शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकूणातच मराठी सिनेमात, शॉर्ट फिल्मधे, सिरिअल्स मधे ऑफिस या विषयावर सखोल अभ्यास गरजेचा आहे. लहानपणी ऑफिस ऑफिस खेळायचो ते आठवतं.

बँकिंगचा अनुभव आहे हिला म्हणून तिला घेऊन जातो ते तर सुपर फनी आहे >>> Lol मी तिथेच विचार करणं बंद करून बिन्डोक परिकथा म्हणून पाहिली उरलेली फिल्म.
बॉसला सुरूवातीलाच समजलंय की ती फ्रॉड आहे तर दिवसभरात एकदाही तिला 'बाहेर हो' असं म्हणता आलं नाही? त्याउलट प्रेझेंटेशन काय दे!? Lol आणि त्याच्या सो कॉल्ड पायलट प्रोजेक्टची डिटेल्स घेऊन ती पसार झाली असती म्हणजे?

बरं, पण पॉईंट काय आहे? की एथिक्सपेक्षा फायदा महत्त्वाचा हाच ना?
आमच्या तासगावकर बाई म्हणतात... एकी महत्त्वाची! Lol इथे फुटलोच!
बाकी प्रेझेन्टेशन चालू असताना ते सोडून प्रत्येकजण काही तरी वेगळ्यात तंद्रीत असणे हे किती हुबेहुब पकडलं आहे. किती खोलवर अभ्यास आहे!

कसलं प्रेझेन्टेशन मुळात? आणि नवीन (नॉन्)जॉइनी देते कुठल्या कपॅसिटीमध्ये? काही सिक्युरिटी चेक, काही ऑनबोर्डिंग फॉर्मॅलिटीज, काही अ‍ॅक्सेस रिक्वेस्ट्स, काही ओरिएन्टेशन, काही टीमशी इन्ट्रोडक्शन काही काही न करता एकदम प्रोजेक्ट मॅनेजरच्याच लॅपटॉपवरून प्रेझेन्टेशनच तयार करते?

एकूणातच मराठी सिनेमात, शॉर्ट फिल्मधे, सिरिअल्स मधे ऑफिस या विषयावर सखोल अभ्यास गरजेचा आहे. >>>>> अगदी अगदी. त्या फाईल्स तर अश्या वापरतात की हसायला येते. एखाद्या फाईल वर सही करायचा सिन असेल तर हसायला येते. लगेच हा आण इकडे आणि अक्षरशः काहीतरी पेन उठतय की नाही टायीप खरडल्यासारखी सही करतो. अरे ते वाच जरा. सही करतोय ना. सही केल्या सारखी कर.

विशेष म्हणजे कुणीतरी आत्महत्येचा प्रयत्न करणारे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना कळवण्याऐवजी ही मुलगी स्वतःच्याच प्रेमात दिवस वाया घालवते. शॉर्ट फिल्म सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच हा एकच विचार डोक्यात फिरत होता. ती व्यक्ती कोण आहे किमान महिला हेल्पलाइनला तरी कळवायला पाहिजे होते.
लेखकाची काहीतरी विचित्र इच्छा असेल की मला सगळं कळतं असं काहीतरी prove करायचं आहे.

नाकातु आवडण्याचं मुख्य कारण अर्ध्या तासात संपला. बरेच दीड दोन तासांचे पिक्चर्स उगीच ताणलेले वाटतात.
इतर लघुपटांप्रमाणे कुठल्या तरी समस्येला वाचा फोडणारा वगैरे पण नव्हता. थोडी मोठी रील.
सेट अप कमर्शियल पिक्चर सारखा होता. चांगले प्रस्थापित कलाकार घेतलेत.
व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पण दिवसभर आयटीशी संबंधित लोक हेच सांगत होते काल. पणआयटी इंडस्ट्रीचं ओ कि ठो माहिती नसल्याने त्यातल्या बारकाव्यांचं काही कळलं नाही.
उका ने त्याच्या मित्राच्या बहिणीला पाहिलेलं नसतं पण या मुलीच्या चार वाजताच्या प्रेझेंटेशनच्या आधी त्याला तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल समजतं.

