चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

काल यू ट्यूबने गॉडफादर मधला एक सीन दाखवला. ती गंभीर पिपाणी वाजते तो. त्यानंतर one clip leads to another असे होत शेवटी थोडावेळ "दयावान" पाहिला. त्यात पहिला बराच काळ फक्त पोलिस सोडले तर नॉन-दयावान कोणीच नव्हते. एक तमिळ पोलिस अधिकारी शोले मधे "बचगया साला" हे गब्बर ज्याला उद्देशून म्हणतो तो पहिला वाचलेला डाकू असावा असे वाटले. तसाच दिसतो. एण्ट्रीनंतर पाच मिनिटांत मरायच्या रोल मधे तो अ‍ॅक्टर टाइपकास्ट झाला असावा. मी पाहिलेल्या क्लिप मधे एक रॅण्डम रेल्वेगाडी दिसली नाही. त्यामुळे शक्ति (लहानपणचा विनोद खन्ना) तमिळनाडुमधून मुंबईत कसा आला ते कळाले नाही. रेल्वे दिसली असती तर विश्वास बसला असता.

त्याला वाचवणारा शंकर म्हणजे नंतर फिरोज खान होतो तो. तो म्हणे मराठी असतो. उत्तरेतील एखादा नेता महाराष्ट्रात येउन सभेत टोकन मराठी बोलतो तसा तो बोलतो. "गंमत झ्याली रे" वगैरे. मग तो याला एका झोपडीत खायला द्यायला घेउन येतो. तर तेथे आलोक नाथ. आधीच आलोक नाथ, त्यात त्याचे नाव "करीम चाचा". म्हणजे दयाळूपणात "बच्चे की जान लोगे क्या" लेव्हल एकदम. त्यात निष्पन्न होते की तो स्मगलिंग मधे सामील असतो. पण ज्याप्रमाणे "डॉन जख्मी है तो क्या, फिरभी डॉन है" असते, तसे "आलोक नाथ स्मगलर है तो क्या, फिरभी आलोक नाथ है" असे असते. त्यामुळे समुद्रातून चार खोकी उतरवायला सुद्धा तो दयाळूपणाच्या संवादांचा वर्ख लावतो.

हे आलोक नाथकडे येतात तेव्हा तेथे त्याची मुलगी बसलेली असते. ती यांना भैय्या म्हणते/मानते. हा ८०ज मधला पिक्चर आहे. या तपशीलावरून त्या दिवशी कोणता सण असेल ते तुम्ही बरोबर ओळखाल. तोच असतो. इतकेच नव्हे तर तेथून हे जेव्हा मोठे (म्हणजे चाळीशीचे) होतात तेव्हाही तोच सण असतो. हे काही काम बिम करताना दाखवलेले नाहीत. नाही म्हणायला समोरच्या डबक्यात ९०% बुडालेल्या म्हशींच्या पाण्याबाहेर असलेल्या पाठीवर पाणी मारताना दाखवले आहेत.

मग पुढचा बराच ड्रामा पाहिला. माधुरीची एण्ट्री. अमरिश पुरीला इतक्या लौकर मारले आहे याचे आश्चर्य वाटले. तेव्हा त्याला इतक्या लौकर मारत नसत सिनेमात.

मधे एकदा म्हातारा व तापाने फणफणलेला आलोक नाथ तगड्या दिसणार्‍या विनोद खन्नाला "तू समुद्रावर (ती खोकी घ्यायला) जाऊ नको. ते जोखमीचे काम आहे" असे सांगतो असा विनोदी सीनही येउन गेला.

@ प्रविणपा

अर्जुन चित्रपट einthusan.tv वर आहे

अर्जुनच्या - दुनिया माने बुरा तो गोली मारो, इज्जत से जीना हो तो गोली मारो...... यारो पे सदा यार हो फिदा, दुश्मन को ये बता दो दुश्मनी है क्या.. या ओळी कालातीत आहेत, आजही गायला मजा येतात Happy

ज्जेब्बात!! “ त्यात पहिला बराच काळ फक्त पोलिस सोडले तर नॉन-दयावान कोणीच नव्हते. एक तमिळ पोलिस अधिकारी शोले मधे "बचगया साला" हे गब्बर ज्याला उद्देशून म्हणतो तो पहिला वाचलेला डाकू असावा असे वाटले” - हे वाचलं आणि न बघता समजलं कुणाची पोस्ट आहे ते. Happy

आता हा सिनेमा पूर्ण बघून इकडे रसग्रहण करायचं मनावर घ्याच राव!!

