डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ८० वर्षांच्या टाकोला आज गाजर दाखवलं तर उद्या तो विसरुन स्टिकच बाहेर काढणार असेल तर आजतरी गाजर कशाला दाखवा! >>

----- कधी निव्वळ वेळाकाढू पणा फायद्याचा असतो.

कुठे कशाचे लॉजिन नाही. रशियाचे नाक दाबण्यासाठी भारतावर २५ % जादा टेरिफ.

१०० बिलियन $ अ‍ॅपल गुंतवणूक करणार आहे. EU ६०० बिलियन $, तर जपान ५०० बिलियन $..... NVDIA, AMD चीन विक्री मधून १५ % अमेरिकेला देणार आहेत ( to secure export licences to China). म्हणजे आता पैसाच पैसा...

ट्रम्प जात आहे ते अलास्का कुठे आहे? Happy

बाकी कॅनडाला स्टेट बनवायच्या नादात अलास्का रशियाला दिलं आणि आम्हाला पत्ताच नाही लागला! आता कॅनडा स्टेट झाला तर ५१ वा नाही तर ५० वा स्टेट होईल ना?
आम्ही इथे कॅनडा नॉट फॉर सेल, नो मोअर ५१ स्ट स्टेट वगैरेचे टीशर्ट मारे घेऊन बसलो. आता नो मोअर ५० एथ स्टेटचे टीशर्ट घ्यावे लागतील! असा टीशर्ट बिझनेसचा प्लॅन होता तर टाकोचा!

तर काय सांगत होतो! मेकिंग ऑफ बनाना रिप... स्मिथसोनिअन आता कुठलं दालन ठेवायचं त्यात काय ठेवायचं हे टाकोच्या इतिहासाच्या व्हिजनवर ठरवणार आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यावरुन ओव्हल ऑफिस मधील संभाषण.
डीसीच्या रस्त्यावर मिलिटरी आणली तरी एपस्टीनचे प्रश्न थांबेना. अरे एपस्टीनला विसरण्यासाठी काय काय केलं तरी तुमच्या लोकांचं तेच आणि तेच आणि तेच. काय केलं की एपस्टीनला विसराल?
उद्या काय म्हणे एपस्टीन सरवायवल कॅपिटल वर येत आहेत. महागाई, बेरोजगारी, भष्टाचार, इमिग्रेशक, हेल्थकेअर, लॉअँडऑर्डर सगळ्या मुद्द्यावर इतकी धरसोड करुन गोंधळ माजवला, सामान्य अमेरिकन माणसाला सळोकीपळो करुन सोडलं की आता एपस्टीनला विसरुन जातील, पण नाहीच. ओबामा- बायडनचे फोटो हलवले... चेक. जेरिमँडर केलं, चेक... अजुन एपस्टीनलाच धरुन आहेत. काय करावं बरं?

ते आलेले १५० बिलियन डॉलर धरुन डेफिसिट २० % वाढलं. Lol सो विसरा आता ते १५० बिलियन डॉलर. नाहीतर ४०० डॉलरचा चेक देऊन इथल्या महारथींच्या अर्थशास्त्रानुसार महागाई आणखी वाढवायचा प्लॅन होता.

पुटीन ने अमेरिकेची आणि टाकोची अमेरिकेत येऊन पार नाचक्की केली. प्रेस कॉन्फरन्स मध्ये टाको च्या आधी बोलला, टाको पेक्षा जास्तवेळ बोलला, युद्धसंधी झाली नाही ती नाहीच, एकत्र भोजनाचा कार्यक्रम होता तो ही गुंडाळावा.. न्हवे रद्दच करावा लागला, आणि पुटीन रशियाला निघून ही गेला. प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रश्नोत्तरे ही घेतली नाहीत. आता काही करायला नसल्याने टाको हरिहरी करायला डिसीला परत येतोय.
फॉक्सने ट्रम्प गॉट स्टीमरोल्ड बाय रशिया बातमी दिली. आता बोला!
सकाळी मारे अमेरिकेच्या भूमीवर रेडकार्पेट अंथरून स्वागत केलेलं. टाकोमुळे अमेरिकेला इतकी वाईट पद्धतीने जागा दाखवून मिळाली आहे. आता काय करणार? सॅकशन? टाको चे काहीतरी कॉम्प्रोमायजिंग प्रकार रशियाकडे असल्याने रशिया ब्लॅकमेल करत असेल असं पूर्वी ऐकू यायचं. ते कारण असेल का?

