Submitted by rmd on 16 February, 2025 - 23:59
बरेचदा असे होते की एखादा चित्रपट संपल्यावर असे वाटते की याचा शेवट वेगळा असता तर जास्त आवडलं असतं.
उदाहरणार्थ - ' शोले ' चित्रपटाच्या शेवटी अमिताभ मरायला नको होता असं मला वाटतं. किंवा ' ताल ' चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याने कोणाशीच लग्न करायला नको होतं - कितीही असलं तरी अक्षयने तिचा आणि तिच्या वडिलांचा अपमान केलेला असतोच. किंवा मग ' रंग दे बसंती ' च्या शेवटी त्यांना मारून टाकलं असं न दाखवता लोकांनी त्यांना वाचवलं असं काहीतरी दाखवायला हवं होतं.
असे अजून कित्येक पिक्चर असतील ज्यांचा शेवट वेगवेगळ्या प्रकाराने जास्त आवडला असता. तुमच्या मनात आहेत का असे काही वेगळे शेवट?
चला मग लिहा पटापट या धाग्यावर 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@अजबराव , नाही तो टायपो आहे
@अजबराव , नाही तो टायपो आहे लीला च्या ऐवजी लिहिला झालंय. पण रामलीला ला डिरेक्ट करण्याबरोबरच भन्साळी यांनी खरोखर सिद्धार्थ-गरिमा सोबत या चित्रपटाचा स्क्रिनप्ले लिहिला आहे.
एक दूजे के लिए बद्दल सहमत.
एक दूजे के लिए बद्दल सहमत. त्या चित्रपटानंतर तशा आत्महत्या करायचं फॅड आलं होतं म्हणे. पण त्यात शक्ती कपूर कुठे होता? राकेश बेदी होता ना?
जुळून येती रेशीम गाठी मध्ये आदित्य देसाई सुद्धा कायम टॉवेल बिछान्यात टाकायचा. आणि तो म्हणे गुणी बाळ होता.
गुलजारच्या दोन चित्रपटांतल्या शेवटच्या सीनमध्ये नायिका नायकाला वाकून नमस्कार करते हे आवडलं नव्हतं. आँधी आणि इजाजत.
भरत +१००० जाम खटकतात मला ते
भरत +१००० जाम खटकतात मला ते सीन्स!
रमड आणि धनि,
रमड आणि धनि,
टॉवेल बेडवर टाकल्याने बेड ओला होतो आणि ते चुकीचे आहे वगैरे अमान्य करतच नाहीये. फक्त ती नवरा बायकोच्या नात्यात कटूता यावी इतकी मोठी गोष्ट नाहीये इतकेच म्हणायचे होते.
त्यात सिमरन यांच्या पोस्टमध्ये टॉवेल आणि टॉक्सिक लगोलग आल्याने ते आणखी शोकिंग वाटले जे त्यांनी नंतर क्लिअर केले.
आणि हो, चर्चा तर झालीच पाहिजे. अन्यथा चार मुकवाचक बायका इथल्या पोस्ट वाचून घरी जातील आणि टॉवेल बेडवर टाकणाऱ्या आपल्या नवऱ्याला झोड झोड झोडपून घटस्फोट देतील
घ्या.. पुन्हा टाॅवेल..https:/
घ्या.. पुन्हा टाॅवेल..
https://youtu.be/DPKSyrAmwb4?si=hmDtLcrk6GPOIj52&t=283
फक्त ती नवरा बायकोच्या
फक्त ती नवरा बायकोच्या नात्यात कटूता यावी इतकी मोठी गोष्ट नाहीये >> आहे रे, जाऊ दे. उगीच कशाला यावर नवीन धागा?
नाही नाही. नवीन धागा झालाच
नाही नाही. नवीन धागा झालाच पाहिजे.
ह.पा. - मी दुसर्या धाग्यावर नुकतंच म्हटलंय की नवीन धाग्याच्या धमकीला आता पब्लिक घाबरत नाही. तुम्ही मला खोटं पाडू नका.
आहे रे, जाऊ दे..
आहे रे, जाऊ दे..
>>>>
सिरीसली हपा... जर अशा छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा नवरा बायकोच्या नात्यात कटूया आणत असतील तर काय अर्थ राहीला त्या नात्याला??
मग तर राणी मुखर्जी शाहरुख कडे पुन्हा न गेलेलीच बरी.. कारण असे नाते तसेही पुन्हा लगेच तुटणारच
नोंद करतो .. यावर नवा धागा नक्कीच काढता येईल
आँधी आणि इजाजत >>> हो. मलाही
आँधी आणि इजाजत >>> हो. मलाही खटकलं होतं ते.
आदित्य देसाई >>> तो मुद्दा सोडल्यास गुणी नवरा पण होता हो!
नवीन डॉन मध्ये मला खरं
नवीन डॉन मध्ये मला खरं म्हणजे प्रियंकाने शाहरुखला मारून टाकले असते तर आवडले असते.
