डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही असले तरीही अमेरिकेची सॉफ्ट पॉवर कमी झाली आहे हे खरे. (ते चांगले की वाईट हे सोडून देऊ)
सरकार बदलले तरी परराष्ट्र धोरणात फार फरक पडत नाही. (चीन व रशियात तर सरकारही बदलत नाही). मग त्याला ब्यूरोक्रॅसी म्हणा किंवा डीप स्टेट.
आपल्याकडे मनमोहन यांचे सरकार जाऊन त्यांचे कट्टर विरोधक मोदी आले तरी त्यांनी मनमोहन यांनी केलेला अणूकरार फाडून टाकला नाही किंवा इतर देशांशी केलेले करार 'आम्ही नाही जा' म्हणून रद्द केले नाहीत.

इथेही बुश जाऊन त्यांच्या अगदी विरुद्ध असलेले ओबामा आले तरी परराष्ट्र धोरण फार बदलले नाही,

ट्रंप यांनी मात्र पार उलटे पालटे करून टाकले आहे. यू एन मध्ये रशियाच्या बाजूने मतदान काय, नॅटो मधून बाहेर जाण्याचे सूतोवाच काय. यामुळे पुढे अमेरिकेवर कुणी विश्वास ठेवेल असे वाटत नाही. चार वर्षांनी कदाचित न्यूसम येतील, ते परत नेटो मध्ये जातीलही, पण तरी कुणी हमी देणार नाही की आणखी चार वर्षांनी व्हान्स येतील व बाहेर पडतील.

तेच डील ठरलं होतं, ट्रंप आणि झेलेंस्किमधे आणि तो सहि करण्यासाठिच येणार होता. पण तो आला हिडन अजेंडा घेउन - अमेरिकेने फक्त युक्रेनची साइड घ्यावी. असं होत नाहि ना बाळा आर्ब्रिट्रेशन मधे. >> थांब राज. त्याचा अगेंडा काय वगैरे बाजूला ठेव. तात्याने एका शब्दाने तरी युक्रेन नाही तर रशिया युद्धखोर आहे नि इथे दोषी आहे हे स्पष्ट शब्दांमधे मांडलेले ऐकलेस का ? माझा मुद्दा हा आहे. दादागिरी फक्त दुबळ्यांसमोर केली जातेय.

>>काही असले तरीही अमेरिकेची सॉफ्ट पॉवर कमी झाली आहे हे खरे.<<
विच सॉफ्ट पावर यु आर टॉकिंग अबौट? टॅक्सपेयर्स्च्या खिशातुन काढलेले पैसे खिरापती सारखे वाटल्यावर मिळालेला लिडरशिपचा मुकुट? च्यायला, एकिकडे नॅशन्ल डेट ३०+ ट्रिलियन झालंय म्हणुन गळे काढायचे, इयर-ओवर-इयर डेफिसिट वाढवत न्यायचा आणि केवळ हा मुकुट मिरवता यावा म्हणुन स्वतःचाच देश गर्तेत ढकलायचा? नॉट एनी मोर..

युक्रेन्/तैवान अँड हुएवर इन द लाइन, नीड टु वेक अप. इन रश्या/चायना काँफ्लिक्ट, अमेरिका विल्नॉट हॅव ए स्किन इन द गेम अन्लेस ए प्रॉपर डील इज ड्रॉन फेवरिंग अमेरिका, अँड गेट्स साइन्ड.. द मेसेज इज क्रिस्टल क्लियर - अमेरिका फर्स्ट...

>>दादागिरी फक्त दुबळ्यांसमोर केली जातेय.<<
बरं. काहिंना तसं वाटत असेल. पण सत्य परिस्थिती तशी नाहि. परत लिहायचा कंटाळा आलाय...

<< हे म्हणजे युद्धखोरी नाकारायची आणि बुलींग्च झोडपत बसायचं>>>
धन्यवाद, तुमच्या कॉमेंट मुळे डोळे उघडले की झेलेंस्की नेच आक्रमण केलंय. त्यानेच युद्ध सुरू केलं असणार नाहीतर तो कसा असेल युद्धखोर. >>

------ युद्धखोर कोण आहे ?

