विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओ हो हो. सरांमधला लेखक जागा झाला. कल्पनाशक्तीला वाव मिळाला.

लोक मूर्ख राहिले नाहीत, म्हणजे आधी होते म्हणायचंय ना? सो ग्रेसफुल.

वरच्या फोटोत एकनाथ शिंदेंचा चेहरा सगळं गमावल्यासारखा का दिसतोय?

आपण अलीकडे माझ्या प्रतिसादांना उद्देशून काहीबाही लिहिता असे निरीक्षण आहे. पूर्ण अनुल्लेखाची प्रतिज्ञा लोप पावली याचे वाईट वाटते. ती प्रतिज्ञा, जाहीर न करता, मीच पाळत होतो, पण हाय रे दैवा!

भाजप नेते किंवा एकनाथ शिंदें किंवा महायुतीबद्दल काही लिहिलं तर भाजप समर्थक त्या लिहिणार्‍याबद्दल का लिहीत सुटतात?

त्यामुळे महायुतीबद्दल जे लिहिलंय ते खोटं ठरतं का?

>>> ओ हो हो. सरांमधला लेखक जागा झाला. कल्पनाशक्तीला वाव मिळाला.

लोक मूर्ख राहिले नाहीत, म्हणजे आधी होते म्हणायचंय ना? सो ग्रेसफुल.

=====

हे महायुतीबद्दल आहे असे वाटले नाही प्रथम वाचनात. लिहिणाऱ्याबद्दल आहे असे वाटले. परत वाचून बघतो.

<< त्यांचा हेतू साफ होता. शिंदेंच्या वहाणेने ठाकरे यांचा विंचू मारणे. >>

------- divide and rule चा भाग आहे. शिंदे यांना हे असेच होणार आहे माहित होते आणि त्यांनी ते मनोमन स्विकारले पण असेल. मुरब्बी राजकारणी आहेत असे वरकरणी तरी दिसते. आतून दुखावले जाणे हा मनुष्यस्वभाव आहे.

निवडणूकीतल्या भरघोस यशाचे रहस्य लोकांना समजवितांना संघ कार्यकर्त्यांच्या त्यागाच्या खोट्या कथा रचल्या जात आहेत. म्हणे घरो घरी प्रचार केला. ते काल जिथे होते तिथेच आजही आहेत मग या खोट्या त्यागाच्या कथा कशाला रचायच्या? सरळ EVM आणि पक्षाच्या निवडणूक आयोगाला क्रेडिट द्यायचे. कोश्यारी, ED, CBI, आय टी सेलचा वाटा आहेच.

निवडणूकीचा फार्स कशासाठी सरळ ३० - ४० वर्षे राज्य करु द्या.

<सगळेच गमावल्यानंतर येणाऱ्या हताश प्रतिक्रियांमधील उद्वेग हळूहळू बोचरा होऊ लागला आहे.

तो होणारच होता. दोन, तीन दिवस दिलदारपणाचा आव आणणे, आकडेवारी किंवा लिंका डकवणे यात कसेबसे काढले. >

हे राज ठाकरेंबद्दल लिहिलंय का सर?

सर, माझा उल्लेख कृपया सर असा करू नयेत ही विनंती!

आपला राजकारण, इतिहास, कला, काव्य याबाबतचा जो अभ्यास आहे त्याच्या नखाचीही सर मला नाही व हे मी गंभीरपणे म्हणत आहे. उपरोधीकपणे नव्हे. सर ही उपाधी आपल्याला शोभून दिसते.

मी ते विधान हे काही मायबोलीकर सदस्य यांना उद्देशून केले होते.

आपण ते व्यक्तीगतरीत्या घ्यावेत की नाही ही निवड आपलीच!

चर्चांना पूर्णविराम…अखेर शिक्कामोर्तब! चंद्रकांत पाटील राज्याचे नवे मुख्यमंत्री! अमीत शहा ह्यांचे रात्री उशिराने ट्विट….

ही बातमी वाचा. इलेक्शन कमिशन ने कसा मोठा झोल
केला आहे ते कळेल.
https://www.loksatta.com/maharashtra/parakala-prabhakar-doubts-increased...>>>

Honestly ही निवडणूक पूर्णपणे managed आहे हे आता माहित आहे . आणि न्यायालय , निवडणूक आयोग भाजपच्याच हातात असल्यामुळे आदळआपट करून काही उपयोग नाही . कारण कोणी खरा तपास केला तरी त्याची डाळ न्यायालयातही शिजणार नाही . यावर 'झाले गेले विसरा, तुम्ही हरला आहेत ' असेच सांगून चर्चाही कोणाला नको आहे .
जर हे खरे नसेल, तर करा ना तपास.