युक्रेनला अमर्याद अनंतकाळ पैसे, शस्त्रे, अन्य संसाधने देऊन युद्धाच्या आगीत तेल ओतून ती भडकत ठेवणाऱ्या भ्रमिष्ट म्हाताऱ्या बायडनपेक्षा हा प्रयत्ने कण रगडिता वाळूचे तेलही गळे म्हणत युद्ध थांबवायची बोलणी करणारा ट्रम्प कितीतरी बरा.
आज नाहीतर उद्या यश मिळेल. तोवर ट्रंप महाराज निंदंतु नीति निपुण: यदि वा स्तुवंतु हे धोरण समजून प्रयत्न करत राहील अशी आशा!

अरेच्चा..
आता 'हमखास' वरुन आशावादावर यावं लागलं का..

काहीवेळा हमखास यश (उदा सीमेवरील घुसखोरी थांबवणे) तर काही वेळा प्रयत्नांती यश. पण प्रयत्नच न करता यश मिळण्याची आशा करणारे डेमोक्रॅट सत्तेत नाहीत.
ट्रंप जरी वारेमाप यशाची आश्वासने देत सत्तेवर आला तरी मतदारांना हे कळत होते की १००% निर्भेळ यश असणार नाहीं. तो जे दावे करतो आहे त्यातले २०% जरी पूर्ण केले तरी तो Democrats पेक्षा २० पट सरस ठरेल हे आम्हा मतदारांना माहीत होते.
जसे मागील वेळी अमेरिका मेक्सिको मधे भिंत बांधून मेक्सिकोला त्याचे पैसे द्यावे लागणार हे काही खरे नव्हते त्यातले भिंत बांधणे तरी सुरू झाले हे मोठे काम होते. डेमोक्रॅट लोकांनी जे दिवे लावले त्यापेक्षा ट्रम्प ने कितीतरी चांगले काम केले आहे.

>> ट्रंप जरी वारेमाप यशाची आश्वासने देत सत्तेवर आला तरी मतदारांना हे कळत होते की १००% निर्भेळ यश असणार नाहीं. तो जे दावे करतो आहे त्यातले २०% जरी पूर्ण केले तरी तो Democrats पेक्षा २० पट सरस ठरेल हे आम्हा मतदारांना माहीत होते.
जसे मागील वेळी अमेरिका मेक्सिको मधे भिंत बांधून मेक्सिकोला त्याचे पैसे द्यावे लागणार हे काही खरे नव्हते त्यातले भिंत बांधणे तरी सुरू झाले हे मोठे काम होते.>> किती कोलांट्या उड्या! आता टॅरीफ हा आयात कर असल्याने तो शेवटी अमेरीकन कंझुमर्स भरणार हे देखील कबुल करुन टाकणार का?

