Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल लिहायचे टाळले. मवा
.
पुष्पा१ कसा होता? खर्र खर्र
पुष्पा१ कसा होता? खर्र खर्र सांगा. म्हणजे तो पाहिल्यावर पुष्पा२ चा विचार करता येईल.
पुष्पा १ चान्गला आहे सुनिधी !
पुष्पा १ चान्गला आहे सुनिधी ! साउथ मुव्हिजचा टिपिकल अचाट आणी अतर्क्यपणा सुसह्य असेल तर आवडेल.
साउथ मुव्हिजचा टिपिकल अचाट
साउथ मुव्हिजचा टिपिकल अचाट आणी अतर्क्यपणा सुसह्य असेल तर आवडेल>>>>>
मला अगदी असह्य होतो हा प्रकार त्यामुळे सहसा साउथी अॅक्शन मुवी बघत नाही. बाहुबाली बघितला होता त्यानण्तर सितारामम बघितला. पुष्पाबद्दल वाचुन बघावासा वाटला नाही.
पुष्पा वन चांगला आहे. मला
पुष्पा वन चांगला आहे. मला आवडलेला पण प्राजक्ता म्हणते तेच साउथ मुव्हिजचा टिपिकल अचाट आणी अतर्क्यपणा सुसह्य असेल तर आवडेल...मला आवडतात असले मसालापट..
पुष्पा टु ओटिटिवर बघणार..
The Children's Train नेफ्ली
The Children's Train नेफ्ली वर बघितला इटालियन आहे. फारच छान. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे. कणा मोडलेल्या दक्षिण इटली मधल्या आई आणि मुलाची गोष्ट आहे. नक्की बघा. त्यात शेवटी आईचे एक वाक्य आहे sometimes those who let you go love you more than those who keep you
त्यातल्या Derna ह्या त्या मुलाच्या उत्तर इटलितल्या foster आईचे काम अफाट भारी आहे. नक्की बघावा असा चित्रपट.
विकी और विद्या वाला पिक्चर -
विकी और विद्या वाला पिक्चर - एक आचरट कॉमेडी पाहत आहोत अशी फ्रेम ऑफ माईंड सेट करून पाहिला की मजा येते. टाईमपास म्हणून पाहायला हरकत नाही. हैदराबादी येडचाप कॉमेडीज आवडत असतील त्यांना आवडेल. त्यातला सलीम फेकू चोराच्या रोलमध्ये आहे. डायलॉग खास नाहीत. खिक्कन हसू वगैरे फारसं आलं नाही. पण सेकंडरी कॅरेक्टर्स (अर्चना पुरण सिंग, मल्लिका शेरावत, विजय राज, आणखी काही लोक ज्यांची नावं माहीत नाहीत) वेअर गुड.
अजून थोडा ओव्हर द टॉप आचरटपणा असायला हवा होता.
तृप्ती दिमरी या आधी फक्त कला नामक रडतराऊत रडपटात पाहिली होती. त्यात ती संपूर्ण वेळ हातातली बाहुली काढून घेतलेल्या तीन वर्षांच्या मुलीसारखी रडवेलं तोंड घेऊन वावरत असते. इथे शी लूक्स ॲन ॲबसोल्युट डॉल! फॅन क्लब वगैरे असेल तर माझं नाव लिहून घ्या.
‘अग्नी’ पाहिला. विषय चांगला
‘अग्नी’ पाहिला. विषय चांगला आहे, पण मांडणीत डेप्थ नाहीये. त्यामुळे शेवटी चांगल्या विषयाला न्याय न मिळाल्याची खंत वाटत राहते. >>>
फेफ - मलाही तसेच वाटले. बहुतांश पिक्चर एंगेजिंग आहे. सर्व लीड्सची कामे चांगली आहेत. प्रतीक गांधी व सैयामी खेर मस्त. सखी गोखले आणि सई ताम्हणकरची केमिस्ट्री अगदी अधूनमधून दाखवली आहे, ती अजून थोडी चालली असती. सई जेव्हा एक निव्वळ अभिनेत्री म्हणून समोर येते तेव्हा मला तिचे काम नेहमीच आवडले आहे. त्यामानाने दिव्येंदूच जरा मिसकास्ट वाटतो, त्याचे काम चांगले असले तरी. तो पोलिस अधिकारी वाटेल असे त्याचे भारदस्त, उंचेपुरे व्यक्तिमत्त्व नाही, पण खान त्रिकुट, अजय देवगण हे सुद्धा तसे नाहीत. चित्रीकरण करताना कॅमेरा अँगल्स बरोबर वापरून ते मॅग्निफाय करता येते. याच्या बाबतीत तसे वाटले नाही. मला राग आला तो अनंत जोग चे कॅरेक्टर बघून. एका राजकारण्याचे काहीही न्युआन्सेस न दाखवता सिंघम स्टाइल ढोबळ "बॅड पॉलिटिशियन" त्याला इथेही दाखवला आहे.
