Submitted by rmd on 16 February, 2025 - 23:59
बरेचदा असे होते की एखादा चित्रपट संपल्यावर असे वाटते की याचा शेवट वेगळा असता तर जास्त आवडलं असतं.
उदाहरणार्थ - ' शोले ' चित्रपटाच्या शेवटी अमिताभ मरायला नको होता असं मला वाटतं. किंवा ' ताल ' चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याने कोणाशीच लग्न करायला नको होतं - कितीही असलं तरी अक्षयने तिचा आणि तिच्या वडिलांचा अपमान केलेला असतोच. किंवा मग ' रंग दे बसंती ' च्या शेवटी त्यांना मारून टाकलं असं न दाखवता लोकांनी त्यांना वाचवलं असं काहीतरी दाखवायला हवं होतं.
असे अजून कित्येक पिक्चर असतील ज्यांचा शेवट वेगवेगळ्या प्रकाराने जास्त आवडला असता. तुमच्या मनात आहेत का असे काही वेगळे शेवट?
चला मग लिहा पटापट या धाग्यावर 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिथे रेखा पैशाला भुलते ना?
तिथे रेखा पैशाला भुलते ना? शिवाय पहिला अमिताभ मेलाय अशी समजूत असते. >>> भरत - बहुधा तुमचे बरोबर आहे. मलाही नीट आठवत नाही पण ती पैशाला भुलत असावी. मेक-ओव्हरला नाही.
जोडीदाराची एखादी गोष्ट तक्रार न करता चालवून घेणे याने जास्त प्रेम फुलते >>>
ऋन्मेष सर्व पिक्चर्सचा शेवट नवरा तुम्हाला आवडत असेल तर काय वाट्टेल ते करत असला तरी सांभाळून घ्या असा करायला निघालाय
ऋन्मेष सर्व पिक्चर्सचा शेवट
ऋन्मेष सर्व पिक्चर्सचा शेवट नवरा तुम्हाला आवडत असेल तर काय वाट्टेल ते करत असला तरी सांभाळून घ्या असा करायला निघालाय >>>
काहीच्या काही फॉर्वर्ड धाग्यावरचा लेटेस्ट मेसेज दाखवा ऋ ला.
तर काय वाट्टेल ते करत असला
तर काय वाट्टेल ते करत असला तरी...
>>>>>
असे काही नाही, पण टॉवेल बेडवर टाकत असेल तर तेवढ्यासाठी सोडू नका..
दारू पिणारा असेल तर थेट व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन सोडा की माझी काही हरकत नाही
काहीच्या काही फॉर्वर्ड
काहीच्या काही फॉर्वर्ड धाग्यावरचा लेटेस्ट मेसेज दाखवा ऋ ला. >> मी तेच लिहायला आलो होतो र्मड
मला ते गप्पा फॉरवर्ड वगैरे
मला ते गप्पा फॉरवर्ड वगैरे धागे दिसत नाहीत तशी सेटिंग आहे माझी..
पण आता वाचून आलो
बाई दवे,
आमच्याकडे घालून पाडून बोलायचेच नाही तर डोमेस्टिक वॉयलन्स सदराअंतर्गत मारायचे काम सुद्धा बायकोच करते.. ऊर्जा नर नारी शक्ती सगळी तीच आहे.
एक किस्सा आहे आमच्या घरात फेमस. ज्यावरून पोरगी सुद्धा मला फार चिडवते. आणि एवढे लिहितोस तर हा किस्सा सुद्धा लिही असे चॅलेंज देते.. आता विषय निघाला तर आठवले. कधीतरी लिहितो नक्की. सध्या माझे खूप धागे वेटिंगला आहेत.
सध्या माझे खूप धागे वेटिंगला
सध्या माझे खूप धागे वेटिंगला आहेत. >> ओपनली धमक्या देतो हा माणूस
जरासं अवांतर -
जरासं अवांतर -
डीडीएलजे - प्यार तो मैंने कर लिया, माँ - या डायलॉगनंतर "अब गोली खा" म्हणावंसं वाटतं
"अब गोली खा" म्हणावंसं वाटतं
"अब गोली खा" म्हणावंसं वाटतं Proud

>>
(No subject)
(No subject)
(No subject)
अब गोली खा >>>
अब गोली खा >>>
ललिता प्रीती.
या डायलॉगनंतर "अब गोली खा"
या डायलॉगनंतर "अब गोली खा" म्हणावंसं वाटतं >>>
काहीच्या काही फॉर्वर्ड धाग्यावरचा लेटेस्ट मेसेज दाखवा ऋ ला. >>>
असे काही नाही, पण टॉवेल बेडवर टाकत असेल तर तेवढ्यासाठी सोडू नका.. >>> हो तितका अंदाज आहे. जस्ट किडिंग
aashu29 - धन्यवाद
ते दोन्ही पिक्चर बघताना ते जाणवले होते. "एक हसिना थी" आवडला होता इतके लक्षात आहे. स्पेसिफिक शेवट लक्षात नाही.
एक हसिना थी" आवडला होता इतके
एक हसिना थी" आवडला होता इतके लक्षात आहे. स्पेसिफिक शेवट लक्षात नाही.
>>>>
तो पिक्चर विसरला जातो आणि त्याचा शेवटच तर लक्षात राहतो.
ती त्याचे हात पाय बांधून त्याला उंदरांचे भक्ष्य व्हायला सोडते..
