Submitted by rmd on 16 February, 2025 - 23:59
बरेचदा असे होते की एखादा चित्रपट संपल्यावर असे वाटते की याचा शेवट वेगळा असता तर जास्त आवडलं असतं.
उदाहरणार्थ - ' शोले ' चित्रपटाच्या शेवटी अमिताभ मरायला नको होता असं मला वाटतं. किंवा ' ताल ' चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याने कोणाशीच लग्न करायला नको होतं - कितीही असलं तरी अक्षयने तिचा आणि तिच्या वडिलांचा अपमान केलेला असतोच. किंवा मग ' रंग दे बसंती ' च्या शेवटी त्यांना मारून टाकलं असं न दाखवता लोकांनी त्यांना वाचवलं असं काहीतरी दाखवायला हवं होतं.
असे अजून कित्येक पिक्चर असतील ज्यांचा शेवट वेगवेगळ्या प्रकाराने जास्त आवडला असता. तुमच्या मनात आहेत का असे काही वेगळे शेवट?
चला मग लिहा पटापट या धाग्यावर 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
खरंय, विधुर असूनही जिचा साखरपुडा झालेला आहे तिचे 'रंगिला रे' तो किती भक्तिभावाने बघतो. Wink>>>

कबीर सिंग मध्ये शेवटी तिच्या
कबीर सिंग मध्ये शेवटी तिच्या पोटातले मूल आपले नाही ही जाणूनही तो तिच्याशी लग्न करतो>>> +१
कबीर सिंग मध्ये तो म्हणतो ना
कबीर सिंग मध्ये तो म्हणतो ना की पोटातले मूल कोणाचे पण असू दे मला काही फरक पडत नाही...
आणि जसे त्याचे कॅरेक्टर दाखवले आहे त्यानुसार त्याला बिलकुल फरक पडला नसता... असे दुसऱ्याचे मूल स्वीकारणे याचे मागच्या पिढीत कौतुक एकवेळ ठीक होते. पण आता काय त्याचे इतके कौतुक. पण मूल त्याचेच दाखवून शेवटाला अजून एक इमोशनल टच दिला. मला तर तोच शेवट आवडला.
'चलते चलते' सिनेमात राणीने
'चलते चलते' सिनेमात राणीने शेवटी शाहरूखकडे परत यायलाच नको होतं. त्याच्या शेवटी तो पुन्हा तसाच टॉवेल फेकताना दाखवला आहे. म्हणजे तो बदलला नाहीये आणि बदलणारही नाहीये. त्यामुळे आता तिने उलट आयुष्यभराकरता संशयी नवरा आणि अब्युझिव्ह नात्याशी स्वतःला बांधून घेतलं आहे.
'कभी अलविदा ना कहना' मधे पण तेच. इतका किरकिरा माणूस आहे. त्याच्याकडे ती कशी काय जाते परत? शेवटच्या सीनमधे प्रपोज करताना पण तो टोमणे मारतो तिला. या माणसासाठी ती अभिषेकशी प्रतारणा करते? सिरिअसली?
'चलते चलते' सिनेमात राणीने
'चलते चलते' सिनेमात राणीने शेवटी शाहरूखकडे परत यायलाच नको होतं. >>> + 1 बरोबर आहे जो पाण्यात पडून लग्नाआधी सिक्का शोधून काढतो तो लग्नानंतर साधा टॉवेल नीट पसरवून दांडीवर टाकू शकत नाही टॉक्सिक .चित्रपट आता आला असता तर पडलाच असता.
कभी अलविदा ना .. इथे येणार
कभी अलविदा ना .. इथे येणार याची खात्री होतीच
लोकं थिएटर बाहेर पडताना शाहरुखला शिव्या घालत होते.. मी सोडून
आणि मग करण जोहर म्हणाला की हा चित्रपट काळाच्या पुढे आहे.
पण प्रत्यक्षात हा चित्रपट आपल्या चित्रपटाकडून ज्या अपेक्षा असतात त्याच्याही पुढे आहे.
शाहरूख चांगली व्यक्ती आहे की अभिषेक चांगली व्यक्ती आहे हा मुद्दाच नव्हता चित्रपटात. उलट शाहरुखला किरकिरे दाखवून करण जोहरने हेच हायलाईट केले आहे. ज्याच्याकडे हीरोइन जाणार तो खूप चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा हे मुद्दाम दाखवले नाहीये..
