डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्ज कमी करायच्या वल्गना असताना डेब्ट सिलिंग वाढवून का हवे आहे? की सिलिंग वाढवून मग आता अ‍ॅवेलेबल क्रेडीटच्या इतकेच टक्के क्रेडिट वापरात असे म्हणजे पूर्वीपेक्षा कित्ती कमी अशी नुसतीच आकडेवारीची धूळफेक?

<<<हर्ड अँड मॅक्डोनाल्ड बेटांवर १०% कर........अँटार्टिक बेटांवरच्या पेग्विन्सवर पण कर लावतो! >>>
त्याला म्हणतात दूर दृष्टी. उद्या चीनने सगळा माल त्या बेटांवर पाठवला नि तिथे मेड इन चायना च्या पाट्या काढून तो माल अमेरिकेला पाठवला तर टॅरिफ नाही असे व्हायला नको.

Amazon स्टॉक २४० ला होता, आता तो १७० ला आला आहे
कंपनी तीच आहे पण मार्केट ते विचारात घेत नाही

पहा - त्रंपने सांगितल्याप्रमाणे किमती खाली आणल्या!!

दोन मतदात्यांना दोन मिलीयन डॉलर जाहीरपणे वाटून, "हि निवडणूक मानवजातीचे भवितव्य ठरवेल" असे म्हणूनही मस्क ज्या विस्कॉन्सीन मधल्या निवडूकीबाबत बोलत होता तिथला मस्कचा उमेदवार पडला.

एकेकाळी सोरोस सोरोस म्हणून रडणारे लोक आज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस उघडपणे पैसे फेकुन पब्लिक पॉलिसी कंट्रोल करू पाहतो त्याला चिअर करतायत!

स्टॉक मार्केट पडणे, लोकांचे 401k पडणे हे वाईट आहेच. पण तरी अमेरिकेने एकतर्फी बाजारपेठ बनणे समर्थनीय का? आणि किती दिवस ते चालणार?
अमेरिकेत जपानी आणि युरोपियन कार मोठ्या दिमाखात जात असताना युरोप आणि जपान मात्र अमेरिकन कारवरती चाप लावणार हे का?
समजा मेक्सिको अमाप प्रमाणात अव्हाकाडो अमेरिकेत निर्यात करत आहेत. त्यांना ही निर्यात शून्य करून तसेच मातब्बर गिर्हाईक मिळणार आहे का? मग ह्या झाडांना तोडून ते दुसरी लागवड करतील का अमेरिकेशी समझोता तह करून मार्ग काढतील?

माझ्या मते स्टॉक पडणे हे वाईट असले तरी तो एक हिस्टेरिया आहे. कदाचित लोक जागे होऊन पुन्हा स्टॉक विकत घेऊन मार्केट वर नेतील. अमाप धुरळा उडला आहे तो खाली बसल्यावर कदाचित वेगळे चित्र दिसेल अशी आशा!

परंतु क्ष देश अमुक एक प्रमाणात टेरिफ लावतो तितकाच अमेरिका लावणार हे तत्त्व मला तरी पटणारे आहे. त्यात खोट काय आहे? निदान काही देश तरी ह्यामुळे नमून टेरिफ कमी करतील आणि अमेरिकन शेतकरी, उद्योजक ह्यांचा फायदा करून देतील आणि त्यातून शेवटी नागरिकांना फायदा होणार असा हिशेब आहे.
बायडनच्या नोटा छापण्याच्या, लॉक्डाऊन आणि अगणित बेकायदा घुसखोरीला उत्तेजन देण्याच्या प्रकाराचेही अनेक तथाकथित अर्थज्ञांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. आता हेच तज्ञ टेरिफ कसे वाईट आणि बेकायदा घुसखोरी थांबवणे किती घातक वगैरे सांगत राहतील यात शंका नाही. कदाचित युद्धे थांबवणेही त्यांच्या लेखी वाईटच असेल.

<< अमेरिकेत ग्रोसरीच्या किंमती खाली येत आहेत. गॅसोलिनचेही भाव बर्यापैकी खाली आलेले आहेत. >>

------ ग्रोसरीच्या किंमती खाली येत आहे?

स्टॉकच्या किंमती खाली आल्या आहेत... अगदी आपटल्या म्हटले तरी चालेल. पण स्टॉक म्हणजे ग्रोसरी नसावी.

