चित्रपटाचा शेवट तुम्हाला कसा आवडेल?

Submitted by rmd on 16 February, 2025 - 23:59

बरेचदा असे होते की एखादा चित्रपट संपल्यावर असे वाटते की याचा शेवट वेगळा असता तर जास्त आवडलं असतं.
उदाहरणार्थ - ' शोले ' चित्रपटाच्या शेवटी अमिताभ मरायला नको होता असं मला वाटतं. किंवा ' ताल ' चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याने कोणाशीच लग्न करायला नको होतं - कितीही असलं तरी अक्षयने तिचा आणि तिच्या वडिलांचा अपमान केलेला असतोच. किंवा मग ' रंग दे बसंती ' च्या शेवटी त्यांना मारून टाकलं असं न दाखवता लोकांनी त्यांना वाचवलं असं काहीतरी दाखवायला हवं होतं.
असे अजून कित्येक पिक्चर असतील ज्यांचा शेवट वेगवेगळ्या प्रकाराने जास्त आवडला असता. तुमच्या मनात आहेत का असे काही वेगळे शेवट?
चला मग लिहा पटापट या धाग्यावर Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमिताविषयी उगीचच वाईट वाटतं. >>> "त्याच्याबद्दल्/तिच्याबद्दल वाईट वाटतं" कॅटेगरीत बरेच आहे. डीडीएलजे मधे तो तिचा मंगेतर केवळ पिक्चरचा हीरो नाही म्हणून त्याचा पोपट केला आहे. तो काही व्हिलनही नाही. एकवेळ त्याला हे सगळे माहीत होते असे काहीतरी शेवटी दाखवले असते तरी चालले असते. दिलदार अच्छा दोस्त वगैरे.

आँधी आणि इजाजत >>> हो. मलाही खटकलं होतं ते. >>> इजाजत मधले नक्कीच. आँधी पाहिलेला नाही.

मला एकूणच प्रेमाचे त्रिकोण सोडवायला एकाने मरावे लागते हा प्रकार बळंच वाटतो. काही पिक्चर्स मधे त्या तिसर्‍याची जोडी जमेल अशी सोय करतात त्याला/तिला कोणीतरी भेटवून. ते ठीक आहे.

नसीब अपना अपना >>> मी पाहिलाय Lol फरहाची आत्महत्या उगीचच आहे हे बरोबर.

मेरे यारकी शादी है - जिमी शेरगिलचे लग्न जुळायला हवे होते
राजाकी आयेगी बारात - अशा माणसाशी लग्न करण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित
>>> +१

डीडीएलजे मधे तो तिचा मंगेतर केवळ पिक्चरचा हीरो नाही म्हणून त्याचा पोपट केला आहे >>> अगदी अगदी Lol

प्रेमाचे त्रिकोण सोडवायला एकाने मरावे लागते >>> हा खरंच बळंच प्रकार आहे. त्यातही गुप्त सारख्या सिनेमात त्याचं काही वाटत नाही. पण दिवाना मधे हकनाक मारलंय बिचार्‍याला.

तिनेच त्याग केला शेवटी वगैरे कशाला? >> १००+++

नसीब अपना अपना >>> मी बघितलाय चक्क. फराहची आत्महत्या आठवत नाही. पण त्यात ऋषीच्या गळ्यात त्या राधिकाला जबरदस्तीने बांधणाऱ्या बापाचा मात्र राग आला होता हे आठवतं. मुलावर व सुनेवर एकतर्फी लग्न लादल्यामुळे व फराहवर उगीच अन्याय केल्यामुळे बापाला पश्चाताप होऊन त्यानेच आत्महत्या केली पाहिजे होती. मग त्या राधिकाला डिवोर्स देऊन तिचं दुसरीकडे लग्न करता आलं असतं.

डीडीएलजे मधे तो तिचा मंगेतर केवळ पिक्चरचा हीरो नाही म्हणून त्याचा पोपट केला आहे >>> तर काय?

ऋषीच्या गळ्यात त्या राधिकाला जबरदस्तीने बांधणाऱ्या >>> हेच लॉजिक लावून मला मुंबईचा फौजदार पण नव्हता पटला. त्याचा एक शेवट तसलाच. रंजनाचा मेकोव्हर झाल्यावर याला लग्गेच प्रेमाचा साक्षात्कार!

