चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा
सिमरन,
बोल याचं थेंबाचं टेक्श्चर>>>>> भारीच.
मामी,
कुठून कुठून आणता हे कलेक्शन 😍
काटे दाखवणारा मासा कम लँप>>>> खूपच भारी आहे
त्याचा इतका लचका तोडलाय तरी हसरा दिसतो आहे हा मासा>>>>> Lol

धन्यवाद.

कुठून कुठून आणता हे कलेक्शन. >>> हा कुठून आणला होता आता आठवतही नाहीये.

आईसक्रीम तिन्हीं जगाचे
चमच्याविना भिकारी

79f3a700-6f45-4587-a445-4fe586fb35aa.jpeg

काचेचे चमचे.
वय = १६ वर्ष.

यांचे उर्वरित कुटुंब शहीद झाले आहे.

मधल्या काळात ही निळी क्रॉकरी बाजारात ट्रेंड होती मला पण ही गिफ्ट मिळाली होती . ट्रे खूपच जुना आहे बहुतेक आईच्या लग्नातला

IMG_20250307_091010.jpg
वरती ट्रेच्या निळ्या रंगात नीट दिसत नाही डिझाईन इथे नीट दिसेल

IMG_20250307_091107.jpg

आणि हे माझे फेवरेट कप विथ चहा आणि शेताचा व्यू.

IMG_20250307_085321_0.jpg

तिथूनच डोंगराचा व्यू दिसतो त्यामुळे त्याचाही फोटो काढलेला

IMG_20250307_095514.jpg

आईसक्रीम तिन्हीं जगाचे
चमच्याविना भिकारी>>>>
अनिंद्य,
अगदीच नाजूक आणि छान आहेत चमचे.

सिमरन,
कप आवडले आणि शेताचा view पण.

हे चखना पॉट्स.

यांना तुम्ही काय म्हणता / म्हणाल ?

12edc58e-45f8-4de3-a4f6-8ebf3309c9f9.jpeg
असे ४ आहेत त्यात पुण्यवंतांना snacks यथा - नट्स, शेव वगैरे सर्व करण्यात येतात.

जबरी आहे.
पुण्यवंत व्हावे घेता स्नॅक्स ची नावे.....

अनिंद्य ,सेम पिंच, हे इतकं सुंदर कमळासारखं दिसतं की वापरत नाही. जपून ठेवलेलं IMG_20250313_093205.jpg

पण मध्यंतरी उर्मिला निंबाळकर चा एक व्हिडिओ पाहिला होता त्यात ती म्हणाली होती सुंदर वस्तू कपडे नुसते ठेवून देण्यापेक्षा किंवा मग वापरू ,ओक्याजन ला वापरू, पण तो प्रसंग काही येत नाही,आणि छान छान वस्तू नुसत्या पडून राहतात तशाच खराब होतात , वस्तू वापरा .वस्तू वापरण्यासाठी असतात.
तेव्हापासून कपडे असो का क्रोकरी मी रोज वापरायला सुरुवात केली .तसही उद्या वापरू म्हणून आपण म्हणतो पण तो उद्या आलाच नाही तर. निगेटिव्ह नाही पण ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

उर्मिला निंबाळकर कोण ते नाही माहित. पण माझे २ पैसे :

हे सहसा करत नाही पण इथल्या धागामित्रांना एक आगाऊ सल्ला देईन म्हणतो. भोचकपणा वाटला, सल्ला नाही आवडला तर सोडून द्या.

घरात सुंदर, हौसेने घेतलेले कपबशी सेट्स, वासेस, डिनर सेट्स, बोल्स, सिरॅमिक प्लेट्स वगैरे कपाटात पडून असतील, 'खास' पाहुण्यांची वाट बघत असतील तर त्यांना ताबडतोब वापरायला काढा.

आपल्या स्वतःच्या घरात आपल्यापेक्षा आणि आपल्या कुटुंबा-प्रियजनांपेक्षाही 'खास' असा तो भूमंडळी कोण आहे ?? वर्षा-महिन्यातून ४-५ दा येणारे पाहुणे ? No No No आपण स्वतःच 'खास' आहोत; खास चे पण Boss आहोत, व्हेरी व्हेरी स्पेशल.

