चित्रपटाचा शेवट तुम्हाला कसा आवडेल?

Submitted by rmd on 16 February, 2025 - 23:59

बरेचदा असे होते की एखादा चित्रपट संपल्यावर असे वाटते की याचा शेवट वेगळा असता तर जास्त आवडलं असतं.
उदाहरणार्थ - ' शोले ' चित्रपटाच्या शेवटी अमिताभ मरायला नको होता असं मला वाटतं. किंवा ' ताल ' चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याने कोणाशीच लग्न करायला नको होतं - कितीही असलं तरी अक्षयने तिचा आणि तिच्या वडिलांचा अपमान केलेला असतोच. किंवा मग ' रंग दे बसंती ' च्या शेवटी त्यांना मारून टाकलं असं न दाखवता लोकांनी त्यांना वाचवलं असं काहीतरी दाखवायला हवं होतं.
असे अजून कित्येक पिक्चर असतील ज्यांचा शेवट वेगवेगळ्या प्रकाराने जास्त आवडला असता. तुमच्या मनात आहेत का असे काही वेगळे शेवट?
चला मग लिहा पटापट या धाग्यावर Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिक गांधी शेवटी 'रिश्ते मे' बोलतो तो भाग भारीच जमलाय. >>> +१
मी हे चिकवावर (थोड्या फार फरकाने) लिहिले आताच आणि इकडे आले. Happy

शेवटी तो "...बाप लगते है यार!!!" असे म्हणतो तेव्हा मी टोटल फुटलो. आणि "कौनसे सीआयडी हो आप, पुलिस तुम्हारे पाँच कदम आगे है" म्हणतो तेव्हाही Happy

सॉरी विषयांतर होतंय, पण राहावलं नाही - या सिनेमातले सीआयडी सोनीच्या सीआयडीवाल्यांशी साधर्म्य राखून आहेत. त्यांच्यासारखेच ते कोणाकडेही गेल्यागेल्या आपली ओळख देत नाहीत. तसंच आपल्या गाडीबाहेर एक ट्रक पार्क झालाय हे त्यांना कळतही नाही कारण सगळे गाडीतच असतात, बाहेर कोणीही लक्ष ठेवून नसतं वगैरे Happy

शेवटी तो "...बाप लगते है यार!!!" असे म्हणतो तेव्हा मी टोटल फुटलो. आणि "कौनसे सीआयडी हो आप, पुलिस तुम्हारे पाँच कदम आगे है" म्हणतो तेव्हाही >> +1

बाप्रे धमाल झालाय हा धागा, अजून मी प्रतिक्रिया पान क्र १ वरच आहे आणि किती हसतेय..
सादम्य Lol
शाहरूख काही वाईट दाखवला नाही त्यात. तो काजोलला पुन्हा भेटून तिच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याला सलमान बद्दल काही माहिती सुद्धा नसते. >>>गप्प रे. शाखा ला आधी राणी असताना काजोल बद्दल काही पडलेलं नसतं. शाखा स्वतः ही मान्य करेल की त्याचं कॅरॅक्टर स्वार्थी दाखवलय, पण तू नाही करणार. त्याला तिच्या लग्नाचं माहीत पडल्यावर जातोच ना तो बिब्बा घालायला. काजोल कनफ्युज दाखवलीये. तिचं आधी प्रेम असतं मग ती मुव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करते.

संगममध्ये वैजयंतीमाला राज कपूर नी राजेंद्र कुमार या दोघांना गोळ्या घालून जेलमध्ये गेलेली चाललं असतं मला>>>> Rofl आई आई गं

काजोल कनफ्युज दाखवलीये. तिचं आधी प्रेम असतं मग ती मुव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करते.
>>>>>

रीमा लागू आणि काजोल यांचा संवाद ऐका.

रीमा - मुझे पता ही नही था की मेरी बेटी प्यार नही समझोता करेगी...
काजोल - प्यार तो मैने कर लिया है माँ...

एवढे सरळ सरळ दाखवले आहे की ती अजूनही शाहरुखच्याच प्रेमात असते..

ऑन ए सिरीयास नोट.. जो पर्यंत आपण स्वतः अश्या एखाद्या प्रेमाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत या भावना समजूच शकत नाही.. आपण फक्त लॉजिक शोधत बसणार.. पण प्रेमात पडलेल्या मनाला ते कळत नाही. आपण शहाणी माणसे त्याला प्रेम आंधळे असते असा शिक्का मारून मोकळे होतो Happy

लेडीज व्हर्सेस रिकी बहल" मधे रणवीरला उगाचच शेवटी भाव खाउ दिला आहे. या बायकांनीच त्याच्यावर मात केलेली दाखवायला हवी होती.
याउलट अत्यंत चपखल शेवट म्हणजे "लक बाय चान्स" मधे कोंकणा फरहानला शेवटी तू स्वार्थी आहेस आणि तसाच असणार आहेस हे सुनावते तो भाग. >>>> अगदी मनातलं लिहतोस फा.

माझा आवडता शेवट (अ‍ॅक्चुअली धागा विषय तो नाही Wink सॉरी रमड.- १ हसिना थी चा शेवट.