२०१४ मधे, रशियाने युक्रेनचा भाग असणारे क्रिमिया गिळंकृत केले. सध्याचे युद्ध रशियाने सुरु केले आहे. पूर्व युक्रेनचा लचका तोडला आणि दोन प्रांत स्वातंत्र केले. दोन्ही बाजूची हजारो लोक मारल्या गेली आहेत. युक्रेन प्रतिकार करत आहे. प्रतिकार करणे याला युद्धखोर म्हणता येणार नाही.

<< ट्रंप यांनी मात्र पार उलटे पालटे करून टाकले आहे. >>

------ सहमत , येत्या काही दिवसांत पुढील घटना बघायला मिळाल्या तर आष्चर्य वाटायला नको .
रशियाला G20 मधे तसेच G7 ( G8 होणार ) मधे प्रवेश.
रशियन बँकांचा SWIFT मधे समावेश
अमेरिकन उद्योगांना रशियन बाजारपेढ उपलब्द तसेच रशियन आक्रमणानंतर तिथून पिटाळून लावलेले उद्द्योगधंदे ( mcdonold, KFC, Exon mobil, 3M, John Deere, Kellogs, Whirlpool Ford, Bunge..... शेकडो कंपन्या आहेत).

अमेरिक-रशिया शिखर परिषदेसाठी ट्रम्पची मॉस्को भेट.

झेलेंसकी साठी युद्धखोरी हा शब्द वाचून आश्चर्य वाटले. रशियाने सार्वभौम देशावर आक्रमण केले. जीओपॉलिटिकल रिऍलीटी वैगेरे सगळं ठीक पण रशिया ने युद्धाला सुरुवात केली. आणि झेलेंसकी पूतीनचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता फक्त सीझफायर इत्यादी सहजगत्या मोडता येणाऱ्या गोष्टींनी युद्ध थांबवण्यास राजी नाहीये - म्हणजे काय की युक्रेन युद्धातन माघार घेईल पण रशिया घेणार नाही - हा युक्रेनी लोकांच्या स्वातंत्र्यावर संपूर्ण घाला असेल.

ही युद्धखोरी आहे?

बरं. काहिंना तसं वाटत असेल. पण सत्य परिस्थिती तशी नाहि. परत लिहायचा कंटाळा आलाय... >> हेगसेथचे वक्तव्य वाचल्यावरही तुला अजून तसेच वाटातेय का आता ?

असे ऐकिवात येते आहे की सगळ्या डेमोक्रॅट्सनी ट्रान्स स्त्रियांना/व्यक्तींना स्त्रियांच्या खेळात भाग घेण्यास रोखणाऱ्या विधेयकाच्या विरोधात मतदान केले आहे. परिणामी या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकले नाही.
या व्यक्तींना स्त्रियांसोबत खेळताना शारीरिक रचनेमुळे व हार्मोन्समुळे फायदा होतो आहे हे ऑलिम्पिकमध्ये किमान २ केसेस मध्ये दिसले असताना याला विरोध करण्याचे कारण काय?
ट्रान्सजेन्डर व्यक्तींना योग्य रिप्रेझेंटेशन देण्याच्या मोहिमेत स्त्रियांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होते आहे का?

<< झेलेन्स्कीबापू नरमले (असं दाखवतायत). तात्यामास्तरांचं ऐकेन म्हणतात. >>
----- त्याच्या हातामधे कुठलेच कार्ड नाही. Happy

नेब्रास्का दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे Lol
तिकडचे ७०% शेतमजुर इल्लीगल आहेत.
युएस एड फायरिंग मध्ये कामं आणि सबसिडी दोन्ही गेल्या
टेरिफ वॉर मध्ये शेतमाल पडून रहाण्याची/ किंमत कमी मिळण्याची/ रेव्हेन्यू कमी हो़ण्याची शक्यता.
कॅनडाचं पोटॅश महागण्याची, रशिया-युक्रेन मधुनही महागण्याचीच शक्यता आहे.

थोडक्यात पहिला रेड स्टेट सहा महिन्यांत धारातीर्थी पडण्याची शक्यता आहे. वाजवा रे वाजवा!

