चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अस्मिता, मला लिहायचं होतं ते सगळं अचूक शब्दात लिहिल्याबद्दल धन्यवाद Happy मी जरासा कंटाळा केला होता इतकं लिहायचा.
तुझ्या पोस्टला भरघोस अनुमोदन!

रमड, धन्यवाद, धन्यवाद. तुमाखमै. Happy तू ते 'प्रेम रतन' तेवढं लक्षात ठेव कारण मी काही विसरणार नाही. Proud

रमड हो, पण ती निकड दाखवली आहे तरी फार पटणारीच हवी असा हट्ट ठेवायची गरज नाही असे मला म्हणायचे आहे.
विनोदाबाबत संमिश्र मत.
म्हणजे खास विनोद निर्मिती साठी जे त्रिकूट घेतले आहे ते अगदी चिरकूट विनोद करतात. नशीबाने ते फार ताणले नाहीत.
त्यामानाने कार्तिक चे प्रसंग मला विनोदी वाटले, भले तो अक्षय कुमारची कॉपी का करत असेना. पण काही सीन त्याचे ओरीजिनल सुद्धा होते आणि ते आवडले. जसे की एक त्याच्या अंगात हिरोईनची आई येताना दाखवले.
आणि मुळात विनोदी पिक्चर बघतोय हे माझ्या डोक्यातच नव्हते. मी मनोरंजक चित्रपट समजून बघत होतो आणि माझे मनोरंजन झाले. कदाचित अपेक्षा कमी असल्यामुळे असेल. किंवा हा आमच्या इथल्या मुलांना जास्त आवडला आहे हे डोक्यात असल्याने त्यांच्या लेव्हललाच जाऊन बघितला असेल. हॉरर पिक्चर बघतोय म्हणून लेकीने घरी झुंबर डिमलाईट अशी वातावरण निर्मिती केल्यामुळे असेल.. पण झोप येत असून मी जागून बघितला.
नाहीतर असाच तो एक मागच्या जन्मीचा राजा वगैरे प्लॉट असलेला हाऊस फुल ४ -- वैतागून अर्धा तासात सोडला होता. त्यात तर खुद्द अक्षय कुमार असून..

अरे त्या कार्तिक आर्यानला किती नावे ठेवाल Proud मला आवडतो तो.. त्यावर वेगळा धागा काढू शकतो इतका तरी नक्कीच आवडतो. इथे कोणी तसे कबूल करणे अवघड पण बरेच जणांना आवडत असेल असे त्याची मार्केट व्हॅल्यू पाहून वाटते.

इरिटेट करणाऱ्या व्यक्ती, गोष्टी यांची भलावण प्रतिसादासाठी करतो/करते असंही सहसा कोणी कबूल करत नाही.
ते कसं योग्य आहे याचा मुलामा मात्र फार व्यवस्थित दिला जातो.

कुठे आहे ते मार्केट?
>>>
मायबोलीच्या पलीकडे असेल पण आहे Happy
भूल भूलैय्या बॉक्स ऑफिस आकडे चेक कर..
किंवा इथे भारतात येशील तेव्हा Generation Alpha मुलामुलींच्या ग्रूप मध्ये थोडा वेळ राहा.
माझ्या मुलीच्या मागच्या वाढदिवसाला आम्ही who knows Pari better असा खेळ खेळत होतो. त्यात प्रश्न होता माय फेवरेट ॲक्टर. तिचे उत्तर होते कार्तिक आर्यन.
इथे सोसायटी मधील टीनेजर मुलांमध्ये भुलभुलय्या सिरीजचा वेगळा फॅन बेस आहे.
ते सारे मिळून फर्स्ट नाईट लास्ट शो बघायला गेले होते. ते देखील आमच्या शेजारचे थिएटर फुल झाले तर तीनशे रुपये तिकीट ऐवजी सातशे रुपयांचे तिकीट काढून गेले. भूलभुलेय्या नेटफ्लिक्स वर आला तेव्हा मी पहिल्याच दिवशी नाही बघितला कारण मुलगी दोन दिवस आजीकडे राहायला गेली होती आणि आम्हाला एकत्र बघायचा होता. काल 31st साजरा करायला परत आली तेव्हा पार्टी ओवर झाल्यावर आम्ही शो सुरू केला.
आपल्याला कदाचित इथे कार्तिक आर्यनचा पडद्यावरील वावर बावळट सारखा वाटत असेल पण तेच क्यूट फनी वगैरे वगैरे वाटणारा सुद्धा एक भला मोठा वर्ग आहे. जो त्याचा शहाजादा चित्रपट सुद्धा दोन तीन वेळा बघतो. मार्केट तर आहे बॉस.. Happy

मला पर्सनली तो सोनू के टिटू की स्विटी मध्ये आणि तेव्हापासून आवडला होता.