कारण चित्रपटाचा मेन पॉइंट हा होता की कोणाची कोणाशी केमिस्ट्री जुळते..
राणी मुखर्जीची अभिषेक सोबत जुळत नव्हती तरी समाजमान्य लग्नबंधनात अडकली होती.. शाहरुख सोबत केमिस्ट्री जुळली.. पण ते समाजाला मान्य नव्हते.
अभिषेक तिला आपल्यासारखा बनवू पाहत होता पण ते तिला जमत नव्हते. आणि ती अभिषेकला आपल्या सारखे बनवू पाहत नव्हती आणि तो बनत सुद्धा नव्हता कारण तो पुरुष म्हणजे नवरा होता.
जेव्हा अभिषेकला त्यांच्याबद्दल समजते तेव्हा त्याचाही पहिला प्रश्न काय असतो? तू शाहरुखबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले आहेस का? आणि ती हो म्हणाल्यावर आकांड तांडव.. म्हणजे आपल्या बायकोचे दुसऱ्याशी मन जुळणे दुय्यम होते. सेक्स झाला तर नात्याचा खेळ खल्लास ! मग आता मी तुला कसा स्वीकारणार??
पण तेच शाहरुखने मात्र तिच्याशी लग्न करताना हा विचार नाही केला की ती एवढे वर्षे अभिषेक सोबत संबंधात होती.. अश्या बाईशी मी एक्स्ट्रा मेडिकल अफेअर करेन, लग्न का करेन असा विचार त्याने केला नाही.. कारण त्याच्यासाठी ते दुय्यम होते.. त्यांची केमिस्ट्री मॅच झाली होती. त्यांची मने जुळली होती.
एक्स्ट्रा मेडिकल अफेअर >>>
एक्स्ट्रा मेडिकल अफेअर >>> म्हणजे काय रे?
शाहरुखने मात्र तिच्याशी लग्न करताना हा विचार नाही केला की ती एवढे वर्षे अभिषेक सोबत >>> आँ? आणि त्याचं प्रीतीशी लग्न झालं होतं ते?
म्हणजे आपल्या बायकोचे
म्हणजे आपल्या बायकोचे दुसऱ्याशी मन जुळणे दुय्यम होते. सेक्स झाला तर नात्याचा खेळ खल्लास ! मग आता मी तुला कसा स्वीकारणार??
>>> यावरून मला ती मिर्झापूर मधली मुन्नाची मुख्यमंत्री असलेली बायको आठवली. ती मुन्नाला म्हणते "सेक्स केलास तर चालेल पण मी सोडून कुणावर प्रेम केलंस तर खबरदार..!" आवडला होता तो संवाद.
रमड, अवांतर चालेल समजून लिहितेय.
'एक्स्ट्रा मेडिकल' म्हणजे ते हुमायून नेचर, बाई दवे, जोक्स द अपार्ट या यादीला आपली सोशिकता वाढवणारे नवीन अपग्रेड मिळाले आहे.
अवांतर चालेल समजून लिहितेय >>
अवांतर चालेल समजून लिहितेय >>> हो हो
अवांतर चालेल, टाईमपास चालेल - काहीच प्रॉब्लेम नाही मला. सगळ्यांनी मिळून मजा करण्यासाठी काढलाय धागा गं.
सोशिकता वाढवणारे अपग्रेड
माहिती होतं तरीही खात्री करून
ती अभिषेकला आपल्या सारखे बनवू
ती अभिषेकला आपल्या सारखे बनवू पाहत नव्हती आणि तो बनत सुद्धा नव्हता कारण तो पुरुष म्हणजे नवरा होता.
>>
परत बघ पिक्चर
उगा वोक बनायचा नादात तपशिलात घोटाळा करतो आहेस.
राणी चं ocd वालं पात्र अभिषेकला पँट उतरवायला लावते, टाके घालायला
बचाना ए हसीनो: इंटरवल ला
बचाना ए हसीनो: इंटरवल ला संपवता आला असता
रब ने बना दी जोडी: अनुष्का शेवटी शाहरुख ला म्हणते की 'बावळ्या, मला माहिती होतं की तूच आहेस. I was simply testing you...'
बचाना ए हसीनो: इंटरवल ला
बचाना ए हसीनो: इंटरवल ला संपवता आला असता
>>> मग बिपाशाला इतकं फूटेज कसं खाता आलं असतं?