परंतु क्ष देश अमुक एक प्रमाणात टेरिफ लावतो तितकाच अमेरिका लावणार हे तत्त्व मला तरी पटणारे आहे. त्यात खोट काय आहे?

>>>ट्रम्पला tariff आणि ट्रेड डेफिसीट हया दोन गोष्टींमधला फरक समजत नाही.
“There does not appear to have been any tariffs used in the calculation of the rate,” said Mike O’Rourke, chief marketing strategist at Jones Trading, in a note to investors Wednesday. “The Trump administration is specifically targeting nations with large trade surpluses with the United States relative to their exports to the United States.”
पण लक्षात कोण घेतो? ट्रम्प ने किया तो सोच समझकर ही किया होगा.

>>ग्रोसरीच्या किंमती खाली येत आहे?
होय. बायडनच्या काळात ज्या प्रमाणात वाढ ल्या होत्या त्या मानाने खाली आलेल्या आहेत.
कुठला डेटा सांगतो की ट्रंपमुळे ग्रोसरी महागल्यात?

>>ट्रम्पला tariff आणि ट्रेड डेफिसीट हया दोन गोष्टींमधला फरक समजत नाही.
हो फक्त ट्रंप द्वेष्ट्या लोकांनाच कळतो.
कुठल्याश्या तज्ञाच्या जडजंबाल अनाकलनीय गोलमाल विधानाऐवजी ठोस उदाहरणे द्या.
उदा. अमुक तमुक कारणामुळे चीनवर टेरिफ लादणे चूक. आपण इतका माल चीनकडून घेतो आणि चीन तमका माल घेतो आणि म्हणून चूक.

आणि बहुतांश टेरिफ हे कायम नसून संबंधित देश वाटाघाटी करायला नाईलाजाने तयार व्हावेत म्हणून खेळलेली खेळी आहे. ह्यात धोका आहे पण फायदाही आहे. काळच सांगेल हे किती यशस्वी होते ते.

तोवर तथाकथित अर्थतज्ञ ट्रंप कसा महामूर्ख आहे हे वेगवेगळे सूर आळवत गातील तेच ऐकावे लागेल!

But if you unpick the formula above it boils down to simple maths: take the trade deficit for the US in goods with a particular country, divide that by the total goods imports from that country and then divide that number by two.

A trade deficit occurs when a country buys (imports) more physical products from other countries than it sells (exports) to them.

For example, the US buys more goods from China than it sells to them - there is a goods deficit of $295bn. The total amount of goods it buys from China is $440bn.

Dividing 295 by 440 gets you to 67% and you divide that by two and round up. Therefore the tariff imposed on China is 34%.

Similarly, when it applied to the EU, the White House's formula resulted in a 20% tariff.

Are the Trump tariffs 'reciprocal'?
Many commentators have pointed out that these tariffs are not reciprocal.

Reciprocal would mean they were based on what countries already charge the US in the form of existing tariffs, plus non-tariff barriers (things like regulations that drive up costs).

But the White House's official methodology document makes clear that they have not calculated this for all the countries on which they have imposed tariffs.

Instead the tariff rate was calculated on the basis that it would eliminate the US's goods trade deficit with each country.

Trump has broken away from the formula in imposing tariffs on countries that buy more goods from the US than they sell to it.

For example the US does not currently run goods trade deficit with the UK. Yet the UK has been hit with a 10% tariff.

In total, more than 100 countries are covered by the new tariff regime.

https://www.bbc.com/news/articles/c93gq72n7y1o

जडजंबाळ बोलणारे अर्थतज्ञ मूर्ख पण वाट्टेल ते फेकणारा ट्रम्प हुशार! आता बीबीसी सुद्धा कसे डावे आणि खोटारडे आहेत येउदे म्हणजे वर्तुळ पूर्ण होईल.

बीबीसी डावे आणि खोटारडे आहेत ह्याला पुरावा देणे म्हणजे भूतलावर दिवसा डोक्यावर तळपणारा तारा हा सूर्यच आहे ह्याचे पुरावे देण्यासारखे आहे.
गरजच नाही!
आणि ही वाटाघाटीला उद्युक्त करण्याची एक खेळी आहे. त्यामुळे हस्तिदंती मनोर्‍यात रहाणारे बुद्धीजीवी ज्यांनी आयुष्यात कधी उद्योग धंदा केलेला नाही अशांची मते कितपत ग्राह्य मानावीत हा प्रश्नच आहे.

