Submitted by rmd on 16 February, 2025 - 23:59
बरेचदा असे होते की एखादा चित्रपट संपल्यावर असे वाटते की याचा शेवट वेगळा असता तर जास्त आवडलं असतं.
उदाहरणार्थ - ' शोले ' चित्रपटाच्या शेवटी अमिताभ मरायला नको होता असं मला वाटतं. किंवा ' ताल ' चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याने कोणाशीच लग्न करायला नको होतं - कितीही असलं तरी अक्षयने तिचा आणि तिच्या वडिलांचा अपमान केलेला असतोच. किंवा मग ' रंग दे बसंती ' च्या शेवटी त्यांना मारून टाकलं असं न दाखवता लोकांनी त्यांना वाचवलं असं काहीतरी दाखवायला हवं होतं.
असे अजून कित्येक पिक्चर असतील ज्यांचा शेवट वेगवेगळ्या प्रकाराने जास्त आवडला असता. तुमच्या मनात आहेत का असे काही वेगळे शेवट?
चला मग लिहा पटापट या धाग्यावर 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लग्नानंतर साधा टॉवेल नीट
लग्नानंतर साधा टॉवेल नीट पसरवून दांडीवर टाकू शकत नाही टॉक्सिक
>>>>
टॉवेल जागेवर नाही ठेवला म्हणून टॉक्सिक हे जरा हार्श वाटते हो
आणि हे शाहरूखच्या बाजूने नाही तर सर्वच पुरुषांच्या बाजूने बोलत आहे.
मुले शिक्षण धंद्यानिमित्त हॉस्टेलला राहतात तेव्हा त्यांना अश्याच सवयी असतात. लग्न झाले तर का आपली लाईफ स्टाईल टोटल चेंज करायची. नाही जमत एखाद्याला..
येनीवेज, मी सुद्धा आज टॉवेल नेहमी सारखा दांडीवर टाकला.
तरी माझी बायको मला नेहमीसारखी ओरडली.
म्हणाली, वाळत घातलेल्या कपड्यावर टॉवेल कश्याला घालतोस.. आणि खेचून धुवायच्या कपड्यात फेकून दिला. मी शांतपणे तिथून उचलून खुर्चीवर लटकवला आणि ऑफिसला निघालो. पाठीमागून पुन्हा धपकन टॉवेल कुठेतरी फेकण्याचा आवाज कानावर पडला. मी मागे वळून न बघता ऑफिसला आलो. कारण पुरुषांनी काहीही केले तरी समाज त्यांना नावेच ठेवतो असे माझे ठाम मत आहे
हम दिल दे चुके सनम मध्ये
हम दिल दे चुके सनम मध्ये मंगळसूत्राची ताकद म्हणून ती परत जाते असं मला नाही वाटलं. अजय तिला माणूस म्हणून आवडायला लागतो म्हणून ती मंगळसूत्र देते त्याला. पण 'झोंका हवा का' गाण्यात मात्र उगीचच सिंदूर वगैरे भरताना दाखवली आहे.
सलमान रडताना बघून नाही मला दया येत. त्याचा रडण्याचा अभिनय बघून दिग्दर्शकाची दया येते. एकंदरीत पिक्चरभर सलमानच्या पात्राचीच दया येते. एकदोन प्रसंग सोडल्यास पांचट वाटतो तो.
त्याचा रडण्याचा अभिनय बघून
त्याचा रडण्याचा अभिनय बघून दिग्दर्शकाची दया येते. >>>
वाचतेय ... धमाल चालू आहे.
देवदास मध्ये देखील शेवटी
देवदास मध्ये देखील शेवटी चंद्रमुखीचं लग्न दुसऱ्या कोणाबरोबर तरी होतं असं दाखवलं पाहिजे होतं
म्हणजे मग शाखा चुनीबाबू बरोबर ख से खफा होऊन बसला असता.