नाव काय तुझं? मला तरी बरा वाटला.
>>>>
+७८६ मलाही
इथलीच चर्चा वाचून काल रात्री पाहिला.
त्या मुलीचा अभिनय चांगला होता. उमेश कामत समोर नवखी किंवा लो बजेट वाटली नाही.

फक्त आत्महत्या करणाऱया मुलीचा विचार सोडून ही बिनधास्त आपले आयुष्य जगली हे काही पटले नाही. त्यापेक्षा तिथे वेगळे कारण सुद्धा देता आले असतेच.

बाकी चित्रपटात ज्या कॉर्पोरेट आणि आयटी फील्डच्या बाळबोध चुका होत्या त्या मनावर घेतल्या नाहीत. मी आयटीचा नसल्याने त्याकडे काना डोळा करणे सोपे गेले. माझ्या फील्डबाबत सुद्धा चित्रपटात जे दाखवतात ते देखील फारच बाळबोध असते असा अनुभव आहे.

बरं, पण पॉईंट काय आहे? की एथिक्सपेक्षा फायदा महत्त्वाचा हाच ना?
>>>>>>>

शेवटी त्याने तिला झाडायच्या आधी ती प्रामाणिकपणे सारे कबूल करून जसे व्यक्त होते हे त्याला आवडते असे मला वाटले.
मी त्या जागी असतो तर अश्या मुलीला थेट लग्नाला मागणी घातली असती.

काल रात्री नाव काय तुझं संपल्यावर शंभरावे स्थळ लागले.
मजेशीर होती. रिलेट झाली. एका महत्त्वाकांक्षी मुलीला एक मुलगा लग्नाला नकार देतो आणि ती तलवार उपसून भांडायला जाते. त्यांनतर तो जे कारण सांगतो ते तिला पटते. मी देखील अश्या कारणासाठी अश्या एखाद्या मुलीला नकार दिला असता. पण ती मुलगी मात्र चालाक निघते. शेवटी त्या मुलाचा बरोबर गेम करते.

शंभरावे स्थळ संपल्यावर रविवार सकाळ सुरू झाली. झोप येत होती पण शॉर्ट फिल्मस बघायचा मूड तयार झाला होता.
पण त्यातील दुसऱ्याच दृश्याला एक आजी आजोबा इतके पुस्तकी बोलत होते, इतके पुस्तकी बोलत होते, की कधी डोळे मिटले समजलेच नाही.
उघडले तेव्हा मंगळवार सकाळ झाली होती Happy
कोणी पाहिले असेल तर प्लीज स्टोरी फोडा..

अनिकेत फरांडे यांची - 'मसाला' ही शॉर्ट फिल्म पाहीली. मला भावुक करुन गेली. अमृता सुरेश यांनी फार छान काम केलय.
किती बिचरी राबते. मसाला घरी बनवुन दळून आणते आणि भाजी छान होते. एवढीशीच कथा आहे पण त्यात आईचे संस्कार, आईने शिकवलेले , तिला येणारी आठवण. मस्त आहे.

इथे वाचून ना का तू पाहिली
Basic आहे फार
IT चं काम असं नसतं हो.. असं ओरडून सांगावं वाटलं.
पण सगळ्या comments positive होत्या तिकडे. म्हटलं जाऊ देत
.
ऋ same क्रम मलाही आलेला series चा पण मी एकच पाहून बंद केलं yt

मंग्या नावाची शॉर्टफिल्म पाहिली. मनोरंजक आहे.

https://youtu.be/eBGxhmh7O6A?si=qMO0lWFGtvsQJtRf

एका कर्लि केस असलेल्या लहान मुलाला केस स्ट्रेट करायचे असतात त्यावर मस्त छोटीशी स्टोरी

>>>>एका कर्लि केस असलेल्या लहान मुलाला केस स्ट्रेट करायचे असतात त्यावर मस्त छोटीशी स्टोरी
ही मंग्या फिल्म पहाताना इतकी हसले. मस्त आहे एकदम.

>>>>>काल रात्री नाव काय तुझं संपल्यावर शंभरावे स्थळ लागले.
मस्त आहे. पण तिला तो पसंत आहे पण त्याला तर ती मिसमॅच वाटते ना. अरे काय कॉम्प्लिकेटेड करुन ठेवलय. त्याचा बळीचा बकरा कशाला Lol

एका कर्लि केस असलेल्या लहान मुलाला केस स्ट्रेट करायचे असतात >>> वाऊ! रिलेटेबल. बघतो लवकरच..