आमच्या भागात तरी ट्रंप निवडून आला कारण एकाधिकारशाहीत आपले भले होईल यावर विश्वास असलेला, डिसफंक्शनल डेमॉक्रसी आणि चेक-बॅलन्स नसलेली व्यवस्था हवी असलेला वर्ग वाढला आहे. ही मंडळी डेमोक्रॅट्सच्या वोकपणाला विटली होती. एका सहीवर (एक्झिक्युटिव ऑर्डरवर) ट्रंप कसा सगळ्यांना नाचवतो याचे या वर्गाला प्रचंड कौतुक आहे. मात्र तोच वर्ग किमती वाढल्या तर भागवायचे कसे या चिंतेतही आहे. नोकर्‍या उपलब्ध आहेत पण त्यासाठी लागणारा स्किलसेट तुमच्याकडे नाही हे ऐकायला त्यांना आवडत नाही. बरे हा आवश्यक स्किलसेट म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही. कंपनी खर्च करेल, नोकरी करत वेल्डर, इलेक्टिशियन वगैरेची ट्रेड स्कूल पूर्ण करायची आणि 'क्लिन' रहायचे. नुसत्या एका सहीवर फॅक्टरी उभी रहात नाही, दर दिवशी नवे धोरण अशा परीस्थितीत कंपन्या फक्त गुंतवणूकीच्या घोषणा करुन टाईम बाय करतात हे कुठेतरी कळत असले तरी मान्य करायची मानसिक तयारी नाही.

इथल्या अमेरीकन फॅक्टर्‍या ज्या युनियन शॉप होत्या त्या जेव्हा बंद पडल्या तेव्हा त्या बंद पडलेल्या फॅक्टर्‍या परत उभ्या करायला जपानी मंडळींना आमंत्रण दिले, नॉन युनियन शॉप-टॅक्स ब्रेक या बोलीवर फॅक्टर्‍या सुरु होवून जॉब आले. कालांतराने मार्केट मधे नफ्यात रहायला काही कामे मेक्सिकोत आउट सोर्स करायला लागलो. त्यामुळे इथे अजून नवी प्रॉडक्शन लाईन घालता आली, नॉन यिनियन शॉप होते तिथे युनियन आली, एका प्लँटचे तीन प्लँट झाले, आपले पगार वाढले हा गेल्या चाळीस वर्षांचा इतिहास हे विसरलेत.

योर डेली रिमाइंडर डॅट मूर्ख टाको एंड हिज मूर्ख सपोर्टर्स थिंक अदर कंट्रीज पे इंपोर्ट टॅक्स (सम पीपल कॉल इट टेरिफ). थँक यू फॉर अटेंशन टू दिस मॅटर

तात्यांनी पुतीनला विचारलं "काय खाणार ?"
तर पुतीन म्हणाले "आळूचं फदफदं, सिंहगडची झुणका भाकर, लाल कांद्याची चटणी, भजी आणि भरली भेंडी "
तात्या म्हणाले " जले पे नमक छिडक रहे हो क्या ? याचा सप्लाय बंद झालाय. "

साभार - कायप्पा

रशियन ऑईल आपण फदफदं करन्सी मध्ये विकत घेतो ना? टाकूनेच विचारलं असेल फदफदं आणलं का? व्लादिमिर नाही म्हणाल्याने बोलणी फिसकटली असणार!

ट्रम्प ला हिटलर म्हणून झाले. त्याच्या अनुयायांना नाझी ठरवून झाले.
मुसोलिनी, स्टॅलिन, माओ सगळ्यांशी मनसोक्त तुलना करून झाल्या. त्याला ठार मारायचे प्रयत्नही झाले. लहरी, माथेफिरू, चंचल, कमालीचा अहंकारी नेता ठरवून झाले. आता तिसरे महायुद्ध अटळ आहे असे जाणकार इतके वेळा छातीठोक सांगत होते की सगळ्यांच्या छात्या ठणकत असतील!
पण अजून काही भीषण आर्थिक अध:पात, आ वासून उभी असणारी बेकारी, महागाई असे काहीच दिसत नाहीं.
क्लायमेट देवाला नैवेद्य, पूजा, बळी द्यायला ट्रम्प ने साफ नकार दिला. पण प्रचंड कोप आणि प्रलय , दुष्काळ, आगी, भूकंप ज्वालामुखी, जगबुडी असे काही होत नाही अजून!
आता अगदी एकेकाळची डेमोक्रॅटच्या ताटाखालची मांजरे आता त्यांच्यावर गुरगुरत आहेत.