तर ट्रेड वॉर मधला एक दिवस पूर्ण व्हायच्या आतच डॉनाल्डची सपशेल माघार. One day into tariff war, U.S. says de-escalation now possible एका दिवसांत फेटेनल आणि इमिग्रेशन सॉल्व्ह झालं बहुतेक.
ल्युटनिकने आमच्या प्रिमिअरला (डग फोर्ड) फोन केलेला म्हणे. फोर्डने मिशिगन, मिनिसोटा, न्यूयॉर्कचे इलेक्ट्रिसिटी रेट २५% वाढवले, डॉनाल्ड टॅक्स २५% + ओंटारिओ २५% का कसं माहित नाही. थोडक्यात कॅनडाची टफ पॉलिसी काम करते आहे दिसतंय. अमेरिकन लिकर अनेक प्रोव्हिएंसेसने शेल्फवरुन काढून टाकली आहे. कॅनडात दारूची विक्री बर्‍यापैकी प्रोव्हिएंसच्या हातात असते त्यामुळे अमेरिकन दारू बंद आणि जिकडे आहे तिकडून लोकच घेईनासे झाले आहेत.

आता टेरिफ वगैरे जाऊन युएसएमसीए रिव्ह्यू करू थोडक्यात निगोशिएटिंग टेबलवर बसू. बोलून प्रश्न सोडवू असा जमिनीवरचा सूर तात्याचे पित्ते आऴवू लागले आहेत. पायाखालची जमिन सरकण्याची आवश्यक्ता होतीच.

<< ल्युटनिकने आमच्या प्रिमिअरला (डग फोर्ड) फोन केलेला म्हणे. >>
----- वीज तोडण्या सारखी कठोर भाषा करु नको असे सांगितले. ऐकेल तो डग कसला... अमेरिका धमकावत रहाणार आणि कॅनडाने सर्व काही मुकाट्याने सहन करायचे.

आज ट्रूडो " डोनॉल्ड ..... " संबोधला तर लागलीच पर्सनल अटॅक वाटला.... काल पर्यंत ट्रम्पने अनेक वेळा कॅनडीयन गव्हर्नर , ५१ वे राज्य म्हणाला होता तेव्हा ट्रम्पने राजकीय शिष्टाचार पाळला होता?

काही चांगल्या बातम्या
आधुनिक हिटलर समजल्या जाणाऱ्या इलोन मस्कने आपली रॉकेट कंपनीचे कौशल्य वापरून नऊ महिने अंतराळात अडकून बसलेल्या दोन अंतराळ वीरांना सुखरूप परत आणले. अर्थात ह्यालाही नाके मुरडली जातील ह्याची खात्री आहे.
भ्रमिष्ट म्हातारा बायडन अध्यक्ष असताना मस्कने त्याला ह्याबद्दल विचारणा केली होती पण मस्क ट्रंप च्या बाजूचा असल्याने म्हाताऱ्याने त्याला उडवून लावले. अंतराळवीर कायमचे अडकले तरी हरकत नाही पण मस्कची मदत नको अशी प्रगल्भ भूमिका म्हाताऱ्याने घेतली.

समर्थाघराचे श्वान शेपटी हलवत तासभर इस रूट की सभी लायने व्यस्त है ऐकत बसलेले म्हणे!
मालक भर सभेत हसून जोक करत होते तो तासभर, याच विषयावर.
मग तब्बल दोन तास बोलून शेवटी वाटण्याच्या अक्षता मिळाल्या. तेलही गेले तूपही गेले... हाती राहिलेले धुपाटणे तरी अमेरिकन लंबर चे आहे का? नसेलच!

तूर्तास Democrat पक्षाची लोकप्रियता पाआआआआर रसातळाला गेल्याचे आनंदमय वृत्त मिळाले! CNN नामक कायम त्या पक्षाची बाजू लावून धरणाऱ्या पक्षपाती वृत्तवाहिनी ने जनमत चाचणी घेतली त्यात हे निष्पन्न जाहले!
नको त्या लोकांची तळी उचलून सामान्य लोकांकडे त्यांच्या समस्यांकडे साफ दुर्लक्ष करायचे फळ त्यांना निदान काही वर्षे तरी मिळो ही प्रार्थना.