पोलिस सोडले तर नॉन-दयावान, पहिला वाचलेला डाकू, रेल्वे दिसली असती तर विश्वास बसला असता, गंमत झ्याली रे, बच्चे की जान लोगे क्या, दयाळूपणाच्या संवादांचा वर्ख ,त्या दिवशी कोणता सण असेल, ९०% बुडालेल्या म्हशींच्या पाण्याबाहेर असलेल्या पाठीवर पाणी मारताना,तापाने फणफणलेला आलोक नाथ तगड्या दिसणार्‍या विनोद खन्नाला >>>>
Lol फारच हहपुवा पोस्ट आहे. 'दयावान' बघितला नाहीये पण नाव ऐकलं की तो कुप्रसिद्ध किसींग सीनच आठवायचा. आता म्हशी व इतर प्राणीही आठवतील. धमाल लिहिले आहेस, त्याबद्दल थॅंक्यू.

फारएण्ड दयावानसाठी Rofl
फेफ +१ पहिल्या तीनचार वाक्यात समजलं कुणाची पोस्ट आहे ते.
दयावान हा मणिरत्नम- कमल हासनच्या नायकन् वरून घेतलाय ना! नायकन् फारच आवडला होता जेव्हा बघितला होता तेव्हा.

>> अर्जुन चित्रपट einthusan.tv वर आहे

धन्यवाद स्पार्कल. वीपीएन लागलं पण सिनेमा सुरु झाला आहे Happy

पहिल्या तीनचार वाक्यात समजलं कुणाची पोस्ट आहे ते. >>>> सगळीच पोस्ट खास फारएन्ड टच
रॅण्डम रेल्वे नाही दिसली? मग निदान व्ही टी स्टेशन तरी दाखवलं का?
चित्रपट पाहिला नाहीये पण पाण्यात बुडालेल्या म्हशी आठवतात आणि पाण्यात भिजलेली माधुरी आठवत नाही? शिरसी मा लिख....
शिवाय अंगात कुलीफेम लाल डगला, डोक्याला लाल चौकडीचा केफिया घातलेला पठाण शंकर भर समुद्रात बोटीवर 'चाहे मेरी जान तू ल्ले ल्ले' करताना कमरेपर्यंतचे केस मोकळे सोडून, आदिवासी पद्धतीची हाफ सारी नेसून, दंडात वाकी घालून 'ओ हैय्या' करत शिवगामी देवी नाचताहेत याचा अनुल्लेख? कुफेहेपा...
सनबर्न घालवण्यासाठी आणि केसातला गुंता सोडवण्यासाठी ताईंनी नंतर काय केले हे विचारायची फार फार इच्छा आहे खरं तर...

दयावान हा मणिरत्नम- कमल हासनच्या नायकन् वरुन >>> दोन्हींचे इन्स्पिरेशन आपले मुम्बैकर श्रीयुत वरदाराजन मुदलियार (बस नामही काफी है)

Sakaratul Maut - Indonesian (supernatural horror )
ott var asel tara sangal ka ?

नाही काल मी तिथपर्यंत पोहोचलोच नव्हतो Happy माधुरीची फक्त एण्ट्री झाली होती. नंतर पुढे पाहिला पण मला जी चांगली कॉपी यूट्यूबवर दिसली ती एकदम सॅनिटाइज्ड व्हर्जन आहे. त्यात एकही गाणे नाही. दयावान अनेकांनी ज्या कारणाकरता पाहिला त्यातले काही त्यात नाही.

