चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सिकंदर का मुकद्दर - नेटफ्लिक्स

जुना अमिताभचा मुकद्दर का सिकंदर होता. चित्रपट बोर होताच पण लॉजिकच्या नावावर सुद्धा कायच्या काय होता. बहुधा मुकद्दर हा शब्द शीर्षकात आला की काहीही घडू शकते, अलाउड आहे. जसे शाहीद कपूरचा सुद्धा किस्मत कनेक्शन म्हणून एक चित्रपट होता. त्यात सुद्धा काहीही शेवट होता.

या चित्रपटाची सुरुवात मात्र दमदार वाटली. हिऱ्यांच्या चोरीचा तपास, कसलाही फाफटपसारा ना दाखवता थेट चोरी आणि आरीपीमुळे सरसावून बसलो. पण थोड्याच वेळात फॅमिली ड्रामा सुरू झाला आणि मलाही मूड चेंज करावा लागला. शेवटी पुन्हा ट्रॅक वर आले. पण जो अपेक्षित होता तोच शेवट ट्विस्ट म्हणून चित्रपटात आला.

तरी ओवर ऑल एकदा बघायला काही वाईट नाही.
जिमी शेरगील असला चित्रपटात की मला छान वाटते. पर्सनल आवड.

घजिनी पाहिला
आमिरचा, असिन चा जुना चित्रपट.
हा बहुतेक south चा remake होता.
ओरिजिनल कन्सेप्ट हॉलिवूड चित्रपट बहुतेक memonto नाव.
बऱ्याच ठिकाणी लॉजिक लै गंडलेले आहे.
Overall बघणेबल.
आमिरने पहिल्यांदा ह्या चित्रपटा साठी बॉडी बनवली.
हेअर कट देखील वेगळा. तेव्हा गजनी ( बोली भाषेत घजिनी कोण म्हणतंय) कट, विसराळू माणसाला गजनी झालास काय म्हणणे सुरू झालेले
तुझा गजनी झालाय काय अजूनही असते.
मारामारी south style , व्हिलन south style फक्त भाषा हरयणवी/ राजस्थानी.
तेव्हाच सुपरहिट असेल हा.

गजनी माझा आवडता पिक्चर.
Famed director Christopher Nolan, during a trip to Mumbai in 2018, shared his thoughts about Aamir Khan starrer Ghajini.
The filmmaker revealed how Aamir's movie was an official remake of his film Memento.
ह्यातले ते "कैसे मुझे तुम मिल गयी" पुन्हा पुन्हा ऐकावसे व्वाटणारे गाणे!

अकख्या सिनेमात फक्त गाणीच चांगली आहेत, तीही ऐकायलाच
बाकी सगळा आनंदी आनंद आहे

एखाद्याने किती माठ असावं याचा आदर्श असिन ने घालून दिलाय Happy

असिन मरेपर्यंत चा चांगल वाटलेला मला picture.
Specially, उसने कहा please मैने बोला नो वाला सीन तर भारी आहे.

कैसे मुझे तुम मिल गयी" पुन्हा पुन्हा ऐकावसे व्वाटणारे गाणे!>>>> १०००++

उलट मला असिन मरते तिथपासून आवडला. कैसे मुझेपासून पिक्चर इंटेन्स होत जातो. मेमेंटो पाहिला नाहीये. पण आता हा आवडला आहे तर मेमेंटो पाहिला तरी फरक नाही.

माझेमन
आपण दुसरीकडे वादावादी करू पण इथे एकमत! Happy

सिकंदर का मुकद्दर

लीड रोल्स मध्ये दोन तगडे कलाकार आहेत. अभिनय आणि आवाज यात दोघेही एकमेकांना टक्कर देतात. त्यामुळे मजा आली बघायला. चांगला कोण आणि वाईट कोण याच्यामध्ये सुई बर्‍यापैकी इकडून तिकडे होत राहते (अंदाज येतो पण खात्री होत नाही). पण खरी मजा दोघांची जुगलबंदी बघण्यात आहे.

जिमी शेरगील तर आवडतोच. 'खाकी' मालिकेत अविनाश तिवारी पण आवडला होता. या सिनेमातही मस्त काम केले आहे त्याने.

जिमी शेरगीलला तरुण दाखवायला जी रंगभूषा केली आहे ती भयाण आहे. रंगभूषेशिवायचा जिमी जास्त तरूण वाटतो.