तो चित्रपट एकदा पाहिला आहे. खूप वर्षे झाले. काजोलला टॉमबॉयगिरी सोडून भारतीय नारी का व्हावंसं वाटतं ते दाखवलंय का ?वय वाढतंय, लग्न जमत नाही म्हणून सुधारली का?

सलमानने केलेल्या रोलसाठी कोणी तयार होत नव्हतं, करणला सलमानला विचारायचं सुचलं नव्हतं आणि हिंमत त्याहून नव्हती. सलमानने स्वतःहून मी तो रोल करतो असं सांगितलं हे मात्र १०० वेळा रील्समध्ये दिसलंय. सलमानमुळे सिनेमा वेगळ्याच उंचीला गेला . दुसरा कोणी असता तर त्याला सोडून शाहरुखकडे जाण्यात काही विशेष वाटलं नसतं Wink

सिलसिलामधे शेवटी अमिताभ रेखा एकत्र यायला हवे होते. जयानं तसंही आधी इमोशनल ब्लॅकमेल करून आपल्या पोराला बाप मिळावा म्हणून अमिताभला लग्न करायला भाग पाडलेलं असतं. तर मिसकॅरेज झाल्यावर त्याला का गुंतवून ठेवायचं?

जयानं तसंही आधी इमोशनल ब्लॅकमेल करून आपल्या पोराला बाप मिळावा म्हणून अमिताभला लग्न करायला भाग पाडलेलं असतं >>> १००++

सिलसिलातलं अमिताभचं पात्र फार cheap and cringeworthy आहे. तो रेखाच्या ज्या पद्धतीने मागे लागतो आणि रंग बरसे गाणं तर त्याची परिसीमा. त्याला शिक्षा म्हणून जयाच बरोबर.

नवरा बायकोच्या नात्यात कटूता यावी इतकी मोठी गोष्ट नाहीये इतकेच म्हणायचे होते.>>> टॉवेल नीट ठेवणे इतकी शुल्लक गोष्ट जर आपल्या बायको ला तसं आवडतं म्हणुन करता येत नसेल तर मग ती गोष्ट मोठीच होणार पुढे. नवर्याने/बायको ने आमुलाग्र बदलावे अशी अपेक्षा जशी चूक.
पण जोडीदाराला आवडते/आवडत नाही म्हणुन लक्षात ठेवून एखादी गोष्ट करणे ह्यातून च प्रेम फुलत जातं.

अमिताभ चा सौदागर आठवला. त्यात नुतन कडे तो परत येतो का? ती त्याला नाही म्हणते असे दाखवलेय ना?

काजोल - प्यार तो मैने कर लिया है माँ>>> एग्झॅक्टली ह्याच लॉजिक ने प्यार तर शाखा ने भी कर लिया था ऋन्मेषा. राणीशी. काजोल शी समझौताच असतो. Wink
आता अजून मूर्ख लॉजिक नको देऊस. केजो नेही मान्य केलंय मुलाखतींत की त्याने माती खाल्लीये कुकुहोहै मधे..

भरत शिक्षा जया Lol
पण ती प्रेग्नन्ट असते की
म्हणजे अमिताभचे character दोन्हीकडे अडकले आहे असे म्हणू शकतो का?

ह्यावरून साजन चित्रपट आठवला
त्यात माधुरी दोघांची खरडपट्टी काढते असा संवाद आहे
असे अंधुक आठवतंय

कबुतरांना तर गोळ्या मारत असतो फारसा वाईट नसतो त्याच्याशीच व्हायला हवं होतं लग्न काजोलचं Proud >>> Happy मग या लॉजिकने त्याच्याच घरी राहून त्यालाच गंडवणार्‍या शाखाबद्दल काय? धावती गाडी स्वतः पकडणे तर सोडाच, तो होता त्याच्या मागचे इतर डबेही त्याच्या डब्यापासून अनलिंक करायला हवे होते काजोलने Happy>>>स्वतःच्या प्रेमासाठी एखाद्याला गंडवणे आणि कबुतरांना मारणे (प्राणिहत्या)यात फरक आहे आणि परमीत चं काजोल वर प्रेम नसतं लग्न ठरलेलं असतानाही तो शाहरुखला बोलतोही अमेरिका चलेंगे और वहांकि कुडीया देखेगे.त्यामुळे वर लिहिलेलं वाक्य सारक्याजम आहे परमित च्य लग्नाचं वालं , त्यामुळे काजोल शाहरुख बरोबर गेली तोच शेवट योग्यच आहे

आवडलेला शेवट:
क्या यही प्यार है - आफताब अमिषाच्या मागे लागणं सोडून जॉब इंटरव्ह्यू ला जातो
मुझे कुछ कहेना है - करीना तिच्या मास्टर्स साठी अमेरिकेला जाते, तुषार ला आयुष्यात काहीतरी सीरियस कर म्हणून सांगून
एक मैं और एक तू - दोघं एकत्र न यायचं ठरवतात

क्या यही प्यार है - आफताब अमिषाच्या मागे लागणं सोडून जॉब इंटरव्ह्यू ला जातो
मुझे कुछ कहेना है - करीना तिच्या मास्टर्स साठी अमेरिकेला जाते, तुषार ला आयुष्यात काहीतरी सीरियस कर म्हणून सांगून>>>
हे दोन्ही शेवट आवडले होते. करीना शेवटच्या क्षणी थांबायचं म्हणते तेव्हा टिपिकल शेवट होणार का असे वाटले होते पण तसं झालं नाही. तुषार व तिचे शेवटचे संवाद चांगले घेतलेत. प्रेम आहे म्हणून आयुष्यातील महत्वाकांक्षा थांबवायच्या नसतात ते अगदीच पटले.