डीडीएलजे मधे तो तिचा मंगेतर केवळ पिक्चरचा हीरो नाही म्हणून त्याचा पोपट केला आहे. तो काही व्हिलनही नाही.>>> फक्त कबुतरांना तर गोळ्या मारत असतो फारसा वाईट नसतो त्याच्याशीच व्हायला हवं होतं लग्न काजोलचं. Proud

रंजनाचा मेकोव्हर झाल्यावर याला लग्गेच प्रेमाचा साक्षात्कार!>> exactly
मला कन्सेप्ट च पटत नाही हा >>>> +१

वरचा चित्रपट पाहिला नाही पण,
मेकोव्हर झाल्यावर व्यक्ती आवडायला लागणे यात काही गैर नाही.
एखादी व्यक्ती मनाने खूप चांगली का असेना पण वागणे बावळटसारखे असेल तर आयुष्याचा जोडीदार म्हणून नाही आवडत. जर तीच व्यक्ती मेकोव्हर होत स्मार्ट दिसू लागली तर आवडणे साहजिक आहे.

फेसबुकवर शाळेतल्या किती तरी मुली दिसतात ज्या आजच्या तारखेला इतक्या भारी दिसतात की आपण त्यांच्यावर तेव्हा लाईन का नाही मारली हा प्रश्न पडतो.

पिक्चर आदर्शवादी का पाहिजे असतात आपल्याला? हिरोला सुद्धा सामान्य माणसासारखे वागू द्या..

मग मेकओव्हर झालेली व्यक्ती काही कारणाने वाईट दिसायला लागली (आजारपण, अपघात, म्हातारपण, स्ट्रेस इत्यादी) तर परत सोडणार का?

राधिका मसालेवाली राधिका मुलगा झाल्यावर आणि संसारात गुरफटल्यावर अगदीच टिपिकल गृहिणी झाली. त्यामुळे तिच्या नवर्‍याला (काय नाव त्याचं) त्यांचा प्रेमविवाह असूनही ती आवडेनाशी झाली आणि तो शनायाच्या मागे लागला.

डिट्टो - अरुंधती - अनिरुद्ध आणि संजना.

बीवी नं १ मध्येही असंच होतं का?

तेव्हा बायकोचा मेकोव्हर झाला की नवर्‍याच्या तिच्या बद्दलच्या भावना बदलतातच. हेच सामान्य माणसाचं लक्षण आहे. म्हणून बायकोने नवर्‍यासाठी स्वतःला कायम टिपटॉप ठेवावं.

नवर्‍याचा मेकोव्हर झाल्यावर बायको त्याच्या प्रेमात पडल्याचा एक सिनेमा आहे. पाहिला नाहीए. पण त्यात तिला दुसर्‍या पुरुषाकडे बघायचा चान्स असतो का? नवर्‍याला टक्कल पडलं, त्याचं पोट सुटलं म्हणून तिने नवा गडी शोधला असं कुठे झालंय का?
---
अर्थचा शेवट महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी तू पूजाला सोडलंस. उद्या आणखी कोणासाठी मला सोडशील , असं कविता इंदरला सांगते. इंदर पूजाकडे परत आल्यावर कविता त्याला विचारते, मी अशी दुसर्‍या कोणाकडे जाऊन परत आले असते, तर तू मला स्वीकारलं असतंस का? ती दुसर्‍या पुरुषाचा आधारही शोधत नाही. हा असा शेवट ठेवल्याबद्दल महेश भटला मानलं पाहिजे.

मग मेकओव्हर झालेली व्यक्ती काही कारणाने वाईट दिसायला लागली
>>>>

मेकओव्हर म्हणजे फक्त दिसणे नाही त्याला मेकअप बोलत असावेत..
मेकओवर तुमच्या पर्सनॅलिटीचा होतो व्यक्तिमत्त्वाचा होतो..

नवर्‍याला टक्कल पडलं, त्याचं पोट सुटलं म्हणून तिने नवा गडी शोधला असं कुठे झालंय का?
>>>>>

सिरियसली? असे कुठल्या चित्रपटात दाखवले नाही किंवा प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा असे कधी घडत नाही? नवरा दिसायला छान नाही म्हणून एखाद्या बाईने विवाहबाह्य संबंध ठेवणे हे कधी झालेच नाही? तुम्ही कधी पाहिलेच नाही?

