चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पण हायपर रिसेप्टिव्हीटी, संवेदनशीलता आणि अ‍ॅक्युट इमोशन्स यांचा निर्मीतीक्षमतेशी संबंध असावा.>> पॉसिबल.

पण हायपर रिसेप्टिव्हीटी, संवेदनशीलता आणि अ‍ॅक्युट इमोशन्स यांचा निर्मीतीक्षमतेशी संबंध असावा>>>>>

खुप जास्त अनिश्चितता आहे या क्षेत्रात. पडद्यावर येण्यासाठी/काम मिळण्यासाठी कुठल्याही थराला जाणारे लोक इथे असल्याने एकाला मिळालेले काम दुसरा काढुन घेऊ शकतो. खुप प्रसिद्ध असलेल्या कलाकारांच्याही बाबतीत हे होतेतर नविन लोकांचे काय. त्यामुळे ड्रग्सची आवश्यकता पडते. डोके ठिकाणावर तर राहायला हवे. सुशांत सिंगच्या बाबतीत जे झाले तेच सोनु निगमच्या बाबतीत घडले/घडतेय. पण सोनु आहे, सुशांत गेला. हल्ली सोनु, शान वगैरे मंडळींची गाणी कुठे येताहेत फारशी? गायकांना हल्ली गाण्यांचे पैसेही मिळत नाहीत असे बिविध फोरम्स वर वाचायला मिळते. सिनेमात गाणे गाऊन प्रसिद्धी मिळतेय ना ती एनकॅश करा, त्यातुन पैसे कमवा असे सांगितले जाते म्हणे. अशा वेळी टिविवरच्या संगित स्पर्धेमधुन पुढे येणारे गायक किती नाऊमेद होत असतील.

सोनू निगम बाबत अन्याय वर्षानुवर्षे होत आहे.
अरीजीतचे सुद्धा भाईशी वाकडे तर नदीवर लाकडे झाले होते.
माफिया लोकांनी भरली आहे बॉलीवूड..

त्यामुळेच व्यसनाधीनता आहे. गृपमध्ये राहायचे तर पार्ट्या टाळता येत नाही. अक्षयकुमारने स्वताचे स्थान कमावले आहे, तिथवर पोचणे जमेपर्यंत एखाद्याचा जीव जातो. के जो स्वतः प्रोडुसर आहे म्हणजे पैसा राखुन आहे. त्याची काय मजबुरी कळत नाही. असो.

मला नेहमी वाटते की असे आयुष्य जगण्यापेक्षा हे रडणारे लोक विशिष्ट पैसे कमाऊन घेऊन दुर राहणे का स्विकारत नाहीत? जसे मन्सुर खानने केले.

कालच एक रील पाहिले. कुण्या वादकाच्या वादनानंतर सलमान त्याला सांगतोय की सोनुने जसे गायलेय त्यापेक्षा तु जास्त चांगले वाजवलेस, किंबहुना तु सोनुचीच वाजवलीस. वादन व गायन यांची तुलना होऊ शकत नाही हे सलमानला कोण सांगणार?

मजबूरी म्हणजे खाऊच्या बरणीत हात अडकलेला माकड झाला असतो.
तसेच तुमच्या जीवावर इतर कोणी पैसे कमावत असतील तर ते सुद्धा तुम्हाला असे सहजी जाऊ देणार नाही.
गैर कृत्ये होत असतील आणि तुम्ही त्यात सामील असाल तर यहा सिर्फ आने का रास्ता है जाने का नही..

सोनूही व्यसनाधीन झाला होता पण वेळीच सावरला. मध्ये टी सिरीजच्या विरोधात भुमिका घेतल्याने त्याच्यावर अघोषित बहिष्कार घातला होता. पण त्याच्या मेहनतीने त्याचं स्टॅचर आता खूपच वरंच आहे आणि काही गाण्यांसाठी सोनूला पर्याय नाही (भुभुतलं मेरे ढोलना) सो ही कॅन पिक न चूझ.

>>>>>>कालच एक रील पाहिले. कुण्या वादकाच्या वादनानंतर सलमान त्याला सांगतोय की सोनुने जसे गायलेय त्यापेक्षा तु जास्त चांगले वाजवलेस, किंबहुना तु सोनुचीच वाजवलीस. वादन व गायन यांची तुलना होऊ शकत नाही हे सलमानला कोण सांगणार?

