चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

डकैत पहायचा राहिला होता. झी 5 वर दिसला.
सहज सुरू केला आणि शेवटापर्यंत पाहिला.
इतका चांगला बनवला तरी चालला का नाही?

तो रणवीर सिंग तर त्यासमोर लंगूर वाटत होता तरी आता त्याची लंका जाळून येताना दाखवतील..>>>> लंगूरच दाखवलाय .असो पण रणवीर खूप बेटर आहे त्याचा खिलजी जबरदस्त वाटलेला. त्याला चांगले रोल मिळायला हवेत .अर्जुन कपूरने थोडाफार अभिनय इश्कजादे मध्ये केला होता पण परिणीती समोर तोही दिसला नाही .मख्ख एक्सप्रेशन देतो त्यातल्यात्यात मख्खपणा सूट झालेला (चांगल्या अर्थाने )चित्रपट पाहायचा असेल तर त्याचा औरंगजेब बघ चांगला होता. डबल रोल होता त्यात त्याचा.

मख्ख एक्सप्रेशन देतो त्यातल्यात्यात मख्खपणा सूट झालेला (चांगल्या अर्थाने )
>>>>
Two states.. मला त्यात आवडलेला.
मला वाटलेले कॅरेक्टर तसे पकडले आहे. पण तोच तसाच मग सगळीकडे दिसलेला..
रणवीर त्याच्यापेक्षा बेटर नाही..
फार बेटर आहे..
पण इथे चर्चा अभिनयाची नाही तर जे लोक मीम फिरवून त्याची खिल्ली उडवत होते त्याबद्दल बोलत आहे. व्हीलन म्हणून तो यात खतरनाक आणि तसाच दरारा वाटावा असा भासलाय. मलाही अपेक्षा नव्हती.

Its whats inside - नेटफ्लिक्स वर. साय फाय थ्रिलर आहे.
७-८कॉलेज फ्रेन्ड्स च्या ग्रुप्स चे ८ वर्षांनी रियुनियन, एका मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने. आपसातली जुनी, नवी, लव, हेट, जेलसी वगैरे इक्वेशन्स. या रियुनियन ला एक जण एक मशीन घेऊन येतो. ज्याद्वारे दोन किंवा जास्त लोकांचा कॉन्शसनेस आणि बॉडीज स्विच करता येतात. मग हे लोक वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करून एकमेकांच्या बॉडीत जाण्याचा आणि कोण कोण आहे ते ओळखण्याचा खेळ खेळतात(!) रेसिपी फॉर डिझास्टर. एक राउंड ठीक होते मग एक्साइट होऊन २ री मग ३री राउंड खेळतात ज्यामधे एक भीषण घटना घडते आणि मग आयडेन्टिटीज आणि बॉडिज चा गोंधळ सुरु होतो. आपल्या डोक्याचा पार भुगा करूनच सिनेमा संपतो Happy

त्यातल्यात्यात मख्खपणा सूट झालेला (चांगल्या अर्थाने )चित्रपट पाहायचा असेल तर त्याचा औरंगजेब बघ चांगला होता. डबल रोल होता त्यात त्याचा.
>>
संदीप और पिंकी फरार

>>आयडेन्टिटीज आणि बॉडिज चा गोंधळ सुरु होतो. >> आरारा! आजच बघणार होतो. आता रात्री नको, उद्या भुगा करायची इच्छा झाली की बघतो. Proud

पानिपतमध्ये शेवटी शेवटी बरं काम केलं होतं अर्जून कपूरने. पण बाकी अशक्य होतं सगळं. विश्वासराव व त्यांची पत्नी १४-१५ च्या घोडवयात पकडापकडी काय खेळत होते, किर्तीने पार्वतीबाईंच्या रोलमध्ये अफगाणांसमोर तलवारबाजी काय केली. पद्मिनी कोल्हापुरे हॅम करत होती, संजय दत्त खिल्जी व्हायची महत्वाकांक्षा अब्दालीच्या रोलमध्ये पुरी करत होता. नाट्यमय करण्याच्या नादात जरा अतीच झालं नंतर.

संदीप और पिंकी फरार +1 तो चित्रपटही चांगला होता स्पेशली फर्स्ट हाफ . पण त्यातही परिणीती होती तीच भाव खाऊन जाते एक्स्प्रेशन्स च्या बाबतीत.

