हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शब्बो हौर जुम्मन मिरआलम मंडी जाते, तो वहापे मटर के ढेर लगे दिखे गाडी पे.
शब्बो : सुनो जुम्मन, दो किलो मटर ले लूं ?
जुम्मन : हां, ले लो जो ठीक लग रहा है कर लो...
शब्बो: राय नहीं मांग रही , पूछ रही हूं कि छील लोगे इतने की कम लूं करके....... Angry

Lol मटर की तेहरी बनाएँगे जुम्मे कू.

… ले लो जो ठीक लग रहा है कर लो...

जुम्मन इस कू ऐसे बोलेंगा देखो:

“तुमकू जैसे होना वैसेच करो शब्बो”

अनिंद्य, Lol
तुमकू जैसे होना वैसेच करो शब्बो”.. ...
एकदम सरेंडर्ड आहे जुम्मन!
Happy
तसेही मी हां, ले लो जो ठीक लग रहा है कर लो हे त्याचा गुळमुळीतपणा अधोरेखित करण्यासाठीच लिहीले होते.

मेरा इशारा उधरीच था मोहतरमा.

“ले लो. जो ठीक लग रहा है कर लो” ये एकदमीच प्योर हिन्दी. अपना हैदराबादी जुम्मन नै बोलिंगा ऐसे.

उनो दकनी इस्टाइल में : “तुमकू होना वैसेच करो” ऐसा बोलिंगा Lol

Just a nuanced deviation

English: she is calling the cab.
अम्मी: vocabulary

(सौजन्य: व्हाट्सएप युनिव्हर्सिटी)

जुम्मन आज जरा फिलोसोफिकल मूड मे थे.
तो शब्बो से पूछे, " सुनो, शबनम, अचानक से खुदा सामने आ जाए तो क्या करना चाहिए ? "
शब्बो नेल पालीस लगाने मे बिझी थी, तो उनो डिस्टर्ब हो गये.
तो गुस्से मे बोले," हौला है क्या तू जुम्मन ?
पहिले ये तो कंफर्म करना चाहिए , की खुदा खुद होके आया है इधर या तुम गये हो जन्नत मे..!

येस अनिंद्य.
प्लीज ऑथेंटीक हैदराबादी मध्ये लिहून द्या..

छल्ला, हे घ्या, तड़का मार के :

जुम्मन आज जरा फ़लसफ़ियाना बातां कर रै.

- शब्बो, अल्लामिया एकदमीच सामने कू मुखातीब होते तो क्या करना ?

शब्बो बेगम नेलपालीस लगा रै, उनो ऐसी फालतू बातां नै लगाते कांना में. उनो गुस्से में बोले :

- हौलेपना नक्को करो, अल्लामिया खुद तशरीफ लाये के तुमकू जन्नत में बुलाए ये चेक कर ना पडता पैले. Lol

(थोडा बदल केला कारण खुदा = generic god आणि अल्लामिया = specific god for muslims)

मस्त... Happy

एकदम मस्त, अनिंद्य. Biggrin
फ़लसफ़ियाना शब्द आवडलेला आहे... सूफियाना सारखा!

सूफियाना सारखा, एकदम करेक्टो.

फ़लसफ़ियाना समस्त उर्दू बोलणारे वापरतात philosophical साठी.

गाणं ऐकलं असेल तुम्ही… फ़लसफ़ा प्यार का तुम क्या जानो…रफ़ी, हसरत जयपुरी, शंकर जयकिशन. पडद्यावर देव आनंद. बहुदा दुनिया पिक्चर.

Happy ऐकले आहे. पण फलसफा म्हणजे फिलॉसॉफिकल असेल असे कधी वाटले नाही.
इंग्लिश शब्द कसला बेमालूमपणे वळवला आहे !

खुदा व अल्ल्ला फरक माहित नव्हता.

जुम्मन बेचारा.. मुंह खोले तो किस वास्ते खोले, बेगम
कुच्च भी सुनके नै लेती असे होत असेल त्याला… बेगम बोलते, खानेके वास्तेच खोल, बाकी टैम बंदीच रख..

.. ग्रीक भाषेतून हा शब्द अरेबिक भाषांमध्ये गेला….

शक्य आहे. Philosophy आणि ग्रीकांचा ऐतिहासिक संबंध आहे.

BTW, दीडशहाण्या लोकांना “ज्यादा अरस्तू नक्को बनो” असा टोमणा कॉमन आहे हैदराबादेत.

अरस्तू = Aristotle Lol

Pages