ते हिला माहित नसते.
२. लग्नाआधी फारसे भेटले कुठे? पोल्ट्री फार्मवर मैत्रिणीच्या पहार्यात काय बोलणार.. त्यांची लग्नानंतरची केमिस्ट्री व्यवस्थित आहे. त्याला हातात प्रोटेक्शन आले की डोक्यात टेंशन येत होते (डोक्यात हा उल्लेख आवर्जुन केला आहे हे कृ लक्षात घ्यावे)
३. मोठ्या मुलाचे लग्न मामाच्या मुलीशी बालपणापासुन जुळवलेले असते. आजोबा गेल्यावर वाटण्या पडतात त्यात बहिण आईचा माहेरच्या जमिनीवरचा हक्क मामाशी भांडुन मिळवते. चार एकर जमिन आईच्या नावावर होते पण मामा संबंध तोडतो आणि लग्नही.
४. वडलांचे सस्पेन्स प्रकरण दाखवायची अजिबात गरज नव्हती. रातीचे जाऊन कसले पुनर्वसन करणार होते? आणि आज तरी जाऊ नका ही अजिजी करायचे कारण काय? हा भाग अजिबात आवडला नाही. रिटायर्ड माणुस, दिवसा निवांत जायचे की सगळ्यांना सांगुन.
५. चित्रपटाने मला तरी काल खुप हसवले. आत्याबाईच्या एका संवादानंतर तर फुटलेच. इतक्या मस्त संवादांसाठी बाकी गोष्टी माफ.
६. परत ivf नको हा निर्णय त्यांनी आधीच घेतलेला असतो. घरच्यांना सांगणार पण असतात. दुर्दैवाने आत्याच्या टोमण्यांनी दुखाऊन ती रागाने निर्णय बदलते, नवर्याच्या बोलण्यात आलेय. भाऊ समजावतो तेव्हा ती मुळ निर्णयावर परतते.
स्वाती +१.
स्वाती +१.
अमेयच्या समस्येवर त्याला अंगारे धुपारे हे औषध नाही तर डॉक्टर कडे गेलं पाहिजे हे समजण्या इतकी अक्कल आहे तर लैंगिक शिक्षण दिलं नाही, मुलग्यांस दिलं नाही, मुलींना दिलं यावरून २०२५ मध्ये आई बापाला बोल लावण्याची काय गरज आहे? तो पुरेसा रिसोर्सफुल आहे, का गूगल न करता माबोवर रुमाल कुठला घेऊ धागा काढा स्कूलचा आहे तो?
स्किन डीप समस्या आणि फुंकर हेच औषध हे तर प्रत्येक समस्येला आहे. गेल्या महिन्यात बघितलेला. मला ठार कंटाळा आला आणि इथे तेव्हा लिहावं ही वाटलं नाही.
Pages