माझे मन, हा चित्रपट कोणे एके काळी - फल्त दूरदर्शन असे त्या काळात - टीव्हीवर पाहिला होता. आणि या सीनला आम्ही सगळे हसलो होतो. हे लक्षात आहे. त्यामुळे गजनी बघताना तो प्लॉट आणि सीन आधी पाहिलाय हे आणि कलाकार लक्षात होते. गजनी मधला पर्फॉर्मन्स अधिक चांगला वाटला. मनोजकुमार- आशा पारेखचा तो चित्रपट आता मला पाहवेल की नाही माहीत नाही. विकि म्हणतोय की गजनी आणि या साजन दोन्हीचा पहिला भाग हॅपी गो लव्हली वर बेतला आहे.
-----------
गजनी , तसंच सिंघम हे दोन्ही सूर्याच्या तमिळ चित्रपटांचे रिमेक्स आहेत. जय भीम मधली पेपर वाचतानाची त्याची क्लिप पाहून मला त्याचे तमिळ चित्रपट पाहावेसे वाटत आहेत. युवा, जॉन अब्राहमचा फोर्स हेही सूर्याच्या तमिळ चित्रपटांचे रिमेक्स आहेत.

सिकंदर का मुकद्दर - नीरज पान्डे चा आहे ( A Wednesday, Special 25, Baby वाला ) ठिक ठाक आहे. नीरज पान्डे वाचुन अपेक्शा वाढ्ल्या होत्या.

“ कैसे मुझे तुम मिल गयी" पुन्हा पुन्हा ऐकावसे व्वाटणारे गाणे!” - ट्यून श्रवणीय आहे. शब्दांनी काही ठिकाणी माती खाल्लीय -

मैं तो ये सोचता था
कि आजकल ऊपर वाले को फ़ुर्सत नहीं
फिर भी तुम्हें बना के वो मेरी नज़र में चढ़ गया
हाँ, रुत्बे में वो और बढ़ गया

Happy Happy

“ सिकंदर का मुकद्दर - नीरज पान्डे चा आहे ( A Wednesday, Special 25, Baby वाला ) ठिक ठाक आहे. ” +१ नीरज पांडे कडून जास्त अपेक्षा होत्या हे खरंय.

एमिनेम हा रॅपर आहे इतकेच माहीत आहे. मी त्याची गाणी ऐकलेली नाहीत >> एमिनेम ची सोलो पेक्षा त्याचे इतरांबरोबरचे कोलॅब्स ऐक. सिंपली आउअट ऑफ द वर्ल्ड आहेत. सोज्वळ भाषा असेलच असे धरून चालू नको.

पण आता हा आवडला आहे तर मेमेंटो पाहिला तरी फरक नाही. >> नाही नाही. मेमेंटो ची सर नाही गजनीला. ( तसच गजनी बराच भरकटत जातो मूळ सिनेमापासून) मेमेंटो ज्या तर्‍हेने उलगडत जातो त्याला तोड नाही. सिनेमासाठी काय कष्ट घेतले आहेत हे आधी गूगलून मग बघा. अवाक व्हाल.

जिमी शेरगीलला तरुण दाखवायला जी रंगभूषा केली आहे ती भयाण आहे >> पूर्ण गंडलेला ऐ आय वापरलाय बहुधा थोबाड बदलण्यासाठी. नीरज पान्डे कडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्‍या झाल्या नाहित ह्या सिनेमामधून. बरेच लूपहोल्स जाणवतात.

मी धागा अधुन मधून वाचतोय गेले काही महिने, सगळ्या पोस्ट्स वाचत नाही, तेव्हा वरील काही पोस्ट्स वाचता मी एकदम गुहेतून बाहेर येऊन पोस्ट करतोय असे वाटेल(च):

काल "अमर भूपाळी" हा चित्रपट पाहिला.
आवडला, आणि एवढा जुना आहे याची जाणीव ठेवता अजूनच आवडला.
विशेष म्हणजे संध्या अजिबात खटकली नाही, पण "लटपट लटपट" मध्ये सतत कमरेतून एवढे वाकुन केलेल्या नाचाची कोरिओग्राफी खटकली.

ललिता पवारचा मी पाहिलेल्या चित्रपटांतील बेस्टेस्ट परफर्मन्स. आणि पंडितरावांचा अभिनय सुद्धा आवडला.

मुकुंद कुणी हा पाहिला आधीही ऐकले आणि आवडले असून आता अधिकच आवडले आणि धनश्याम सुंदराने तर आता मनात आधी पेक्षा मोठंच घर केलंय.

शेवटाला खरंच एक हुंदका आला एक, पण खोकला काढुन आवरला.

अजुन एक म्हणजे, व्ही शांतारामचे मला दोनच चित्रपट आवडले होते आतापर्यँत "दो आंखे बारा हात" आणि "पिंजरा"
त्यांच्या इतर चित्रपटांची मी माझ्यापरीने जमेल तशी पिसं काढत असे (हे दोन आवडले तरी काढली आहेत), पण हा चित्रपट पाहिल्यावर त्यांचे बाकी अत्याचार माफ केलेत.

फेफ मला प्रिसाईजली तेच लिरीक्स आवडतात. Wink

असामी मेमेंटो चांगलाच असेल. मला असं म्हणायचं होतं की आता गजनीचं इंप्रेशन माझ्यापुरतं बदलणार नाही.