त्या सलमानच्या थोतरीत भडकावली पाहीजे. प्रत्येकाचे स्वतःचे क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन असते. हे मूर्ख लोक सूर्यावर थुंकुन स्वतःच घाण होत असतात.

फायनली मुंजा बघितला. जाम फनी आहे. त्या मुंज्याची किळस वाटली मात्र, हस्तरची किळस वाटली नाही, भीती वाटली. तो कुरळे केसवाला हीरो आणि शर्वरी वाघ आवडले, अभिनयही आवडला. शेवटी ते आयटेम song उगाच आहे. दुसरा भाग आणणार असं शेवट बघून वाटलं त्यात वरुण धवन आहे की काय. पिक्चर ठीक म्हणता येईल. एकदा बघण्यासारखा.

हे मी ‘जवानीच्या विझलेल्या आगीच्या’ असं वाचलं. ‘पूर्ण कपड्यातली सई’ वाचल्यामुळे असेल का? >> मी पण मी पण !

Submitted by असामी on 11 December, 2024 - 12:40

>>>

नशीब
वस्त्र पात्र प्रक्षालिका

धागा नाही बघीतला

५ फुट उंच टकलु बोडक्या डोक्याचा औरंगजेब मोहन जोशी बघवात नाही
सर सेनापति हम्बिर राव बघत आहे

After Earth - (एचबीओ) मॅक्स वर पाहिला. ज्यांना अशा जॉनरा मधले पिक्चर्स आवडतात त्यांना बघणेबल आहे. विल स्मिथ असल्याने काहीतरी बघण्याइतपत असेल असा अंदाज होता. पण खिळवून ठेवले नाही.

इतर ग्रह, एलियन्स, काही हजार वर्षांंनंतरची किंवा तितकीच आधीची पृथ्वी, चित्रविचित्र प्राणी असा मिक्स जॉनरा असलेले काही पिक्चर्स आहेत तसाच आहे हा. अवतार, "६५" वगैरे कॅटेगरी. मानवजात नोव्हा समथिंग समथिंग नावाच्या दुसर्‍या एका सिस्टीममधल्या ग्रहावर वसवलेली आहे. पृथ्वी आता राहण्याजोगी राहिलेली नाही. अशात हे कोठेतरी निघालेले बाप व मुलगा अचानक पृथ्वीवरच येतात - कारण त्यांचे यान त्यांना इथे उतरवावे लागते व तसे करताना प्रत्यक्षात ते कोसळते. इथले वातावरण आता बदलले आहे. इथले प्राणी माणसांवर हल्ले करतात वगैरे माहिती दिली आहे. यांचे यान येउन कोसळते व हे दोघे वाचतात. मग १०० किमीवर पडलेल्या दुसर्‍या तुकड्यातून मूळ ग्रहावर सिग्नल पाठवू शकणारा "बीकन" आणणे हे त्या मुलाचे काम असते. त्याचा प्रवास म्हणजे हा पिक्चर आहे.

मला साय-फाय मधले परग्रह व एकूण अंतराळातील विज्ञान ठासून भरलेले पिक्चर्स फार इंटरेस्टिंग वाटत नाहीत, आणि अशा पिक्चर्स मधे काय बाउण्ड्रीज दाखवतात तेही माहीत नाही.. पण असे दुसर्‍या ग्रहावरचे लोक त्या एका सोलर सिस्टीममधेच फिरत असतील असे मला वाटले होते. हे लोक तर "हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण" करत कोणत्याही सूर्यमालेत संचार करतात असे दिसते. यांची सूर्यमाला वेगळी असते पण तेथे अ‍ॅस्टेरॉइडस पासून वाचताना काहीतरी "वर्महोल" वगैरे नावे आपल्यावर फेकली जातात व अचानक यांच्या समोर पृथ्वीच येते. पृथ्वीवर आल्यावर हजार वर्षे मानवजात न पाहिलेले प्राणी यांना पाहिल्या पाहिल्या का हल्ले करतील माहीत नाही. अर्थात इतर पिक्चर्स सारखे बरेच प्राणी नाहीत - दोन तीनच आहेत. त्यातला एक एलियन आहे. त्यामुळे अशा इतर अनेक पिक्चर्स मधे प्राण्यांचे विविध गुणदर्शन चालते ते यात इतके नाही.