अजून मोठी लिस्ट आहे..
पण आता आंघोळीची वेळ झाली आहे. लिहितोच आहे तर वेगळा धागाच काढून लिहितो.

Happy बरं, बरं. म्हणजे लहान मुलांचा 'छोटा चेतन' होता तसा हा 'छोटा आर्यन' आहे. तुमच्या या संयत, माहितीने परिपूर्ण व रंजक प्रतिसादासाठी आभार मानून मीही घर झाडायला जाते. Happy

अस्मिताच्या पोस्ट्स! smiley36.gif
कार्तिक आर्यनची आई पण फेमस आहे म्हणे, तिला घेवुन कपिल शर्मा ने एक एपिसोड केला होता...लाइट होता तो एपिसोड
कार्तिक मला स्विटी की टीटु...हे काय जे नाव असेल ते त्यात आवडला होता..बाकी त्याच्यात टॅलेन्ट वैगरे नाही, ठिकठाक आहे, मोस्टली गबाळाच वाटतो...अक्षयची वाइट कॉपी बहुतेक ठीकाणी करतो.

सोनू के टिटू की स्विटी >>> हा एक नंबर पकाऊ पिक्चर होता. आणि कार्तिक आर्यन त्यात महा पकाऊ होता. किती हॅम करावे एखाद्याने. फक्त एका प्यार का पंचनामाच्या त्या डायलॉगच्या पुण्याईवर इतका तगला आहे. सध्या तर तो घावकीत अक्कीची नक्कल करत असतो. Uhoh त्या पिक्चरमुळे मला तर ती हिरोईन पण आवडेनाशी झाली. मेरे डूबे हुए दो घंटे मुझे वापस दिलाओ!!!! Angry

सोनू के टिटू की स्विटी>>> मला यातलं एक गाणं आवडलं म्हणून पिक्चर बघितला, नुसतंच गाणं बघितलं पाहिजे होतं

अस्मिता.... Lol भूलभुलैया3 बद्दल तुमचां नि माजां मत्त येकदम बराब्बर जुळतां..

भूभु 3 चे पॉझिटिव्ह पॉईंट्स दो या तीन बस्स!

१. सोनू निगमचे 'मेरे ढोलना सुन' व्हर्जन
२. विद्या बालनची ऑक्सिडाईज्ड ज्युलरी
3. नेटफ्लिक्स वाला जोक

Happy सोनू तर बेस्टच आहे, मागे भुभू२ मधे अरिजितने भुतापेक्षा जास्त घाबरवून सोडले होते. नेटफ्लिक्सचा जोक मी हुकला वाटते. विद्याची ज्युलरी आणि माधुरीच्या साड्या आवडल्या. ग्रूमड भुते वाटली, आपण शिकायला हवं. अशी नीटनेटकी, फॅशनेबल भुतं किंवा अंगात येणाऱ्या बाया हा एक नाविन्यपूर्ण पैलू होता सिनेमाचा. एवढी रस्सीखेच करून इनकी ब्यूटी इधरकीउधर नहीं हुई..!

दो या तीन बस्स!>>> दुरदर्शनवरील एकानंतर एक टोमॅटो जार मधे घालून तिसऱ्या टोमॅटोच्या वेळी त्याचा चुराडा होणारी कुटुंबनियोजनाची जाहिरात आठवली. Lol

फक्त एका प्यार का पंचनामाच्या त्या डायलॉगच्या पुण्याईवर इतका तगला आहे >>> त्यात होता होय! मी त्याला नंतर पाहिल्यापासून मला वाटत होते की याला कोठेतरी पाहिला आहे. तो पिक्चर मजेदार वाटला होता इतके लक्षात आहे.