The Notebook बघितली.

काश्मीरचे अतिसुंदर चित्रीकरण सोडल्यास फार पीळ वाटली.
गाणी तर महापीळ आहेत.

फिरदौस ची डायरी आणि त्यातली चित्रं वगैरे आवडले.
बाकी सगळे स्टिरीओटाईप चेक मार्क झाले.

आज पहाटे पहाटे (बहुतेक इंडोनेशियन डब्ड) हॉरर /थ्रिलर / सायकॉलॉजिकल डब्ड मूव्ही पाहिला. नाव कळले नाही. पण कसला जबरदस्त आहे.
थोडीशी हाताळणी किंवा स्पेशल इफेक्ट्स मधे कमी आहे. पण इट्स ओके. प्लॉट सशक्त आहे. स्क्रीप्ट पण तेव्हढीच ताकदवान.
स्केरी प्रसंगांची भरमार नसताना पण डोक्याचा भुगा करून टाकला. नेहमी अशा कथेचा शेवट कसा करावा हा यक्ष प्रश्न लेखकासाठी असतो.
पण कसला अनपेक्षित आणि तरीही लॉजिकल शेवट. शेवटी असेही वाटले कि अरेच्चा ! इथेच आपल्या भोवती त्यांनी धागे दोरे दिले होते कि. कसे काय मिस केले ?
आता लिंक द्यावी म्हणून पुन्हा युट्यूब चेक केलं तर आता फीड मधून गायब आहे.

याच धाग्यावर एका मूवी बद्दल विचारणा केली आहे. तो शोधताना हा आयताच सापडला.

सिंघम मधे प्रत्येक जण रामायण मधलं पात्र आहे.
दीपिका कुठलं पात्रं आहे ते नाही कळलं.
टाश्रॉ लक्ष्मण कसा काय ? सुग्रीव ठीक होता.

अदे तर एकपत्नीव्रता पाहिजे ना ? सिंघम १ मधे काजल अगरवाल होती त्याची बायको.
बहुतेक हे नवीन शेट्टी रामायण दिसतंय.
रिअल लाईफ मधल्या अदे वरून इस्न्पायर्ड. #काजोल / तब्बू.

हा हा. आणि लक्ष्मणाचे वडील हे रावणाचे आजोबा झालेत.

(संत्र - ल = टाश्रॉ >> वडील = जॅश्रॉ = आजोबा >> नातू = डेंलं)

दीपिका कुठलं पात्रं आहे ते नाही कळलं
>>>
ती रणवीर सिग यांची पत्नी आहे. आणि ते हनुमान दाखवले होते. पण हनुमान तर ब्रह्मचारी होते. म्हणून दीपिकाला पात्र देता आले नाही.

It's what's inside पाहिला. आवडला. भारी कन्सेप्ट आणि प्लॉट आहे. सस्पेन्स लक्षात येतो मात्र.

Looper (2012) (भारत - Amazon Prime)

टाईमट्रॅवल वर आधारित सिनेमा आहे. प्लॉट गुंतागुंतीचा आहे. विकिवर वाचून मग बघावा म्हणजे व्यवस्थित कळेल. आधी वाचला म्हणून काही फरक पडत नाही. इथेही टाट्रॅच्या नियमांची ऐशी की तैशी केलीये पण बाकी स्टोरी भन्नाट आहे.

The Mountain between us : Netflix
आयडाहोत ( बहुतेक स्नो वादळामुळे) फ्लाईट रद्द झाल्याने ॲलेक्स (केट विंस्लेट हिचं उद्या लग्न आहे) आणि बेन ( इड्रिस अल्बा हा ब्रेन सर्जन आहे आणि बाल्टीमोरला एक सर्जरी आहे) हे एक प्र्याव्हेट प्लेन भाड्याने घेतात. हा भाग इतका कॅज्युअली दाखवलाय की मला एक क्षण लायसन्स इन्शुरन्स दाखवून केटला विमानाची किल्ली आणि ते पार्क केलेली जागा सांगणार का काय वाटून गेलं. पण नाही एक म्हातारा पायलट येतो. तर रॉकिज मध्ये हिमाच्छादित शिखरांवर ते विमान कोसळतं आणि या दोघांचा त्यातून बाहेर पडायचा प्रवास सुरू होतो. बरोबर तोंडी लावायला एक कुत्रं आहे. ...त्याला ते काही नाव न देता डॉग म्हणुनच हाक मारतात. नंतर सुटका झाल्यावर ही नाव देत नाहीत की भुभू बाळ म्हणत नाहीत ... सर्वायव्हल/ थोडा रोमँटिक असा आहे.
बघणेबल
प्रत्यक्ष स्नो मध्ये चित्रण केलंय का हिरवे कपडे घालून कल्पना नाही पण ते फार हुबेहूब आहे. काल फायरप्लेस लावून बघायला ठीक वाटला.