एक हसीना थी सारखा मध्यंतरी फ्रेडी चित्रपट आला होता. त्यात उर्मिलाजागी आपला कार्तिक आर्यन होता.
"एक हसिना थी" आवडला होता इतके
"एक हसिना थी" आवडला होता इतके लक्षात आहे. स्पेसिफिक शेवट लक्षात नाही. >> आश्चर्य आहे. मी उलट तेवढंच लक्षात ठेवलं आहे. एक हसीना थी म्हणजे तोच ना, ज्यात सैफ ला शेवटी उंदीर मारतात तो... असं
हो हपा बरोबर.. म्हणूनच मलाही
हो हपा बरोबर.. म्हणूनच मलाही आश्चर्य वाटले.
फा ने तो पिक्चर पूर्ण बघितला नसावा किंवा तो वेगळ्या चित्रपटाबद्दल बोलत असावा.. एक था व्हिलन, एक था टायगर वगैरे
त्याचा शेवट बदलायचा म्हणजे
त्याचा शेवट बदलायचा म्हणजे रॅट किलची जाहिरात टाकायची. उंदिर एकदा खाऊन, मरतात बाहेर जाऊन.
उंदिर एकदा खाऊन, मरतात बाहेर
उंदिर एकदा खाऊन, मरतात बाहेर जाऊन >>>
उंदिर एकदा खाऊन, मरतात बाहेर
उंदिर एकदा खाऊन, मरतात बाहेर जाऊन >>>>
"उंदीर सैफला खाऊन" करा येथे. पण मग सैफला रॅट किल घातलेले सुग्रास जेवण द्यावे लागेल आधी. मलाच आयडिया यायला लागल्या वेगवेगळ्या. 
ती सुरवातीला साधीसुधी मुलगी असते, आणि उंदरांना घाबरत असते. तो त्यावरून तिला घाबरट म्हणून हसलेलाही असतो. त्याच्यामुळे तिला स्त्रियांच्या तुरुंगात जावे लागते व नरकयातना सोसाव्या लागतात. त्याने तसाच बदला निवडते ती. स्त्रियांच्या तुरुंगात असलेल्या ईनमेट रसिका जोशीचे काम जबरदस्त होते. हा बिनलग्नाचा 'खून भरी मांग' होता.
उंदिर एकदा खाऊन, मरतात बाहेर
उंदिर एकदा खाऊन, मरतात बाहेर जाऊन >>>
स्पेसिफिक शेवट लक्षात नाही. >>> याबद्दल - ती त्याच्यावर सूड उगवायला त्याला मरायला कोठेतरी सोडून देते इतके लक्षात होते. पण हे हातपाय बांंधणे, उंदीर वगैरे लक्षात नव्हते. पिक्चर पूर्ण पाहिलेला आहे. काहीही माहिती नसताना सहज लावला होता आणि पूर्ण ग्रिपिंग होता इतके लक्षात आहे.
हा बिनलग्नाचा 'खून भरी मांग'
हा बिनलग्नाचा 'खून भरी मांग' होता.
हा बिनलग्नाचा 'खून भरी मांग'
हा बिनलग्नाचा 'खून भरी मांग' होता. >>>
बिनलग्नाचा 'खून भरी मांग' >>>
बिनलग्नाचा 'खून भरी मांग' >>>
ओपनली धमक्या देतो हा माणूस>
ओपनली धमक्या देतो हा माणूस>
जोडीदाराची एखादी गोष्ट तक्रार न करता चालवून घेणे>>> एखादी नसते चुपके चुपके मधे तो तिच्या चारित्र्या वर संशय घेतो, अनेक लहान सहान तक्रारी दाखवल्यात. तुझ्या अंध प्रेमा पोटी तुला त्या दिसत नसतील.
डीडीएल जे मधे ही शाखा शेवटाला फसवणूक च करत असतो. असो कॅरॅक्टर आहे ते. आपण का कीस पाडतोय
आणि कोणत्या चित्रपटाचा शेवट कोणाला कसा हवा हा विषय आहे. योग्य कि अयोग्या जाऊद्यात.
उंदिर एकदा खाऊन, मरतात बाहेर
उंदिर एकदा खाऊन, मरतात बाहेर जाऊन>>
अब गोली खा >>>
अब गोली खा >>>
एखादी नसते चुपके चुपके मधे तो
एखादी नसते चुपके चुपके मधे तो तिच्या चारित्र्या वर संशय घेतो
>>>>>
तुम्ही कोट केले ते एखादी गोष्ट वाक्य मी टॉवेलबद्दल लिहिले आहे. त्या चित्रपटात त्याने इतर काय केले याची लिस्ट कोणी केली तर मी प्रत्येक मुद्द्याबद्दल स्वतंत्र मत व्यक्त करेन.. नवरा बेडवर टॉवेल फेकतो हे काही घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही यावर मी ठाम आहे.
तुम्ही कोट केले ते एखादी
तुम्ही कोट केले ते एखादी गोष्ट वाक्य मी टॉवेलबद्दल लिहिले आहे>>> नाही. तू एखादी गोष्ट प्रेमापोटी चालवून घेण्यावर मी ते लिहिलेय. आता इतर गोष्टी बद्दल सांगितले तर तू परत टॉवेल वर आलास. पालथा घडा मोड कायम असतो तुझा.
यांच्यात पण ओले टॉवेल्स आहेत.
यांच्यात पण ओले टॉवेल्स आहेत.
Pages