नवर्‍याला टक्कल पडलं, त्याचं पोट सुटलं म्हणून तिने नवा गडी शोधला असं कुठे झालंय का?
>>> अशी नायिका आली तर कितपत चालेल, व्यभिचार-व्यभिचार म्हणून ओरडायला लागतील लोक. मात्र शनाया प्रकरण तर मोठं 'ऑब्हियस' होतं असं बघतात. सध्या समानतेची व्याख्या म्हणजे पुरुषांनी स्वैपाक आणि बायकांनी नोकरी करणं यातच अडकली आहे. प्रत्यक्ष स्त्रियांचा सेल्फ एस्टीम अतिशय 'लो' असतो, बऱ्याच घरात पगार सासू किंवा नवऱ्याच्या हातात देऊन घरातील कामं उपसत बसावी लागतात. मग चार मसाले विकले, चांगली साडी नेसून मेकप केल्यावर नवऱ्याने टाकलीच 'कृपादृष्टी' की यांना उपकृत वगैरे वाटतं. शनायांवर यांना कुरघोडी केल्यासारखी वाटते.

पण त्या नवऱ्याला बायकोचा आदर वाटत नाही, तिच्याबद्दल प्रेम वाटत नाही. हा यांच्या नात्याचा कणा आहे, असं नातं वाचवून काय करायचंय ... मेलेलं बरं. गंमत म्हणजे त्या शनायाचा सुद्धा सेल्फ एस्टीम 'लो' आहे. तिलाही एकनिष्ठ व समर्पित नसलेला पुरुष चालतोय, स्वतःला यापेक्षा चांगला मिळू शकेल असे वाटत नाही. त्यामुळेच या नायकाचे फावतेय. दोन बायका आपल्यासाठी लढत आहेत वगैरे. अरब कन्ट्रीज मधला एक माणूस बायका जास्त असल्याने सर्व्हिस जास्त चांगली मिळते असे माझ्या ओळखीच्या एका बाईला म्हटल्याचे तिने मला सांगितले होते. अतिशय आक्षेपार्ह विधान आहे पण साधर्म्य आहे सिच्युएशनमधे.

शनाया व राधिका दोघींनीही त्याच्या एकेक कानाखाली काढून आपापल्या आयुष्यात आवडीच्या पुरुषासोबत वा पुरुषाशिवाय 'मूव्ह ऑन' व्हायला हवं. बायकोने चांगला वकील गाठून अर्धी प्रॉपर्टी व शेअर्ड कस्टडी कायदेशीर मार्गाने मिळवायला हवी. आपला आदरही न करणाऱ्या माणसासाठी काही भावनाप्रधान व्हायचं नाही, स्ट्रेट फॉरवर्ड रहायचं. प्रत्येकाला आयुष्यात सुखी व्हायचा अधिकार आहे. मी मालिका लिहिली तर अशी लिहीन आणि मग बुरसटलेल्या लोकांना 'आगाऊ' वाटून ती बंद पडेल. Happy कारण बहुतांश प्रेक्षक वर्ग बुरसटलेल्या विचारांचा आहे म्हणून तर ह्या मालिका चालतात.

*मी स्त्रीवादी आणि व्यक्तिवादी दोन्ही आहे. त्यामुळे उलट युक्तिवाद घेऊन येऊ नये. सध्या फक्त या अशा पायंड्याविषयी लिहिले आहे.

रमडचा धागा असल्याने मोकळेपणाने लिहिता येतेय. Happy

नवर्‍याचा मेकोव्हर झाल्यावर बायको त्याच्या प्रेमात पडल्याचा एक सिनेमा आहे. पाहिला नाहीए. >>> दो अंजाने. पण हा अपवाद आहे.

कबुतरांना तर गोळ्या मारत असतो फारसा वाईट नसतो त्याच्याशीच व्हायला हवं होतं लग्न काजोलचं >>> Happy मग या लॉजिकने त्याच्याच घरी राहून त्यालाच गंडवणार्‍या शाखाबद्दल काय? धावती गाडी स्वतः पकडणे तर सोडाच, तो होता त्याच्या मागचे इतर डबेही त्याच्या डब्यापासून अनलिंक करायला हवे होते काजोलने Happy

अस्मिता - सहमत आहे. आवडली पोस्ट. यामुळेच मला लक बाय चान्स मधल्या कोंकणाचे कॅरेक्टर आवडले.

अस्मिता, जबरदस्त पोस्ट. नेमकेपणानं मांडलं आहेस.