अँकी च्या पोस्ट मधले सगळे शेवट आणि एक हसीना थी चा शेवट माझाही आवडता. पण आपल्या धाग्याचा तो विषय नाही म्हणून लिहित नव्हते Happy

मला आवडलेला चित्रपटाचा शेवट असा धागा काढूया का? Happy

न आवडलेले अजून काही शेवट

रेश्मा और शेरा - वहिदाने अमिताभला वाचवण्यासाठी त्याच्याशी लग्न करणे आणि मग एकाच वेळी सुनील दत्त मेल्यावर तीही मरणे काहीच्या काही होते.
बहारोंकी मंझिल - खरं तर या चित्रपटातील मीनाकुमारीची स्वतंत्र, निर्भीड व्यक्तिरेखा आवडली होती. पण शेवटी रेहमानला उगीचच मारले आहे.
चंदन का पलना - धर्मेन्द्रच्या दुसर्‍या पत्नीचा बाळंतपणात मृत्यु परत काहीही आहे, केवळ त्याची आणि मीनाकुमारीची परत जोडी जमवण्यासाठी आणि तिला बाळ देण्यासाठी, कारण ती वांझ आहे म्हणून तिची सासू नाराज असते.
देवर - हा चित्रपट खरं तर खूप आवडला होता. अनुपमाची टीम आहे. देवेन वर्मा, शशिकला, धर्मेंद्र सर्वांच्या ग्रे शेड्स आहेत. शेवटी शर्मिलाचे मतपरिवर्तन थोडे अनाकलनीय आहे. शशिकलाचीही मनातून इच्छा नसताना बळेच धर्मेंद्रचा पती म्हणून स्वीकार करून आदर्श नारीप्रमाणे त्याच्याबरोबर राहाणेही तसं पटत नाही.

स्वतःच्या प्रेमासाठी एखाद्याला गंडवणे आणि कबुतरांना मारणे (प्राणिहत्या)यात फरक आहे आणि परमीत चं काजोल वर प्रेम नसतं लग्न ठरलेलं असतानाही तो शाहरुखला बोलतोही अमेरिका चलेंगे और वहांकि कुडीया देखेगे.त्यामुळे वर लिहिलेलं वाक्य सारक्याजम आहे परमित च्य लग्नाचं वालं , त्यामुळे काजोल शाहरुख बरोबर गेली तोच शेवट योग्यच आहे
>>>>

अजून दहा पंधरा पॉईंट निघतील.. त्यांचे विश्लेषण करून स्वतंत्र लेख बनेल.. पण बहुधा लोक टाइमपास म्हणून हे म्हणत आहेत. अन्यथा डीडीएलजे शाहरुख खान कोणीही प्रेमात पडावा असाच होता.. बदाम बदाम बदाम !

सलमानमुळे सिनेमा वेगळ्याच उंचीला गेला . दुसरा कोणी असता तर त्याला सोडून शाहरुखकडे जाण्यात काही विशेष वाटलं नसतं Wink
>>>>>

का? लूक्समुळे? बाह्यसौंदर्य ? बॉडी बिल्डिंग?

टॉवेल नीट ठेवणे इतकी शुल्लक गोष्ट जर आपल्या बायको ला तसं आवडतं म्हणुन करता येत नसेल तर मग ती गोष्ट मोठीच होणार पुढे. नवर्याने/बायको ने आमुलाग्र बदलावे अशी अपेक्षा जशी चूक.
पण जोडीदाराला आवडते/आवडत नाही म्हणुन लक्षात ठेवून एखादी गोष्ट करणे ह्यातून च प्रेम फुलत जातं.
>>>>>>

जोडीदाराची एखादी गोष्ट तक्रार न करता चालवून घेणे याने जास्त प्रेम फुलते... Happy
सर्वांनी ट्राय करा. आणि याच धाग्यावर कळवा. किंवा वेगळा धागा काढुया...

एग्झॅक्टली ह्याच लॉजिक ने प्यार तर शाखा ने भी कर लिया था ऋन्मेषा. राणीशी. काजोल शी समझौताच असतो. Wink
>>>>>>

प्रेम एकदाच होते असे मी म्हणतच नाहीये.
काजोलच्या त्या वाक्याचा अर्थ असा होता की अजूनही ती शाहरूखच्याच प्रेमात आहे. मग शेवटी शाहरूखकडेच जाणे योग्य नाही का.

Pages