अशी नीटनेटकी, फॅशनेबल भुतं किंवा अंगात येणाऱ्या बाया हा एक नाविन्यपूर्ण पैलू होता सिनेमाचा. >>> थांबा. अजून केजो, बडजात्या किंवा भन्साळीची भुते यायची आहेत. ८०चा अमिताभ आजोबा संस्कारी व्हॅल्यूज शुध हिंदीत दरडावताना पन्नाशीतील तरूण लीड्स नाचत आहेत. अशा वेळेस हॉलच्या समोरून कोणीतरी सरप्राइज सेलेब्रिटी आल्याच्या थाटात करीना किंवा राणी मुखर्जी ओपन बॅक ड्रेस घालून आपल्याकडे पाठ करून नाचत येतात. मग कॅमेरा त्यांच्या पायावर जातो तर त्यांची पावले आपल्याकडेच असतात. असा काहीतरी सीन असेल.

एवढी रस्सीखेच करून इनकी ब्यूटी इधरकीउधर नहीं हुई..! >>> Lol

अस्मिता Lol

भुभू२ मधे अरिजितने भुतापेक्षा जास्त घाबरवून सोडले होते >>> याला +१०००००० Rofl धनिने सुद्धा याला अनुमोदन दिले आहे.

केजो, बडजात्या किंवा भन्साळीची भुते >>> फा Lol तो सीन कहर लिहिला आहेस.

श्र, netflix चा सीन भन्नाट आहेच. मला तर कव्वा बिर्याणी वाला पण आवडला Happy

विझर्ड ऑफ ओझ आणि विकेड एकापाठी एक पाहीले. दोन्ही फार आवडले. पैकी विकेड ची कथा छान आहे. जी चेटकिण
विझर्ड ऑफ ओझ मध्ये दुष्ट वाटत असते तिच्याच दृष्टीकोनातून 'विकेड' सिनेमात, जग दिसते.

<अजून केजो, बडजात्या किंवा भन्साळीची भुते यायची आहेत>
चोप्रांच्या मोहब्बतें मध्ये ऐश्वर्या भूत होती ना? यांची भुतेही त्याच शाळेतली असतील.

करीना किंवा राणी मुखर्जी ओपन बॅक ड्रेस घालून आपल्याकडे पाठ करून नाचत येतात. मग कॅमेरा त्यांच्या पायावर जातो तर त्यांची पावले आपल्याकडेच असतात.
<<<<<<<
आपण - ये कौनसा हमारी तरफ है?
भूतिणी - फेस उनकी तरफ है, पैर आपही की तरफ है...

ग्रूमड भुते वाटली, आपण शिकायला हवं. अशी नीटनेटकी, फॅशनेबल भुतं किंवा अंगात येणाऱ्या बाया हा एक नाविन्यपूर्ण पैलू होता सिनेमाचा.
<<<<<<<
मग काय तर... विद्या बालन आपले घनघोर काळे लांब वेव्ही केस मोकळे सोडून धूळ, जाळ्याजळमटांमधून रिस्टोरेशनची कामं करते. अशा वातावरणात एरवी आपल्यातुपल्या वेव्ही केसांची सुनामी झाली असती.

मुफासा - डिस्ने मूव्ही - प्रॉडक्शन, कथा, संगीत, व्हिज्युअल इफेक्ट्स - मस्त आहे. एंगेजिंग आहे. मुफासा आणि स्कारची (रफिकी, जाजू पण) कॅरेक्टर्स मस्त डिफाइन होतात. थिएटरमधे बघण्याचा सिनेमा आहे.

विक्की और विद्या का वह वाला व्हिडिओ - हलका-फुलका आहे. शेवट खेचलाय. पण हा सिनेमा राजकुमार राव चा नसून विजय राजचा आहे. राज शांडिल्य ची कथा आणि दिग्दर्शन असल्यामुळे कॉमेडी सर्कस/कपिल शर्मा शो मधल्या विनोदी स्किट्सच्या अंगाने सीन्स पुढे सरकतात. म्युझिकच्या बाबतीत सध्याचा लो रिस्क, हाय रिवॉर्ड फॉर्म्युला - ९० च्या दशकातल्या हिट गाण्यांचा पुनर्वापर - वापरलाय.

