डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेडरल रिझर्व बँक ऑफ अटलांटा म्हणतंय की पहिल्या तिमाहीत जिडीपी -३.७ रीड..... निगेटिव्ह ३.७ ने वाढणार आहे.
आम्हाला खेळखंडोबा करायला कुण्णाची गरज नाही!
इझिली रिसेशन टेरिटरी आहे ही! उद्या धमाकाच होईल. गेट अमेरिका इन ग्रेट रिसेशन अगेन! Rofl

त्रंपचे खोटे बोलणे हा त्याचा एक रोग किंवा व्यंग म्हणा.
परत परत त्रंप खोटे बोलतो असे सांगणे म्हणजे त्याच्या व्यंगावर हसणे असे होईल.
सभ्य लोक तसे करत नाहीत.
त्याला Alternate reality असे म्हणायचे असते असे कॉन्वे बाईंनी पूर्वीच सांगून ठेवले आहे.
त्यामुळे, पहा व्यंग असून, गुन्हा सिद्ध झाला असूनहि तो परत जनतेचे पैस लुबाडायला येतो याचे कौतुक करायला पाहिजे.
त्याला पूर्वी महाराष्ट्राचे रा़जकारणी " जण्टेची शेवा" असे म्हणत.

>>अर्थात फार थंडी असल्यामुळे कॅनडावासी मंडळींची विनोदबुद्धी गोठत असेल! चालायचंच!<<
मात्र यात स्मिथबाईंचा सन्माननिय अपवाद आहे. शी मेड अ ब्रिल्यंट कामेंट इन फ्लोरीडा - अ‍ॅडिंग कॅनडा अ‍ॅज ए ५१स्ट स्टेट इज लाइक अ‍ॅडिंग अनदर कॅलिफोर्निया टु द इलेक्टोटेट..

सूज्ञास अधिक सांगणे न लगे...

अजूनही आमच्या गावातली मंडळी टॅरीफची किंमत आपण नाही तर चायना आणि तत्सम देश मोजणार असे समजत आहे. मेक्सिकोने भिंतीचे पैसे दिले तसे का विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही. बायडेन अ‍ॅडमिनीस्ट्रेशनकडून स्ट्राँग इकॉनॉमी मिळाली हे यांना पटत नाही. रोज वाढत चाललेल्या ग्रोसरीच्या किमती ही त्यांच्या मते बायडनची कर्तबगारी. ज्यांना साधे चेकबुकही बॅलन्स करता येत नाही त्यांच्या कडून काय अपेक्षा करायची?
ज्या माणसाने ६ वेळा दिवाळखोरी-११ फाईल केल्या, त्यातल्या पहिल्या तीन या एकत्र धरुन एकच म्हणून दावा केला, संपत्तीचा आभास निर्माण करत स्वतःची लाएफस्टाईल राजेशाही ठेवून गुंतवणूकदारांना भिकेला लावले ($३५ चा स्टॉक १७सेंट) अशा माणसाला अमेरीकन पब्लीकने अमेरीका ग्रेट करायला चक्क दोन वेळा निवडून दिले आहे. ट्रंप १.० मधे. जवळ जवळ ३ मिलीयन जॉब्ज गेले. आता ट्रंप २.० मधे रिसेशन + इंनफ्लेशन ?

ट्रंप १.० मधे. जवळ जवळ ३ मिलीयन जॉब्ज गेले. आता ट्रंप २.० मधे रिसेशन + इंनफ्लेशन ? >> फक्त अमेरिकेत थोडी येणार आहे रिसेशन, तात्या तर हम डुबेंगे तो सनम तुमको भी साथ लेके अशी अवस्था करणार आहे सगळ्यांची.

अहो स्वाती२, तुमचे म्हणणे बरोबर आहे.
शेंडेनक्षत्र या सर्व मुद्द्यांना खोडून काढतील.
सत्यमेव जयते वगैरे सगळे शेवटी. सध्या आहे तसेच चालायचे.

