पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकिता मझ्या महितिप्रमाणे गो़कुळच दुध चांगल. आणि गाइच दुध वपरण उत्तम. ते पचायला हलक पड्त मुलांना.

निकिता मी तुप करायला अमुल गोल्ड वापरते. अमुल गोल्डचं तुप खूप छान होतं. आणि मुलीला प्यायला द्यायला गायीचं दूध- महानंद (तिला महानंदची चव आवडली नाही. तिनी पिणं बंद केलं होतं) किंवा अमुल गायीचं दूध.

लोणी तुप करायला वारणाचे म्हशीचे दुध पण बेस्ट.. गायीच्या विकतच्या दुधापासुन अजीबात तुप निघणार नाही.

माझ्या मुलीला फक्त म्हशीचेच दुध चालते. गायीचे दुध पाण्यासारखे पातळ म्हणुन अजिबात पित नाही. ती लहान होती तेव्हा माझ्याकडे दिवाळीला कधीच तुप विकत आणायची वेळ आली नाही. रोज एक लिटर दुध घ्यायचे आणि दर चार दिवसांनी तुप कढवायचे.

वारणा दुध तापवुन थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवायचे. मस्त जाड साय येते. तिचे दही लावुन मग लोणी, ताकाची कढी, तुप...... काय हवे ते...

गोकुळ आणि वारणा सेम आहे. नव्या मुंबईत वारणा मिळते, मुंबईत गोकुळ...

admin चुकिच्या ठिकाणी असेल तर योग्य ठिकाणी हलवा.

<<< निकिता, काहीच्या काही .... अ‍ॅडमिन कसे चुकीच्या ठिकाणी असतील ? Lol

हो तुप गाईचेच चांगले असते... पण ते घरी नाही बनत.. डेअरीमध्ये मिळते ते चांगले असते. मी डब्ब्यामधले वापरुन बघितले नाही.

मी करते ईथे बेगलोर मध्ये गाईच्या दुधाचे तुप.पारपरिक पद्ध्तीने.फक्त म्हशीच्या दुधात फयाट जास्त असल्याने
जास्त तुप निघते म्हशीच्या दुधाचे तुलनेने.

मी वारणा गाईचे दुघ आणते हल्ली. पाण्यासारखे पातळ आणि तापवल्यावर जेमतेम साय निघते.... Sad पण मला चालते. मी लो फॅट म्हणुन पिते. आपल्याकडे ते १%, २% कुठुन मिळायला....

तिनेक वर्षांपुर्वी दिनेशनी द्राक्षाच्या भाजीची कृती टाकली होती माबोवर. मी खुप शोधली पण सापडेना. कोणाला लिंक माहित असेल तर द्याल का??

इथूनच लिन्क दिल्याप्रमाणे जिरा सुरती बटर कसे करायाचे ते कळले , पण भारतात आपल्याकडे जे कड्क बटर बेकरीत मिळतात , ते कसे करायचे ? कोणी जाणकार सान्गणार का?

मला ३१ ला ६० गुलाबजार करायचे आहेत. गिट्स च पॅकेट घेउ की चितळेच आणि कीती पॅकेट्स लागतील ? पाकाचा अंदाज पण हवा आहे.

चितळेचे २ पॅकेटस (जर खूप छोटे साईज चालणार असतील तर एक पाकीट पुरेल.). गिटस बिलकुल घेऊ नका जागु.
पाकाचा अंदाज पॅकेटवरच लिहीला असतो. त्या सूचना तंतोतंत पाळायच्या.

गिटस बिलकुल घेऊ नका जागु.

हो का? मी नेहमी गिट्स चेच आणते. पण कधीकधी ते तळल्यावर बसतात. पण माझी आई नेहमी करते गिट्सचे ते अगदी मस्त होतात.

जुन्या माबोवर दिल्याप्रमाणे आज सकाळी कोथिंबीर वड्या केल्या. मस्त खुसखुशित झाल्या. मी कच्चे पिठ भिजवुन वळकटी करुन उकडायचे तेव्हा जरा कडक व्हायच्या, पण ह्या शिजवुन घेऊन मग थापुन वड्या पाडुन तळल्या त्या अगदी मस्तच झाल्या. मलाही एक छोटा तुकडा खाण्याचा मोह आवरला नाही Happy

मला कोणी "मटार कचोर्‍या" ची कृती सांगाल का pls?
खरतर मला हिरव्या मटाराचे सारण भरुन काहीतरी बनवायचय.. तत्सम काही पदार्थ माहीत असल्यास लिहावा..

प्रादी.. फक्त तांदुळ पिठी वापरली नाही कारण ती नव्हती.. पण तरीही अतिशय छान झाल्या...

कुणाला ग्लुकोज बिस्किटान्पासून चॉकोलेट केक ची रेसिपी माहीती आहे का?

गावच्या उकड्या तांदळाची पेज, भात याव्यतिरिक्त आणखी काही करता येईल का?
घावणे, ईडली, डोसे होऊ शकतील का?

घावणे होतील का डाऊटफुल..... पण इडल्या/डोसे मात्र नक्कीच होतील. इडली रवा मिळतो तो मला वाटते उकड्या तांदळाचाच असतो.

Pages