Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जर योग्य त्या डेटा
जर योग्य त्या डेटा/पुराव्यानिशी तक्रार असेल तर त्यात तथ्य असेल अन्यथा नाही. >>> १०००+
शाम भागवत, तुमची वाढलेल्या
शाम भागवत, तुमची वाढलेल्या मतदानाची थियरी मागे नेऊन लिहितो. तुम्ही लोक सभे च्या मतदानाच्या आकडेवारीचीही अशी तुलना केली होती का? (यात खोच नाही, जेन्युइन प्रश्न आहे). तेव्हा महाराष्ट्रात युतीच्या जागा घटल्या. राकॉ - अजित पवार आणि भाजपला फटका बसला. यांचं एकत्र येणं दोन्ही पक्षांच्या मतदारांना आवडलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी परस्परांना मतं ट्रान्सफर केली नाहीत . हे लोक मतदानाला बाहेर पडले नसतील . राकॉच्या मतदारांना तुतारी हा पर्याय होताच.
मग लोकसभेचे निकाल - भाजप बहुमतापासून लांब, महाराष्ट्रात युतीचा पराभव हे बघून त्यांच्या मतदाराला हे विधानसभेला परवडण्यासारखं नाही, हे लक्षात आलं. त्यात संघही मैदानात उतरला आणि युतीचं मतदान वाढलं. >>
माझ्या अभ्यासावरून मला जे कळलं ते असं
बरंच काही घडलं होतं. घडत होतं. सगळंच अनाकलनीय होतं. सगळीच खिचडी झाली होती. त्यामुळे आपण सर्वच जे जे दिसले तेच घटक कारणीभूत समजत आलो आहोत. त्यांत परत आपण आपल्या आवडी निवडीपण घालून आणखीनच मूळ कारणांपासून लांब जातोय. तिथेच आपण चुकतोय असं मला वाटत. यासाठी लोकसभेचं यशापयश मोजताना मोठा कॅनव्हॉसवर बघायला लागेल. महाराष्ट्रात ४ चे ६ पक्ष झाले वगैरे बाजूला ठेवायला लागेल. आपली आवड निवड, कोण काय म्हणाले हे बाजूला ठेवायला लागेल.
कारण
कोणी नविन आलं नाही कोणी बाहेर गेलं नाही असं समजा. भाजप व भाजप विरोधक यांच्या एकत्रीत मतांत फक्त ०.५५% किंवा ३ लाखांचा फरक आहे. किंवा फरकच नाहीये असं समजा.
फक्त मतदारांमधे आतल्या आत बेरजा वजाबाक्या झाल्या असं समजायचं. यापध्दतीने विचार केल्यास नीट समजू शकेल. यात जी बेरीज वजाबाकी मोठ्या प्रमाणावर झाली व ज्या बेरीज वजाबाकीचे निकष ठामपणे कठोरपणे पाळले गेले त्यांना फायदा झाला.
यातून जे समीकरण तयार झालं त्यावर
एक उपाय नव्याने बेरजा वजाबाक्या करायला लागेल असं काहीतरी करणं पण याला मर्यादा असतात.
दुसरा उपाय बाहेरून नव्याने कुमक आणणं.
भाजपाने दोन्ही उपाय योजले व ते जिंकले. मोठ्या प्रमाणावर नवीन कुमक आणली
व
वरच्या थरावर असलेल्या हिंदूत्वाला साद घालून पक्ष व जात यांत अडकलेली लोकांची मनं मोकळी केली. त्यामुळे महायुतीतील पक्षांत मत ट्रान्सफर झाली.
हे असं काहीच मविआ मधे झालं नाही. कोणते तरी मोठे धेय्य ठेऊन सगळ्यांना एकत्र करणे त्यांना जमले नाही. उलट आरोप प्रत्यारोपांमुळे ते एकमेकांपासून लांबच जात राहिले.
असा दुहेरी परिणाम झाल्याने खूपच मोठा परिणाम झालेला दिसायला लागला.