<आदित्य देसाई >>> तो मुद्दा
<आदित्य देसाई >>> तो मुद्दा सोडल्यास गुणी नवरा पण होता हो>
पुण्याच्या घरात त्याने किचनमध्ये सगळा पसारा, उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवली . दोघे ऑफिसातून परत आल्यावर तो तोंडावर उशी घेऊन झोपला.
आणखीही अवगुण आहेत. त्या धाग्यावर लिहिले होते. त्या मालिकेचा शेवटही मूल दत्तक घेण्यावर ओढून ताणून आणला होता. आलो मूळ विषयावर.
त्या मालिकेचा शेवटही मूल
त्या मालिकेचा शेवटही मूल दत्तक घेण्यावर >>> हो हो शेवट कंप्लीट गंडला होता. त्यांनी ती मालिका आदित्य मेघनाच्या रेशीमगाठी जुळल्यावरच बंद करायला हवी होती.
नवीन डॉन मध्ये मला खरं म्हणजे
नवीन डॉन मध्ये मला खरं म्हणजे प्रियंकाने शाहरुखला मारून टाकले असते तर आवडले असते
>>>
मग डॉन दोन कसा आला असता?
चांदनी सिनेमात शेवटी
चांदनी सिनेमात शेवटी श्रीदेवीने ऋषी कपूरशी लग्न करायला नको होतं मे बी. त्याच्या घरच्यांना ती अजिबात आवडत नसते. आणि त्यांचा अप्रोच बदललेला दाखवला नाहीये. ते तिला वाईटच वागवण्याची शक्यता जास्त. तिने तिच्यावर प्रेम करणारं घर निवडायला हवं होतं, तिचा अपमान करून हाकलून लावणारं घर नाही.
नथिंग अगेन्स्ट विनोद खन्ना पण
नथिंग अगेन्स्ट विनोद खन्ना पण ऋषी कपूर अपघात होण्यापूर्वी घरच्यांना जागा दाखवून देत असतो. तो अपंग झाल्यावर घरचे अजूनच वाईट वागतात आणि तिला कशाला त्रास म्हणून ब्रेकअप करतो तेही प्रेमापोटी. त्यामुळे (आणि ऋषी फेवरीट असल्याने) मला चालला शेवट.
आणि विनोदसोबत ती तडजोड म्हणूनच असते. त्या शेवटच्या गाण्यात फरक दाखवला आहे की.
चांदनी सिनेमात शेवटी
चांदनी सिनेमात शेवटी श्रीदेवीने ऋषी कपूरशी लग्न करायला नको होतं मे बी.>>>>>>अगदी अगदी
मला पण आवडला चांदणी चा शेवट .
मला पण आवडला चांदणी चा शेवट .(आवडता) नवरा की ( चांगले )सासरचे यात (आवडता) नवरा निवडणे योग्य आहे सासरचे लोकं अवॉईड करता येतात नवरा नाही.
सासरचे लोकं अवॉईड करता येतात
सासरचे लोकं अवॉईड करता येतात नवरा नाही >>> गुड पॉईंट. तसा विनोद चांगलाच असतो. पण ती अजूनही ऋषीच्याच प्रेमात असेल तर उलट तो विनोदवरच अन्याय झाला असता.
या धाग्यावर सगळी जुळलेली लग्न
या धाग्यावर सगळी जुळलेली लग्न तोडा तोडी चालू आहे
बाई दवे,
पण मी रमड यांच्या एका मुद्द्याशी सहमत. जर सासरचे वाईट असतील आणि नवरा त्यांच्या थेट विरोधात जायची हिंमत दाखवत नसेल. तर असे लग्न म्हणजे जुगार आहे. उद्या (नवऱ्याने बेडवर टॉवेल टाकला आणि) त्याच्याशी भांडण झाले तर तो बायकोला सोडून त्याच्या घरच्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसण्याची शक्यता आहे. अश्यावेळी तिला ना कोणी वाली राहणार ना कोणी सुग्रीव.
नवरा बायको म्हटले की भांड्याला भांडे लागून भांडण होणारच. अश्यावेळी दोन्ही घरचे चांगले समजूतदार नसतील तर ते पेल्यातील वादळाला आणखी चमच्याने ढवळून नात्याची वाट लावतात.
शेवट .(आवडता) नवरा की (
शेवट .(आवडता) नवरा की ( चांगले )सासरचे यात (आवडता) नवरा निवडणे योग्य आहे
>>> १९००+++
धन्यवाद ऋ
धन्यवाद ऋ
या धाग्यावर सगळी जुळलेली लग्न तोडा तोडी चालू आहे >>> असं झालंय खरं. तू लिही बरं काहीतरी वेगळं.
मला हायवे सिनेमात शेवटी रणदीप हुडाला मारून टाकलं ते आवडलं नव्हतं. तिची त्याच्याशी जोडी जुळवली नाही ते ठीकच आहे पण त्याला मारायचं कशाला?
मला हायवे सिनेमात शेवटी रणदीप
मला हायवे सिनेमात शेवटी रणदीप हुडाला मारून टाकलं ते आवडलं नव्हतं.
