हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आज जुम्मा नै जुमेरात है; लेकिन कल जुम्मे कू ये नाचीज़ बीजी रहेंगा. इस वास्ते आज ईच लिखरा ये नया हैदराबादी किस्सा :

अपनी खडूस बड़ी अम्मी हौर बहू फरजाना बेगम की बातां हो रई. सुनो :

बडी अम्मी : फरजाना बहू ये जो पड़ोस मे रैती बरखा उनों परले दर्जे की मक्कार औरत है. तुम उसकू ज़्यादा कन्ने नक्को आने देव.

बहू बेगम : हौ बडी अम्मी, ऐसाच करतुं

बडी अम्मी : उनों जो बोलती ना वो ख़समखानी फ़क़त झूठच बोलती..उस नासपीटी खसुअन की बातां पे तुम बिल्कुलच भरोसा नक्को करो, मै बोल रई.

बहू बेगम : हौ बडी अम्मी. ठीक बोलरै तुम.

बडी अम्मी : वैसे आज सुभु को उनों क्या बोल रई थी तुमकू?

बहू बेगम : कुछ नै. उनों झूठी बरखा बोल रई की तेरी सास बडी अम्मी भौत अच्छी औरत है Proud Proud

Pointers for specific words :

खसमखानी = नवऱ्याला खाऊन टाकणारी, कजाग

परले दर्जे की = वरच्या दर्ज्याची

नासपीटी = जिचा सर्वनाश व्हावा अशी, एक शिवी

खसुअन तर आता माहितीच आहे इथे सर्वांना Lol

>>> आज जुम्मा नै पीर है
ओह पीर म्हणजे गुरुवार का? Happy
सगळ्या वारांची नावं सांगाल का, अनिंद्य?

ओह ओके!
तुमचे लतीफे़ मजेशीर असतातच, पण हा लहजा कानाला फार गोड लागतो! Happy

शुक्रिया.

मला हे क़िस्से लिहितांना स्वत:शीच मोठ्याने वाचायची सवय आहे. म्हणून मोठी वाक्ये नसतात. साधे बोलणे, रोजच्या वापरातले. Past tense कमी, past perfect तर नसतोच Happy

शब्बो हौर जुम्मन बेगमबाजार से लोट रहे तो एक अन्धे भिखारी ने टोका.

भिखारी: ए हुस्न की मलिका, अंधे को दस रुपये दे दे...

जुम्मन एकदम नादानिस्ता तौरपर : शब्बो दे दे बेगम. सच्ची मे अन्धा लगता है!
ऐसे लोगाकी तो मदद करनी चाहिए
नही तो आजकाल लोगा दिखाते एक होर होते हौर है...

छल्ला>>>> Lol
म्हणूनच या किस्स्यांचा ऑडियो करायचाय.>>>> नक्की करा, अनिंद्य.

छान आहे किस्सा.

Monday 》Somwaar/Peer
Tuesday 》Mangal
Wednesday 》Budh
Thursday 》 Jumaraat
Friday 》Jumm'ah
Saturday 》Hafta
Sunday 》Itwaar

छल्ला,
Lol Lol Lol
फार आवडला. सिक्सर जोक आहे.

कळला गं
Lol
हसायचं राहिलं होतं......+१.

@ स्वाती_आंबोळे

वर उपाशी बोका यांनी बरोबर लिहिले आहेत वार.

फक्त शनिवार ला हैदराबादी लहज्यात “शनिच्चर” आणि रविवार ला शुद्ध उर्दू ज़ुबान वाल्यांसारखे इतवार न म्हणता “दीतवार” म्हणतात Lol

बाकी हे सर्व जुन्या पीढीत. विशीतली मुलं संडे-मंडे वाली.

>>> फक्त शनिवार ला हैदराबादी लहज्यात “शनिच्चर” आणि रविवार ला शुद्ध उर्दू ज़ुबान वाल्यांसारखे इतवार न म्हणता “दीतवार”
ओह ओके. Happy
(दीतवार 'आदित्यवार'चा नातेवाईक असेल का?)

Pages