कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सायो - आंबा पोखरुन त्यात कुल्फी…

हे मी सर्वात आधी पुरानी दिल्ली (सीताराम बाज़ार) च्या कूरेमल मोहनलाल क़ुल्फ़ीवाल्याकडे बघितले. ११६ वर्ष जुनी establishment ! कैरी-आंबाच नाही तर चिकू, डाळिंबाची सुद्धा अशी फळं कोरून केलेली कुल्फी असते त्यांच्याकडे. सालीसकट फळे असतात ते खातांना थोडे त्रासदायक होते 😀

घरी आटवलेले दूध + हापुस आंब्याचा गर याची क़ुल्फ़ी दर सीझनला होतेच. त्यात शून्य साखर कारण आंबा आणि आटीव दुधाचा गोडवा (मला) पुरेसा असतो.

तुम्ही मस्त आयडिया दिलीत, यावर्षी कुरेमल स्टाईल करणार. फोटो डकवणार इथे. तुम्ही पण करा, फोटो एव्हिडन्स द्या 👍

@ माधव, मँगो साल्सा करुन बघणार 👍

IMG-20250411-WA0007.jpg

आज पहाटे केली आंब्याची डाळ आणि पन्हे. देवीला नैवेद्य दाखवला. नंतर हॉलमध्ये ठेऊन फोटो काढला.

काचेच्या ग्लासात वगैरे ठेऊन पन्हे नीट दिसेल पण ते जरा वरून काढायला हवेत. कैरी शिजवून हाताने गर काढून भरपूर गुळ घालून, किंचित साखरही घातली आणि सैंधव, वेलची, जिरे घातलं.

मस्त पहिला फोटो आला आंबेडाळीचा. पुढच्या वेळी जवळून काढा फोटो काढून काढून मस्त येतील .पण यातही दिसतंय छान पन्ह आणि डाळ.

अंजू खरच फणसे नाडण गटग व्हायला पाहिजे. डाळ पन्हं दोन्ही छानच दिसतय.
आंब्याचं साईज नुसार सॉर्टिंग भरणी पॅकिंग वगैरे.

पूर्वी एक नंबरचे आंबे असे पत्र्याच्या पेटीतून मार्केटला येत असत हल्ली जाळीदार प्लॅस्टिक क्रेट असतात.
IMG_20160424_184435505.jpg

फोटो आवडला त्यांना धन्यवाद. हा फोटो घरच्यांसाठी काढलेला, इथे पोस्ट करणार नव्हते. माझ्या फोनने नीट येतही नाहीत. अनिंद्य फोटोचं म्हणाले आणि म्हटलं अनायसे काढला आहेच तर शेअर करुया.

हेमाताई आंबे माहोल.

मला माहितच होते इथे भारी चर्चा होणार आहे म्हणून आज जसा वेळ मिळाला तसा पहिल्यांदा माबो उघडून या धाग्यावर उडी मारली.
ऋतुराज, माहिती आणि श्लोक छान.
ऋन्मेऽऽष, जाळा निल्सन जाळा.... Lol
बर्याच जणांकडे आंबा वाटणीवरून भांडण व्ह्यायची वाटते Lol
अनिंद्य, नशिब आमची आई तुमच्या आईसारखी हुशार नव्हती Wink
अनिंद्य, तुमच्या पन्ह्याचा रंग किती सुरेख हिरवा आला आहे. माझा साखरेत केला तर पिवळा आणि गुळात केला काळपट येतो. रेसीपी सांगा प्लिज.

पन्ह्याचा रंग …रेसीपी सांगा

सौंना विचारतो. हे त्यांचे कौशल्य ! सोड्याच्या आयडिया सकट.

आई ने हुशारी नसती वापरली तर तीन तीन राक्षसगणाची अपत्ये सांभाळणे शक्य झाले नसते हो. रोज उभा दावा 😀

मनीमोहोर - आंबा क्रॉनिकल्स छान.