तो होता त्याच्या मागचे इतर डबेही त्याच्या डब्यापासून अनलिंक करायला हवे होते काजोलने >>> Rofl इमॅजिन करून हसतेय

सध्या समानतेची व्याख्या म्हणजे पुरुषांनी स्वैपाक आणि बायकांनी नोकरी करणं यातच अडकली आहे.
>>>>

+७८६
आणि गंमत म्हणजे ज्या पुरुषाला स्वयंपाक करायला आवडत नाही त्याला स्वयंपाक करायचे सल्ले असे दिले जातात की जणू तो आपल्या बायकोवर अन्यायच करत आहे Happy

यावर मी मागे एकदा धागा काढायचा विचार करत होतो. पुन्हा आठवण झाली. नोंद करून ठेवतो.

मुळात जे प्रत्येक गोष्टीची लिंक स्त्री पुरुष समानतेवर नेतात त्यांच्याच डोक्यात कुठेतरी हा भेद असतो. एखादी अमुक तमुक पोस्ट लिहिली तर असे तुमच्या बायकोने केले तर चालेल का हा प्रश्न सुद्धा कुठेतरी यातूनच विचारला जातो Happy

मग या लॉजिकने त्याच्याच घरी राहून त्यालाच गंडवणार्‍या शाखाबद्दल काय? धावती गाडी स्वतः पकडणे तर सोडाच, तो होता त्याच्या मागचे इतर डबेही त्याच्या डब्यापासून अनलिंक करायला हवे होते काजोलने

>>>>> Lol परमितचा एवढाच दोष की त्याने फ्लर्टेशियस शाहरुखवर विश्वास ठेवला. घरातील प्रत्येक स्त्री अगदी आत्याही त्याच्यावर खूष असते. त्याला साडीपासून सिलेंडर पर्यंत सगळं निवडू दिलं. एवढ्या चार्मिंग आणि हजरजबाबी तरुणाला स्वयंपाकघरात सुद्धा कामं करू दिली. त्यात काजोलचेही त्याच्यावरच प्रेम. ही लढाईच अनफेअर होती. Happy

थॅंक्यू सर्वांना, ऋ सहित. Happy

नवर्‍याचा मेकोव्हर झाल्यावर बायको त्याच्या प्रेमात >> आता धूम धाम मध्ये तो स्ट्रिप क्लब मध्ये कपडे काढतो तेव्हा आणि मग नंतर मारामारी करतो तेव्हा त्याची बायको त्याच्या प्रेमात पडते

आपला आदरही न करणाऱ्या माणसासाठी काही भावनाप्रधान व्हायचं नाही, स्ट्रेट फॉरवर्ड रहायचं. >>> १०० +++

आता धूम धाम मध्ये तो स्ट्रिप क्लब मध्ये कपडे काढतो तेव्हा आणि मग नंतर मारामारी करतो तेव्हा त्याची बायको त्याच्या प्रेमात पडते >> तो फक्त एक बॉक्स टीक मार्क होता. तिची मैत्रीण नि नवर्‍याची वेव्ह लेंग्थ जमतेय हे लक्षात आल्यावर पूर्ण शीट टीक्ड होतय .

त्यावरून सिनेमाचा क्ल्यायमॅक्स थोडक्यात गुंडाळलाय तो लांब असायला हवा होता - विशेषतः यामी नि मेन इंस्पेक्टरमधला प्रसंग. ती बोलून बोलून त्याला गारद करते असे दाखवायला हवे होते. Happy

गाऊन नाही र्मड - ती गाडीमधे बांधलेले असताना जे बोलते तसे बोलून - कहर आहे तो प्रकार - प्रतिक गांधी शेवटी 'रिश्ते मे' बोलतो तो भाग भारीच जमलाय.

विशेषतः यामी नि मेन इंस्पेक्टरमधला प्रसंग. ती बोलून बोलून त्याला गारद करते असे दाखवायला हवे होते.
>>>> Lol 'गारद' शब्दाचा वाक्यात उपयोग झाला. पण ती सहज करू शकली असती. कंटिन्यू बोलत राहिले की समोरचा माणूस भांबावतोच. तेही असं वाक्ताडण जणू AK 47.

गाऊन नाही र्मड - Lol
जब वी मेट ची गीत! >>> Lol तुमचं संभाषण वाचून फुटले.

जब वी मेट ची गीत >> अशक्य आहे एव्हढे जुने आठवणे र्मद. तसही त्या गाण्यानंतर फक्त ते गाणेच लक्षात राहिलेय म्हणा.

प्रतिक गांधी शेवटी 'रिश्ते मे' बोलतो तो भाग भारीच जमलाय. >>> +१

ती गाडीमधे बांधलेले असताना जे बोलते तसे बोलून >>> हो हो , हे मान्य.

आपलं संभाषण वाचून मी पण हसते आहे इथे Lol

Pages