बाहेरून आलेली कुमक किती होती ते मी लिहीलेच आहे. ती जरी ४.५ म्हणजे लाटेची असली तरी युतीतील मनोमिलनामुळे त्याचे रूपांतर त्सुनामी मधे झाले. प्रत्यक्षात मतदान टक्केवारीनुसार त्सुनामी फक्त ९२ मतदार संघात आलेली आहे
इव्हीएम वरील टीकेला निवडणूक
इव्हीएम वरील टीकेला निवडणूक आयोगाने उत्तर देणे अपेक्षित असताना भाजपचे लोक का लेंड्या टाकताहेत? जवळपास सर्वच पक्ष इव्हीएम ला आक्षेप घेताहेत फक्त भाजपच नाही असे का? हया प्रश्नांचे उत्तर कोण देणार? देणार कोण ? कोण देणार?
काहीही कळलं नाही. माझा प्रश्न
काहीही कळलं नाही. माझा प्रश्न इतका गहन नव्हता.
{आपण सर्वच जे जे दिसले तेच घटक कारणीभूत समजत आलो आहोत. त्यांत परत आपण आपल्या आवडी निवडीपण घालून आणखीनच मूळ कारणांपासून लांब जातोय}
हे तुम्हांलाही लागू आहे ना?
मी विचार करताना ती आवड निवड
मी विचार करताना ती आवड निवड बाजूला ठेवतो असे मला वाटते. त्याचेही स्पष्टीकरण मी दिलेले आहे.

४० वर्षांचा वाढत्या हिंदूत्वाचा कल नियती दाखवत आहे. ती तेच कल दाखवणार आहे. त्यानुसार ती सर्वांना बुध्दी देत आहे असे समजल्यावर डोके शांत ठेऊन विचार करायला जमते. उखाळ्या पाखाळ्या शिव्या शाप याचा परिणाम होत नाही.
काहीही कळलं नाही. माझा प्रश्न
काहीही कळलं नाही. माझा प्रश्न इतका गहन नव्हता.

>>
जाऊ दे.
मला कळलंय या भ्रमांत मला राहू दे.
Nitin gadkari new cm of
Nitin gadkari new cm of maharashtra! congrat!
शाम भागवत यांचं स्पष्टीकरण
शाम भागवत यांचं स्पष्टीकरण नॉन बायॉलिजकल, भगवान से रिश्ता टाइप वाटलं.
(No subject)
लोकसत्तेच्या आजच्या
लोकसत्तेच्या आजच्या अग्रलेखातून
एकनाथ शिंदे यांचे काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर कालांतराने उद्धव ठाकरे यांचे जे झाले तेच शिंदे यांचेही होणार हे उघड असले तरी ते देण्याची ही वेळ नव्हे. हे आताच स्पष्ट केले तर भाजप मित्रपक्षांस कसा संपवतो त्याची पुन्हा वाच्यता होणार. ते बरे दिसणार नाही.
उद्धव ठाकरे यांनी न दाखवलेली लवचीकता शिंदे यांनी प्रदर्शित केली आणि स्वत:स ‘वाचवले’. ही परिस्थिती-शरणता ते किती काळ दाखवणार यावर त्यांच्या शिवसेनेचे भवितव्य अवलंबून असेल. यापुढे भाजपस शिंदे यांची गरज असणार नाही. हे विधान उलट मात्र तितके खरे नसेल. शिंदे यांना भाजपचा आधार यापुढेही लागेल
ईव्हीएम मशीन मतदानापूर्वी
ईव्हीएम मशीन मतदानापूर्वी तपासण्यात काहीच अर्थ नाही. प्रोग्राम सेट केला असेल तर ? मतमोजणी झाल्यावरच तक्रार आल्यास VVPAT मोजणी करावी, ज्यामुळे शंकेला वाव राहणार नाही.
संपूर्ण मतदान पारदर्शक कसे
संपूर्ण मतदान पारदर्शक कसे करणार? मग ते गुप्त राहणार नाही. आता ते मतदारापुरते पारदर्शक आहेच की. >>>>
पारदर्शकता आणण्यावर माझी युक्ती कशी वाटते पहा विचार करून. काही चुकत असेल ( लॉजिकल लूपहोल असेल तर ) तर निदर्शनास आणून द्या कुणीही.