आशू, तुम्ही बहुतेक आज का अर्जून बद्दल बोलताय Happy हा फक्त अर्जून आहे. >>> करेक्ट. मला ही उत्सुकता वाटू लागली अर्जून बघायची आता Happy

सिंघम3 बघायला सुरुवात केली. अ आणि अ असूनही >> माहिती असूनही मी पण कुर्‍हाडीवर पाय मारला.
आळसावलेला मूड असेल आणि घरात फिरत फिरत पिक्चर लावून ठेवायचा असेल तर मग अशा पिक्चर्स पर्याय नसतो. Happy

मन लावून पाहण्यासाठी मग पुढचे दोनेक तास एका जागेवर बसायची तयारी ठेवूनच तसे पिक्चर्स बघायचे.

जुना लव स्टोरी असाच दोन दिवस थोडा थोडा वेळ काढून अर्ध्याच्या वर पाहिला. चक्क आवडतोय. विजयता पंडीत कशी काय हिरॉइन म्हणून चालली असेल? कुगौ ज्यु. अब वाटतो.

नाही म्हणायला समोरच्या डबक्यात ९०% बुडालेल्या म्हशींच्या पाण्याबाहेर असलेल्या पाठीवर पाणी मारताना दाखवले आहेत.>>>> ओह गॉड Rofl
भुभू२ मधे अरिजितने भुतापेक्षा जास्त घाबरवून सोडले होते.>>> अर्रे देवा पोटात दुखायला लागलं. भुभु न बघताही नुसत्या कॉमेंटीच किती कहर आहेत. अस्मिताच्या रीव्ह्यु पॅरा साठी तरी हा मुव्ही पळवून बघणार.

सोनू के टीटू की मला १ दा पहायला रंजक वाटला होता. प्यार का पंचनामा पण १ ला भाग आवडला होता. अशा स्वार्थी मुली जवळून बघण्यात आलेल्या आहेत म्हणुन असेल. पण त्याच्या २र्या भागात जाम च सर्व मुलींना स्टीरिऑटीपिकल करून सोडले.

विकी और विद्या बद्दल सगले बेकार म्हणत आहेत म्हणुन पाहिला नाही. त्यात विजय राज पण आहे?

Payal Kapadia
@PayalKapadia86
·
20h
3rd January !
The birth anniversary of Savitribai Phule.How lucky we are that All We Imagine as Light will release on Hotstar on this wonderful day…. With Hindi subs too

थांबा >>> मी या 'थांबा' ला सुद्धा Lol
फा, पोस्ट क्रीपी आहे. Lol
रमड आणि धनि. Happy
आशु Happy बघ बघ.

भरत , मोहब्बते मधली ऐश्वर्या पंजाबी ड्रेस वाले फार साधेसुधे भूत होते. या दोघींपुढे तर आशा काळेच. Happy मेल्यावरही बाबाची, एक्सची काळजी वहायचे. म्हणजे बॉयफ्रेंड एक्स नाही तीच एक्सपायर्ड म्हणून एक्सले. वर गुरुकुलात प्यार 'पनपवायला' हातभार लावायचे. या दोघी साळकाया -माळकाया अशा नाहीत. ढालगज आहेत. काळ्या साड्या नेसून रात्री बेरात्री हिंडतात, खिडक्यांवर, बुरुजांवर चढतात व टाईमपास म्हणून एकमेकींशी 'टाळ्या बाई टाळ्या पुरणाच्या पोळ्या' वगैरे उंबरठ्यावर बसून खेळतात. Proud तरीही फॅशनकडे कधीही दुर्लक्ष होत नाही त्यांचे. श्रद्धा हो की नै Wink

आपण - ये कौनसा हमारी तरफ है?
भूतिणी - फेस उनकी तरफ है, पैर आपही की तरफ है...>>> Lol हे तुझे फेवरेट आहे का ? डायनो म्हणू नका, भुतं म्हणू नका. Happy

इथे भु३भू पोस्टी वाचून पहायला घेतलाय.
कार्तिक बद्दल सर्वांना अनुमोदन.
आभा हांजुराच्या हक्कूस बुक्कूसचं विडंबन वाटावं असं गाणं घेतलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=pA9UPOSh3Ws

मूळ गाण्यातले शब्द समजले नाहीत तरी नादमय आहे. शानचं हिंदी पण ठीक आहे.

Pages