<<अजूनही आमच्या गावातली मंडळी टॅरीफची किंमत आपण नाही तर चायना आणि तत्सम देश मोजणार असे समजत आहे.>>

अहो, गावातल्या मंडळींचं काय घेउन बसलात, इथं राजालाच स्व:ताला समजत नाही, नक्की कोण टेरिफ भरते ते.

फॉक्स किंवा तत्सम साइट्स वर जाऊन बातम्या पाहिल्या म्हणजे समजते की त्याच्या सपोर्टर्स ना दिसणारे जग वेगळेच आहे. टेरिफ्स, इन्फ्लेशन, इकॉनॉमी वगैरे चर्चाच नाहीये तिकडे. तिकडे बघावे तर आरएफके कसा अमेरिकेला हेल्दी बवनवत आहे. डोज मुळे अमूक इतके बिलियन्स डॉलर वाचले जे टॅक्सपेयर्स ना परत मिळणार अशाच बातम्या आहेत फक्त.

सिनेटर कोरी बुकर यांचे सिनेटमध्ये २५ तासांचे मॅरेथॉन भाषण. Very impressive.

सिनेट, काँग्रेस अजूनही सक्रिय आहेत हे लक्षात आले.

अमेरिकेत ग्रोसरीच्या किंमती खाली येत आहेत. गॅसोलिनचेही भाव बर्यापैकी खाली आलेले आहेत. आमच्यासारखे भाग्यवान कॅलिफोर्नियावासी मात्र अजून हे सगळे भरपूर पैसे मोजून विकत घेतो. कारण कॅलिफोर्नियाचा कारभार गेले ३०-४० वर्षे ट्रंप हाकतो आहे!

सरकारी नोकर्‍या कमी होतायत म्हणून गळे काढणार्‍यांना प्रश्न. करदात्यांचा पैसा व्यर्थ घालवून काही नोकर्‍या टिकवून त्याच्या बदल्यात अमेरिकेचे कर्ज आणखी वाढवत नेणे योग्य कसे ते जरा समजावा.

कोरी बुकर हा डॉलर्स स्टोर (की वॉलमार्ट) ओबामा म्हणून नावाजला जातो असे ऐकून आहे! त्यांचा पराक्रम म्हणजे फार म्हणजे फारच अफाट आहे.

कॅनडावासी अमेरिकेचा बट्ट्याबोळ होणार, सगळे देशोधडीला लागणार वगैरे नेहमीचीच खुशीची गाजरे खात आहेत.
त्यांची सुखस्वप्ने भंग करायची इच्छा नाही.
पण कावळ्याच्या शापाने गुरे मरत नसतात (अगदी कॅनेडियन कावळ्यांच्याही!)

Waltz’s team set up at least 20 Signal group chats for crises across the world

पर्सनल जीमेल वरुन हे लोक कामाच्या मेल पाठवतात. अजुनही.
आतले लोक म्हणताहेत की कँपेन मध्ये हे सिग्नल वापरायचे आणि अजुन त्यातुन बाहेरच पडता आलेलं नाही.
मेकिंग ऑफ खेळखंडोबा. अगेन!

<<अमेरिकेत ग्रोसरीच्या किंमती खाली येत आहेत. गॅसोलिनचेही भाव बर्यापैकी खाली आलेले आहेत. >>
तुम्ही राजाची कितीही गुलामी करा, पण आकडे खोटं बोलत नाहीत. इथल्या सर्व आकड्यांवर सहज नजर टाकलीत तरी लक्शात येइल की, काही अपवाद वगळता, जानेवारी ते आत्ता पर्यंत सर्व किंमतींमधे वाढ झालेली आहे ( मागाचे वेडे, आकडे, फॅक्ट्स मधे बिलिव करत नाहीत हे माहीत असून सुद्धा हि लिंक देतोय)