पण त्याला तर ती मिसमॅच वाटते ना.. >>> पण आता ती बदलाची तयारी दाखवते ना.. म्हणून तर तो तिला पसंत पडतो. जुळेल आता.

पाहिली "नाव काय तुझं"

"तुझ्यासारखी खोटारडी मुलगी मला माझ्या कंपनीत अजिबात नको होती. पण तुझं प्रेझेण्टेशन बघून मी इम्प्रेस झालो" अरे तुझे कॅरेक्टर एथिक्स पाळणारे आहे हे फिल्मभर उभे केले आहे ना? मग निदान तिला न हाकलण्याचे कारण तिने स्वतः आधीच खरे सांगितले असे तरी सांग. खोटारडी आहे पण प्रेझेण्टेशन चांगले म्हणून हाकलणार नाही हे म्हणजे जोईच्या चीटिंग बद्दलच्या नियमासारखे झाले.

आणि ते अफलातून प्रेझेण्टेशन पाहिले तर गाढवही गेले व एथिक्सचे ब्रह्मचर्यही गेले अशी अवस्था आहे त्या बॉसची.

मला खरे म्हणजे त्या प्रेझेण्टेशनपर्यंतचा भाग इतका विनोदी वाटला नाही. एकतर मला भारतातील असे क्लायण्ट प्रोजेक्ट्स घेणार्‍या आयटी कंपन्या कसे काम करतात माहीत नाही. पण लहान कंपनी, अ‍ॅग्रेसिव्ह प्रोजेक्ट, ऑलरेडी हायर केलेल्या मुलीला बँकिंगचा अनुभव आहे म्हंटल्यावर प्रेशरमधे असलेला प्रोजेक्ट मॅनेजर किमान तिला एक संधी देईल हे अगदीच अशक्य वाटत नाही. तिने अ‍ॅप तयार केले आहे त्यामुळे कस्टमर करता असलेल्या वेब फॉर्म मधे तिला त्रुटी दिसतील हे ही बॉर्डरलाइन ठीक आहे. आणि मराठी सिरीयल्स मधली ऑफिसेस व तेथील कामाच्या पद्धती पाहून माझी टॉलरन्स लेव्हल बरीच खाली आली आहे, त्यामानाने हे बरेच ठीक आहे.

पण प्रेझेण्टेशन पाहून मात्र मी फुटलो. अमितने लिहीले आहे तसे तासगावकर मॅडमने सांगितलेला एकीचा मंत्र तर लोल आहेच (नशीब तेथेच "एक्क चिडिया, अनेक्क चिडिया" वाले गाणे नाही गायली) पण पायलट प्रोजेक्ट करता २८ दिवस आहेत म्हणजे ४ आठवडे, व डिफाईन, डिझाईन, डेव्हलप आणि टेस्ट/डेमो असे प्रत्येकी एकेका आठवड्यात करून टाकू ही एका आयटी कंपनीत कोणालाही माहीत नसलेली नवकल्पना ती मांडते व त्या प्रेझेण्टेशनने थक्क होऊन तिला ऑफर मिळते.

तरी तिने क्लाउड कॉम्प्युटिंग बद्दल "कॉलेज मधे ऐकले आहे पण कसे काम करते हे नक्की माहीत नाही" असे तारे तोडलेले आहेत. ही बी ई काँप्युटर आहे.

बाकी त्या सुसाइड नोट वाल्या मुलीचा फोन नंबर त्या फाइल मधे असताना आधी पोलिसांना कळवून मग नंतर हा बनाव ती रचते असे दाखवले असते तरी कथेच्या दृष्टीने चालले असते.

ही फिल्म पाहून "सूट्स" सिरीज मधल्या पहिल्या एपिसोडची आठवण झाली. ही देशी हार्वी व माइकची जोडी आयटीमधे भल्याभल्यांना नमवते अशी सिरीज काढू शकतील Happy

कोणती युनिव्हर्सिटी आहे जिथे इंजिनीरिंग ला cloud computing शिकवत नाहीत?
आम्हाला १० वर्षांपूर्वी पॉलीटेकनिक ला होतं.
.
आणि ते aws, azure की gcp असं का नाही विचारत?
हल्ली cloud computing हा शब्द सुद्धा वापरला जात नाही कम्पणी मध्ये..
.
अजून एक तू सॉफ्टवेअर बनव हा शब्द मी कधीच खऱ्या आयुष्यात ऐकला नाही, मराठी serial मध्ये घनश्याम बनवतो मात्र..
.
ते प्रेसेंटेशन काहीही अशक्य आहे.
आणि त्याने experienced लोक impress होतात हे तर भन्नाट आहे.