EVM चा प्रोग्रॅम चिप लेव्हल वर असतो, त्यामुळे त्यांला नंतर रीसेट करू शकत नाही असा माझा एकूण समज आहे.
प्रत्येक बूथ वर प्रत्येक पक्षाचे पोलिंग एजंट बसलेले असतात, गृहीत धरा एका पोलिंग रूम मध्ये पाच प्रमुख पक्षांचे पोलिंग एजंट आहेत.
- पूर्ण मतदान चालू असताना केंव्हाही, मतदानाची सलगता न मोडता त्या पाच पैकी प्रत्येकाला एक टेस्टिंग मत ( वेगवेगळ्या वेळी ) सर्वांसमक्ष टाकू द्याव.
- सर्वांसमक्ष ती मते कोणत्या मशीनवर कितव्या अनुक्रमांकाची आहेत आणि कोणत्या पक्षाला/ उमेदवाराला दिलेली आहेत हे नमूद करून ठेवावे.
- EVM मध्ये त्या पाच अनुक्रमांकावर जी मते मतदानाच्या दिवशी नोंदवली गेली होती, ती तीच आहेत ना याची खात्री मतमोजणीच्या वेळी उपस्थित सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना करू द्यावी.
- शेवटी एकूण मतदानातून ती पाच मते वगळून आकडे प्रसिद्ध करावेत.
- कोणत्याही बूथवर १% पेक्षा जास्त EVM मशीन मध्ये पडताळणीत तफावत आढळ्यास त्या मतदारसंघात फेरमतदान घ्यावे.
यासाठी EVM च्या प्रोग्रॅम मध्ये फक्त अनुक्रमांकानुसार (कुणाही मतदाराच्या नावानुसार नाही ) ठरावीक अनुक्रमांकावरचे मत कुणाला गेल ते काढण्याची सुविधा अंतर्भूत करावी लागेल. हा काही फार मोठा बदल आहे असा मला वाटत नाही आणि त्यामुळे गुप्त मतदानाची लक्ष्मणरेषा ही ओलांडली जाणार नाही, कारण फक्त जे अनुक्रमांक मतदानाच्या दिवशी नोंदवले गेले त्या अनुक्रमांकांची मतेच मतमोजणीच्या वेळी पडताळली जातील.
Nitin gadkari new cm of
Nitin gadkari new cm of maharashtra! congrat!
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 28 November, 2024 - 16:44>>>>>> तुम्ही काहीपण पुड्या सोडता का ओ?? का हे मविआ स्पेशल आहे
*निवडणूक संपली…बटेंगे तो
*निवडणूक संपली…बटेंगे तो कटेंगेची गोळी संपली…#वक्फ बोर्डाच्या विरोधातला प्रचारही संपला. कालच राज्य शासनाने वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी १० कोटी रुपये निधी जाहीर ही केला.. हिंदू हिंदू म्हणून यांच्या मागे गेलेल्या लोकांचे आता तरी डोळे उघडतील अशी आशा बाळगुया…*
https://marathi.aajtak.in/india/story/mahayuti-government-announced-to-g...
Pankaja munde new cm of
Pankaja munde new cm of mahatashtra. announcement in few hours…..
भाजपचा घराणेशाही विरोध आता कुठे गेला?
बाहुबली जी दम घ्या थोडा..
बाहुबली जी दम घ्या थोडा.. फार कष्ट करून नकात अजून स्थानिक स्वराज्यसंस्था बाकी आहे निवडणुकीत
वक्फला निधी दरवर्षी दिला जातो
वक्फला निधी दरवर्षी दिला जातो. प्रत्येक राज्यात ही तरतूद आहे. नियमानुसार यावर्षीही दिला असणार. उगाच साधी बातमी sensational करून आणि चुकीचा अर्थ निघेल अशी पसरवणे योग्य नाही.
https://mahawakf.com/citizens-charter/
आम्हाला तर सांगत होते वक्फ
आम्हाला तर सांगत होते वक्फ बोर्डचा कायदा रद्द करायचा आहे, नाहीतर वक्फ बोर्ड तुमच्या जमिनी घेईल.:) भाजप सत्तेत आला तर वक्फ रद्द करणार होते म्हणे. आता वक्फ चे बळकटीकरण सूरू आहे.