<<सरकारी नोकर्‍या कमी होतायत म्हणून गळे काढणार्‍यांना प्रश्न. करदात्यांचा पैसा व्यर्थ घालवून काही नोकर्‍या टिकवून त्याच्या बदल्यात अमेरिकेचे कर्ज आणखी वाढवत नेणे योग्य कसे ते जरा समजावा>>
नोकर्या व कर्ज कमी करण्याला अजिबातच विरोध नाहीये. पण त्या ज्या प्रकारे कमी केल्या जातायेत आणि जिथे कमी केल्या जातायेत त्यात अ‍ॅडमिनिस्ट्रेशन्चा रेसिझम, विज्ञान विरोध क्लियर दिसतोय (उदा. डिओइ, सि डि सी). डिऑइ डिसमँटल करण्या मागचं कारण काहिही देत असले तरी, त्याचं खरं कारण हे एकच आहे. ते म्हण़़जे, ते जिमी कार्टर ह्या डेम प्रेसिडेंट ने ते एस्टॅब्लिश केलं होतं व ते इनर सिटी स्कुल्सना मदत करत होतं, इकॉनॉमिकली बॅकवर्ड (रिड : कम्युनिटीज ऑफ कलर) ना स्कॉलर्शीप, ग्रँट मिळत राहील हे बघत होतं. (लक्शात घ्या : डि ओ ई मधे अजिबात वेस्टफूल स्पेंडिंग नव्हतं असा अजिबात दावा नाहिये. जर खरोखर एफिशियेन्सी वाढवणे हा उद्देष्य असता तर, पुर्ण डिपार्ट्मेण्ट गट न करता फक्त ठराविक भाग कट केला असता व चांगल्या गोष्टींना फंडिंग वाढवलं असतं. आता तुम्ही म्हणाल, हे सगळ चुकिचं आहे व डि ओ ई थ्रु काहिही चांगलं, उपयोगाचं होतंच नव्हतं Proud ). बाकी सिडीसी, वॅक्सीन विरोध ह्या बद्दल तर बोलायलाच नको. सो कॉल्ड थर्ड वर्ल्ड कंट्रीज मधे इरॅडिकेट झालेले रोग परत उद्भवतायेत, ह्या मागाच्या मुर्खांमुळे...

कावळ्याला शापही द्यायची गरज नाही. गाई गुरं कोंबड्यांचं काय घेऊन बसलात! त्या मरु दे. बिचारी लहान मुलं मरत आहेत. Sad तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही याची कल्पना आहे.

>><अमेरिकेत ग्रोसरीच्या किंमती खाली येत आहेत. >> तुमची रिअ‍ॅलीटी वेगळी दिसतेय. माझ्या प्राईसबुकमधे तरी ग्रोसरीच्या किंमती सातत्याने वाढल्या आहेत.
>>
<<सरकारी नोकर्‍या कमी होतायत म्हणून गळे काढणार्‍यांना प्रश्न. करदात्यांचा पैसा व्यर्थ घालवून काही नोकर्‍या टिकवून त्याच्या बदल्यात अमेरिकेचे कर्ज आणखी वाढवत नेणे योग्य कसे ते जरा समजावा>>
सरकारी नोकर्‍या कमी करुन कर्ज कमी करणे हा खरोखर उद्देश असता तर कुणी कशाला गळा काढेल? इफिशियन्सीच्या नावाखाली कसलाही अभ्यास न करता, बर्‍या-वाईट परीणामांची पर्वा न करता केवळ मोडतोड सुरु आहे म्हणून दु:ख आहे.