खोखोखो.

बरं तुम्ही समजावून सांगा काय मेथोडोलोजी आहे. जर बीबीसी नको असेल तर तुम्ही तुमचा स्रोत द्या. जिथे कट अँड ड्राय विषय आहे तिथे सोर्स बद्दल वाद घालणे म्हणजे वस्तुस्थिती नाकारणे झाले.

आणि कशाबद्दल वाटाघाटी करायच्या आहेत नक्की? इमरजन्सी पॉवर वापरून tarrif लावले आहेत. उगाच मोघम पणे "बिझनेस असाच असतो" म्हणून उपयोग नाही. नक्की एन्ड गोल तरी काय आहे आणि ते कसे साध्य होणार आहे हे सांगा??

अगदी सोपा एंड गोल आहे. अगदी तुम्हालाही कळेल.
जर तुम्ही आमच्या मालावर टेरिफ नामक जाचक कर लादणार असाल. तर आम्हीही तुमच्या मालावर टेरिफ नामक जाचक कर लादू.

जर तुमच्यावर लादलेले टेरिफ कमी व्हावे असे वाटत असेल तर आमच्या मालावरचे टेरिफ कमी करा आणि मग आम्ही करु.

तुमच्यावर लादलेला करांचा बोजा आवडत नसेल तर आम्हालाही तुमच्या करांचा बोजा आवडत नाही.

तुमच्यावर लादलेल्या करांमुळे तुमचे शेतकरी, उद्योजक, नागरिक त्रस्त होत आहेत तर आमच्यावर लादलेल्या टेरिफ करामुळे आमचे उद्योजक, शेतकरी, नागरिक त्रस्त होत आलेले आहेत.

शेतकरी, उद्योजक, नागरिक मग आता आनंदी असतील ना? मग इतकं गिल्टी एक्सप्लनेशन कशाला येतंय? तुमचा देश, तुमचे नियम. हवे तितके कर लावा! त्याचं इतकं स्पष्टीकरण द्यायची मागा लोकांना गरजच का पडावी म्हणतो मी! खच्चून कर लावा. आणि ते लोक जर ६० आणि ७० % लावत असतील तर तुम्हाला निम्मा लावायचा पुळका का येतोय? या अशा पुळकेबहाद्दर अध्यक्षांमुळे कधी ग्रेट अगेन होईल तरी का!
त्यांनी ६० लावला तर तुम्ही १२०% लावला पाहिजे. अशा निधड्या छातीचा लीडर बघा बाबा पुढच्या वेळी! हे शेपुट घालू कामाचं नाही.

कॅनडा इतका २५०% कर लावतं आणि यांनी काय केलं. १२५% तरी लावला असेल वाटलं ना? नाही. किमान एक चतुर्थांश! ६०% तरी... ऊ हुं! नाही!!! त्यांना कॅनडाला पूर्ण सोडून दिलं करातून! पहिला स्टील आणि अल्युमिनिअम वर २५% लावला आणि आता कार्सवर तेवढा लावला.. बाकी घाबरले बहुतेक कावळ्याला. गाई गुरं मारू म्हणून नुसता शाप दिला आणि काम झालं. तेच मेक्सिकोचं. काहीच नवे कर नाहीत. तुम्ही ५००% लावला पाहिजे. अशाने टफ प्रतिमा डागाळून जाईल बरं!
जानेवारीत म्हणतो फेब्रुवारीत लावू. फेब मध्ये आणखी एक महिना मुदत करुन मार्च आला. मार्च मध्ये मुदतवाढ करुन एप्रिल आला. कर लादायचं नावच घेईना तात्या. लाऊन लाऊन कार्सवर लावले. ते ही इतके चक्रम सारखे की अमेरिकन लोकांच्याच पायावर धोंडा मारुन घेतला.
आमच्या हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड प्रशिक्षित पंतप्रधानाने फार काही न बोलता.... बोलेतो कमितकमी शब्दांत जास्तित जास्त त्रास होईल असे कर लावले त्याचा अभ्यास करुन एंड गोल ध्यानात ठेवून ते अचिव करण्यासाठी कर लावा म्हणावं. हे बाबूराव आपटे स्टाईल हातात गन मिळाल्यागत गोळीबार करतय.. Lol आम्हाला तर लय मजा येते आहे. Lol आता या टॅरिफ मेस मधुन बाहेर पडायला एक्झिट प्लॅन कसा असेल ते बघणं जाम मनोरंजक असणार आहे. Lol