तुम्ही काहीपण पुड्या सोडता का ओ?? का हे मविआ स्पेशल आहे >>>> खो खो खो. काय विनोद करता हो तुम्ही. स्टेज शो केला तर कपिल शर्मा ला कटोरे घेऊन गावोगावी भीक मागावी लागेल.
Interestingly, the BJP blamed
Interestingly, the BJP blamed EVMs for its unexpected defeat in the 2004 general elections; the Congress did likewise in 2014.
समजा सत्तारूढ पक्षाने
समजा सत्तारूढ पक्षाने प्रत्येक व्होटर आय डी धारकाला दम १०००० रुपये देऊ असे जाहीर केले आणि तरी देखील ते निवडणूक हरले तर मात्र EVM हॅक केली असे मी मानेन.
मी जर राजीखुशीने माझे मत
मी जर राजीखुशीने माझे मत विकले तर ते लोकशाहीचे अत्त्यच्च प्रदर्शन नाही का? मला मत विकायचे स्वातंत्र्य का नसावे?
ही बातमी वाचा. इलेक्शन कमिशन
ही बातमी वाचा. इलेक्शन कमिशन ने कसा मोठा झोल
केला आहे ते कळेल.
https://www.loksatta.com/maharashtra/parakala-prabhakar-doubts-increased...
एकनाथ शिंदेंचा चेहरा असा का
एकनाथ शिंदेंचा चेहरा असा का दिसतोय ? त्यांनी लोकसत्तेचा आजचा अग्रलेख वाचला असेल का?
एकनाथ शिंदे यांस मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पाहणे हे काही भाजपचे उद्दिष्ट कधीच नव्हते. त्यांचा हेतू साफ होता. शिंदेंच्या वहाणेने ठाकरे यांचा विंचू मारणे. आताच्या निवडणुकीत तो मृत नाही; पण मृतवत झाला आहे. तेव्हा शिंदे यांस जवळ घेण्यामागील उद्दिष्ट साध्य झाले. अशा परिस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेच्या लहानशा दिव्यात भाजप तेल घालत बसणार नाही, हे उघड आहे. अमित शहा यांनीच सांगून ठेवलेले आहे. त्यानुसार ‘‘२०२९ साली शत-प्रतिशत’’ आहेच. म्हणजे ना अजित पवार यांची गरज, ना एकनाथ शिंदे यांची. याचा अर्थ अकाली दल, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, बिजू जनता दल, आसाम गण परिषद आणि अन्य काही नामशेष होत जाणाऱ्या पक्षांच्या यादीत आणखी एकाची भर पडणार. पानिपतच्या युद्धात पराभूत होणाऱ्या नेत्यांबाबत ‘आणखी एक मोती गळाला’ असे वर्णन केले गेले. राजकारणाच्या पानिपतात महाराष्ट्रात आणखी एक पक्ष गळाला अशी नोंद भविष्यात होईल.
२०२२ साली वर्षावरून घरी मातोश्रीवर जाताना किंवा आता इतका दारुण पराभव होऊनही उद्धव ठाकरेंचा चेहरा असा झाला नव्हता.
हं. दोन वर्षे रात्री वेश बदलून लपत छपत फिरून काय काय कामगिर्या केल्यानंतर २०२२ साली देवेंद्र फडणवीसांना मारू़न मुटकून उपमुख्यमंत्री व्हायला तयार व्हावं लागलं, तेव्हा त्यांचा चेहरा कसा झाला होता, ते आठवत नाही.
अमरेंद्र बाहुबली, निकाल लागला, प्रचंड बहुमत मिळालं , सहा दिवस झाले तरी सरकार स्थापनेची चिन्हे दिसेनात, मुख्यमंत्री कोण ते ठरेना. त्याने भाजप भक्त, अजित पवार यांच्या "समाजातले" आशाळभूत आधीच थोडे त्रासले आहेत. त्यात तुम्ही वेगवेगळी नावे घेऊन त्यांना डिवचू नका. मी गिरीश महाजनांचं नाव ऐकलं. तुम्ही ऐकलं का?