So , let the entire set of beautiful stuff in your house serve YOU first . You deserve it more than anyone else !

मी तरी असेच समजतो आणि म्हणून माझ्याकडे 'ठेवणीतले' काहीच नाही, सगळेच नेहेमीच्या वापरातले आहे.

मेरे घर का मैच बादशाह 😁

अनिंद्य तुमच्या पूर्ण पोस्ट ला +1000000

उर्मिला निंबाळकर ऍक्टरेस आहे आता युट्यूब इन्फ्लुन्झर ,छान असतात तिचे व्हिडीओज .पूर्वी कपडे मेकअप लाइफस्टाइल वरचे व्हिडीओज बनवायची जे थोडक्यात आणि उत्तम असायचे आतातर वेगवेगळ्या विषयावर बनवायला लागली आहे तेही उत्तम आहेत . तिच्या चॅनेल वर जाऊन पाहू शकता.

हा तो वरचा व्हिडीओ https://www.instagram.com/reel/Cz3YGkKv3C2/?igsh=MTZjZzBxMjIzaHR6Mw==

युट्यूब चॅनल वरचा पूर्ण व्हिडीओ
https://youtu.be/y3zh9TR8G5M?si=8ndJt9kXPeWmLY9l

अनिंद्य, वर्षूताई... सेम पिंचवालं काचेचं पॉट क्यूट आहे.

याला मराठीत काहीतरी म्हणतात ना? बक्कम बहुतेक.

बक्कम ?

चालावे, कारण तसे भक्कम आहेत हे मजबूतीला Lol

Biggrin

त्यात नट्स भरले की ते भरबक्कम होईल.

काचेचे असल्यामुळे >>> हपा, असा अपमान करू नका त्याचा. क्रिस्टल आहे तो Happy

हो त्यातला नट-रंग नीट दिसेल. आणि सोबतच्या क्रिस्टल ग्लासात नीट वारुणी पण दिसेल.

नीट >>> Wink

वस्तू वापरा .वस्तू वापरण्यासाठी असतात. >>> येस मी पण पाहिला होता तो व्हिडिओ. तेव्हापासून या अशा खास टाईप वस्तू, कपडे वापरायला काढले आहेत. आणि भारी वाटतं आहे.

आपण स्वतःच 'खास' आहोत >>> बरोबर आहे. अनिंद्य, पूर्ण पोस्ट पटली आणि आवडली.

@ सिमरन.
@ rmd

थँक्यू.

“ठेवणीत” काही ठेऊ नये फार हेच खरे Happy

माझ्याकडे दोन गार्डन एंजल्स आहेत. गार्डियन नव्हे, गार्डन एंजल्स. दोन्ही सिरॅमिकमधे आहेत.

एक आहे मोठा handmade व्हास. यात फुलं इ ठेऊ शकतो. या परीला दोन चिंटुकले त्रिकोणी निळे पंख आहेत. तिच्या भोवती झाडं आणि गुलाबाची फुलं आहेत. आकाशात सूर्य आणि ढग दिसत आहेत तर मागे डोंगरही दिसत आहेत. खूप खूप वर्षांपूर्वी मुंबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमधे एका प्रदर्शनातून घेतला आहे.

IMG_20250315_120448_(1080_x_1080_pixel).jpgIMG_20250315_120509_(1080_x_1080_pixel).jpg

ही एक नेहमीच्या आकाराची टाईल आहे. ही मी मागे कधीतरी अमेरिकेत एका thrift store मधे घेतली होती.

IMG_20250315_120534_(1080_x_1080_pixel).jpg

दोन्ही वस्तू माझ्या अति जिव्हाळ्याच्या आहेत.

Everything that blooms and grows
Gardening Angel scatters and sows.
वाह !

हे वाक्य तर निसर्गाच्या धाग्यावरसुद्धा शोभेल आणि तुमची ही टाईल प्लेटही.

Pages