विविध गुणदर्शन म्हणजे एखाद्या थीम पार्क मधे विविध ठिकाणी राइड्स असतात. त्या प्राण्यांचा संचार तेवढ्यापुरताच असतो. तसेच अशा पिक्चर्स मधे लोकांना एकेक प्रकारचे प्राणी समोर येतात, यांच्यावर हल्ला करतात. मग ते त्यांच्यापासून वाचून पळतात. मग दुसरा प्राणी. असे करत करत प्रवास चालतो. अजून त्याच जंगलात असले, तरी ते आधीचे प्राणी नंतर पुढे कोठे दिसत नाहीत. आपापली कला फक्त एकदा सादर करून जंगलात नाहीसे होतात. जुरासिक पार्क ( त्यातही पहिल्यानंतरचे पुढचे), किंग कॉंग पासून अनेक पिक्चर्स मधे असाच फॉर्म्युला आहे. कधीकधी तर आख्ख्या जंगलात एखाद्या प्रजातीचा एकच प्राणी यांना त्रास देतो. त्याला मारले की नंतर ती प्रजात परत दिसत नाही.

म्हणजे एका पक्ष्याच्या घरट्यावर वाघासारखे दिसणारे प्राणी हल्ला करतात त्याची पिल्ले खायला. मात्र त्या ४-५ वाघांना तेथून खाली पाडल्यावर त्या पक्ष्यापासून वाचून जेव्हा आपला हीरो पुढे निघतो तेव्हा आता ते वाघही येणार नाहीत याची खात्री असल्यासारखा तो रमतगमत जातो. कारण वाघांची कला सादर करून झालेली असते.

हे सगळे या एका पिक्चर मधे नाही. या जॉनरा मधल्या काही पिक्चर्स मधून दिसलेले चित्र आहे Happy

कला दर्शन>>> Lol अचूक निरीक्षण.

पृथ्वी आता राहण्याजोगी राहिलेली नाही >>> हे आत्ता पण खरं वाटतं मला कधीकधी. सायफाय मध्ये हेच काय ते realistic असावं. Happy

शाम बेनेगल यांचे बरेच चित्रपट दूरदर्शनच्या कृपेने पाहिलेत. फार समज नसलेल्या, चित्रपट दिग्दर्शकाचं माध्यम असतं हे माहीत नसलेल्या वयात.
त्यांच्या स्टोरीटेलिंगचा परिणाम , प्रत्येक चित्रपटातलं एखादं तरी दृश्य अजूनही लक्षात आहे.
आजच्या लोकसता लोकरंग पुरवणीतून त्यांच्यावरचा हा लेख - भारतीय वास्तव ; वैश्विक दृष्टी - अभिजित रणदिवे

फार वर्षांनी दिल चाहता है परत पाहिला ( कितव्यांदा मोजत नाही आता )
ऐन विशीत पाहिलेला चित्रपट.
आजही तितकाच ताजा वाटतोय.
मुलासोबत पाहिला. त्यानेही फार एन्जॉय केला.
सैफ आमिर प्रिटी सगळे एकदम तरुण आणि डोळ्यात बदाम दिसतात.
गाणी आवडतातच.
मस्त वेळ गेला.
कधीकाळी पगार फक्त 4 की 5 हजार होता तेव्हा ह्याची ओरिजिनल व्हिडीओ CD ( 3 यायच्या ) घेतली होती.
त्याची किमंत तेव्हा 300 रु होती.
पायरसी सुरू होण्याच्या आधी.

दिल चाहता है आम्ही पण मुलांबरोबर गेल्या आठवड्यात परत बघितला Happy एव्हरग्रीन सिनेमा आहे तो! मी ज्याची ऑडिओ कॅसेट विकत घेतली असा शेवटचा पिक्चर हा.

अरे सेम पिंच. म्हणजे मी इतक्यात पाहिला नाही हा पण नुकतेच हा मुलीला दाखवायच्या लिस्टमध्ये घ्यायचे डोक्यात आलेले. फायनल करून टाकतो Happy

बाई दवे,
हल्ली इंस्टारील्समुळे मुलांना त्या काळातील हिट गाणी माहीत असतात. याचेही टायटल साँग आजही तितकेच फ्रेश वाटते आणि हिट आहे.