>>>>>>
अरे यार मला हा बरेच दिवसापासून बघायचा होता..
या धाग्यावर न बघितलेल्या पिक्चरांचे शेवट कळणार हे लक्षातच आले नाही.
आता मला काय माहिती इतक्या आधी
ऋषीच्याच प्रेमात असेल तर उलट
ऋषीच्याच प्रेमात असेल तर उलट तो विनोदवरच अन्याय झाला असता.>>>> +1 प्रेम तर ऋषि वरच असतं विनोद खन्ना तर फक्त आवडत असतो त्यालाच पुढे जाऊन प्रेम समजली असती तर किंवा सॉफ्ट कॉर्नर ने पुन्हा प्रेमात पडली असती तर.प्रेम असणे आणि आवडणे यात फरक असतो ना .हे खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय .
पण जर ऋषी कपूर परत आला नसता तर मेबी ...
मला जुदाई पिक्चरचा शेवट
मला जुदाई पिक्चरचा शेवट नव्हता आवडला. तिनेच त्याग केला शेवटी वगैरे कशाला? अनिलला पण उर्मिला आवडायला लागलेली असते. मुलांनी पण तिला अॅक्सेप्ट केलेलं असतं. फक्त श्रीदेवीला पश्चात्ताप झाला म्हणून सगळं पुन्हा नॉर्मलला आलं असं का बरं?
थोडे जोड्या जुळवा ट्रॅक
थोडे जोड्या जुळवा ट्रॅक बदलून वेगळे जायचे म्हटल्यास,
मला ओह माय गॉड चित्रपट फार आवडला पण त्याचा शेवट रुचला नाही. थोडा वेगळा आवडला असता.
म्हणजे एकीकडे पूर्ण चित्रपटभर देवाच्या अतीआहारी जाऊन फसू नका म्हटले तर दुसरीकडे शेवटी देवच चमत्कार करून सारे काही ठीक करतो असे दाखवले. आणि नास्तिकाला सुद्धा अखेर आस्तिक बनवले.
त्याऐवजी पीके चित्रपटामध्ये कोणत्या देवाचा चमत्कार न दाखवता, तो शक्तिशाली असा कुठेतरी आहे हे मान्य करून पण त्याचे अस्तित्व थेट न दाखवता तटस्थपणे हाच संदेश पोहोचवला.
मला 'शोले' ची एक विडियो कॅसेट
मला 'शोले' ची एक विडियो कॅसेट मिळाली होती... त्यात शोलेचा शेवट... ठाकूर गब्बरला चपलानी (खिळे असलेल्या) ठार मारतो आणि पोलिस येतात असा होता. त्याच विडियो कॅसेटमधे धर्मेन्द्र हेमामालिनीला आंबे पाडायला नेम लावायला शिकवतो त्या दृश्यात 'ये अपने आपको जेम्स बॉण्ड के पोते समझते हैं' या ऐवजी अमिताभ 'ये अपने आप को तात्या टोपे के पोते समझते हैं' असं म्हणाला होता. माझ्या मित्राने ती विडीयो कॅसेट ढापली (आणि हरवली म्हणुन त्याचे पैसे पण भरले) आणि नंतर महागुरू सचिनला भेट दिल्याचे आठवते..
....
ठाकूर गब्बरला चपलानी (खिळे
ठाकूर गब्बरला चपलानी (खिळे असलेल्या) ठार मारतो आणि पोलिस येतात >>> हा शेवट मी पण पाहिलेला आहे
परदेसाई,
परदेसाई,
माझ्याकडे सीडी आहे ह्या वर्जन ची...
आह - राज कपूर मेलेला दाखवायला
आह - राज कपूर मेलेला दाखवायला हवा होता. म्हणे आधी चित्रपटात तसंच होतं पण मग चित्रपट चालेल की नाही या धास्तीने त्याला जिवंत ठेवलं.
तोहफा - जयाप्रदाला उगीचच मारून टाकलंय, बळेच जितेंद्र श्रीदेवीची जोडी जुळवायला.
नसीब अपना अपना - हा कोणी बघितला असेल असं वाटत नाही. पण फरहाची आत्महत्या उगीचच काहीही आहे.
मेरे यारकी शादी है - जिमी शेरगिलचे लग्न जुळायला हवे होते.
मेरे मेहबूब - अमिताविषयी उगीचच वाईट वाटतं. राजेंद्रकुमार तिला आशा दाखवून, तिच्याकडे रात्रभर प्रेमाने बघत बसतो. आणि मग साधना तिची जेव्हा त्याच्याशी ओळख करून देते तेव्हा उगीचच तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे असं मानभावीपणे म्हणतो. त्याला दोघींशीही निकाह सहज करता आला असता
राजाकी आयेगी बारात - पूर्ण चित्रपटच भयानक आहे. राणी मुखर्जीने शादाब खानला पोलीस कोठडीत खितपत पडायला लावायला हवं होतं. अशा माणसाशी लग्न करण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहिलेलंच चांगलं.
Pages