चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20250319_232912_Gallery.jpg
ड्रॅगन महाशयांचे हे भलेथोर्ले कुटुंब गेली अनेक वर्षे उपेक्षेची धूळ खात एका कोपऱ्यात सुस्त आणि मस्त पडून आहे.
साखरेचे, दुधाचे, चहाचे भांडे आणि सहा कप आणि त्यावर 3D कोरलेले कप.... Very impressive but unused.

टी सेट्स ची क्रॉकरी निरुपयोगी असली तरी attraction टी पॉटचंच असतं लहानपणापासून. म्हणून प्रत्येक मुलीकडे चहाचा सेट ची भातुकली असतेच. तुमची तर खूप सुरेख आणि क्युट आहे

खरय सिमरन.... उद्या न वेळ काढून मी खेळण्यातल्या आणखी टी सेट्स चे फोटो टाकील. माझ्या आते सासूबाईंच्या खेळण्यातले, कमीत काम 80 वर्षे जून असतील... त्या जाऊनही 10 वर्ष झाली, आणि जाताना त्यांचे वय 80 होते.

अतिशय सुंदर आणि नाजूक असे हे नॅपकिन होल्डर मी अभावानेच वापरले असावेत. पाहुण्यांचा काय भरवसा फोडले तर, त्यांना मुलांसारखे चार धपाटे पण मारता येणार नाहीत, या भीतीपोटी बहुदा ; हा ) ;-);-)

सगळच भारी आहे! पण मला प्रश्न पडलाय की एवढं सगळ नाजूक समान सांभाळून ठेवायला जागा किती लागत असणार?

गंधकुटी,
त्या कप बशा फारच क्यूट आहेत...
ड्रॅगन प्लेट आणि जग सुंदर....
विशेष आवडले ते नॅपकिन होल्डर... Very unique.
तुमच्याकडचे कलेक्शन दुर्मिळ आहे.

There is a lot more to share.... Happy

मस्त धागा आहे हा. एकसे बढकर एक क्रोकरी कलेक्शन बघायला मिळाले .
गंधकुटी यांचे कलेक्शन तर एकदमच युनिक आणि मस्त आहे .

गंधकुटी, काय सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडे!!
आणि त्याच्याबरोबर माहितीपण किती छान वाटतेय वाचायला!

Simply Amazing ❤️
पत्ता सांगा बघू
आलेच धावत

काय अफाट सुंदर संग्रह आहे तुमचा गंधकुटी. पण एवढे सगळे सांभाळायला जागा आणि मेहेनत ही खूप लागत असेल.

आते सासूबाईं ची चिनी मातीची भातुकली.... एक रुपयाच्या नाण्यामुळे आकार समजू शकतो... खालचा फोटो चिटिंग आहे तो लाकडी भातुकलीच्या भांड्यांचा आहे. Sorry coldnt resist the temptation.:-)

आता प्रमाद घडलाच आहे तर... Let me share closeup. शेजारी La Opala cha डेस्सर्ट बोल आहे त्यामुळे हे किती चिंटूकले पिंटूकले आहेत ते कळेल... आणि त्यावर अगदी micro size च्या मण्यांचे काम आहे. ते हातात घेतानाही माझा हात थरथरतो की कुणी कधीकाळी हे किती skillfully कौशल्याने हाताने बनवले असेल, कुणी तितक्याच प्रेमाने आपल्या मुलीसाठी ते हौसेने घेतले असेल आणि त्या मुलींनी पण ते व्यवस्थित पणे खेळले असेल. काहींच्या वरच्या मण्यांचे आवरण तुटायला लागलंय, the thread is giving up... But they are so beautiful... It's simply amzing!

ही पण सुंदर आहे.८० वर्षे जुनी भातुकली निगुतीने जपून ठेवलीय खरंच कौतुक आहे.

मी पण चीटिंग केली असती पण माझी लाकडाची भातुकली खेळणी गावाला आहेत ,जी मी गणपतीपुळ्याला घेतली होती.आधी लक्षात आलं असतं तर फोटो काढून ठेवला असता. तुमची हि लाकडाची पण छान आहे विशेष म्हणजे रंग खूप नैसर्गिक आहेत नवीन खेळण्यासारखे भडक आणि कृत्रिम नाहीत.

सिमरन, किल्ली, मामी, अनिंद्य, ऋतुराज, निलुदा, प्रज्ञा , झकासराव... I am so happy to share these, आणि तुम्हाला आवडतय हे फारच छान वाटतंय. ह्या सगळ्यांबरोबर आठवणी गुंफलेल्या आहेत... त्यामुळे ही अडगळ अगदीच अमूल्य अशी समृद्ध अडगळ आहे खरी... Fortunately there is space to keep it.