मी काल अंगण शब्द "आंगण" असा लिहीला हे आत्ता वाचताना जाणवले Happy गाण्यात तसा उच्चार आहे यावर ब्लेम करून जस्टिफाय करतो Happy

हुलू वर एक नवीन पिक्चर दिसला "नाइटबिच". एमी अ‍ॅडम्स आहे. कथा इंटरेस्टिंग वाटली, आणि हुलू ने "कॉमेडी" लिहीले आहे म्हणून बघितला थोडा. पण संथ सुरूवात आहे. पुढे काहीतरी इंटरेस्टिंग असावे पण तेथे पोहोचायला इतका वेळ घेतायत की कंटाळा आला व शेवटी बदलला. कोणी पुढे पाहिलात तर सांगा.

नेफि वरती, अ बॉय इरेझड- जस्ट सुरुवात केलीये. नक्की पहाणार आहे.
गे मुलाला कन्व्हर्जन थेरपीमध्ये पाठवतात असा काहीतरी प्लॉट आहे.
निकोल किडमनही आहे असे दिसते.
-------
ग्रिम आहे. माझ्याच्याने बघवला नाही. Sad

मित्र हो. मी गेली बरीच वर्षे सनी देओल चा अर्जुन सिनेमा शोधत आहे. मला अजून तरी कुठेही ऑन्लाईन सापडलेला नाही. तु नळी वर अर्जून च्या नावाखाली असलेल्या सर्व लिंक्स बोगस आहेत. कुठे रेंटवर देखील हा सिनेमा सापडलेला नाही. तर या सिनेमाची ऑनलाईन लिंक (पेड असली तरी चालेल) कोणाकडे असली तर देणे. कोणाकडे या सिनेमाची सीडी व्हीसीडी व्हीएचेस काहीही असेल तर मी विकत घेईन. किंवा मला ती कुरिअर करावी. मग मी तिची डिजिटल प्रिंट काढून पुन्हा कुरिअर करेन.

मी गेली बरीच वर्षे सनी देओल चा अर्जुन सिनेमा शोधत आहे>>> का? पीळ आहे असे ऐकलेय.. Sad
ईथे वाचून सिकंदर का मुकद्दर बघितला, आवडला. ते जिमी शेरगिल चे टेरेस वर बसून हिरो ला बोलवणे, सतत १५ वर्ष वाली रर्टाळ लावलेली टेप, फ्लॅश बॅक वगैरे बघून त्या जिमी, अजय दे. तब्बू चा गैरोंमें कहा दम था आठवला. पण तसा बोर नाहिये हा मुव्ही. Wink
स्पोईलर

.
.
.
.
.
.
.

काही गोष्टी अ तर्क्य आहेत, जसे बाकी केसेस सोडून जिमी केवळ ह्याच एका केस भोवती आपली माणसे+ एनर्जी लावत बसतो १५ वर्ष. अगदी मुलांना घराबाहेर काढायला लावणे, भुरट्यांनी पैसे पळवणे कायच्याकाय.
ती नर्स मैत्रिण का म्हणुन मदत करते ह्याला आणि? तिची नियत कशी नाही फिरत? हिरो बायकोला उगा सोडून देतो.. काहीही कारण देऊन..
शेवट अर्धवट ठेवलाय आणि Sad

प्रविणपा,
रेड चिलीज एंटरटेनमेंटने हा चित्रपट विकत घेतला आहे.
https://www.youtube.com/watch?v=5N2ci1D4XPc
आणि तो बघायला पैसे लागतात. पण पैसे भरून पाहायची सोय आता नाही. ज्यांनी आधी पैसे भरलेत, त्यांनाच दिसेल.
https://support.google.com/youtube/answer/7515570?hl=en

पुष्पा २ मुळीच बघणार नाही. पुष्पा १ फ्री दिसला तर कसाबसा ह्याच साठी ७०% बघितला की कुणी पिसं काढली तर सीन माहीत हवे Wink
असे गुंड्गिरी ग्लॉरिफाय करणारे चित्रपट का काढतात, लोक ही ते हिट करतात आणि मग असेच पुन्हा पुन्हा बनत राहतात Sad

>>प्रविणपा,
रेड चिलीज एंटरटेनमेंटने हा चित्रपट विकत घेतला आहे.