दुःख याचेच आहे की यापुढे सर्वच निवडणुकीत हे शस्त्रच वापरले जाईल . उलट भाजपला आता जास्त पैसे लोकांवर खर्च करायचीही गरज नाही . फक्त evm मॅनेज केले कि झाले . हे जास्त सोपे आहे .

<< कारण कोणी खरा तपास केला तरी त्याची डाळ न्यायालयातही शिजणार >>

------ उ प्र बुलंदशहराचे पोलीस अधिकारी सुबोधकुमार सिंग यांची आठवण झाली. त्यांची हत्या करायची होती म्हणून सुनियोजीत दंगल घडविली. दंगलीसाठी निमीत्त हवे होते ते गावांतल्या चौकांत गोमांस "आढळले " या बातमीने दिले. हजारोंचा संतप्त जमाव अगदी "तयारच " होता.

पुढे सातही आरोपींची जामिनीवर मुक्तता होते त्यावेळी त्यांचे स्वागत हार तुरे, आणि भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणेत होते.

<< उलट भाजपला आता जास्त पैसे लोकांवर खर्च करायचीही गरज नाही . फक्त evm मॅनेज केले कि झाले . हे जास्त सोपे आहे . >>
-------- लोकांमधे वाटला जाणारा पैसा कुठे कष्ट करुन कमवलेला आहे - त्यामुळे who cares?
EVM मॅनेज हे शेवटचे ब्रह्मास्त्र आहे. इतरही काही घटक सोबत असायला हवेत असे मॅन्युअल मधे लिहीलेले आहे.

खरे कारण हे आहे की बहुसंख्य नागरिक जातपात बघत नाहीत (सी के पी सोडून - हा स्वानुभव आहे). >>
काही लोकांमुळे तुम्हाला काही कटू अनुभव आले असतील. पण त्यावरून संपूर्ण जातीबद्दल विधान करणं चुकीचं आहे.

भाजपचे धक्कातंत्र! माधव भंडारी राज्याचे नवे मुख्यमंत्री! अमित शहा पत्रकार परिषदेतून लाइव्ह.

लोकसत्ता आणि इंडियन एक्स्प्रेस दोघांची बातमी आहे . शिंदे यांच्या निर्णयाला फडणवीसांची स्थगिती - वक्फ मंडळा च्या निधीचा निर्णय मागे.
बातमीत फडणवीसांचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' असा केला आहे. काळजीवाहू सरकार असे पैसे देऊ शकत नाही - इति मुख्य सचिव.

एकनाथ शिंदेंना डंप करायचंच आहे, पण अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. विशेषतः मुंबई मनपा भाजपसाठी फार महत्त्वाची आहे. तोवर शिंदेंना सहन करतील.

निकाल लागल्यापासून शाम भागवतानी शेअर मार्केट वार ज्ञान देणे थांबवले आहे. कितीचा लॉस झाला? Happy

लोक मूर्ख राहिले नाहीत हे 'ग्रेसफुली' स्वीकारण्याची क्षमता निर्माण करायला हवी.
>>>> मुर्ख म्हणण्यापेक्षा अजाण म्हणेन मी. याला कारण सोशल मिडीआ. आता बातम्या एकाच सोर्सकडून मिळत नाहीत. त्यामुळे लोक स्वतःच बरंवाईट ठरवतात.

मुख्यमंत्री कोणीही होवो, पराजित कोण आहे हे ढळढळीत दिसत आहे.>>> १००+

<याला कारण सोशल मिडीआ. आता बातम्या एकाच सोर्सकडून मिळत नाहीत. त्यामुळे लोक स्वतःच बरंवाईट ठरवतात.> म्हणूनच वक्फ बोर्डाने सिद्धिविनायक मंदिराच्या जागेवर हक्क सांगितला, संसदेची जमीन तर त्यांचीच आहे, असे मेसेजेस लोक पाठवत राहतात का?

<मुख्यमंत्री कोणीही होवो, पराजित कोण आहे हे ढळढळीत दिसत आहे.>

निवडणूक यासाठी असते का? मग २०१९ साली काय बिनसलं? तेव्हा आघाडी पराभूत झाली होती. पण युतीचं गाडं मुख्यमंत्री आमचाच हवा वर अडलं ना?
आता शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाबाबत नाईलाज आहे. पण आपले सरदार सांभाळायचे तर त्यांना सत्तेची ऊब मिळायला हवी , ते कसं जमवायचं याची विवंचना असेल.
उद्या भाजपने डंप केलं तर अजित पवार दोन्ही राकॉ एकत्र आणतील. (शरद पवारांची राकॉ संपली नसेल तर - मतांची टक्केवारी दोघांची सारखीच आहे) एकदा जाऊन परतलेले आहेतच. शिंदेंना ठाकरे घेतील का?