<<<<बिचारी लहान मुलं मरत आहेत. Sad>>>>

फक्त लहान मुलेच नाहीत दुर्दैवाने सगळ्या च वयोगटातील लोक. पाश्चिमात्य देशात मानवाचे सरासरी आयुष्यमान हे मेडिसिन मधल्या नेत्रदीपक शोधांमुळे नाही तर पब्लिक हेल्थ मधील अत्यंत प्रॅक्टिकल उपाययोजनांमुळे वाढले. प्रामुख्याने ३ महत्वाचे उपाय म्हणजे जनरल सॅनिटेशन ची सुधारलेली स्थिती, व्हॅक्सिन्स चार वापर आणि रासायनिक खतांचा पुरवठा (ज्याने अन्नाची उपलब्धता वाढवली). ह्या मुळे पाश्चिमात्य देशांमधील सरासरी आयुर्मान ३० वरुन ६५ च्या पलिकडे गेले.

सध्याच्या प्रशासनाने नेमक्या ह्याच गोष्टींविरोधात मोर्चा उघडला आहे. वॅक्सिन आणि खतांबद्दल तर सविस्तर चर्चा झालेली आहे. जनरल सॅनिटेशन बाबतीत बोलायचे तर मध्य अमेरिकेतील पिण्याच्या पाण्यातुन फ्लोराइड काढुन टाकण्याचा प्रस्ताव मध्यंतरी वाचला. त्या पट्ट्यात दंतवैद्य फार नाहीत, फ्लोराइड नसेल तर दंत आरोग्याचे काय होणार? दंत आरोग्य पर्यायाने आयुर्मान कमी करते.

अंडी महागणे पण अक्षरशः प्राणघातक ठरू शकते. मी मध्यंतरी बातमीची लिंक टाकली होती. अंड्यांच्या किमती वाढल्याने, गरीब मधुमेही आणि मधुमेहाचा धोका असलेल्या लोकांना ती खाणे परवडत नाही. ज्या गोष्टी परवडतात (फ्रेंच फ्राईज आणि सोडा) त्यामुळे मधुमेह बळावतो.

प्रशासनातील व्यक्तींना किरकोळ वाटणारे हे मुद्दे म्हणजे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळ आहे.

नॅशनल इमर्जंसी आणि कॅनडा टेरिफ रद्द करायचे बिल सिनेटने पास केले. सिंबॉलिक रेझेल्युशन आहे. कारण याचं पुढे काही होणार नाही.
पण रिपब्लिकन कॉकस मध्ये फूट पडली, ट्रंपच्या श्रीमुखात बसली, व्हाईट हाऊसची नाचक्की झाली, हाऊस मध्ये मतं नाहीत आणि व्हिटोला तर त्याहुन नाहीत, त्यामुळे पुढे काही होणार नाहीच. पण रँड पॉल, लिसा मरकाउस्की, सुझन कॉलिन आणि .... मिच मकॉनल! थोडक्यात केंटकी बर्बनचं कावळ्याने नाक दाबलं की काय होतं ते दिसलं.
गरज नाही ना!
टेरिफच्या यादीत पण कॅनडाचं नावच नाहीये. ओ ओ!
युएसएमसीए मधल्या उत्पादनांवर आता काही कर नाही लावणार म्हणे! .. नाहीतर ढुंxx पुसायचे वांदे झाले असते!
मी जास्त पण लावू शकतो, पण नाही लावला. का? लाव की! रेसिप्रोकलच्या अर्धेच लावतोय. लावायचे की रेसिप्रोकल. का शेपुट घातलं? घाबरला का?

हर्ड अँड मॅक्डोनाल्ड बेटांवर १०% कर.
लोकसंख्या - ०
निर्यात - ०
तात्या माणसांवरच नाही तर मिडल ऑफ अँटार्टिक बेटांवरच्या पेग्विन्सवर पण कर लावतो! Biggrin

“ अंडी महागणे पण अक्षरशः प्राणघातक ठरू शकते.” - राजकीय धागा आहे, पण एक अ-राजकीय पोस्ट टाकतो.