टॉवेल जागेवर नाही ठेवला
टॉवेल जागेवर नाही ठेवला म्हणून टॉक्सिक हे जरा हार्श वाटते हो Sad>>> टॉक्सिक टॉवेल साठी नाही त्या चित्रपटातल्या संशयी वृत्तीआणि अब्युजिव वागणुकी साठी आहे. टॉवेल फक्त एक गोष्ट झाली ते टॉक्सिक एकत्र लिहिल्याने.
rmd यांचा प्रतिसाद वाचून घाईत प्रतिसाद दिला.
एकंदरीत पिक्चरभर सलमानच्या पात्राचीच दया येते. एकदोन प्रसंग सोडल्यास पांचट वाटतो तो.>>> +1 सलमान ला acting येत नाही बावळट फॅन्स च्या जीवावर पिच्चर चालतात.
हम दिल दे चुके चा शेवट माझ्या
हम दिल दे चुके चा शेवट माझ्या नेहमी डोक्यात जातो.>>>> मझ्या संजय लीला भन्साळीच अख्खा डोक्यात जातो....वास्तवाचे तारतम्य सुटलेला दिग्दर्शक आहे तो...डिल्यूजनल... 😏
डिल्यूजनल आहे म्हणूनच मला
उलट डिल्यूजनल आहे म्हणूनच मला त्याचे चित्रपट आवडतात त्यावरून आठवलं संजय लिहिला भन्साळीने ने डिरेक्ट केलेला रामलीला चा शेवट आवडला नव्हता हॅपी असायला हवा होता (एकतर पिच्चर बड्डे ला बघायला गेले होते. आपण जन्माला आलो त्यादिवशी उगाच कोणाला मरताना का पाहा ,पण गाणी एक नंबर होती त्यामुळे सगळे पैसे वसूल)तसही शेवटी दोन्ही वैन्यांनी मॅटर इमोशनली सोडवून कुल केला होता आई झालेली सुप्रिया पाठक निवळली होती आणि हे इकडे एकमेकांना गोळ्या मारून घेतात .
रोमियो ज्युलिएट ची आवृत्ती म्हणून ठीक आहे.तसही दीपिका मरते तो चित्रपट सुपरहिट होतो ,बघा ओम शांती ओम, बाजीराव मस्तानी ,पद्मावत.
उलट डिल्यूजनल आहे म्हणूनच मला
उलट डिल्यूजनल आहे म्हणूनच मला त्याचे चित्रपट आवडतात
>>>>>
मला डिल्यूजनलचा अर्थ माहीत नसल्याने तो माझा आवडता किंवा नावडता दोन्ही नाही
त्या चित्रपटातल्या संशयी
त्या चित्रपटातल्या संशयी वृत्तीआणि अब्युजिव वागणुकी साठी आहे
>>>>>
अब्युजिव वागणुक कुठली नेमकी.. फार आठवत नाहीये आता..
पण संशयी वृत्ती ओके. म्हणजे आदर्श नात्यात ते नसावे, आदर्श जोडीदार तसा नसावा.. पण तेच तर चित्रपटात दाखवले आहे. माणूस आहे तो चुकतो माफी मागतो सुधारतो पुन्हा एकत्र होतात..
मला शाहरुखचे बरेच चित्रपट जसे हा चलते चलते, कभी हा कभी ना, राजू बन गया जेंटलमेन, येस बॉस वगैरे याचसाठी आवडतात की त्यात तो इतर कुठल्याही माणसांसारखा क्रोध लोभ मोह माया मत्सर वगैरे दाखवतो.. पण त्याचे हिरो म्हणून उदात्तीकरण न करता त्याची शिक्षा भोगतो.
अन्यथा ते बागवान किंवा हम साथ साथ है वाला सलमान, किंवा धडकनचा अक्षय कुमार हे किती आदर्श, नकली आणि बोर वाटतात.