Horizon - An American Saga Part 1 - थोडा पाहिला आहे. चांगला वाटतो. अमेरिकेतील मूळ कॉलन्यांतून "पश्चिमेकडे" लोक जाऊ लागले त्यावर आहे. सिव्हिल वॉर च्या आसपासचा काळ वाटतो. मी मॅक्स वर पहिला भाग थोडा पाहिला आहे पण आता नेफिवरही आलेला दिसतोय. केविन कोस्टनर आहे म्हणून उत्सुकता आहे.

नवीन Nosferatu पहिला. १८०० मधला काळ मस्त उभा केला आहे. पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट नाही तरीही छायाप्रकाशाचा खेळ उत्तम साधला आहे. इतकी वर्षं जगलेला(?) काउन्ट जसा दिसेल तसाच दाखवला आहे. पण पिक्चर अतिशय संथ आहे. मध्येच एक प्लेग पण घातला आहे. कोपोलाच्या पिक्चर मध्ये तो नव्हता. खरंतर अजूनही काही गोष्टी कोपोलाच्या पिक्चर पेक्षा वेगळ्या आहेत. मी कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे कुठला पिक्चर कादंबरीच्या जवळ जाणारा आहे ते समजलं नाही. काही काही सीन्स अतिशय gory आहेत. ज्यांना हे सगळं पाहायला जमणार असेल त्यांनी अवश्य पाहा. It's an experience.

विनोद खन्नाचा "इन्कार" परत पाहिला. आधी पाहून बरीच वर्षे झाली होती. त्यातले अपहरण व अमजदची पायाची अ‍ॅक्शन (आणि मुंगळा Happy ) सोडून फारसे काही आठवत नव्हते पण तेव्हा एकदम ग्रिपिंग वाटला होता हे लक्षात होते.

यू ट्यूबवर दिसला गोल्ड्माइन मूव्हीज का कोणीतरी अपलोड केलेला. चांगली प्रिंट आहे. जाहिराती नाहीत.

अजूनही बघायला चांगला वाटतो. थरार चांगला आहे. संवादलेखनही स्मार्ट आहे १९७७ च्या मानाने. विनोद खन्ना सूटमधे व इतर "रगेड" कपड्यांत हॅण्डसम दिसतो, पण गाण्याबिण्यात कॅज्युअल कपड्यांत चम्या वाटतो. विद्या सिन्हा अशा कमर्शियल पिक्चर मधे जरा आउट ऑफ प्लेस वाटते. डॉ लागूंचे काम नेहमीसारखे चांगले आहे. अमजद भारी आहे यातही पण त्याचा अंगभूत स्मार्टनेस, संवादफेक जरा कमीच वापरले आहे यात. शोलेव्यतिरिक्त त्याचा चपखल वापर कुर्बानीमधे केला आहे, आणि बहुधा हम किसीसे कम नही मधे. नीट लक्षात नाही.

त्याला मुंबईहून कलकत्याला पळून जायचे असते पण केवळ कलकत्ता मेलचे लौकरचे तिकीट मिळत नाही म्हणून तो अडकून पडतो व त्याला स्टेशनच्या चकरा माराव्या लागतत हे पाहून मजा वाटली. एक पिवळा धूर वाला सीन सोडला तर तपासात फार अतर्क्य काही वाटले नाही.

बघितला नसेल तर नक्कीच पाहा, पण इव्हन बघितला असेल आणि बराच काळ झाला असेल तरी पाहण्यासारखा आहेच.