ही ती संस्कृतीप्रधान व्हर्जन. सगळे अपशब्दही गाळले आहेत संवादांतले.
https://www.youtube.com/watch?v=MFoac9Yy1Tg

रम्यावाले ते गाणे कापले आहे पण ती काही सेकंद दाखवली आहे. विनोद खन्ना व फिरोज खान तो स्मगलिंगचा माल हस्तगत करतात व सेलिब्रेट करायचे ठरवतात. तेव्हा फिरोज खान त्याला हिंट देतो " तू नमक का बोरी लाया, अपन नमकीन चीज लाया रे". तेव्हा विनोद खन्ना विचारतो "क्या?" आणि फिरोज खान समोर बोट दाखवतो, तर धडधडीत समोर रम्या पहुडलेली असते. इतका वेळ हे दोघे ज्या बाजूला तोंड करून बोलत असतात तेथेच अ‍ॅपरंटली ती असते इतका वेळ. पण फिरोज खान दाखवेपर्यंत विनोद खन्नाला तेथील एकूण रंगसंगतीमधे फटकून पिवळाधमक ड्रेस घातलेली ती नोटिस होत नाही.

त्यांच्या वस्तीतील गरीब लोक आपण बरे आपले काम बरे हा मंत्र किती जपतात याचे उदाहरण म्हणजे वस्तीतील एक काहीतरी निवडत बसलेली बाई. यांची वस्ती बिल्डरपासून वाचवणारा, तेथे जुलूम करणार्‍या पोलिसाला मारणारा व इन जनरल गरीबोंका मसीहा टाइप दयावान तिच्या थेट समोर राहात आहे. त्याचा घनिष्ट मित्र तिच्या बाजेवर बसला आहे. तेव्हा समोर गच्चीत तो दयावान त्याच्या बायकोला उचलून काहीतरी सांगत आहे. तो बाजेवरचा मित्र "बाळा जो जो रे" करत नाचायला लागतो. त्या दयावानच्या जीवनात काहीतरी आनंददायक झाले आहे. पण तेथे बसलेल्या बाईला मान वर उचलून वर बघायलाही फुरसत नाही. एरव्ही लोक धान्य निवडताना दुनियाभरचे गॉसिप करतात. पण ही वरही पाहात नाही. तो आपले काम वाला मंत्र ते कटाक्षाने जपतात लिहीणार होतो पण ही बाई तितकाही कटाक्ष टाकत नाही.

संस्कृतीप्रधान व्हर्जन >>> मग दयावान कशाला पहायचा? Proud

पिवळाधमक ड्रेस घातलेली ती नोटिस होत नाही
काहीतरी निवडत बसलेली बाई
>>> Rofl

फारेण्डची वरची पोस्ट आत्ता वाचली.

बचगया साला
दयाळूपणात "बच्चे की जान लोगे क्या" लेव्हल
आलोक नाथ स्मगलर है तो क्या, फिरभी आलोक नाथ है
>>> Rofl

करीमचाचा वगैरे असणं मस्ट होतं त्या वेळी सिनेमात. यावर स्वतंत्र पीएच्डी होईल.

दयावानला सुद्धा दया नाही इथे Lol

आम्ही शाळेत असताना दयावानचा एक डायलॉग खूप फेमस होता..
मेरा बाबा मर गया..

“ पण फिरोज खान दाखवेपर्यंत” - Lol हे तुझ्याच बॉलिवूडच्या कितव्यातरी नियमांतर्गत येतं ना - ते फ्रेम मध्ये आपल्याला जितकं दिसतं, तितकंच त्या फ्रेम मधल्या अ‍ॅक्टर्सना पण दिसतं??

Lol एक्झॅक्टली फेफ Happy

रमड - मी पाहीपर्यंत मला माहीत नव्हते की सॅनिटाइज्ड व्हर्जन आहे. त्यांनी सुरूवातीला वैधानिक इशारा द्यायला हवा होता Happy

“ मग दयावान कशाला पहायचा?” - Lol सहीं पकडे हैं…. हे म्हणजे नौकानयन-शास्त्र शिकण्यासाठी टायटॅनिक बघण्यासारखं झालं. Wink

