चित्रपटाचा शेवट तुम्हाला कसा आवडेल?

Submitted by rmd on 16 February, 2025 - 23:59

बरेचदा असे होते की एखादा चित्रपट संपल्यावर असे वाटते की याचा शेवट वेगळा असता तर जास्त आवडलं असतं.
उदाहरणार्थ - ' शोले ' चित्रपटाच्या शेवटी अमिताभ मरायला नको होता असं मला वाटतं. किंवा ' ताल ' चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याने कोणाशीच लग्न करायला नको होतं - कितीही असलं तरी अक्षयने तिचा आणि तिच्या वडिलांचा अपमान केलेला असतोच. किंवा मग ' रंग दे बसंती ' च्या शेवटी त्यांना मारून टाकलं असं न दाखवता लोकांनी त्यांना वाचवलं असं काहीतरी दाखवायला हवं होतं.
असे अजून कित्येक पिक्चर असतील ज्यांचा शेवट वेगवेगळ्या प्रकाराने जास्त आवडला असता. तुमच्या मनात आहेत का असे काही वेगळे शेवट?
चला मग लिहा पटापट या धाग्यावर Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू एखादी गोष्ट प्रेमापोटी चालवून घेण्यावर मी ते लिहिलेय.
>>>>

एखादी गोष्ट हा मुद्दा टॉवेल वरून लिहीला म्हणजे त्याच रेंजची गोष्ट झाली ना..

एखादी गोष्ट लिहिली म्हणजे सगळ्या गोष्टी त्यात कश्या घेत आहात? उद्या तुम्ही म्हणाल नवरा एखादा खून करून आला तर एखादाच म्हणून चालवून घ्यावे का? बिलकुल नाही.. असे म्हणेल का मी?

आणि हो,
पुढे मी अजून एक लिहिले आहे ना की नवरा दारू पिऊन घरी येत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल आणि तो दारू प्यायचे सोडत नसेल तर खुशाल सोडावे बायकांनी त्याला..
ते मिस केले का?

लिव्ह इन >>>2004 चा चित्रपट आहे तेव्हा चं असलं तरी लिव्ह इनच.तो तिला फसवत असतो आणि एकत्र राहायलाही फसवूनच भाग पाडतो कसं ते पिच्चर मध्ये बघा. जबरदस्त चित्रपट आहे . तो गँगस्टर असतो ती सामान्य घाबरट मुलगी ती त्याच्यावर विश्वास ठेवते तो मात्र तिचा पहिल्यापासून वापर करून फसवत असतो त्याचा ती नंतर सॉलिड रिवेंज घेते ही स्टोरीलाईन आहे.दिवंगत मराठीअभिनेत्री रसिका जोशी नेही यात मस्त काम केलंय.

Pages