<< शिंदेंना ठाकरे घेतील का? >>

------ कायमचे शत्रू म्हणून नको वागवायला , जर ते आले तर घ्यायचे सामावून. राणे सोडून, जे जे येतील त्यांच्यासाठी दरवाजे उघडे ठेवायचे. राणे यांनी अगदीच खालच्या पातळीवर टिका केली आहे. अर्थात तोच त्यांचा नेमून दिलेला रोल आहे.

संविधानाचे लाल आणि निळे असे क्लिष्ट प्रकार लोकांना समजावून सांगणारे आणि महाराष्ट्राचे महत्वाचे प्रकल्प गुजरातकडे पाठविणारे फडणवीस पुन्हा येणार आहेत का?

निकाल लागल्यापासून शाम भागवतानी शेअर मार्केट वार ज्ञान देणे थांबवले आहे. कितीचा लॉस झाला? >>

माझ्या नुकसानीत तुम्हाला आनंद वाटत असेल तर मी नुकसानीत आहे असंच समजा. Wink

जाणकारांना त्यावेळचा निफ्टी व सेन्सेक्स कुठे होता ते माहीती आहे.
Happy

मी सध्या २० तारखेपूर्वीची मविआची वक्तव्ये ऐकतोय. तुम्ही मुमं ची नावे जाहीर करण्याचे चांगले काम करत आहात. ते चालू ठेवा.
Wink

>>> माझ्या नुकसानीत तुम्हाला आनंद वाटत असेल तर मी नुकसानीत आहे असंच समजा.

>>> तुम्ही मुमं ची नावे जाहीर करण्याचे चांगले काम करत आहात. ते चालू ठेवा.

Lol

उद्या भाजपने डंप केलं तर अजित पवार दोन्ही राकॉ एकत्र आणतील. (शरद पवारांची राकॉ संपली नसेल तर - मतांची टक्केवारी दोघांची सारखीच आहे) एकदा जाऊन परतलेले आहेतच. शिंदेंना ठाकरे घेतील का?

ज्यांना चायना+ ची संकल्पना कळली असेल त्यांनाच शिवसेना + ची संकल्पना कळू शकेल. Wink

२०१४ ला शप चा पाठिंबा घेऊन शिवसेनेच्या मोठ्या भाऊची कल्पनेला कात्री लावली होती. ती शप ची कल्पना खूपच मोठ्या प्रमाणांत सुधारून वापरलीय हे ज्याला कळेल त्यालाच फडणवीस, मोदी व शहा कळू शकतील.

चला आता मात्र थांबतो. नविन मुद्दे फारसे मिळेनासे झाले आहेत. Happy

न्यायाधीशांनी नावडत्या वकिलाला सवाल विचारावेत तश्या मानसिकतेत येथे काहीजण जाब वगैरे विचारतात. हेच काम फिल्ड वर केले तर हव्या त्या पक्षाला चार जास्त मते तरी पडतील

<< निकाल लागल्यापासून शाम भागवतानी शेअर मार्केट वार ज्ञान देणे थांबवले आहे. >>

------ बारिक निरीक्षण. Happy

देशभक्त लोकांनी अडाणी यांच्या कंपनी मधे गुंतविलेले पैसे आताच काढू नये. आता जरी ते थोडे अडचणीत असतील तरी शेअर्स विकू नका. पुढे फायदा होणार आहे. नव्हे सुरवातही झाली. नुकसान झाल्यास देशभक्ती खात्यावर नोंदवावे.

छे छे, हे तुम्हालाच उद्देशून होते. जे उद्देशून नव्हते त्यावरही जाब विचारलात तेव्हा तश्या अर्थाचे पण अधिक चांगल्या शैलीत लिहिले होते. हे तुम्हालाच उद्देशून होते.

तुम्ही या पामराशी संवाद न साधण्याची प्रतिज्ञा कधी व का मोडलीत पण? त्यामुळे उगीचच मलाही जाहीर न केलेली प्रतिज्ञा मोडावी लागते.

देशभक्त लोकांनी अडाणी यांच्या कंपनी मधे गुंतविलेले पैसे आताच काढू नये. आता जरी ते थोडे अडचणीत असतील तरी शेअर्स विकू नका. पुढे फायदा होणार आहे. नव्हे सुरवातही झाली. नुकसान झाल्यास देशभक्ती खात्यावर नोंदवावे.
>>

मी अडाणींच्या शेअरमध्ये जास्तीचे घातलेले पैसे फायद्यात आल्यावर काढून घेतले. जुनं भांडवल मोकळं करून घेण्याची माझी ती पध्ददत आहे.
त्यामुळे जुने शेअर्स तसेच ठेवले आहेत. त्यातलं भांडवल केंव्हाच मोकळं झालेलं असलं तरीपण तुमच्या सूचनेमुळे खूपच आधार मिळालाय. Wink
देशभक्तीपर खात्यावर काहीच नोंदवता येणार नसल्याने तुमच्या दु:खात मी सहभागी आहे. Happy

Pages