अमर भुपाळी लहानपणी टीव्हीवर बघितलेला. गाणी तेवढी आठवतायेत आणि ती लागायचीही टीव्हीवर. अर्थात घनःश्याम सुंदरा हे फार आवडीचं आहे.

मैं तो ये सोचता था
कि आजकल ऊपर वाले को फ़ुर्सत नहीं
फिर भी तुम्हें बना के वो मेरी नज़र में चढ़ गया >> हे गाणं खूप आवडतं, पण मी सहसा शब्दांकडे नीट लक्ष देत नाही. आत्ता वाचून हसू येत आहे. काहीही आहे हे!

इथे फार पोस्ट येतात त्या गर्दीत अश्या पोस्ट हरवतात >>>> अनुमोदन. पिसं काढण्यासाठी वेगळा धागा किंवा वहाता बाफ का नाही वापरत ? इथे त्या विनोदी* पोस्टी इतक्या येतात की चित्रपटांचे रिव्ह्यू किंवा रेकोज सापडतच नाहीत!

* - आणि त्यातला बर्‍याच पोस्टींवर हसूच येत नाही हा अजून एक प्रॉब्लेम.

पण तशा गप्पाही पिक्चर बघताना जे सुचते त्यावर ओघानेच येतात ना? पिक्चरशी संबंधित गंभीर चर्चा जशी अवांतर नाही तशी इतरही नाही.

लटपट लटपट बद्दल - तो डान्स विचित्र आहे खरा. पण त्या गाण्याचा वेग, संगीत, गायकी सगळेच भारी आहे. एखादे गाणे त्यातील एखाद्या जाणकाराने उलगडून दाखवले की आपल्याला नव्याने इंटरेस्ट येतो तसे माझे या गाण्याबद्दल झाले. अजय- अतुल परीक्षक असलेल्या एका शो मधे हे गाणे एकीने गायले. तेव्हा त्यांनी या गाण्याबद्दल बरेच काही सांगितले. यात मधे "लखलख लखलख तेज गं जैसे तुटत्या तार्‍याचं" नंतर एका वेगळ्याच वाद्याचा आवाज मधेच दिला आहे. त्याबद्दल त्यांनी काहीतरी सांगितले होते - अशा पद्धतीच्या गाण्यांमधे तो नवीन प्रयोग होता वगैरे. मला आता काहीच डिटेल्स आठवत नाहीत पण त्यांनी बरीच तारीफ केली होती.

पराग + १/२ Wink
हसू येतं (काही) विनोदी पोस्टींवर, पण चित्रपटांचे रिव्ह्यू हरवून जातात!

सिकंदर का मुकद्दर - सुरुवात एकदम दमदार होते . पण नंतर हळूहळू ढेपाळत जातो. पण पुढे नक्की काय ही उत्सुकता कायम राहीली. फार योगायोग आहेत. कोणता दुकानदार गिर्हाईकाला दुकानात एकटं सोडून बाहेर जाईल , ते पण दागिन्यांच दुकान. गिर्हाईक कितीही ओळखीचा असला तरीही.
जिमी शेरगील आवडतो ,अशा भुमिका करण्यात आता हातखंडा आहे त्याचा. तमन्ना OK . बोलण्यात साऊथ इंडियन accent जाणवतो. हिरोला बाकी कुठे बघितलेलं आठवत नाही. दिव्या दत्ता आवडली छोट्याशा रोलमध्ये. शेवटि जिमी तिला फोन करतो तो छोटासा सीन आवडला.
एकंदरीत one time watch आहे. नीरज पांडे म्हणून जास्त अपेक्षा ठेवू नका , इतकच.

हिरोला बाकी कुठे बघितलेलं आठवत नाही.
>>>>
बाजीराव, सिंबा, पद्मावती, बँड बाजा बारात वगैरे वगैरे...
जोक्स द अपार्ट, रणवीर सिंगचे वाईब येत राहतात जो आवडतो त्यामुळे आवडला हा सुद्धा हिरो.
पण वयस्कर लूक जरा चम्या केलाय त्याचा..

@ अवांतर चर्चा/गप्पा
चित्रपट कसा वाटला आणि चित्रपट गप्पा/चर्चा/गल्ली असे दोन वेगळे धागे चालवले तर गप्पा सुद्धा चालतील आणि रेको सुद्धा एकत्र राहतील.
चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला हा धागा एक चांगले उदाहरण आहे. तिथे अवांतर गप्पा होत नाहीत. याचे कारण त्या करायला हा धागा आहे. त्याच धर्तीवर चित्रपट कसा वाटला संबधित पोस्ट वेगळ्या धाग्यावर ठेवू शकतो. हवे तर चित्रपट परीक्षणाची आपली मूळ पोस्ट दोन्हीकडे टाकू शकतो. एकीकडे रेकॉर्डला राहील. एकीकडे गप्पा सुरू होतील.

Pages