पिक्चरमधे डीटेलिंग चांगले आहे, थरार चांगला आहे. पण शेवटी जो उलगडा आहे तो साफ गंडला आहे. म्हणजे पिक्चरभर जो मेसेज दाखवला आहे तो त्या उलगड्याने पूर्ण फसतो. त्यामुळे मूळ कथेतच फ्लॉ आहे. आता ही एखाद्या खरोखरच्या घटनेवर असेल तर माहीत नाही. पण तसे जरी धरले, तरी कथेत सुरूवातीपासून एक प्रतिमा उभी करणे हा तरी फ्लॉ आहे, किंवा तो उलगडा तरी - कारण दोन्ही एकमेकांपासून पूर्ण फटकून आहेत. स्पॉईलर होऊ नये म्हणून यापेक्षा जास्त आत्ता लिहिता येणार नाही.
बाकी फायरफायटर्सना मास्क, हेल्मेट वगैरे सक्तीचे नसते का आणि काही प्रसंगात त्यांना त्याच्याशिवाय वावरावे लागत असेल तर ते का, हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पब्लिकच्या निष्काळजीपणाबद्दलचे सीन्स चपखल आहेत.
एकूण बरेच बघण्यासारखे आहे. बोअर नक्कीच होणार नाही. पण शेवट underwhelming वाटेल याची तयारी ठेवून बघा. प्राइमवर आहे.
“ मला राग आला तो अनंत जोग चे
“ मला राग आला तो अनंत जोग चे कॅरेक्टर बघून.” - टोटली सहमत फा. खूप सुपरफिशियल कॅरेक्टरायझेशन आहे आणि अश्याच प्रसंगामुळे विषयाचं गांभीर्य कमी होतं. तो कॉमिक रिलीफ पण वाटत नाही.
“ सुरूवातीपासून एक प्रतिमा उभी करणे हा तरी फ्लॉ आहे, किंवा तो उलगडा तरी - कारण दोन्ही एकमेकांपासून पूर्ण फटकून आहेत.” - हे पण अगदी बरोबर लिहिलंयस.
स्पॉयलर अॅलर्ट
शेवटच्या प्रसंगात सईच्या इमोशन्स कमी पडल्या आहेत असं वाटतं. तिचा मुलगा इतक्या भयंकर संकटात सापडला असताना ती फक्त भांबावलेले भाव घेऊन वावरते. मंत्रालयात इतका मोठा कार्यक्रम असताना मुळात इमर्जन्सी सर्व्हिसेस तिथे नसणं, भायखळ्याऐवजी परळहून फायर इंजिन्स येणं (परळहून अॅडिशनल येऊ शकतील, पण फक्त त्यांचीच दोन! मुळात फक्त दोनच!) मंत्रालयात इतक्या सहज स्फोटकं घेऊन जाता येणं, ती अशी रमत गमत जाऊन प्लँट करता येणं, त्या कार्यक्रमातल्या निवेदकांचा पांचटपणा, हजार डिग्रीज तपमानातल्या आगीतून, फायर-सूट नसलेल्यांनी सुद्धा, फक्त कपड्यांवरच्या आणि चेहर्यावरच्या थोड्याश्या काळ्या डागांनी बाहेर पडणं, अश्या अनेक गोष्टींमुळे सिनेमा सुपरफिशियल वाटतो.
हो मलाही ते पाहताना पहिला
हो
मलाही ते पाहताना पहिला प्रश्न हाच पडला होता की मंत्रालयाला जवळ परळचे फायर स्टेशन असेल की इतर एक दोन
दुसरे म्हणजे त्यांचे स्वतःचेही असेल कदाचित. माहीत नाही.