वेल वेल!! म्हणजे आता "ट्रंप आला तरी प्रलय किंवा जगबुडी आली नाही" (सो फार) एवढाच एक फुशारकी मारायचा पॉइन्ट उरला का ट्रम्पेट्स कडे ? Happy

टाकोच्या एजन्सीजमध्ये अजुन राहिलेल्या लोकांकडून आलेल्या आकड्यांवर विश्वास ठेवायचा का आता! Rofl स्वतःचं हसं कसं करुन घ्यायचं हे रिप्स कडून शिकावं.

डिसेंबर २०२४ मध्ये अमेरिकेत इन्फ्लेशन २.९% होतं. तरी बिडेन काळ म्हणताना जून २०२२ मधला ९.१% हाच रेट का धरून बसतात? त्या धक्क्याने यांचा मेंदू फ्रीझ झाला तो ट्रंप निवडून आल्यावरच जागा झाला का?

>>
वेल वेल!! म्हणजे आता "ट्रंप आला तरी प्रलय किंवा जगबुडी आली नाही" (सो फार) एवढाच एक फुशारकी मारायचा पॉइन्ट उरला का ट्रम्पेट्स कडे ?

<<<
वेल वेल, ट्रम्प च्या प्रत्येक कृतीचे भयानक, महाभयानक परिणाम होणारं असे प्रत्येक वेळी छाती बडवून सांगणारे महाज्ञानी तोंडावर पडत आहेत हे दाखवून देत आहे.
भगवान क्लायमेट ची बाय डन काळात नित्य पूजा होत होती. भजने,कीर्तने होत होती. क्लायमेट इमर्जन्सी नामक प्रलयंकारी संकट उरावर आहे असे सांगत होते. सैन्यदल बाकी सर्व शत्रू नष्ट झाले..फक्त रेसिजम आणि भगवान क्लायमेट ची पुरेशी पूजा अर्चा न केल्यामुळे माजलेला अधर्म एवढेच काय ते शत्रू उरले होते. म्हणून क्लायमेट बाप्पा मोरया म्हणत विविध कार्यक्रम हाती घेतले. रणगाडे आणि अन्य सैनिकी वाहने बॅटरी वर चालवून क्लायमेट देवाला खूश करायचा प्रयत्न इ आचरट प्रकार चालू होते.
Trump ने सगळे प्रकार थांबवले पण अहो आश्चर्यम्! क्लायमेट देवाचा कोप झालाच नाही. ह्या कोपिष्ट देवासमोर गुडघे न टेकता सैन्य शस्त्र सज्ज करणे, गे ट्रान्स ड्रॅग क्वीन वगैरे बिनडोक , विकृत पणा त्यागून पौरूष , पराक्रम, शारीरिक ताकदीकडे लक्ष देणे सुरू झाले. तरी क्लायमेट देवाचा कोप होत नाही.

<<<युक्रेनला अमर्याद अनंतकाळ पैसे, शस्त्रे, अन्य संसाधने देऊन ............... युद्ध थांबवायची बोलणी करणारा ट्रम्प कितीतरी बरा.>>>
+१.
त्यासाठी अलास्का, अर्धा युक्रेन आणि नो टॅरिफ असे द्यावे लागले तरी हरकत नाही. वाटल्यास करदात्यांच्या पैशातून एक दोन बिलियनची आर्थिक मदत पण. शिवाय अमेरिका पुनः युक्रेनला काहीहि मदत करणार नाही हे वचन.
बदल्यात रशियात ठि़कठिकाणी ट्रंप टॉवर, ट्रंप हॉटेल बांधायला परवानगी. शिवाय त्रंपला टेबलाखालून १ बिलियन डोलर्स.

<<<वेल वेल, ट्रम्प च्या प्रत्येक कृतीचे भयानक, महाभयानक परिणाम होणारं असे प्रत्येक वेळी छाती बडवून सांगणारे महाज्ञानी तोंडावर पडत आहेत हे दाखवून देत आहे.>>>
निदान येत्या दोन तीन वर्षात तरी. मग काही का होईना!!

Pages