चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hasami >>> होय. आपली एक जुनी माबोकर आहे मिनोती म्हणून - तिने सांगितलं हे. तिला प्रचंड आवड आहे पॉटरीची.

Beautiful blue and gold colour of Sake Jug.
त्या जपानी ललनांचा ग्लास सेट मस्त आहे.
@MeghaSK, Black and White कप मस्त आहेत

@ गंधकुटी,
तुम्हाला संपर्कातून मेल केला आहे. प्लीज पहा.

लग्नात गिफ्ट मिळालेला हा Parka ग्लासेस cha set आता 4 उरलेत. It has coasters which can used as lids... सुंदर जांभळा आणि पिंक असे कलर कॉम्बिनेशन आहे.

Screenshot_20250326_210112_Gallery.jpg

Glasses of various shapes and sizes.
I am yet to buy Champaign flutes...
एकदा त्या flutes मधून रंगी बेरंगी काही तरी प्यायले होते, आणि घ्यायचे ठरवले होते... पण मग अग बाई, ह्यांना धुणे खूपच कठीण असेल बाई, नकोच ते... म्हणून ठेऊन दिले होते. ,;-)

Screenshot_20250326_214047_Gallery.jpg

This made in china बोल हा एकाच रंगाच्या hues and shades ने बनला आहे. A single piece, age unknown, I am seeing it for nearly 30 years.

या चहा प्यायला.... या जपानी टी सेट चे सौंदर्य फोटोत capture करणे कठीण आहे... I have tried.

Fortunately लाकडी पॅकिंग शाबुत असल्याने गूगल मातेने त्याविषयी additional information दिली आहे.
Screenshot_20250327_082139_Gallery.jpgScreenshot_20250327_081914_Gallery_0.jpgScreenshot_20250327_082701_Gallery_0.jpg

घरात ही perforated ceramic plates होते, pan te काय आहेत हे नक्की माहिती नव्हते... Apparently te tablewar गरम भांडी ठेवण्यासाठी किंवा strainer mhanun स्वयंपाकघरात वापरत असत म्हणे.
Screenshot_20250327_084830_Gallery.jpgScreenshot_20250327_084848_Gallery.jpg

गंधकुटी
अप्रतिम खजिना आहे तुमचा

खूप संदर collection पहात आहे ह्या धाग्यावर

मला पण कुठेही गेले की क्रॉकरी घ्यायची फार आवड आहे.

हा माझा आवडता vase
WhatsApp Image 2025-03-27 at 14.49.09 (3).jpeg

ह्या अश्याच जमा केलेल्यांपैकी काही
WhatsApp Image 2025-03-27 at 14.49.09 (2).jpeg

हा सेट लिस्बन ला फिरतांना घेतलेला .
WhatsApp Image 2025-03-27 at 14.49.09 (1).jpeg

पॅरिस मधील क्युट espresso shot coffee cup
WhatsApp Image 2025-03-27 at 14.49.08 (1).jpeg

ह्या एकाच ग्लासवर Flamenco डान्स करत असलेल्या स्पॅनिश नर्तिका
WhatsApp Image 2025-03-27 at 15.00.13 (1).jpegWhatsApp Image 2025-03-27 at 15.00.13.jpeg

Wow मस्त कलेक्शन माधुरी, नर्तिका असलेला ग्लास सुंदरच !
वरच्या गंधकुटीं च्या पाण्याच्या भांड्याबरोबर देवघर, किचन अर्ध घरच दिसतंय ,तेही स्वच्छ सुंदर. क्रॉकरी त्या किती निगुतीने जपत असतील व स्वच्छ ठेवत याबद्दल शंकाच नाही. पण. खरंच एवढं मॅनेज करणं कठीण आहे. कसं करता..

माधुरी१०१

छान कलेक्शन आहे तुमचे.

मला फोटो क्र. २ मधले पांढरे बोल विशेष आवडले. Those Corded ends are giving them very stylish look 👌

गंधकुटी खजिना कसा काय सांभाळून ठेवता?….

+ १११

बक्षी नेमत असत पूर्वीचे संस्थानिक लोकं तसे करता की काय? 😀

Jokes apart, संग्रही काय काय आहे आणि कुठे काय ठेवले आहे हे लक्षात ठेवणे सुद्धा कठीण असावे.

Catalog केलाय की स्मरणशक्ती झिंदाबाद ?

कौतुक आहे.

गंधकुटी, अफाट संग्रह आहे तुमचा सिरॅमिकचा.

बक्षी नेमत असत पूर्वीचे संस्थानिक लोकं तसे करता की काय? >>> मला पण तुम्ही कुठल्या तरी संस्थानाच्या हर हायनेस असल्याचा संशय आहे. संग्रह कसा सांभाळता हा पुढचा भाग झाला, माझ्या ममव डोक्यात पहिला विचार आला की एवढा संग्रह ठेवायला राजवाड्याएवढी जागा लागेल.