मी "लकी भास्कर"ही बघितला या वीकेण्ड्ला. प्रचंड झोप येत असताना डुलक्या देत "अरे काहीतरी हुकले" करत रिवाइंड करत बघितला. त्यामुळे इतका काही खास वाटला नाही. एकतर डबिंग हॉरीबल आहे. पिक्चर चालू करून केरीओकी (या शब्दाचा नक्की उच्चार मला अजूनही समजलेला नाही) करत कोणीतरी हिंदीत संवाद म्हंटल्यासारखे वाटतात. सेन्सिबल सुरूवात होते पण मधेच पिक्चर अगदी बालिश होतो. पुन्हा गंभीर. कल्पना चांगली आहे. पण हिंदीत पाहताना लॉस्ट इन ट्रान्स्लेशन झाल्यासारखे वाटते - म्हणजे फक्त संवादांचे नाही - सादरीकरणाचे सुद्धा.
फेफ सई बद्दल - हो तेव्हा ती खूप पॅसिव्ह वाटते हे आता जाणवले.
ती पुन्हा गाईल: नक्की बघा
ती पुन्हा गाईल: नक्की बघा आक्रोश. दुर्दैवाने देशात आजही तीच परिस्थिती "पुन्हा" आली आहे.
रंग दे बसंती - नेफि
रंग दे बसंती - नेफि
पुनश्च पारायण. (द्विरुक्ती?)
आमीर ने 'स्मिटन' हिरो काय छान साकारलाय. नॉर्मल हिरो नाही तर स्मिटन हिरो. द वे ही लुक्स, तो ज्या रीतीने सू कडे बघतो वगैरे मध्ये 'स्मिटन' ही छटा मस्त आणलीये. या शब्दाला मराठी प्रतिशब्द माहीत नाही.
Smitten= लुब्ध?
Smitten= लुब्ध?
कॅरी ऑन - अॅक्शन थ्रिलर.
कॅरी ऑन - अॅक्शन थ्रिलर. ख्रिसमस. एअरपोर्ट इ. इ. आहे.
डाय हार्ड, स्पीड एकत्र करुन दिलाय. टेरम इगर्टन एलएएक्सला टीएसए एजंट असतो आणि त्याला एक गूढ व्यक्तीचा एक कॅरी ऑन बॅग टीएसए चेक मधुन पास करायला फोन येतो. तो अर्थात नविन लग्न झालेला आणि त्याच सकाळी बायकोने ती गर्भार आहे सांगितलेला असा सगळा असतो. आता काय पॅकेज आहे आणि काय होणार असा अॅक्शन थ्रिलर. नेहेमीचाच मालमसाला. बरा आहे आपला हॉलिडेजपूर्वी बघायला.
मीदेखिल नुकताच कॅरीऑन बघून
मीदेखिल नुकताच कॅरीऑन बघून संपवला. टाईमपास आहे. अपेक्षित त्या सर्व घटना आहेत त्यामुळे अपेक्षाभंग होत नाही. फक्त विमानाच्या पोटात व्हायरसही बाहेर जाणार नाही असा फ्रीज असतो असा एक अचंबित करणारा साक्षात्कार झाला. खखोदेजा.
मी पण बघितला. कॅरी ऑन.
मी पण बघितला. कॅरी ऑन. टाईमपास आहे.
बर्याच अ आणि अ गोष्टी आहेत. पण चलताय.
पर्णीका, लुब्ध षब्द आवडला
पर्णीका, लुब्ध षब्द आवडला
अग्नी पाहिला.. म्हणजे त्या
अग्नी पाहिला.. म्हणजे त्या नावाचा पिक्चर. ९५% चांगला वाटला. बाकी शेवटचा ५% बघणेबल कॅटेगरी.
पहिली दहा मिनिटे पिक्चर खूप छान ग्रिप घेतो. कॅमेरा असा फिरवला आहे की त्या प्रसंगातील तगमग जाणवून येते. अनंत जोग, काही म्हणा, मला आवडतात. अगदी क्लिषेड रोल केला असला तरी मला आवडले ते. शेवट फक्त, आता इथपर्यंत बघितला आहेच तर बघून टाकू, असा झाला आहे. सगळं माहीत असतं, कसा संपणार हेही माहीत असतं. असो, त्याकडे कानाडोळा करू शकतो.
Hi Nanna / हिंदीत Hi papa -
Hi Nanna / हिंदीत Hi papa - Netflix
छान होता. फार आवडला. लव, रिलेशनशिप, इमोशनल ड्रामा, लव्हस्टोरी, बाप लेकीचे नाते वगैरे सुरुवातीपासूनच गुंतायला झाले चित्रपटात. आता यांचे छान व्हावे असे चित्रपट भर वाटत राहणं, ते होणार हे माहीत असते तरी ते बघायला मजा येणे, आणि तसे झाल्यावर आपल्याही डोळ्यातून पाणी येणे या जॉनरचे चित्रपट असतात त्यातला होता. असे पिक्चर आवडतात त्यांनी जरूर बघा.