खाणाऱ्याच्या तोंडी पडण्याआधीचा आंबा आणि त्याचा चित्रमय प्रवास 👌

आंब्याचा रस, तूप आणि पोळ्या हा जगातील सर्वश्रेष्ठ गोड पदार्थ आहे>> हे खातांना मन /पोट भरलं म्हणून नाही थांबत मी.. तर (आपणच केलेल्या असल्या तरी ) अजून किती पोळ्या खायच्या ह्याची लाज वाटून थांबते.

मधे दोन उन्हाळे मी आणि मुलगा असे दोघेच राहायचो घरी. रोज स्वयंपाक काय, हा प्रश्नच नाही पडला कधी. रोजच आमरस पोळी कुरडई अन शेवटला (फोडणी देऊन केलेला )दहीभात.

.. हा प्रकार कोणी केलाय का?…

द.सा. , वर सायो आणि माझ्या पोस्टी आहेत की याबद्दल. पुढे फोटोही येणार आहेत.

>>>>द.सा. , वर सायो आणि माझ्या पोस्टी आहेत>>>
खरंच की कसं सुटलं माझ्या नजरेतून.

दसा, तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये त्या बाईने साधी कुल्फी करुन भरली आहे आंब्यात. खूप वर्षांपूर्वी संजीव कपूरने आंब्याचा गर काढून दुधात मिक्स करुन मग भरला होता आंब्यात. दोन्ही प्रकार छानच लागतील.

सायो, that’s the spirit.

वाट पाहतो इथे तुमच्या सचित्र क़ुल्फ़ी मेकिंग अनुभवाची. 👍

2821b5ba-be02-401c-a524-553b2cc3efc5.jpeg

सुंदर प्रतिसाद आणि फोटो डकवणाऱ्यांसाठी अजिबात तिखट नसलेली कैरीयुक्त सुकी भेळ 👆 👆 👆

अर्र! इथे यायलाच नको - फोटो बघूनच वजन वाढायचं! Happy

अनिंद्य, कोथिंबीर कुठे आहे? ती एकदोन लपलेली पानं दाखवू नका. भेळ इज नो भेळ विदाउट भरपूर कोथिंबीर! Proud Happy

सायोच्या हातची ही कुल्फी खाल्ली आहे. भार्री होते!!
अंजू तुझे पोस्ट आवडले. ममो वरचे आंब्याचे फोटो पण मस्त. एकसारखे पेटीत लावलेले काय सुरेख दिसताय्त आंबे!!
आमच्या ग्रोसरीवाल्याचा मेसेज आलाय काल हापूस आलेत म्हणून. जाऊन बघायला पाहिजे. पण इथे अजून वेदर तेवढे वार्म नाही त्यामुळे शंकाच वाटते कितपत पिकतील.

यावर्षी कैरीची डाळ, कैरी कांदा चटणी, कैरी पुदिना चटणी, कैरीचे ताजे आंबट गोड लोणचे, ताजा सखुबत्ता / सखुबद्दा करून झालाय. इथे अजून खूप जास्त कैऱ्या किंवा आंबे आले नाहीत. आत्ताशिक कैऱ्या यायला लागल्यात.
तरी परवा अमेझॉन फ्रेश वर दिसला म्हणून २ हापूस आणि ५ पायरी आंबे मागवले. हापुस तर दोन्ही खराब निघाले. पायरी पण रस करण्याइतका गोड नव्हता. कापून खाऊन झाला थोडा. आज एका आंब्याचे spicy mango salad dressing केलं.
IMG-20250411-WA0001.jpg
यात ड्रेसिंग चा रंग केशरी न येता डार्क आलाय कारण माझ्याकडचा मध डार्क रंगाचा होता.
उद्या बहूतेक उरलेल्या आंब्याचा इथल्या रेसिपी ने सालसा करेन.

भेळ कुल्फी आणि साल्सा तिन्ही मस्त दिसतय.
कैरीचा सर्वात आवडणारा पदार्थ म्हणजे मेथांबा . दोन कैऱ्या होत्या त्याचा केला आज .

Pages