धन्यवाद भरत. हे मी पाहिले होते. आता याचं सबस्क्रिप्शन घेतेलेला माणूस शोधावा लागणार

>> का? पीळ आहे असे ऐकलेय..
आशू, तुम्ही बहुतेक आज का अर्जून बद्दल बोलताय Happy हा फक्त अर्जून आहे. डिंपल कपाडिआ वाला. हा सिनेमा (लहान पणी) मी लहान असताना आमच्या चाळीत एकाच्या घरी व्ही सी आर वर भाड्याने आणून लावला होता. पण मोठ्या माणसान्ची संख्या जास्त असल्या मुळे आणि रात्र खूप झाल्यामुळे आम्हा सर्व लहान मुलांना बाहेर काढले होते. तेव्हा किलकिल्या दरवाजात रात्रभर उभे राहून हा सिनेमा पाहिला होता आणि तो खूप आवडला होता. त्या नंतर परत कधी पहायचा योग आला नव्हता. काही वर्षापूर्वी अचानक त्या सिनेमाची आणि तो पाहायला घेतलेल्या परिश्रमाची आठवण झाली आणि तेव्हापासून हा चित्रपट कुठे पाहता येइल का ते शोधतोय Happy

प्रविणपा मी पण मधे खूप शोधला. कोठेच दिसला नव्हता.

aashu29 - तुम्ही म्हणताय तो वेगळा पिक्चर असेल. अर्जुन मस्त होता.

सिकंदर का मुकद्दर मधे या केस मधे पहिल्यांदा जिमीचा अंदाज चुकतो असे सिद्ध होते. तो केस हरतो. आणि त्या नादाला लागल्याने त्याचे स्वतःचे बरेच वैयक्तिक नुकसानही होते. हे सगळे फ्लॅशबॅक मधे आहे ना? त्यानंतर त्यामुळेच तो त्याच्या मागावर पुढे १५ वर्षे राहतो.

बाय द वे, १५ वर्षांनंतरचा जिमी आधीच्या जिमीपेक्षा तरूण दिसतो त्यात Happy

बाय द वे, १५ वर्षांनंतरचा जिमी आधीच्या जिमीपेक्षा तरूण दिसतो त्यात
<<<<<<
'सूर्यवंशम'नंतर ही दुसरीच केस! Proud

या सिनेमाचे खरे तात्पर्य वेगळेच आहे.. ते म्हणजे 'कम्प्लिट आउटसोर्सिंग इज ब्याड'.. जिकडेतिकडे त्या सिकंदरमागे माणसे लावत बसलेला असतो, एकदा दोनदा जरी त्या सिकंदरच्या घरापाशी स्वतः गेला असता तर कधीतरी ती त्याच्याच बिल्डिंगमध्ये राहणारी नर्स दिसली असती आणि कनेक्शन तरी जुळले असते.

'सूर्यवंशम'नंतर ही दुसरीच केस! >>> Happy हो

'कम्प्लिट आउटसोर्सिंग इज ब्याड' >>> Lol टोटली. मॅकिन्सी कन्सल्टिंग वगैरेंनी हे वापरायला पाहिजे त्यांच्या स्ट्रॅटेजी प्रेझेण्टेशन्स मधे.

चित्रपट व सिरीज मधून जितके शिकता येते तितके इव्हन ट्रेनिंग मधून येत असेल का शंका आहे. फ्रेण्ड्स मधे फीबी रेचेलला "बॉनी" नावाच्या एका मुलीबद्दल सांगत असते तेव्हा बॉनी म्हणजे नक्की कोण हे सांगताना ती "Average height, medium build, bald" हे या क्रमाने सांगते. त्यावरून डेटाबेस मधे इन्डेक्स बनवताना सर्वात युनिक गोष्ट असेल ती पहिली वापरावी हेच शिकायला मिळते. नाहीतर शोधायला वेळ लागेल. फक्त अ‍ॅव्हरेज हाइट, मिडियम बिल्ड वरून नक्की कोण मुलगी हे कसे कळणार.

Pages