हे मात्र चिटिंग नव्हे ह... मातीच्या भांड्या वर cold ceramics प्रकाराने म्हणजे चॉक पावडर आणि डिंक मिसळून माती बनवून तिने ही फुले पाने मी 98 मधे बनवली होती. It is sort of trinket box. कधी कधी मला असे क्रिएटिव्ह किडे चावतात.

चीनी माती ही चीनीच का, रशियन किंवा जापानी माती का नाही असा प्रश्न कधी पडलाय का ?

उत्तर दडले आहे Kaolinite नामक एका अत्यंत उपयोगी पदार्थात. चीनीमाती आणि काओलिन दोन्ही नावांच बारसं चीन/ चीनमधल्या Kao Ling वरून झालं आहे. तिथे ही चीनी माती उर्फ़ Kaolinite भरपूर सापडते म्हणे. शेकडो वर्षांपासून खणत आहेत तरी संपली नाही म्हणे. (मी काही स्वत: बघितले नाही हां, मला चीनला जायच्या नावानेच घाम फुटतो )

भारतातही आहे चीनी माती पण साठे कमी. बिहार, उत्तर प्रदेश आणि अरावली पर्वतपायथा म्हणजेच राजस्थान, दिल्ली वगैरे भागात नैसर्गिकरित्या सापडते काओलिन / Kaolinite.

ही चीनी माती उर्फ़ Kaolinite सुघट्य असल्याने त्याची विविध सुंदर रूपे आपल्या रोजच्या वापरात आहेत-असतात, अगदी आजी पणजीच्या काळापासून. तुमच्याही घरी नवी-जुनी असतीलच. गेलाबाजार वर्षाचे साठवणीचे लोणचे स्टोअर करायला घरोघरी बरण्या चीनामातीच्याच असतात हमखास. जम्बूद्वीपे भारतखंडे सर्वत्र; आसेतुहिमाचल.

Usable art चे भोक्ते असाल तर रोज वापरण्याच्या वस्तूंमधले हे सौंदर्य आपले सुखसोबती ठरते, खूप आनंद देते.

कलात्मक संग्रह करण्याची आवड असेल तर एक personal म्यूजियम तयार होते, तेही अनेकांचा आनंदठेवा ठरते.

व्वा, धाग्याबद्दल फारच महत्त्वाची माहिती दिलीत तुम्ही Happy
माझ्यासाठी तर इथला संग्रह सुद्धा एक आनंदठेवाच आहे.

@ गंधकुटी,
ती इवली इवली भातुकली ८० वर्षे जुनी. किती निगुतीने जपली आहे तुम्ही.
आणि या सगळ्यांबरोबर गुंफलेल्या आठवणी. त्यासुद्धा जपल्या आहेत. त्यामुळे ही अडगळ नसून तो खजिना आहे.
एकदा बघायला फार आवडेल.

चॉक पावडर आणि डिंक मिसळून माती बनवून तिने ही फुले पाने मी 98 मधे बनवली होती. >>>>> दंडवत.
हे असले चावरे किडे आणखी बघायला मिळाले तरी चालतील Happy

Screenshot_20250321_131647_Gallery.jpg
पाँडिचेरी च्या अरबिंदोश्रम मधून ही पाण्याची चिनी मातीची बाटली घेतली आहे. तिथे खूप सुंदर पॉटरी आयटेम मिळतात, स्वतः पॉटर किंवा तिथले स्वयंसेवक विकायला असतात, खरे सांगू, तिथले सगळेच उचलून आणावे वाटते, पण कंबक्त जेब है की मानती नहीं... ही घेताना एकदम tough competition एक पिवळी फुले असलेली सिरॅमिक प्लेट जी केवळ शो पीस असेल, ही बाटली आणि राकुं टेक्निक ने बनवलेल्या बाटलीत होती. पॉटर ने सांगितले की ती बाटली पण शो पीस असेल कारण, apparently the finish of that technique will not permit to hold water.... So this beauty wins. युसबल पॉटरी पीस.

मला तर पाण्याच्या बाटलीपेक्षा तो बाजूचा वास जास्त flamboyant दिसतोय Happy तोही सिरामिक असावा.

त्या शंखाच्या bangles make a striking prop as well. So quintessentially Bengali Happy

ला तर पाण्याच्या बाटलीपेक्षा तो बाजूचा वास जास्त flamboyant दिसतोय. >>> exactly. बाटलीही सुंदर आहे पण हा वाज तर एकदम वेगळाच आहे.

हो तो वास ही बाटली इतकाच नजरेत भरतोय. आणि बंगाली बांगड्या .
फोटोच इतका कलात्मक आहे की ड्रॉइंग च्या परीक्षेसाठी प्रॉप्स फुलं देतात त्याची आठवण झाली.

Pages