चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय सिरॅमिक चा आहे. In fact त्या pebble सारख्या आकाराच्या कुंड्या आहेत. तिळ आहे... I will plant something in them once I am little free. लोणावळ्याला एक्सप्रेस वे ने न जाता जुन्या रस्त्याने गेले की जुन्या हायवे वरच एक खुर्जा पॉटरी स्टॉल आहे तिथून गेल्याच महिन्यात घेतलाय.

आता ह्यांनाही भेटा... एक कपाच्या आकाराची कुंडी आहे, आणि दुसरा आधी मग, मग पेन होल्डर आणि आता बाथरूम मधे ब्रश होल्डर बनला आहे, त्याचे वय वर्षे 29 आहे.

Screenshot_20250321_160122_Gallery.jpg

शेवटी बदल काय केवळ माणसाच्याच आयुष्यात घडतात?... How gracefully you deal with it is what matters. हे म्हणजे ओढून ताणून विनोद करायचा प्रयत्न आहे हो ... ;हा)

पण मी एका जपानी सिरॅमिक प्रकारा विषयी वाचले होते ज्यात सिरॅमिक फुटले की म्हणे त्याला वितळलेल्या सोन्याने एकत्र जोडतात... Resultant piece is far more precious than the original ceramic itself, fakt वापरलेल्या सोन्यामुळे नव्हे तर तो एक नवाच कलाविष्कार बनतो म्हणून. In that article they had given photos of such artifacts.
And that article articulated a similie that even if you are broken, if you work on yourself you can become better than what you already were.

मी एका जपानी सिरॅमिक प्रकारा विषयी वाचले होते ज्यात सिरॅमिक फुटले की म्हणे त्याला वितळलेल्या सोन्याने एकत्र जोडतात... >> याचे व्हिडिओ आणि फोटो बघितले आहेत पूर्वी.

इथल्या सगळ्यांकडच्याच क्रोकरीचे फोटो बघायला आवडतात.
गंधकुटी, तुमच्या कडची क्रोकरी खूपच आवडली आहे. एक से एक बढकर आहेत तुमच्याकडच्या या वस्तू.

व्वा!!! किती सुंदर आहे तुमचं collection गंधाची....विशेष म्हणजे प्रत्येक वस्तू सोबत एक आठवण, एक भावना जडली आहे...खूपच छान!!!

… सिरॅमिक फुटले की म्हणे त्याला वितळलेल्या सोन्याने एकत्र जोडतात... >> याचे व्हिडिओ आणि फोटो बघितले आहेत

+१

@ फोडले तर चार धपाटे ….

हातून कप-ग्लास फुटला आणि मुलांना- मदतनीसांना कुणी ओरडले असे आमच्या घरी कधी घडत नाही,वस्तू कितीही महागाची का असेना. कुणी मुद्दाम फोडेल का इतक्या सुंदर वस्तू ?

दुसरे असे की जुने जाणार तरच नवे येणार, चक्र सुरु रहाणार.

गंधकुटी यांनी वर लिहिलयं तसे एखाद्या वस्तूला आपल्या आठवणी चिकटल्या की त्या निर्जीव वस्तू राहात नाहीत. अन्य एका धाग्यावर लिहिले होते, कपबशी, food servers, tea service, wine glasses हे मला आपल्या घरी रहायला आलेले पाहुणेच वाटतात. काही फुटतात काही हरवतात. ठीक है. उतना ही आभार उस का जितना जिसने साथ दिया.

मी तर पाहुणे राहून गेले असेच म्हणतो.

गंधकुटी, या दोन कपांवरचं झेंडूचं डिझाईन माझं फार फार आवडतं आहे. कपांचा आकार आणि तळाशी असलेलं डिझाईन यांची रंगसंगती यांचा एकत्रित मेळ फार सुरेख आहे.

भोचकपणा मोड ऑन - कपात काय आहे? मागचा निळा कपही सुरेख दिसतोय त्याचाही फोटो टाका. त्याहून मागच्या - चादर किंवा तत्सम जे काही आहे ते - त्यावरचं डिझाईनही सुरेख आहे.

त्या वरच्या कपाच्या कुंडीला झब्बु देणार.
आणि कपाचा ब्रशहोल्डर म्हणून उपयोग यासाठी सेम पिंच.

एका जपानी सिरॅमिक प्रकारा विषयी वाचले होते ज्यात सिरॅमिक फुटले की म्हणे त्याला वितळलेल्या सोन्याने एकत्र जोडतात >>> याबद्दल वाचलं आहे.

Kintsugi — which means “join with gold” — is the Japanese art of repairing broken objects, often ceramic pottery or glass.

खरय अनिंद्य.
मामी एरव्ही गरम कॉफी असते, आज उकाड्यामुळे संध्याकाळी कोल्ड कॉफी केली होती.
धन्यवाद मोक्षू,

हा चार कप bashyancha सेट होता, आज शोधल्या तर दोनच दिसत आहेत... बापरे! असो.... Were with us for many decades.

माझे मन... झब्बू घ्या... कोरेल च्या रोजच्या वापरातील प्लेट्स, सेम रंग आणि फुलांचे डिझाइन. ह्या पण पुष्कळ जुन्या आहेत, malls मध्ये सहज corelle उपलब्ध असण्याच्या पूर्वीच्या काळातील, हौसेने अमेरिकेतून त्या तुटू नाहीत म्हणून केबिन baggage मधून आणलेल्या... :हा)
आता रोज वापरून त्यांच्यावर यथेच्छ स्क्रेचेस आलेत... पण मस्त वाटतात... एकदम lightweight.

अहाहा....
गंधकुटी,
माझ्याकडचे शब्द संपले. एकसो एक वस्तू आहेत तुमच्याकडे. अप्रतिम कलेक्शन.
Kintsugi>>> याबद्दल वाचले आहे.
एखाद्या वस्तूला आपल्या आठवणी चिकटल्या की त्या निर्जीव वस्तू राहात नाहीत. >>> खरंय

सुरेख
सगळं collection भारी ahe

Screenshot_20250322_125049_Photo Editor.jpg

लोणावळ्याला खुर्जा पॉटरी स्टोअर मधून घेतलेली ही त्रिकोणी प्लेट... नवरा त्याची मीटिंग होती म्हणून गेलेला, लगेच हमने मोकेपे चौका लगाया... त्यात ठेवलेली दगडाची अंडी गेली अनेक वर्षे इमाने इतबारे धूळ खायचे काम गपगुमान करत होती, पण रिसेंट उत्तराखंड मध्ये त्याच्या अव्वाच्या सव्वा किमती ऐकून त्यांना मी थोड्या आदराने वागवू लागले आहे.

अंड्यांची देखभाल करायला कोंबडी पण आहे हो... This again is ageold, टेबलावर उकडलेली अंडी ठेवायला वापरत असावेत बहुदा ही कोंबड्या च्या आकाराचे भांडे

ते ओपन केले की त्यात दोन अंडी माऊ शकतात.
Screenshot_20250322_130325_Gallery.jpg

Pages