अरे तुझे कॅरेक्टर एथिक्स पाळणारे आहे हे फिल्मभर उभे केले आहे ना? <<< हो न. आधी तर म्हणे - मला खोटारडे लोक अजिबात आवडत नाहीत.. हम दिलं दे चुके सनम मधला वनराज च जणू... आणि नंतर हा उजेड

फा +१. मी भारतीय आणि अमेरिकन स्टार्ट अप मध्ये काम केलं आहे आणि 'गेट इट डन ' मध्ये काय काय गुंडाळून ठेवतात ते बघता रिकवायरमेंट देणे, पतपेढी अनुभवातून आय एम एफचा प्रोजेक्ट देणे, ऍक्सेस क्रेडेशियल मिळण्यापूर्वी आपलं मशीन देणे अशी हातघाई कामे आरामात घडू शकतात. न्हवे घडतंच असतील.
पण वर लिहिलंय तेच पॉइंट जर एथिक्स पेक्षा फायदा महत्त्वाचा असेल तर मला ही काही प्रॉब्लेम नाही. प्रेझेंटेशन ला तारे तोडलेले दाखवण्याऐवजी भारी ब्लॉक्स आणि रंगबिरंगी गीच्मिड फळ्यावर दाखवायची की झालं. बँकिंग ऐवजी टेक स्टार्ट अप प्रोजेक्ट दाखवला तर मग काहीच बदलायला नको. Wink

कंपनीचे रिसेप्शन बघणं हे स्वप्न आहे म्हटल्यावर पुढलं सगळं ओकेच आहे एकदम.

काय रिसेप्शन , काय एच आर, काय प्रोजेक्ट, काय प्रेझेंटेशन ,

फिल्म बनवणार्‍यांचा एच आर वर विशेष खुन्नस दिसतो म्हणून ती अशी बेजबाबदार दाखवली आहे म्हणावं तर नव्या मुलीला लगेच आपल्या डब्यातलं खायला लावण्याइतकी प्रेमळही दाखवली आहे. एच आर ने कसं असायला हवं याचा वस्तुपाठ दिलाय का? मूर्ती आणि सुब्रमण्यमने या एच आरला बघितलं तर जीव देतील. मुलाचा डान्स बघायला वीकडेला ऑफिसातून लवकर पळते.
बॉसला खोटं बोललेलं अजिबात खपत नाही हे दाखवायला ऑफिसातून कलटी मारून पिक्चर टाकायला एच आरच मिळाली. मग तिने तसं का केलं याचं कारण. एका वेळी एकेक अख्खा जिना उतरत गेलं लॉजिक.

एका वेळी एकेक अख्खा जिना उतरत गेलं लॉजिक. >>> Lol

ऍक्सेस क्रेडेशियल मिळण्यापूर्वी आपलं मशीन देणे अशी हातघाई कामे >>> मान्य. पण हा बाबा तिला तिथे बसवून संध्याकाळपर्यंत गायब होतो? काहीही!

प्रेझेण्टेशन पाहून मात्र मी फुटलो >>> +१. मी बराच वेळ ते वीक१ वगैरे काय असेल आणि यातलं नेमकं काय समोरच्या टीमला नव्याने कळलं असेल याचा विचार करत होते. मग माझ्या लक्षात आलं, त्यांना काही कळण्यासाठी ते प्रेझेंटेशन बघतच नव्हते. ते तर आपापला भलताच विचार करत होते कुठलातरी आणि ते बॉसला कळू नये म्हणून नुसत्या माना डोलावत होते. Lol

प्रेझेण्टेशनने थक्क होऊन तिला ऑफर मिळते. >>> प्रेझेण्टेशनने नव्हे, कॉन्फिडन्सने Proud तसं म्हणतो उका मनातल्या मनात.

Pages