भूल भुलैय्या ३ पाहिला आता नेटफ्लिक्स वर.. लेकीने आधीच पाहिलेला. तरी पुन्हा पाहिला. कारण तिला फार आवडलेला. मलाही ग्यारंटी दिलेली की बाहेर या पिक्चरला लोकं नावे का ठेवत आहेत समजत नाही पण फार मस्त आहे, तू बघ तुला नक्की आवडेल असे म्हणाली होती. आणि सुरुवातीला थोडा वेळ लोकांचे खरे होते असे वाटले खरे पण शेवटी लेकच खरी निघाली. मला पिक्चर आवडला Happy

शेवटच्या एका सीनमध्ये (सीन काय होता ते सांगत नाही) पण एका क्षणी सोनू निगमच्या आवाजाने डोळ्यात पाणी येते.. तेव्हाचे गाण्याचे शब्द आहेत - जहरीले सपनो मे.. मेरे ही अपनों ने.. मुझको है धोका दिया Sad .. काय म्हटल्या आहेत या ओळी.. मी पुन्हा रिवाइंड करून ऐकल्या. याच साठी सोनूचा फॅन आहे Happy

पिक्चर मध्ये एक सामाजिक संदेश सुद्धा आहे. आणि तो पोचला असे वाटले जेव्हा मुलीच्या तोंडून ऐकले की तो होताच तसा यात त्याची काय चुकी. देवानेच त्याला तसे बनवले... या वयात अश्या विषयांची इतकी समज आणि जाण मला तरी नव्हती जी आताच्या पिढीला आहे. माझ्या काही समवयीन मित्रांमध्ये सुद्धा आढळत नाही.

बाई दवे,
तृप्ती दिमरी छान वाटली यात. मला वाटायचे हॉट सेक्सी मटेरिअल आहे म्हणून हवा आहे. पण साध्या कपडेपटात सुद्धा सुंदर दिसते.
आणि माधुरी ट्रेलर मध्ये पाहून वाटलेले की ही कुठे मध्येच यात आली. पण पिक्चर बघताना ओड वाटत नाही. दिव्या बालन, तब्बू यांच्याच पंक्तीतली वाटली

भूल भुलैय्या ३ >>> एका बर्‍या प्लॉट आणि ट्विस्टची माती केली आहे असं मला तरी वाटलं. पिक्चर ओके आहे. खूप नाही आवडला. बरीच कॉमेडी नसती तरी चाललं असतं. पिक्चर अजून ४० मिनीटांनी वगैरे छोटा हवा होता.
सोनूचं शेवटचं गाणं मात्र माझं प्रचंड लाडकं आहे. रिलीज झाल्यापासून हे गाणं माझ्या रिपीट लिस्टला आहे. मी त्या धाग्यावर टाकलं देखील होतं.
पण एका क्षणी सोनू निगमच्या आवाजाने डोळ्यात पाणी येते >>> टोटली. हा आवाजातला दर्द हल्ली दुर्मिळ झाला आहे.

भूल भुलैय्या ३ >>> नेफीवर पहिला. काही त्रुटी वगळल्या असत्या तर चित्रपट छान होऊ शकला असता .
स्पॉईलर अलर्ट
संवाद खूपच खराब आहेत. एका प्रसंगात "खुफिया रास्ता है " अस म्हणून एक व्यक्ती पुढे जाते , आणि तेच वाक्य पाठीमागची व्यक्ती त्याच्या पाठीमागे येणाऱ्या व्यक्तीला ऐकवते. जणू पुढचा काय बोलला ते पाठीमागच्याला ऐकू आले नसावे .
राजपाल यादव , अश्विनी कालसेकर व संजय मिश्राला वाया घालवले आहे.
विनोदाच्या नादात अतर्क्य गोष्टी दाखविल्या आहेत . ते पण चुकीच्या ठिकाणी . प्यारोडी चित्रपटाप्रमाणे .
माधुरी आणि विद्याच्या नृत्यात शूटिंग मध्ये सुमार तंत्र वापरले आहेत . दोघीही थोड्या बुटक्या वाटल्या मला आणि बॅकग्राऊंड वेळगे आहे हे दिसून येते .
भुतांचा भरपूर वापर केला आहे. मी पाहिलेल्या इंग्रजी भयपटांमध्ये प्रत्यक्ष भुते कमी वेळा व कमी काळ पडद्यावर दिसतात . खरी मजा हि अँटीसिपेशन मध्ये असते . येथे तसे नाही .
आवडलेल्या गोष्टी -
चित्रपटाचे कन्टेन्ट रिच आहे . चित्रपट वेगवान आहे , कुठेही कंटाळा येत नाही . पहिल्या भुलभुलैय्या तील गाणे व त्याला दिलेली नवीन जोड छान आहेत . माधुरी व विद्या यांचे नृत्य छान आहे .