अंड्यांची सिच्युएशन खरंच काळजी करण्यासारखी आहे आणि त्याचा राजकारणाशी संबंध नाही. कुणालाही ह्याचा दोष देता येणार नाही आणि ही परिस्थिती बदलल्यावर कुणी ह्याचं श्रेयही घेऊ नये.

देशभर एव्हियन फ्लू ने थैमान घातलंय. जेव्हा एखाद्या फार्ममधे ह्याचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा रातोरात तिथल्या लाखो कोंबड्या मारल्या जातात आणि लगोलग, त्या अंड्यांचा सप्लाय शेकडो मैल दूर असलेल्या फार्म मधून सुरू करावा लागतो (आजूबाजूच्या काऊंटीजमधून नाही करता येत). सगळी सप्लाय चेन अक्षरशः रातोरात बदलावी लागते (कुठून अंडी आणायची, कोण आणणार, केव्हढ्याला आणणार, कुठे आणणार, तिथून ती दुकानात कशी पोहोचणार). ही सगळी व्यवस्था किती दिवस/आठवडे/महिने टिकेल आणि कधी बदलावी लागेल ह्याचं कुठलंही गणित नाही. एक फार्म बंद पडल्यावर ते काही महिने/वर्ष तरी आऊट ऑफ अ‍ॅक्शन जातं.

स्टॉक मार्केट चे काय चाललय >> नक्की कुठेराहतेस तू सामो ? हे अपेक्षित नव्हते का तुला मागच्या काही दिवसामधल्या धुळवडीकडे बघून ?

Tariffs will raise 6 trillion $$. They are 'a tax cut for American tax payers', others will pay for it.
Make America great again.

<<
Tariffs will raise 6 trillion $$. They are 'a tax cut for American tax payers', others will pay for it.
>>

कोणि उधळली हि मुक्ताफळं?

साक्षात प्रेस सेक्रेटरी म्हणालेली की
“the Biden administration and the Department of Agriculture directed the mass killing of more than 100 million chickens, which has led to a lack of chicken supply in this country, therefore lack of egg supply, which is leading to the shortage.”
आता ही मास किलिंगची पॉलीसी बदलली तरी नवल वाटून घेऊ नका. मग तो फ्लू सर्वदूर पसरेल. मग त्याला गल्फ ऑफ अमेरिका सारखं अमेरिकन व्हायरस म्हणायची एओ काढा. एव्हरी थिंग बिगर, स्टुपिडिटी इनक्लुडेड!

<<<अ‍ॅमॅझॉन, अ‍ॅपल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट सगळे पडलेत.>>
पहा - त्रंपने किंमति खाली आणल्या!!
उगाच अंडी, ग्रोसरी च्या किंमति वाढल्या म्हणून काय म्हणता?
आणि गाडीच्या किंमति वाढतील म्हणून घाबरता कशाला? गाडी तर सरकारच देते आपल्याला.

“ the Biden administration and the Department of Agriculture directed the mass killing of more than 100 million chickens” - Happy १९९६ पासून हा पर्टिक्युलर स्ट्रेन अस्तित्वात आहे आणि जगभरात ह्याच पद्धतीनं त्याचा सामना केला जातो. असो. ही मुक्ताफळं पटणारी लोकं पाहिली कि मला प्रशांत दामलेचं, ‘गेला माधव..’ मधलं, ‘हिला काहीही पटतं‘ आठवतं Happy

<< कोणि उधळली हि मुक्ताफळं? >>

------ टेरिफ - टॅक्स कट बद्दल WH प्रेस सेक्रेटरीचे असे वक्तव्य होते ( AP पत्रकाराच्या प्रश्नाला दिलेले उत्तर वायरल झाले आहे) .

पीटर नव्हारो ( Sr Trade Counselor) यांनी ६ ( ते १० ) ट्रिलियन $ असा नंबर आणलेला आहे. हे आकडे कसे आले आहेत हे ट्रम्पोनॉमिक्स चा भाग आहे.

Pages