कॅनडामधे अफाट महागाई आहे. नको इतके इमिग्रेशन (अगदी कायदेशीर) करुन नको इतके लोक बाहेरुन आयात केले आहेत. समस्त कॅनडावासी कावलेले आहेत. ट्रंपचा द्वेष ह्या एका गोष्टीने ह्यातले काहीही कमी होणार नाही. मोठा रोग झाला आहे आणि काही तास सुटका म्हणून एक पेन किलर घेतली तसे ह्या ट्रंप द्वेषाचे आहे. थोड्या वेळ बरे वाटेल पण काही काळाने वास्तव जाणवेल. निव्वळ अमेरिकेचा काल्पनिक बट्ट्याबोळ पाहून आपल्या समस्या सुटत नाहीत ह्याची जाणीव होईल अशा शुभेच्छा!
तशात ट्रुडोला लाजवेल असा कडवा ट्रंपद्वेष्टा पंतप्रधान बनणार अशी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे आनंद आहे!

<< >>ग्रोसरीच्या किंमती खाली येत आहे?
होय. बायडनच्या काळात ज्या प्रमाणात वाढ ल्या होत्या त्या मानाने खाली आलेल्या आहेत.
कुठला डेटा सांगतो की ट्रंपमुळे ग्रोसरी महागल्यात?
Submitted by shendenaxatra on 5 April, 2025 - 13:55. >>

------ तुमचेच विधान आहे ग्रोसरीच्या किंमती खाली येत आहे. कुठल्या भागांत आणि कुठल्या वस्तूं च्या किंमती खाली येत आहे ?

बायडन काळ संपला आता ट्रम्पचे राज्य सुरु आहे.

<< आणि कशाबद्दल वाटाघाटी करायच्या आहेत नक्की? इमरजन्सी पॉवर वापरून tarrif लावले आहेत. उगाच मोघम पणे "बिझनेस असाच असतो" म्हणून उपयोग नाही. नक्की एन्ड गोल तरी काय आहे आणि ते कसे साध्य होणार आहे हे सांगा?? >>

----- वाटाघाटी नकोत असेही कुणी म्हटलेले नाही? त्या कायम होतच असतात.

या आधी असा पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार झालेला आहे. इतर देशांतून अमेरिकेत आयात मालावर टेरिफ लावल्याने प्रश्न सुटेल असेल १९३० पण वाटले होते. most catastrophic acts in congressional history असे म्हटले जाणारा Hawley-Smoot Tariff Act पास केला. तेव्हाही नुकसान झाले आणि आज त्याची पुनरावृत्ती होत आहे.

ट्रम्प आणि चहात्यांची परिस्थिती या वर्गातल्या विद्द्यार्थ्यांसारखी आहे.
https://youtu.be/AyyAh2lQXF8?t=46

आताच भारतामधील एका चॅनेल वर दाखवलं की अमेरिकेत ट्रम्प आणि मस्क विरोधात लोकं रस्त्यावर उतरलेत, खरं आहे का?

>>>परंतु क्ष देश अमुक एक प्रमाणात टेरिफ लावतो तितकाच अमेरिका लावणार हे तत्त्व मला तरी पटणारे आहे. त्यात खोट काय आहे?> एकूणिसाव्या शतकापासू न वैश्विक आर्थिक सिध्दांत लागू करण्याचा प्रयत्न केला सर्व देशांनी आणि तो आहे
थियरी ऑफ कोम्पिटिटिव्ह अ‍ॅडव्हान्टेज
तो तात्या गाळात घालताहे

परंतु क्ष देश अमुक एक प्रमाणात टेरिफ लावतो तितकाच अमेरिका लावणार हे तत्त्व मला तरी पटणारे आहे. त्यात खोट काय आहे?

हा प्रश्न प्रामाणिक आहे हे गृहित धरून,

लहानपणी बाबांच्या सरकारी नोकरीमुळे काही वर्षे नाशिक मध्ये गेली. तिथली सिक्यूरिटी प्रेस, तिथून बाहेर येणारे नोटांनी भरलेले ट्रक्स वगैरे पाहून माझ्या मनात विचार आला की सरकार ने असे कारखाने प्रत्येक जिह्ल्यात काढले व लोकांना नोटा वाटल्या तर गरीबी आपोआप दूर होईल. हे तत्व मला तरी पटणारे आहे, त्यात खोटं काय आहे ?