<< >>
मस्कच्या टीमला शून्ये मोजता येत नाहीत हे दिसलं आहेच, आता कोट्यावधी म्हणा नाहीतर अब्जावधी - कोण मनावर घेणार?
>>
एक हिशेब चुकला. मान्य. पण बाकीच्या हिशेबांचे काय? त्यात तर चूक नाही?
एखाद्या छिद्रान्वेषी कावळ्याप्रमाणे निव्वळ दोषच बघणार का? >>

------- डोज कडून एकच नाही अनेक घोळ होत आहेत. संपूर्ण व्हिडिओ बघितला तर खोली लक्षात येते.

CNN आवडत नाही म्हणून MSNBC
https://youtu.be/VHlXqBYDWfQ?t=68

<< Trump सरकारने गाझाला पाठवले जाणारे ५ कोटी डॉलर रद्द केले. कशासाठी होते हे? चांगला प्रश्न आहे! हे होते गाझा च्या नागरिकांना कंडोम घेता यावेत म्हणून! बहुधा हे ठरलेल्या कामासाठी न वापरता कुठलेसे शस्त्र बनवायला वापरले जात होते असे कळते.
काहीही असले तरी अमेरिकन करदात्यानी ह्या बहुमोल कामात योगदान द्यावे असे काहीही दिसत नाही.
Submitted by shendenaxatra on 28 January, 2025 - 15:44. >>

------- पैसे दिल्या गेलेले गाझा वेगळेच आहे.... मोझांबिक मधला प्रांत. "...condoms were not for the Palestinian territory of Gaza but for the African country of Mozambique, which has a province called Gaza.... " पण मोझांबिकच्या या गाझामधे ही $ ५० दशलक्ष पैसा कंडोम साठी दिला गेला नव्हता असे CNN म्हणतो.

https://www.cnn.com/2025/02/12/politics/some-of-the-things-that-i-say-wi...

एकापेक्षा जास्त वेळा चूक होणे शक्य आहे. पण चूक असेल दुरुस्त करायला हवी.

मोझांबिक मधल्या गाझा इथे कंडोम घ्यायला लक्षावधी डॉलर वाटले असतील रार मग हरकत नाही. त्या गरीब लोकांना अब्जावधी कंडोमची निकडीची गरज असणार ह्याची खात्री आहे! आणि अमेरिकन करदात्यांची ही जबाबदारीच आहे आफ्रिकेच्या कुठल्याशा कोपऱ्यातील लोकांची कंडोमची गरज पूर्ण करण्याची. आता खरोखर इतके कंडोम , इतके पैसे लागतात का ? खरोखर कंडोम घेतले जातात का? असे प्रश्न विचारू नयेत.

आर्लिंग्टन सेमेटरी च्या वेबसाईट वरून ब्लॅक आणि फिमेल वेटरंसच्या माहितीच्या लिंक्स काढून टाकल्या. बहुतेक ते डीजर्विंग नसावेत, कारण डीईआय मुळेच आलेले आणि वेटरन झालेले असतील.

<<< मस्कने त्याला ह्याबद्दल विचारणा केली होती पण मस्क ट्रंप च्या बाजूचा असल्याने म्हाताऱ्याने त्याला उडवून लावले. अंतराळवीर कायमचे अडकले तरी हरकत नाही पण मस्कची मदत नको अशी प्रगल्भ भूमिका म्हाताऱ्याने घेतली.>>>

असे तुम्ही लिहिता आहात पण नासा नि दोन्ही अंतराळवीरांनी हे नाकारले होते.
तुमच्यावर विश्वास ठेवणे कठिण्च आहे म्हणा - आधी रिपब्लिकनांना ट्रंपने बोललेले सगळे खरे वाटते नि बाकी सगळे ते कसे खोटे आहे हे सांगतात.

मी आजच ऐकले की कॅनडातल्या काही विक्रेत्यांनी साडेबारा टक्के टॅरिफ देण्याचे मान्य केले आहे.
आता यावरून ट्रंप बरोबर होता असे म्हणायला पाहिजे.

https://youtu.be/WuVg1R_n32E?si=U426Kw1rJGBQt7x0

हे पहा अंतराळवीर काय म्हणतात ते.
मस्क म्हणाला ते १००% खरे आहे. पण मला बाकी तपशील माहीत नाही..
काय म्हटला मस्क ? या आधी अंतराळवीरांना परत आणण्याची तयारी दाखवली होती पण आधीच्या सरकारने धुडकावून लावले.