शिर्डी मतदारसंघीतील एका मतदार
शिर्डी मतदारसंघीतील एका मतदार केंद्रावरच्या मतदारांची यादी

मुंडा थोडा ऑफ बीट है
मुंडा थोडा ऑफ बीट है
पर कुड़ियों दे नाल बहुत स्वीट
ढोंगी सा ये बड़ा धीट है
वायरल हो गया ये ट्वीट है
नच दे ने सारे रंग मिल के आज हिल डुल के
ले सारे के सारे नज़ारे
तुम्ही वेगवेगळी नावे घेऊन
तुम्ही वेगवेगळी नावे घेऊन त्यांना डिवचू नका विशिष्ट लोकांचा बिपी वाढवतोय.
बाकी पंकजा मुंडे होणार आहेत असे त्यांच्या पीए च्या चुलत भावाच्या मावस काकांच्या पुतणीचे सख्खे शेजारी सांगत होते. 
कोर्टाच्या दिरंगाईचा नेहमीच
कोर्टाच्या दिरंगाईचा नेहमीच कुणाला तरी फायदा किंवा तोटा होत असतो.
हे सार्वत्रिक आहे. सर्वव्यापी आहे. ब्रिटीश कालापासून आहे.
Happy <<
म्हणजे सध्याचे फायदेधारक ब्रिटिशांसारखेच आहेत.
कोर्ट स्वतःच्या फायद्यासाठी वापरतायत, 'फोडा आणि राज्य करा' असं वागतायत आणि येन केन प्रकारेण सत्ता राखतायत.. हेच कबूल करायचं होतं कां ?
मुरलीधर मोहोळ? खरे की काय ?
मुरलीधर मोहोळ? खरे की काय ?
सगळेच गमावल्यानंतर येणाऱ्या
सगळेच गमावल्यानंतर येणाऱ्या हताश प्रतिक्रियांमधील उद्वेग हळूहळू बोचरा होऊ लागला आहे.
तो होणारच होता. दोन, तीन दिवस दिलदारपणाचा आव आणणे, आकडेवारी किंवा लिंका डकवणे यात कसेबसे काढले.
जरांगे पाटील यांनी जंग जंग पछाडूनही शेवटी भाजप मोठा पक्ष ठरला. याचे खरे कारण हे आहे की बहुसंख्य नागरिक जातपात बघत नाहीत (सी के पी सोडून - हा स्वानुभव आहे). (बहुसंख्य नागरिकांनी केलेले मतदान पाहून हा प्रतिसाद उडवणे टाळले जावे ही अपेक्षा व्यक्त करतो)
लाडकी बहीण - ज्या बहिणींना हे पैसे मिळाले त्या इतक्या निर्बुद्ध नाहीत की पंधराशे रुपये मिळाले की झाले असे त्यांना वाटेल.-आज घर चालवायला 20000 ते एक लाख यातील काहीही रक्कम आवश्यक असते. बरं, फुकट मिळतायत तर घ्या या भूमिकेतून मते द्यायची तर म वि आ च्या 3000 च्या प्रलोभनाला भुलून दिली असती.
दोन अडीच वर्षे शांतपणे कारभार सुरू आहे, काहीही फार भयंकर घडत नाहीये, विरोधी पक्षातील सुंदोपसुंदी उघड दिसत आहे आणि विरोधी पक्षांची भाषा दिवसेंदिवस तिरस्करणीय होत आहे हे सर्व बघून झालेले मतदान आहे हे!
लोक मूर्ख राहिले नाहीत हे 'ग्रेसफुली' स्वीकारण्याची क्षमता निर्माण करायला हवी.
मुख्यमंत्री कोणीही होवो, पराजित कोण आहे हे ढळढळीत दिसत आहे.
सत्ताधारी पक्ष्यांच्या
सत्ताधारी पक्ष्यांच्या लोकांची भाषा फारच सुसंस्कृत आहे.
Pages