चीन वर अमेरिकेने टेरिफ लादले तर चीन चे नुकसान होईल व अमेरिकेचा फायदा होईल हे गृहितकही वरील बालसुलभ गृहितकाप्रमाणेच चूक आहे. ट्रंप तुम्हाला आवडत असेल, तो प्रचंड मतांनी निवडून आलेला असेल, लोकप्रियही असेल, पण फिजिक्स , केमिस्ट्री, अर्थशास्त्र यांचे मूलभूत नियम बदलेल इतकी पॉवर नाय त्याच्याकडे. (वेल, तिकडे डेमोक्रॅट स बायॉलोजी चे नियम बदलू पहात आहेत, हेही आहेच).

हे टेरिफ वॉर अमेरिकेच्या हिताचे नाही हे गेले दोन तीन दिवस मार्केट मध्ये झालेल्या पडझडीने दिसून आले आहेच. ट्रंप थोडेसे नमते घेइल हीच एक आशा , अन्यथा सगळेच बुडाले तर निदान श्री कृष्ण तरी 'संभवामी युगे युगे' हे वचन पाळतील.

विजय जी प्रश्नाचे उत्तर प्रिन्सिपल ऑफ कॉम्पिटिटिव्ह अ‍ॅडव्हान्टेज मध्ये आहे.
यात बॅलन्स ऑफ ट्रेड सांभाळण्यास स्वतःचा कॉम्पिटिटिव्हनेस वाढवणे आवश्यक आहे टॅरिफ वाढवणे हे उत्तर नाही

<<<
परंतु क्ष देश अमुक एक प्रमाणात टेरिफ लावतो तितकाच अमेरिका लावणार हे तत्त्व मला तरी पटणारे आहे. त्यात खोट काय आहे?

आणि ही वाटाघाटीला उद्युक्त करण्याची एक खेळी आहे.

>>>
स्पोकन लाइक ट्रू मागा इडियट Proud

वाटाघाटी करायच्याच असतील तर प्रत्येक देशाची युनिक कळ अमेरिकेला ठाऊक आहे. जसे भारत विरुद्ध पाकिस्तान वगैरे… त्यासाठी स्वतःच्या नागरिकांवर कर लावणे हा हास्यास्पद प्रकार स्टेबल जीनियसच करू शकतो, आणि तुमच्या सारखे कुलेड प्यालेले त्याच्या मागे जाऊ शकतात Proud

आणि लावायचेच असतील टेरिफ तर प्रत्येक देशाचा विक पॉइंट हेरून त्या प्रमाणे लावा ना, उदा. बांगलादेशचा कपडा, तैवान चं इलेक्ट्रॉनिक्स वगैरे, जेणे करून, त्या देशाची दुखती नस दाबली जाऊन स्वतःच्या नागरिकांच्या दैनंदिन जिवनावर कमितकमी परिणाम होईल. उगाच काहितरी सिक्स्थ ग्रेडर मॅथ वापरून सरसकट सगळ्या देशांवरती टेरीफ लाऊन तात्या गेले गोल्फ खेळायला. आता त्याच्या कल्ट चे येडे छाती पिटतायेत, त्यांना तर बिचाऱ्यांना टेरिफ म्हणजे ते स्वतःच टॅक्स भरतात हे सुद्धा कळत नाही Proud मज्जाच मज्जा.

आता सर्व देश त्यांचा स्वतःचा व्यवस्थित वेळ घेऊन, खऱ्या एकोनॉमिस्ट ना कन्सल्ट करून, अमेरिकेची त्या देशाशी असलेली दुखती नस ओळखून, स्वतःला कमीतकमी त्रास होईल हे बघून प्रत्युत्तर देतील.

बट अगेन, डॅट इज टू मच लॉजिक अँड कॉमन सेन्स फॉर हिज कल्ट त्यामुळे असो…

बादवे, पहिल्या शंभर दिवसांत, तात्याने ओबामा बायडेन पेक्षा कितीतरी जास्त गोल्फ खेळलेय, तेही स्वतःच्या प्रायवेट कोर्सवर….. खेळेनाका बापडा… ग्रॉसरीच्या प्राइसेस कमी झाल्या म्हणजे झालं Proud

Pages