विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मानव - निवडणूकीच्या काही दिवस आधी नोटा वाटप कार्यक्रम चित्रीत झाल्यावर त्यावेळी गृहमंत्री असणार्‍या फडणवीसांनी तत्काळ क्लिन चिट दिली होती त्या घटनेची आठवण झाली.

मागच्या पानावर आरतीच्या ताटासमोरचा चेहेरा धमकाविण्यासाठीच आले आहेत का असे वाटण्याएव्हढा गंभिर आहे... वातावरण भक्तीचे दिसण्यापेक्षा तणावग्रस्त दिसत आहे.

तुकडोजी महाराजांचे बोल चपखल बसतात, " मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव.... " Happy

त्यावेळी गृहमंत्री असणार्‍या फडणवीसांनी तत्काळ क्लिन चिट दिली होती त्या घटनेची आठवण झाली.>>> त्यांच्या आजवरच्या साडेसात वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला तर ते क्लिन चिट स्पेशालिस्ट आहेत हे शेंबड पोरसुद्धा सांगेल आणि याचा प्रतिवाद भौ चे भोचक भौ भौ समर्थक व्हॉटअबाऊटरी केल्याशिवाय करुच शकत नाहीत. Rofl

अजित दादाचा काटा काढतायत>>> काटा काढण्यापेक्षा इन चेक ठेवतायत....म्हणजे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर आणि उपद्रव मूल्य आटोक्यात ठेवायला अजित पवार आणि अजित पवारांना कंट्रोल मधे ठेवायला सुरेश धस....धसांचे गियर, ब्रेक, ॲक्सिलेटर सर्व फडणविसांकडे. तपासकार्याचे सर्व कंट्रोल्स फडणवीसांकडे. जबरदस्त खेळी.

फडणवीस.३ सरकारच्या कामकाजाचे कौतुक करण्यासाठी धागा काढणे राहून जाते आहे. निकाल लागल्यापासून जवळपास तीन महिन्यांत बर्‍याच घडामोडी झाल्यात.

शिंदेसेने बद्दलही एक वेगळा धागा बनता है. यथावकाश काढू.
तूर्तास ही गंमत

ते तानाजी सावंत सर्वात श्रीमंत आमदारांपैकी आहेत. ६८ लाख म्हणजे किस झाडकी पत्ती!
बिचार्‍या मुलाच्या मौजेवर पाणी फिरले. रुद्राभिषेकही कामी आला नाही.

हे सगळे महाराष्ट्रात तेही मुंबई सारख्या मोठ्या शहरात घडू शकते ह्यावर विश्वास बसत नाही. एकेकाळी काय दबदबा होता मुंबई पोलिसांचा. गेले ते दिवस.

" अपना घर हो, अपना आंगन हो,
इस ख्वाब में हर कोई जीता है। इंसानके दिल की ये चाहत है,
कि एक घर का सपना कभी न छूटे " - कवि प्रदिप

प्रदिप यांचे काव्य आठवण्याचे कारण नागपूर " दंगलखोरां " विरुद्ध बुलडोझर वापरण्याची धमकी फडणविसांनी दिली आहे.

https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/where-a-bulldozer-is-n...

अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत असं शिकवलं गेलं होत. ह्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत हे बघणं लोकशाही सरकारचे मुख्य काम आहे.

सध्या निवडून आलेल्या सरकारांची स्पर्धा लागलीय कोण किती निवारे उध्वस्त करतोय. सध्या ढोंगी योगी पुढे आहेत, फडणवीस नंबर दोन वर.

दंगलखोरांची घरे पाडण्याबद्दल उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आता महाराष्ट्रातील (नागपूर) घटनेनंतर पडलेला प्रश्न - जर घर दंगलखोराच्या आई-वडील, बहीण- भाऊ, पत्नीच्या नावे असेल आणि त्यात जर काहीच अनधिकृत बांधकाम (?) नसेल तर, संबंधित यंत्रणा ते घर पाडू शकते का? जर दंगलखोर भाडेकरू म्हणून राहत असेल तर काय करतात? फुकट घर मालकाला भुर्दंड का? आणि जर दंगलखोर इमारतीत राहत असेल तर का इतर घर मालकांना त्याचा त्रास. १५ दिवस आधी नोटीस देऊन नंतर कार्यवाही करायची असे कोर्टाचे आदेश असताना, नियम धाब्यावर बसवून हे पाडकाम केले जाते. हे घटनेच्या कुठल्या कलमाप्रमाणे योग्य ठरते.