पण त्याचा शेवट पण गंडलेलाच. तिला अचानक त्याच्या प्रेमाचा साक्षात्कार होतो हे काही पटत नाही. ती खूप सॉर्टेड दाखवली आहे आणि तिला मुळातच लग्न वगैरे करायचं नसतं. मग हा घूमजाव कसा होतो? त्याने माफ्या मागितल्या म्हणून?
आपली सोशिकता वाढवणारे नवीन
आपली सोशिकता वाढवणारे नवीन अपग्रेड मिळाले


>>>>
अरे ते टायपो होते
अंकी असेल, ती सुद्धा प्रयत्न करत.. त्याला आपल्यासारखे बनवायचे. शाहरूख नसलेले सीन मी जास्त तपशीलात बघत नाही. मला लक्षात राहिलेले सीन म्हणजे अभिषेक जॉली असतो आणि तो तिला तसे आपल्यासोबत नाचायला पार्टी करायला वगैरे लावतो.. असो पण मूळ मुद्दा हा की ते एकमेकांना सूट नसतात आणि होण्याची शक्यता सुद्धा नसते हे पुरेसे क्लिअर केले आहे.
एक्स्ट्रा मेडिकल अफेअर >> ते
एक्स्ट्रा मेडिकल अफेअर >> ते मेडिकल टुरिझम बद्दल काही तरी असेल
कभी अलविदा ना >> शेवटच नाही तर हा पूर्ण पिक्चरच का आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.
त्यात राणीला नक्कि काय हवय
त्यात राणीला नक्कि काय हवय हेच कळत नाही..लन्गडा, टॉक्सिक, सतत चिडचिड करणारा माणुस? अभिषेक-राणी नसतिलही मॅच, राणीने ते लग्न उपकाराचि परतफेड म्हणुन केलहि असेल पण शाखा उर्फ देवने तर प्रितीवर प्रेम करुनच मग लग्न केलल, एका अॅक्सीडेन्टने तो फक्त चिडचिडा होतो, मुलावरही विनाकारण राग राग करत असतो..टिपिकल नवरा बनतो...एका सिन्गलवर बायको आणी प्रेयसी दिसल्यावर प्रेयसिकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणारा
हा अक्खा पिक्चरच बडल आहे...चालला नव्हताच तेव्हाही!!
करणचे के सिरिज वाले कोणतेच पिक्चर आत्ता चालले नसतेच..भयकर बालिश पटकथा होत्या..
बचाना ए हसीनो: इंटरवल ला
बचाना ए हसीनो: इंटरवल ला संपवता आला असता
>>> मग बिपाशाला इतकं फूटेज कसं खाता आलं असतं?
होना
Lucky Boy गाणं वाया गेल असत.
काप्रीची निळी बेटं पण पाहता आली नसती.
काप्रीची निळी बेटं >> फार
काप्रीची निळी बेटं >> फार सुंदर आहे ते
धमाल धागा आहे
धमाल धागा आहे
माझेमन यांची पोस्ट घाईत वाचताना मी आधी "बाळा गाऊ कशी अंगाई मध्ये राजेंद्र कुमार ऑपरेशन यशस्वी करून परदेशात निघून जातो" असे वाचले
खरंय, विधुर असूनही जिचा साखरपुडा झालेला आहे तिचे 'रंगिला रे' तो किती भक्तिभावाने बघतो >>
कुकुहोहै एक भंपक पिक्चर आहे याच्याशी टोटल सहमत. कभी खुशी कभी गम सुद्धा. त्यात शेवटी नक्की काय झाले मला अजूनही झेपलेले नाही. टोटल अगम्य शेवट आहे.
शोले, दीवार व मुकद्दर का सिकंदर मधे अमिताभला मारला नसता तर मला आवडले असते. डॉनचा शेवट आहे तसा ठीक आहे पण ती कब्रस्तान मधली मारामारी बाकी पिक्चरच्या लेव्हलच्या मानाने अगदीच पुचाट आहे. दिग्दर्शकाने तरी पाट्या टाकल्या आहेत, सलीम-जावेदही डुलक्या मारत असावेत, किंवा एखाद्या साहाय्यक दिग्दर्शकाला तेवढे उरकून टाक सांगितले आणि त्याने दीवारला अग्नीपथचे ठिगळ लावले असे झाले आहे. बाकी २००६ च्या डॉनचा ट्विस्ट चांगला आहे पण तो "डेरिव्हेटिव्ह" आहे - म्हणजे पहिल्या डॉनची कथा इतकी वर्षे प्रचलित झाल्यावर तो ट्विस्ट इंटरेस्टिंग वाटतो (तीही कथा मूळची "कालिचरण" ची आहे वगैरे माहीत आहे)
गेल्या काही वर्षांतील उदाहरणे म्हणजे "लेडीज व्हर्सेस रिकी बहल" मधे रणवीरला उगाचच शेवटी भाव खाउ दिला आहे. या बायकांनीच त्याच्यावर मात केलेली दाखवायला हवी होती. "शक्ती द पॉवर" मधे करिश्मा काही करून निसटते असे न दाखवता तेथेही नानाला बळंच भाव दिला आहे. आपल्याकडे हीरो वर्शिप कथेवर भारी पडते त्याची उदाहरणे असतील.