माधुरी१०१ , सुंदर आहे कलेक्शन.

गंधकुटी खजिना कसा काय सांभाळून ठेवता? >>> हा प्रश्न मलाही आहे Happy त्यांचं एखादं म्युझिअम असावं अशी मला सूक्ष्म शंका आहे Proud

जबरदस्त फोटो आलेत इथे.
@गंधकुटी,
तुमच्याकडून फार महत्वाची आणि वेगळी माहिती मिळत आहे.
Made in china बोल हा एकाच रंगाच्या hues and shades ने बनला आहे.>>>>> त्याचा रंग छान आहे.
ह्याबद्दल मी अधिक गुगलून पाहिलं.
तेव्हा खालील माहिती मिळाली. तुम्हाला ती ठाऊक असणारच पण माझ्यासाठी ही नवीन माहिती. धन्यवाद .
Hue:
This is the basic, pure color, like red, blue, or green, without any additions of white, black, or gray.
Shade:
A shade is a hue to which black has been added, resulting in a darker version of the original color.
Tint:
A tint is a hue to which white has been added, resulting in a lighter version of the original color.
Tone:
A tone is a hue to which gray has been added, resulting in a muted or desaturated version of the original color.

या चहा प्यायला.... या जपानी टी सेट चे सौंदर्य फोटोत capture करणे कठीण आहे >>> खरच. मला तर उचलून घरी आणावा वाटतोय.
perforated ceramic plates>>> त्यावरील तो चेहरा पाहून ही पण दुर्मिळ गटात मोडत असणार.
पाण्याची भांडी मस्त. त्यात मागे पिचवाई आर्ट पेंटिंग मस्त आहे.
हा सगळा खजिना पहायला नक्की यायला हवं. Happy

@माधुरी १०१,
तुम्ही तुमच्या कलेक्शन सोबत जोरदार एन्ट्री मारली आहे.
सगळ्या वस्तू मस्त आहेत.
मला व्यक्तिशः vase, भडक रंगाचे बोल, लिस्बन सेट आणि
Flamenco डान्स करत असलेल्या स्पॅनिश नर्तिका ग्लास विशेष आवडले.
लिस्बन सेट हॅण्ड पेंटेड असावा.

माधव आणि रमड आम्ही ही टिपिकल ममव आहोत. कुणीही पाहुणे येणार म्हटले की आधी झाडू हातात घेऊन साफ सफाई करण्यासाठी लागावे लागते कारण जेवढे मोठे घर तेवढे मोठे पसारे... गेल्यावर्षीपर्यंत माझे स्वतःचे busy schedule होते तेव्हा मी ... समझोता गमोसे कर लो .... या चालीवर धुळीशी समझोता केला होता. मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे बघत नव्हती, जेव्हा मला crockery हवी तेव्हा मी स्वच्छ करून घेणार, उरलेला काळ धुळीने आरामात तिथे बसावे असा आमचा करार होता. आता मागचे सहा महिने थोडा रिकामा वेळ असल्याने मी साफ सफाई मोहीम regularly करायला लागले आहे. एरव्ही ती धूळ मला दिसतच नसायची.... सिलेक्टिव व्हिजन.... कठीण साधनेनंतर ही सिद्धी प्राप्त होते. ;हा)

खरे सांगायचे तर ही बरीचशी क्रॉकरी मी inherit केली आहे, पण मला आवड असल्याने मी आवर्जून वापरतेही. ऋतुराजच्या या धाग्यामुळे मी सुंदर आकार आणि रंगाच्या व्यतिरिक्त आणखी डोळसपणे त्यांच्याकडे पहायला लागले.

क्रॉकरी धुळीची चिंता करत जर पॅक करून ठेवली तर वापरली जाणारच नाही, ती accessible ठेवली की तुम्ही वापरता, त्यांचा स्पर्श, रंग, लकाकी, वैशिष्ट्यपूर्ण घाट हे enjoy करायला आहे, त्या मुळे धुळीशी मैत्री करायची. धूळ अच्छी है असे स्वतःला सांगत रहायचे... अर्थात हे कधीकधी backfire पण करते, माझा मुलगा स्पायडर आपले मित्र आहेत आणि जाळ्या मध्ये धूळ आणि सूक्ष्म जीवजंतू चिकटून हवा स्वच्छ ठेवतात अशी थिअरी सांगतो तेव्हा त्याची थिअरी विकत न घेता त्याच्या हातात झाडू देऊन उंचावरच्या जाळ्या काढून घ्याव्या लागतात.

Pages