हे उलट जास्तीच तणावाचं आयुष्य त्यांनी विनाकारण ओढवून घेतलंय असं वाटतं.>>> चीकू दृश्यम २ बद्दल. बहुतेक सर्व सामान्य मध्यमवर्गिय माणसा ला त्या क्षणी सर्वांना ह्यातून बाहेर काढावे आपण सेफ राहू, प्रकरण निस्तरेल असे वाटले असावे (पार्ट १ मधे). त्यावेळी दर्शकांना ते कंवींसींग पण वाटले होते.
मग पार्ट २ मधे जरा जास्त च ताणले बॉडी लपवणे वगैरे. इतका दूर चा विचार तो करेल हे अशक्य वाटते.

मवा चा डिसपॅच्ड कुणी पाहिला का? कसा आहे?
इथल्या रेको वरून मवा चाच १ बंदा काफी आहे पाहिला, फार आवडला. मन अडकायला होतं, सुखांत आणि मेन म्हणजे त्याचा मुलगा & आई सुखरूप असल्याने बरं वाटलं.

भुभु ३ आणि लकी भास्कर पाहिला या वीकेंडला.

कार्तिक आर्यन किती कॉपी करतो अक्षय कुमारला!
डायलॉग delivery, देहबोली, एक्स्प्रेशन...!!

लकी भास्कर चा शेवट सोडुन ईतर पिक्चर आवडला Happy

मवा चा डिसपॅच्ड कुणी पाहिला का? >>>> पाहिलाय.

म वा साठी म्हणून पाहिला आणि पुर्ण अपेक्षाभंग झाला.
त्याला कधी पासून असं उघडं नागडं व्हायची गरज भासायला लागली ते कळेना.

नोटबुक - नेटफ्लिक्स
फारच क्यूट लव्हस्टोरी
जिथे चित्रपट घडतो ते काश्मीर लोकेशन सुद्धा तितकेच सुंदर
चित्रपट पुढे सरकत जातो तसे अधिकाअधिक आवडू लागतो.
कोणाला हळूवार रोमांटीक चित्रपट आवडत असतील तर जरूर बघा..

धन्यवाद केया.
--------

इन्कार आवडतो. अनेकदा पाहिला आहे. पण आता खूप वर्षे लोटली पाहून. अमजद खानचे असिस्टंट कोण आहेत? एक भरत कपूर . दुसरी स्त्री आहे ना? किडनॅप झालेल्या मुलाचा बाप साधू मेहेर ना?

चामड्याच्या पिशवीत काहीतरी केमिकल लपवायचं असतं, ती पिशवी शिवायला डॉ लागू स्वतः आपली अवजारं घेऊन बसतात, तो प्रसंग चांगलाच लक्षात आहे.

विनोद खन्नाचा कम बॅक नंतरचा जुर्म पण छान आहे.

>>> दुसरी स्त्री आहे ना?
शीतल का?

मला त्यात अमजद उजव्या हाताने डावीकडच्या हिप पॉकेटमधलं वॉलेट काढायची झटापट करत असल्यामुळे पकडला जातो हे आठवतंय.
त्यात एका सीनमध्ये तो रेस्टॉरन्टमध्ये समोसा आणि कोल्ड्रिंक (बहुधा गोल्डस्पॉट) घेतो. अशा भारीभरकम व्हिलनला स्ट्रॉने कोल्ड्रिंक पिताना बघून मला फार हसू आलं होतं - त्यामुळे तो सीन लक्षात राहिला आहे.

मग पार्ट २ मधे जरा जास्त च ताणले बॉडी लपवणे वगैरे. इतका दूर चा विचार तो करेल हे अशक्य वाटते.>>> कन्या रास असेल!! जोक्स अपार्ट पण ओव्हरथिन्क करणारे आणी बारिक शक्यताचा विचार करुन किस काढणारे लोक असतिल तर सगळ शक्य आहे.
मला त्या तिनही बायकाच भित्रट वागण जास्त बोअर झाल...खरतर इतका काळ लोटल्यावर आपोआप त्याबद्दल वाटणारी भिती,हुरहुर कमी होते पण या कालच खुन झाल्यासारख्या सतत घाबरु घाबरु दाखवल्यात..

Pages