याउलट अत्यंत चपखल शेवट म्हणजे "लक बाय चान्स" मधे कोंकणा फरहानला शेवटी तू स्वार्थी आहेस आणि तसाच असणार आहेस हे सुनावते तो भाग. आनंद मधे "बाबूमोशाय!..." टेप सुरू होते तो भाग, आखरी रास्ता मधे ऑल्मोस्ट मेलेला अमिताभ पुन्हा उठतो तो भाग, आणि नमक हलाल मधे सत्येन कप्पूला रस्त्यावर आडवा घालून त्यावर खुर्ची ठेवून आरामात ट्रकची वाट पाहात बसलेला अमिताभ - हे एकदम जमलेले शेवट आहेत.
लगानचा शेवट भारी आहेच पण तेवढा तो इंग्लिश कप्तान कॅच घ्यायला उलटा पळताना दाखवायला नको होता. शेवटच्या बॉल वर सिक्स मारायची आहे असे असताना फिल्डिंग "आत" लावणारा कप्तान जागतिक दर्जाचा बिनडोक म्हणावा लागेल
अर्थात अशा तर्हेच्या सगळ्याच सीन्स मधे असेच दाखवतात पण लगानचा एरव्ही दर्जा भारी आहे आणि बरेच ऑथेण्टिक क्रिकेट सीन्स आहेत.
आठवेल तसे लिहीतो अजून
राजेंद्र कुमार ऑपरेशन यशस्वी
राजेंद्र कुमार ऑपरेशन यशस्वी करून परदेशात निघून जातो >>>
सत्येन कप्पूला रस्त्यावर आडवा घालून त्यावर खुर्ची ठेवून आरामात ट्रकची वाट पाहात बसलेला अमिताभ >>> हा मला आवडलेला शेवट.
सदमा>> मला पण शेवट जरा वेगळा
सदमा>> मला पण शेवट जरा वेगळा चालला असता. लहानपणी पाहिलेला तेव्हा इतका मलाच सदमा बसलेला की आयुष्यभरात परत पाहण्याची चूक केलेली नाही. ती नुसती निघून जाते दाखवले असते आणि तो दुःखी होतो तरी चालले असते. पण त्याचे जे हाल दाखवलेत ते फार अंगावर येणारे आहेत.
मुघले आजम - मधुबाला मरायला
मुघले आजम - मधुबाला मरायला हवी होती, अकबराचे मनपरिवर्तन फारच अचाट वाटते.
रेहना है तेरे दिलमे - दिया मिर्झाने सैफ अली खानशीच लग्न करायला हवं होतं. माधवन एकदम टॉक्सिक दाखवला आहे.
ताल - ऐश्वर्याने अनिल कपूरकडे यायला हवं होतं
संगम - वैजयन्तीमालाने राज आणि राजेंद्र दोघांनाही डावलून तिसरा कोणीतरी निवडायला पाहिजे होता
अमर - मधुबाला आणि निम्मीने दिलीपकुमारला बलात्काराच्या गुन्ह्याखाली पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं.
सिलसिला - अमिताभ आणि रेखाने शेवटी एकत्र यायला हवं होतं
रंग दे बसंती - सगळ्या पोरांना पकडून जेलमधे टाकायला हवं होतं, गोळ्या झाडून ते उगीचच शहीद झाल्याचं दाखवलंय
सिलसिला - अमिताभ आणि रेखाने
सिलसिला - अमिताभ आणि रेखाने शेवटी एकत्र यायला हवं होतं
त्यापेक्षा रेखा संजीव कुमारकडे गेली तेच बरं झालं. अमिताभ काही भरवशाचा नाही 
>>> कशाला? रेखाबरोबर गुलुगुलू करत होता तेव्हा जयाबरोबर पण होताच की तो! उगाच का ती पुन्हा एकदा प्रेग्नंट असते?