रुन्मेष डिल्यूजनल ह्या
अब्युजिव वागणुक कुठली नेमकी>>>-अब्युजिव वागणुक फक्त फिझिकल नसते वर्बल ही असते .मी पण खूप वर्षांपूर्वी पाहिलाय त्यामुळे नक्की आठवत नाही पण शाहरुख राणीवर संशय घेऊन बोलतो ओरडतो ज्यामुळे ती निघून जाते हे आठवतंय .
रुन्मेष डिल्यूजनल ह्या शब्दाचा मराठी व्यापक अर्थ फार्स विथ द डिफरंस जास्त चांगला सांगू शकतील त्यांनीच आधी पोस्ट मध्ये वापरलाय आणि ते पोस्टीं वरून हुशारही वाटतात.
अब्युजिव वागणुक फक्त फिझिकल
अब्युजिव वागणुक फक्त फिझिकल नसते वर्बल ही असते
>>>
वर्बल ची सुद्धा गरज नसते. जळजळीत नजर, तुच्छ कटाक्ष, एखाद्याला ठरवून वाळीत टाकणं.. बरेच प्रकार असतात.
त्या चित्रपटात असे काय केले शाहरुखने की त्याच्या बायकोने त्याला माफ करूच नये, त्याच्याकडे परत जाऊच नये असे वाटले हे जाणून घेण्यास उत्सुक आहे इतकेच. मलाही आठवत नाहीये फार डिटेल. गाणी तेवढी ऐकतो आजही. क्लास आहेत.
जसे वर कभी अलविदा ना कहना बाबत म्हटले की प्रेम नसेल आणि मन जुळत नसेल तर उगाच नाते खेचू नये...
त्याचप्रमाणे जिथे जुळले आहे ती नाती सहज तोडू ही नयेत. अश्या नात्यांना शक्य तितकी संधी द्यावी..
प्रेम फक्त गुणांवर करू नये तर गुणदोषांना स्वीकारून करावे.
आई नेहमी म्हणते की नवरा बायकोच्या भांडणात स्वतःहून पडू नये... ते आठवले इथे.
एक दुजे के लिये दोघांनी
एक दुजे के लिये दोघांनी आत्महत्या केली असे दाखवायला नको हवे होते. शक्ती कपूरला मारल्यावर बस्स झाले कि दोघांचे झाले तेव्हढे हाल (त्याचा रीयल लाईफ मधे पडलेला प्रभाव कळल्यावर तर अजूनच वाटले होते)
कयामत से कयामत तक मधे पण असे वाटलेले.
जवानचा शेवटच काय सुरूवात पण नको होती असे वाटलेले
पूर्ण जवानच नको होता असामी
आणि मधलाही, पूर्ण जवानच नको होता असामी
जवान बद्दल नासहमत. काही
जवान बद्दल नासहमत. काही पिक्चर हे स्वतःला सिरीयसली न घेता बनवलेले असतात त्यातला तो आहे. त्यामुळे डोके बाजूला ठेवून पाहिला की भन्नाट करमणूक आहे.
एक दुजे के लिये मात्र अगदी मान्य
आता जवान कश्याला...
आता जवान कश्याला...
झोपायला जाऊ द्या रे.. उद्या सुट्टी नाहीये
संजय लिहिला भन्साळीने ने
संजय लिहिला भन्साळीने ने डिरेक्ट केलेला रामलीला >> म्हणजे तो writer आणि director आहे असे म्हणायचे आहे काय?
आणि मधलाही, पूर्ण जवानच नको
आणि मधलाही, पूर्ण जवानच नको होता असामी >>
मी व्हॅनिला स्कायसारखे (सुरूवात नि शेवट नसल्याम्ळे) एका न कळलेल्या सिनेमा साठी मटेरियल देत होतो तुम्हाला 
माणूस आहे तो चुकतो माफी मागतो
माणूस आहे तो चुकतो माफी मागतो सुधारतो पुन्हा एकत्र होतात >>> अरे पण सुधारत नाही ना! तेच तर!! परत टॉवेल फेकून जातो. म्हणजे इतकी छोटीशी गोष्ट पण सुधारली नाहीये त्याने. मग काय उपयोग?
