चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर.

रच्याकने, बाबांचा बालमित्र त्यांच्या वर्गात हे कोडे टाकत असे :

काकाचा धरला कान आणि काकीचा घेतला मुका Lol

उत्तर अर्थातच कप-बशी

म्हणून कप बशीतून चहा प्यावा. >>> मग चहा पिऊच नये. चहा हे गरम पेय आहे ते गरमच प्यायचं असतं - घशाला शेकत शेकत. कोमट पेयाला xxवणी म्हणतात. त्याहून थंड करून प्यायल्यास ती व्यक्ती चहा प्यायच्या लायकिची नाही असे समजून तिला पुढच्या वेळेस चहा दिला जात नाही. Happy

Screenshot_20250220_072238_Gallery.jpg
.
Screenshot_20250220_072231_Gallery.jpg

हा सेट गेल्या वर्षी मिळाला आहे.
आता अधून मधून वापरतो

चहासारखेच तरतरी आणणारे एक अन्य पेय चाखण्यासाठीची फुलपात्रवजा भांडी Happy

ed61757c-af21-46b0-adf3-73882b26cb39.jpeg

कुणालाही “त्या” विशिष्ट पेयाबद्दल अधिकची चर्चा करता येऊ नये म्हणून ग्लास आणि ग्लासमालक दोघेही रिकामे असतांना फोटो काढण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी Lol

मस्त आहेत ग्लास.

चहासारखेच तरतरी आणणारे एक अन्य पेय म्हणजे काय रे भाऊ? Lol

अनिंद्य, डिट्टो असेच ग्लास माझ्या बहिणीकडेही आहेत Happy

मोर नाचरा फारच छान, ऋतुराज. कलेक्शन जबरा दिसतंय तुझ्याकडे.

Hanging planters. आधी मी यात खरी मनीप्लँट्स लावली होती. यांचा मुळातील आणि कालौघात वापरामुळे आलेला rustic look मला आवडतो. टेक्श्चर काहीसं खरखरीत आहे.

IMG_20250221_081530_(1080_x_1080_pixel).jpgIMG_20250221_081548_(1080_x_1080_pixel).jpg

सगळ्यांचे फोटो मस्त. मी बऱ्याच दिवसांनी आलो इथे. मागची २-३ पाने म्हणजे भारीच आहेत.>>>>>>> + १००

Hanging planters जबरी आहेत, मामी.
वर्षू ताई
तुमच्याकडचे कलेक्शन पण भारी आहे
इथे नक्की टाका फोटो.....

थांकु ऋतुराज
याच्या बरोबर एक चिटुकला कोकोनट शेल पासून बनविलेला चमचाही होता. आता हरवला तो

सुस्नात (बिनकामाचा) मेसन जार

f704706f-8d19-4ebe-a644-82534a9b26ba.jpeg

Hanging planters सुरेख आहेत मामी. आणि त्यातून ओघळणारा तो मोगर्‍याच्या कळ्यांचा गजरा तर किती सुंदर दिसतोय.

ओह वॉव! किती मस्त आहेत या प्लेट्स. वरचा चटणी पॉटही क्यूट आहे.

वर्षुताई, तू या प्लेटसमध्ये तळलेले मासे सर्व करत असशील ना? चटणी पॉटमध्ये कशाची चटणी ठेवत असशील हे विचारण्याची हिंमत नाही होत आहे. Lol

बेडूक पॉट ,मासे प्लेट मस्त.
मेसन जार चं मध्ये ट्रेंड आलेला मोठ्या जार वाल्या मगमध्ये हेल्दी ड्रिंक्स पिण्याचा मी पण घेतलेला एक त्याची आताची अवस्था आणि साईज बघून वडील म्हणाले होते आता आंघोळीला वापरा तो Lol

जार आणि ग्लासेस

IMG_20250227_063734_0.jpg

बोल याचं थेंबाचं टेक्श्चर खाली ओट्यावरही दिसतंय.

IMG_20250227_063810.jpg

वर्षू. यांच्याकडचे मस्यावतार = 👌

@ सिमरन.

… मोठ्या जार मधे हेल्दी ड्रिंक्स पिण्याचा ट्रेंड….

होय. आधी मोसंबीच्या चकत्या वगैरे टाकून समर कूलर्स करायचे लोकं. मग घसरता घसरता त्यात बच्चेपार्टी साठी रंगीबेरंगी रसना वगैरे.. मग हे जग कपाटात दडपले लोकांनी परत कधीही बाहेर आलेच नाहीत Lol

Pages