काही त्रुटी >>> लॉजिक सुद्धा गंडलेलं आहे कुठेकुठे. उदा: महाराज महालात असलेलं किंमती सामान विकून बरं आयुष्य कंठू शकले असते की! डायरेक्ट मीठ भाकरी कशाला? किंवा ते दुसरं दार उघडायची रूहानला नेमकी काय घाई असते ते समजलं नाही.

भूलभुलैया 3 अतिशय सुमार चित्रपट आहे, जी काही comedy आहे त्याला अजिबात हसू येत नाही, कार्तिक पूर्ण अक्षय कुमार ची कॉपी करतो

रिलीज झाल्यापासून हे गाणं माझ्या रिपीट लिस्टला आहे. मी त्या धाग्यावर टाकलं देखील होतं.
पण एका क्षणी सोनू निगमच्या आवाजाने डोळ्यात पाणी येते >>> टोटली. हा आवाजातला दर्द हल्ली दुर्मिळ झाला आहे.
>>> १०००++
अफाट गाणं आहे ते. सोनुच्या क्लासिक्समध्ये गणलं जाईल हे गाणं.

डायरेक्ट मीठ भाकरी कशाला?
>>>
ते विनोद निर्मितीसाठी होते. शाही भोजन बोलून सुकी भाकरी.. गाय के दूध का वक्त हो गया है बोलून तिलाच दूध पाजणे.. अंग रक्षकाची स्वतः रक्षा करायची वेळ येणे... वगैरे वगैरे.
अन्यथा तृप्ती दिमरी कुठल्या ही अँगलने गरीब का मध्यमवर्गीय सुद्धा दिसणार नाही याची काळजी घेतली होती.

किंवा ते दुसरं दार उघडायची रूहानला नेमकी काय घाई असते
>>>>
भुतावर विश्वास नसतो. त्यामुळे थांबून राहण्यात देखील पॉइंट नसतो. लवकर दार उघडा, आपले काम करा, आणि एक करोड घ्या.. बाकीच्या लोकांना सुद्धा महाल भुतांच्या अफावापासून मुक्त करून लवकरात लवकर विकायचा असतो.

बाकी जिथे भूत या गोष्टीलाच लॉजिक नाही तिथे इतर लॉजिक का शोधत बसा Happy

भूलभुलैया 3 अतिशय सुमार चित्रपट आहे, जी काही comedy आहे त्याला अजिबात हसू येत नाही, कार्तिक पूर्ण अक्षय कुमार ची कॉपी करतो->
++++++१११११

कार्तिक पूर्ण अक्षय कुमार ची कॉपी करतो >>> +१

अरे ऋ, तसं लॉजिक नाही शोधत आहे. पण निदान घटनाक्रमात काही अर्थ नको का? तू म्हणतो आहेस ती निकड अजिबात समोर येत नाही. बाकी विनोदनिर्मिती sort of केविलवाणी आहे त्यामुळे काय बोलणार Happy

मीही बघितला भुलभुलैय्या. कार्तिकला मी डॉलरशॉपचा अक्षय कुमार म्हणते त्याचा पुनःप्रत्यय आला. सारखं दात काढत राहतो. अक्षयला तो उथळपणा कॅरी करता यायचा, त्याचा राग यायचा नाही. कार्तिकचा राग येतो, कारण त्याच्यात अभिनिवेश आहे. घरात नाही दाणा, आणि कॉमेडियन म्हणा.