अकेले हम अकेले तुम - यच्या
अकेले हम अकेले तुम - या पिक्चरच्या शेवटी तिने परत जायला नको होतं. ज्यापायी ती त्याला सोडतो तो त्याचा अॅरोगन्स काही कमी झालेला नसतो. मग तिला नेमका कसला साक्षात्कार होऊन ती परत जाते?
ईथे इतके वेळा टॉवेल आला की
ईथे इतके वेळा टॉवेल आला की मला हाच टॉवेल आठवला. तसा या चित्रपटाचा शेवट अगदी बरोबर वाटला आणि आवडला.
https://youtu.be/l4-WY2DucKE?si=SkHlRtfvIw5Pj41H&t=801
अरे पण टॉवेल फेकणे का
अरे पण टॉवेल फेकणे का सुधारायचे त्याने.. इट्स ओके.. छोटी गोष्ट आहे ती.. एवढ्या मोठ्या संसारात अश्या छोट्या छोट्या गोष्टी होताच राहतात आणि त्यांना जास्त महत्त्व देऊ नये हेच तर सांगायचे होते शेवटी
अकेले हम अकेले तुम - त्याचा अ
अकेले हम अकेले तुम - त्याचा अॅरोगन्स काही कमी झालेला नसतो.
>>>>
अहो होतो की कमी.. त्याच्या शेजारची बाई सुद्धा म्हणते की हे.. मुलासाठी एवढा लाचार झालेला दाखवला आहे, नेमका कुठे अॅरोगन्स दाखवला त्याने उत्तरार्धात?
तुम्ही दर पोस्टगणिक नवऱ्याकडून अपेक्षांचे बेंचमार्क वाढवून ठेवत आहात रमड
अपेक्षांचे बेंचमार्क >>>
अपेक्षांचे बेंचमार्क >>>
अहो, मुलासाठी लाचार होतो तो! त्याची चूक काही कबूल करत नाही की त्याने तिच्यावर अन्याय केला. असो. आपण काय इथे एक्मेकांची मतं बदलायला बसलोय का? मला जे शेवट आवडले नाहीत ते मी सांगतेय. तुला आवडले नाहीत ते तू सांग
टॉवेल फेकणे >> अरे ओले टॉवेल
टॉवेल फेकणे >> अरे ओले टॉवेल पलंगावर किंवा कुठेही फेकले की त्या गोष्टी पण ओल्या होतात. मग त्यांना ओलसर वास येतात. सगळे घर वासाडे होते. त्याने तो उचलून वाळत टाकला तर हे काहीच होत नाही. मग टॉवेल उचलायचा का नाही ?
जवानचा शेवटच काय सुरूवात पण
जवानचा शेवटच काय सुरूवात पण नको होती असे वाटलेले >>>
तुम्ही दर पोस्टगणिक
तुम्ही दर पोस्टगणिक नवऱ्याकडून अपेक्षांचे बेंचमार्क वाढवून ठेवत आहात रमड >>>>
हे लेकी बोले सुने लागे आहे का रमड
नाही गं माझेमन. तशी गरजच नाही
(शिवाय आपण राणी इतक्या बावळट थोडीच असतो?
)
धनि
धनि
मला असं वाटतंय की rmd type करतेय.
किंवा ये डर/खौफ हो सकता है
डर/खौफ >> किल्ली तू भेटली
डर/खौफ >> किल्ली तू भेटली आहेस आम्हाला. तू असे कसे काय म्हणू शकतेस
खरे तर मलाच हे टॉवेल कुठेही टाकलेले आवडत नाही
Rmd स्वतःच्या आयडी वरून type
Rmd स्वतःच्या आयडी वरून type कर बरं
.
By the way टॉवेल चं झाड सोडूया आता
Pages