मुळात कोणी गुन्हा/अपराध केला (जो सिद्ध व्हायचा अहे) ,तरच समजतं का की हे घर अनधिकृत आहे ?? नाहीतर सरकार आणि तर यंत्रणाना काही प्रोब्लेम नसतो

एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर त्याला कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी पण आरोपीच्या समस्त कुटुंबाला त्यांचे रहाते घर पाडून रस्त्यावर आणणे अन्यायकारक आहे. आरोप सिद्ध झालेला नसतांना असे करणे अजूनच अन्यायकारक आहे. एखाद्या गुन्ह्यातल्या आरोपीचे पक्के घर पाडण्याचा "न्याय " सर्वांसाठी सारखा नसतो हे मोठे दुखणे आहे. आपल्याच नागरिकांवर असा घोर अन्याय सत्तेवर असणार्‍या सरकारने करायला नको. Sad

काळी टोपी परिधान केलेला कोश्यारी जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल आणि मराठी लोकांबद्दल खोटी विधाने करत होता तेव्हा फडणवीसांचे तोंड बंद होते. ३०० वर्षांपुर्वीच्या कबरीचा मुद्दा उकरुन नागपूरांत नियोजन पुर्वक दंगल भडकविण्यात आली. औरंगजेबवर स्तुती वक्तव्य कुणाच्या सांगण्यावरुन झाली? बोलविता धनी कोण आहे? निषेध सभेसाठी गृहमंत्रालयाची परवानगी घेतली होती ? किती लोकांसाठी परवानगी मिळाली होती? नागपूर दंगल संदर्भात हे प्रश्न विचारायला हवेत.

कायदा सर्वांसाठी सारखाच असायला हवा.

नाव न घेता टिका केल्यावर कामराबद्दल मोठा संताप व्यक्त झाल्याचे वरकरणी दिसते. हे सर्व आपल्यासाठीच केले जात आहे असा शिंदे यांचा समज झाला असल्यास आष्चर्य वाटायला नको. टिका बोचरी होती आणि फार खोलवर लागली. पण कुणाला?

परभणी येथे पोलिस कोठडीत एका निरपराधी व्यक्तीचा मारहाणी मुळे मृत्यू आणि मसाजोगच्या सरपंच हत्या या दोन्ही घटनांच्या चौकशी निवृत्त न्यायाधीशां मार्फत होत आहे. चौकशी अहवाल काय आणि कधी येणार आहे?

https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/state-appoints-retired...

राज्यातील कायदा आणि सुव्यावस्था संभाळायची जबाबदारी गृहमंत्री फडणवीस यांची आहे. आता रात्री- अपरात्री शिंदे यांना भेटण्यासाठी जावे लागत नाही. गुवाहटी मार्गे शिंदे आले, (चक्की पिसायला पाठविण्यात येणारे) अजित पवार आले, चव्हाण जोडले त्या आधी राणे आणले... आता धंगेकर जोडून शिरपेचात मानाचा अजून एक तुरा रोवला गेला पण हे सर्व करतांना राज्याची कायदा आणि सुव्यावस्था रसातळाला चालली आहे.

तर छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

संजय राउतांबद्दल रोखठोक प्रश्न विचारणार्‍यांना या रील्स नक्की आवडतील.
https://www.facebook.com/reel/4060762490831540
https://www.facebook.com/share/r/16PbnwyAmY/

During September and October this year (२०२३) , the ED informed the court that it couldn't locate its own petition against the Bhujbals. On November 29, Advocate Harsh Dedhia, representing the ED, requested permission to withdraw the petitions. Justice RN Laddha granted permission, and the court "dismissed [the] petition as withdrawn."
https://www.indiatoday.in/law/story/probe-agency-ed-withdraws-plea-again...

अंजली दमानिया ह्यांचे भाष्य एकदम रोकठोक होते.
एक गेले आणि दुसरे आले.
आल India बहेनजी ह्यावर भाष्य करतील काय?

Pages