हम दिल दे चुके चा शेवट माझ्या
हम दिल दे चुके चा शेवट माझ्या नेहमी डोक्यात जातो.
काळ बदलला तरी वोह सात दिन..
लग्न लावले की मुलगी आपल्या प्रियकराला विसरून नवऱ्याच्या प्रेमात पडते या विचाराने पुढे कित्येक प्रेमी जीवांचे आयुष्य उद्धवस्त केले असेल..
मुलीचे जबरदस्ती लग्न लावायचे आणि लग्न ठरल्यावर ती पळून गेली तर मुलीने धोका दिला म्हणून तिचे श्राद्ध घालायचे..
जर पुढे जाऊन असाच शेवट दाखवायचा होता तर किमान आधीचे प्रेम उथळ तरी दाखवायचे होते. माँ उसने मुझे यहा छुवा है म्हणत कश्याला गहिरे प्रेम दाखवले
(No subject)
हो बिचारा सलमान शेवटच्या
हो बिचारा सलमान शेवटच्या सीनला दयाच येते रडताना पाहून .अजयशी प्रॉपर डीवोर्स घेऊन ऐश्वर्या ला सलामानबरोबर इटलीत डोली तारो करताना दाखवली पाहिजे होती.
पण एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रुन्मेष बाबू त्याच्यामुळे सगळा घोळ होतो.त्यातून जर नवरा चांगला निघाला तर प्रियकराला विसरूनच जातात जसं हल्लीच्या दाभाडे मध्ये मितालीच्या मयेकरच्या स्टोरीत झालाय .आपल्याकडे एकदा लग्न झालं की ते न मोडण्याकडेच कल असतो तेव्हा तरी असायचा हल्ली न्युज मध्ये ऐकतो की जातात बायका लग्नानंतरही प्रियकराबरोबर पळून.
हम दिल दे चुके चा शेवट >> हो
हम दिल दे चुके चा शेवट >> हो हो ... म्हणजे इतके दिवस उगीच सलमानच्या मागे पागल होती. पण आपल्याकडे ते मंगळसूत्राची ताकद वगैरे दाखवणे गरजेचे असते ना
हल्ली न्युज मध्ये ऐकतो की
हल्ली न्युज मध्ये ऐकतो की जातात बायका लग्नानंतरही प्रियकराबरोबर पळून.
>>>>
हो ना.. बातम्या वाचून कसे आपण जज करू शकतो की काय झाले असेल?
१) जबरदस्ती लग्न लावले असेल मुलीचे आणि यात ज्याच्याशी लग्न लावले तो सुद्धा सामील असेल. जर आधीच प्रियकरासोबत लग्न लावून दिले असते तर ही वेळ आलीच नसती.
२) प्रियकर खरेच मवाली असेल आणि मुलगी प्रेमात आंधळी झाली असेल जे तिला हे दिसत नसेल पण घरच्यांनी तिच्या काळजीपोटीच तिचे लग्न दुसरीकडे लावले असेल.
कुठली ही शक्यता असू शकते.
किंवा आणखी तिसरी असू शकते.
पण या सर्व शक्यता constant ठेवल्या आणि तटस्थपणे विचार केला तर ज्याला त्याला आपला जोडीदार निवडायचा हक्क हवाच.
पण आपल्याकडे ते मंगळसूत्राची
पण आपल्याकडे ते मंगळसूत्राची ताकद वगैरे दाखवणे गरजेचे असते ना
>>>>>>
अगदीच.
नात्याला प्रेम विश्वास समजूतदारपणा या बाबींनी बांधून ठेवायला हवे. प्रथा परंपरा संस्कार संस्कृती वगैरे गोष्टींनी नाही. त्यांचे पालन आपल्या जागी करा. पण ती नात्याची वीण होऊ देऊ नका.
तुम्ही मुद्दे बरोबरच आहेत
तुमचे मुद्दे बरोबरच आहेत रुन्मेष
या सर्व शक्यता constant ठेवल्या आणि तटस्थपणे विचार केला तर ज्याला त्याला आपला जोडीदार निवडायचा हक्क हवाच.>>>याला प्रचंड अनुमोदन.
आपल्याकडे ते मंगळसूत्राची ताकद वगैरे दाखवणे गरजेचे असते ना>>>हो हो. ते काही असो सिंदूर आणि मंगळसूत्र जाम टची मुद्दे आहेत स्त्रियांसाठी .
Pages