अक्षय पर्फेक्ट वॅगाबॉन्ड, उडाणटप्पू, छिछोर दिसायचा पण एकदम खरं वाटायचं. हा अनॉयिंग वाटत राहतो. ह्याने केलेले चीप वाटते. अक्षयचे 'तेरी आंखे भुलभुलैय्या' गाणं बेस्ट आहे, भटका, बेपर्वा, फ्लर्ट पण धमाल वाटतो. तो कॅमेरा कडे बघतही नाही आपल्याच नादात मजा करतो. खूप कंफर्टेबल असतो तो अशा रोलमधे.

कार्तिकला काहीही जमत नाही. तो सगळीकडे रोखून बघत, दात वेंगाडतो. त्यामुळे तो देखणाही वाटत नाही, दिसायला बरा शक्ती कपूर वाटतो. Happy त्याला स्क्रीनवर क्षण धरून ठेवता येत नाही, तो पसरतो कुठेही. प्रभाव पडत नाही. काहीही करा पण करकचून करा. हे काय 'खीखी' करत प्रेक्षकांना गृहित धरणं. बंदुकीच्या पिचकारीला कोण हसते, तसे प्रेक्षक राहिले आहेत का आता..!

#थोडे स्पॉयलर्स असतील.
भुलभुलैय्या ३ बंडल आहे पण महामहाबंडल नाही कारण विद्या बालन आहे. माधुरी दीक्षित हसून नाचून जाते, आणि मधेमधे अभिनय करते. विद्या अभिनय करते, पण काम विशेष नाही. सुरवातीला लांबला आहे पिक्चर. तृप्ती दिमरी सगळीकडे क्लिवेज दिसणारे ब्लाऊज आणि डिझायनर साड्या नेसून फिरते. इकडे बाबा आणि मामा मिरची भाकरी खाता आहेत पण तिने साडी ब्लाऊज मधे तडजोड केली नाही. तिची ॲक्टिंग म्हणजे या दोघींवर संशय घ्यायचा पण प्रत्यक्षात कृती काही करायची नाही. नुसता संशय घेत राहते. मग संशय तरी कशाला घ्यायचा, प्रेक्षकांना उगाच आशा वाटते.

कार्तिकला संशय येत नाही पण इतरांना उल्लू बनवायच्या नादात वेगळेच काहीतरी चालू राहते. विद्या, माधुरी आणि तृप्तीचा पुनर्जन्म आणि कार्तिक मात्र फक्त लुक अलाईक. इतके घाऊक पुनर्जन्म आणि वर हे आधी कधी बघितले नव्हते. त्यात कशाचा पायपोस कशाला नाही. दुसऱ्या भुलभुलैय्यातही संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर व राजपाल यादव यांना वाया घालवले होते, यात त्यापेक्षा जास्त वाया घालवून दाखवले आहे. फक्त फ्रॅन्चाईज करून उगाच 'री' ओढली आहे.

कार्तिकला त्या राजपुत्राच्या 'ट्रान्स' रोल मधे नाचता आलेले नाही. त्याची देहबोली अजिबात तशी नाही. कडक शरीर घेऊन ओंडका फिरतो तसा फिरलाय. त्याची माचो - हंक इमेज इतकी महत्त्वाची आहे की यात कसली व्याकुळता वगैरे काही दिसली नाही. प्रयत्न सुद्धा केलेला नाही, मग बघणाऱ्याला त्या राजपुत्राबद्दल सहानुभूती वाटत नाही. राजा सगळ्याच मुलांना परागंदा होण्यास का भाग पाडेल, तेही ओढूनताणून. तरीही भुलभुलैय्या २ पेक्षा हा ३ मनोरंजन करतो असे वाटले. दोघींचा नाच बरा आहे, माधुरीची स्किन कोरिअन ग्लास स्किन वाटत होती. त्या दोघींच्या नाचात काहीतरी नॉर्मल नाही.

बाकी विनोदनिर्मिती sort of केविलवाणी आहे त्यामुळे काय बोलणार>>>>>>+१
विनोदांचा दर्जा टुकार आणि डेटेड आहे, शिवाय टायमिंग जमलेले नाही. फिजिकल कॉमेडी खूप कठीण असते, तीही जमलेली नाही.

Pages