त्यातला हिरो नानी हा तिथे नॅचरल स्टार नावाने ओळखला जातो. तो सुद्धा छान वाटला. आणि मृणाल ठाकूर आवडतेच
शाहीदचा जर्सी ओरीजिनल याच नानीचा होता. आता बघायला हवे. अर्थात डब केलेला असल्यास शोधायला हवा.
पुष्पा नकोच मग.
पुष्पा नकोच मग.
कॅरी ऑन एकदम वेगवान. विचार करायला वेळच मिळत नाही. मला आवडला.
ते अग्नी प्रकरण कुठे दिसते शोधावं लागेल.
नेफिवर "द व्हेल" पाहिला. या
नेफिवर "द व्हेल" पाहिला. या रोल बद्दल ब्रेण्डन फ्रेजरला ऑस्कर मिळाले आहे. त्यामुळेही उत्सुकता होती.
मला पिक्चरचा शेवटचा भाग फारसा न कळूनही खूप ग्रिपिंग वाटला. अभिनय, जरा इण्टेन्स असलेली कथा आणि त्याचे सादरीकरण आपल्याला एंगेज करते. ऑस्करविजेता रोल आहे म्हंटल्यावर शेवट कसा असेल याबद्दल काही अंदाज होता आणि तसेच निघाले. स्पॉईलर देत नाही. सुरूवातीला थोडे अगम्य वाटणारे सीन्स नंतर खुलासा आल्यावर लक्षात येतात. एकूण सादरीकरण नाटकासारखे आहे. एखाद दुसरा आउटडोअर सीन सोडला तर सगळा पिक्चर एका अपार्टमेन्ट मधे आहे. मूळ कथा/पटकथा नाटकाकरता लिहीली असावी.
ब्रेण्डन फ्रेझरचे काम जबरी आहे. त्याला मदत करणारी "लिझ", त्याची मुलगी, त्याची बायको आणि तेथे आलेला एक मिशनरी मुलगा सगळ्यांचीच कामे जमली आहेत. "ममी" पिक्चर्समधला ब्रेण्डन फ्रेजर आणि यातला, यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
त्याबद्दल आधी माहिती न वाचता पाहिला व नंतरही काही स्पष्टीकरणे न वाचता हे लिहीत आहे. मला अनेक ऑस्कर वाले पिक्चर अगम्य वाटले आहेत. हा ही थोडाफार तसा आहेच, विशेषतः शेवट. पण तरीही ग्रिपिंग आहे.
धन्यवाद फा. छान पोस्ट.
धन्यवाद फा. छान पोस्ट.
खूप ऐकले होते या चित्रपटाबद्दल. ब्रॅन्डन हा 'ममी' मुळे आवडता होताच. मी पंधरा मिनिटे बघून थांबवला होता. तो चेहरा लपवून ऑनलाईन शिकवत असतो, तेवढा बघितला आहे. ऑस्कर मुळेच उत्सुकता होती खरेतर.
ममी" पिक्चर्समधला ब्रेण्डन
ममी" पिक्चर्समधला ब्रेण्डन फ्रेजर आणि यातला, यात जमीन अस्मानाचा फरक आहे. >> मी पाहिला नाही अजुन पण हेच मनात आले होते की हा ठोकळाभिनय करायचं सोडुन थेट ऑस्कर घेऊन कसं काय पळाला?
. हल्ली गंभीर, आर्ट सिनेमे पहात नाही म्हणुन हा लांबणीवर पडतोय.
We're the Millers पुन्हा
We're the Millers पुन्हा पाहिला. अत्यंत रिफ्रेशिंग आणि धमाल कॉमेडी. (काही ग्राफिक जोक्स आहेत)
नेटफ्लिक्सवर यो यो हनी सिंगची
नेटफ्लिक्सवर यो यो हनी सिंगची डॉक्युमेंटरी आली आहे. सहज ब्राऊज करताना दिसली. बघायला चालू केली.
मधे तो एकदम गायब होता त्याचं रहस्य उलगडलं. रिहॅब मधे वगैरे होता ते ऐकलं होतं (ड्रग्स, अल्कोहोल मुळे) पण बाकी मानसिक आजार वगैरे पण नव्यानेच कळलं (खखोदेजा). त्याला हॅल्युसिनेशन्स वगैरे व्हायचे ई.ई. आई वडील बहिणीचा भरपूर सपोर्ट आहे त्याला.