जर्मनी आणि युके ने अमेरिकेवर ट्रॅव्हल अ‍ॅडवायझरी टाकली. Biggrin कॅनडा ही टाकू शकेल. राजाने पाकिस्तान, नॉर्थ कोरियाच्या रांगेत अमेरिकेला बसवल्याबद्दल अभिनंदन. आता रशिया, बेलरूस आणि चीन बरोबर हॉकी खेळायची वेळ आलीच आहे. Lol

कॅनडाच्या सनविंग, फ्लेअर, एअरकॅनडा, वेस्टजेट, एअर ट्रॅन्झॅट अशा लहान मोठ्या सगळ्या विमानकंपन्यांनी अमेरिकेची सेवा बंद किंवा कमी केली आहे. मार्च मध्ये २५% कनेडिअन लीझर ट्रॅव्हलर्सनी अमेरिकाप्रवास स्वयंघोषित बंदी म्हणून काढलेलं तिकिट रद्द केलं आहे. ४०% लोकांनी अमेरिकेऐवजी मेक्सिको, करेबिअन्सची निवड केली आहे. २०२४ फेब्रुवारी पेक्षा २०२५ फेब्रुवारीत ६००,००० (सिक्स हन्ड्रेड थाउजंड) कमी कनेडिअन लोकांनी अमेरिकेत पाऊल ठेवले आहे. खरं वातावरण मार्च पासून तापू लागलं त्यामुळे मार्चचे आकडे आणखी जास्त मनोरंजक असतील. Wink
अमेरिकेत साऊथवेस्ट, डेल्टा, अमेरिकन, युएस सगळ्यांची पुढच्या दोन तिमाह्यांची फोरकास्ट खाली गेली आहेत. फेडएक्सने ही फोरकास्ट रिवाईज केलं आहे.
वॉशिंग्टन पोस्टने २०२५ मध्ये अमेरिकन टूरिझमला अंदाजे ६४ बिलियनचा तोटा होईल असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजे किती जॉब जातील! त्यात महागाई वाढू लागली की आणखी मज्जा!

टुरिझम जाऊद्या. बिझनेसचे काय? फ्रेंच, जर्मन, ब्रिटिश आणि कॅनेडियन लीगल नागरिकांना परत नाही पाठवलं तर अब्युझ केलं, तुरूंगात टाकलं. या बातम्या वाचून आता अमेरिकेत मिटिंग्स, कॉन्फरन्सेस आणि इतर बिझनेस ट्रॅव्हल कोण आणि किती करेल विचार करा. आणखी जास्त मज्जा! दोन महिन्यात एक माणूस किती वाट लावू शकतो हे बघण्यासारखं आहे.

बाकी आमच्याकडे एक डझन अंडी $२.१० (२ युएस डॉलर, साधारण ३ कनेडिअन डॉलर) ला आणि मुबलक मिळत आहेत.

इलॉन डेमॉक्रॅट्सना शिव्या घालतोय.. त्याला काय रिपब्लिकन लोक टेस्ला घेतात वाटलं होतं की काय! Rofl रोज टेस्का गडगडला आणि जगात + कॅलिफोर्नियात टेस्ला कोणी घेत नाहीये वाचलं की हल्ली एकदम गार वाटतं. समर इज कमिंग!
लाँग लिव्ह द किंग!

कॅनडाने जर एफ-३५ ची आधी ठरल्याप्रमाणे सगळी ऑर्डर घेतली तर ती पूर्ण करायला अमेरिकेत जॉब तयार करण्याऐवजी कॅनडात जॉब तयार करू अशी लॉकिड मार्टिनने कॅनडाला ऑफर दिली आहे.
लॉकिड मार्टिन ट्रंपचा डोनर आहे.
ट्रंपने ५१ स्टेट करुन गोंधळ घालण्याआधी कॅनडा ८८ एफ-३५ घेणार होती. त्यातील. १६ विमानांचे पैसे देऊन झाले आहेत. उरलेली ऑर्डर रद्द करावी असा लोकांचा आता या ५१ स्टेट रेडरिकमुळे दबाव आहे.

Pages