बाकी डोक्युमेंटरी मधे ओघाने शिव्या वगैरे आहेतच पण ठिक आहे एकदा बघायला अगदी काहीच नसेल तर.
बॅड बॉय ची गाणी मात्र एक से एक हिट आहेत! मला हे रॅपर लोकं (बादशाह वगैरे) म्हणतात ना शुबॉय बादशा...कळायचंच नाही शुबॉय म्हणजे नक्की काय ... ते Its your boy आहे हे यातून कळलं
पुष्पा 2 पाहिला अन् कॉर्पोरेट
पुष्पा 2 पाहिला अन् कॉर्पोरेट बुकिंग चा फर्स्ट हॅण्ड अनुभव घेतला
बुक माय शो वगैरे सोडा, थेटर खिडकीवर तिकीट घेताना सुमारे 75% सीट गेलेल्या होत्या. ज्या होत्या त्यात बऱ्यापैकी पुढच्या 3-4 ओळीत होत्या अन् बाकी विखुरलेल्या. मला शेवटच्या ओळीतली एकमेव खाली असलेली सीट मिळाली.
पण प्रत्यक्षात आत फक्त 25% सीट भरलेल्या होत्या.
माझ्या ओलीतल्या 17 पैकी फक्त 5 सीट वर लोकं होती...
सिनेमा म्हणाल तर 21 अपेक्षित + अल्लू अर्जुन अन् श्रेयस तळपदे...
प्रत्यक्षात आत फक्त 25% सीट
प्रत्यक्षात आत फक्त 25% सीट भरलेल्या होत्या.
>>>
म्हणजे चिटींग करतात?
इथे थोडे अवांतर होईल पण या
इथे थोडे अवांतर होईल पण या पेज ३ वर्तुळात स्ट्रेस आपल्यापेक्षा खूप जास्त आहे का? की फक्त तिथे मेंटल हेल्थ या विषयावर चर्चा जास्त होते? अश्या वर्तुळांमध्ये राहून / वावरून क्लीन राहता येत नाही का? विशेषत: हिंदी इंडस्ट्री?
सुशांत सिंग राजपूत च्या मृत्यूनंतर जी नावे आणि chats पुढे आले त्यातून या इंडस्ट्रीतील सगळेच्या सगळे ड्रग्स घेतात असे वाटू लागले होते.
नेफ्लीवर बॉवा vs फॅला मध्ये पण केजो मी मनाविरुद्ध पार्ट्या अटेंड करतो. मला रोज औषधं घ्यावी लागतात वगैरे बोलला होता.
एकदा इकडे एन्ट्री केली की नॉर्मल आयुष्य जगताच येत नाही?
फार dumb question वाटतील पण हे rehab वगैरे फार वरचेवर ऐकलं आहे या क्षेत्रात.
निर्मीतीक्षमता आणि मानसिक
>>>>>पण हे rehab वगैरे फार वरचेवर ऐकलं आहे या क्षेत्रात.
निर्मीतीक्षमता आणि मानसिक आजारांचा संबंध असावा असा कयास. रिसर्च आहे का कसे ते माहीत नाही. पण हायपर रिसेप्टिव्हीटी, संवेदनशीलता आणि अॅक्युट इमोशन्स यांचा निर्मीतीक्षमतेशी संबंध असावा.
त्यात अनियमित झोप, खाणे व एकंदर अनियमित जीवनशैलीमुळे मूळचे डिव्हीअंट ट्रेटस ट्रिगर होत असावे. मानसिक आजार असेल तर दारु व ड्रग्ज इज अ रेड रेड बिग नो!! पण हे लोक लक्ष देत नसतील.
अक्षयकुमारचे २०१४ नंतरचे बरेच
अक्षयकुमारचे २०१४ नंतरचे बरेच सिनेमे बाळबोध वाटतात. पण त्याला एका गोष्टीसाठी फुल्ल मार्क्स दिले पाहीजेत.
फिल्मी पार्ट्या अटेण्ड न करणे, पहाटे शूटींग सुरू करून बाकीचे फिल्म स्टार्स उठायच्या आत शूटींग संपलेलं असतं. नंतरचा क्वालिटी टाईम तो फॅमिलीला देऊ शकतो.
Pages