पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मझ्या बाबांची हल्लीच बायपास झाली. आजुन त्यांना म्हणावी तशी भूक लागत नाही. कुणाला भुक वाढ्तील अश्या पाकक्रूती माहीत आहेत का?

मामी इथे चिकन हॉट डॉग मिळतात ते पेपर नॅपकिन मधे ठेऊन मावे करायचे असतात. एकदम खूप करायचे असतील तर स्टीम करतात. आम्ही शाळेच्या कन्सेशन स्टॉलसाठी ते गोल फिरणार मशीन वापरतो. बन्स मधे हॉटडॉग घालायचा वर मस्टर्ड, केचप, रेलिश. ते पिकल्स म्हणजे ब्राइनमधल्या काकड्या. हॉटडॉग फक्त बीफचा असतो किंवा पोर्क्,बीफ वगैरे मिक्स पण असतो. एकंदरीत हा पदार्थ आरोग्याला घातक पण हाफ टाईमला दणकून खपतो.

त्या मस्टर्डचे काय करायचे? लेट्युस घालायचे का? <<< मस्टर्ड चे लेट्युस घालता येत नाही Happy

रस्त्यावर मिळणारा हॉडॉ पोर्क चा असतो असा माझा समज आहे.
पिकल्स = व्हिनेगर मध्ये बुडवलेले / मुरवलेले घटक पदार्थ, जसे की मिरची, घेरकीन, बीट, कांदा, जालापिनो इत्यादी.

निकिता, डॉक्टरनी काय पथ्य सांगितले आहे ? जेवणापूर्वी दहा मिनिटे आल्याचा एक तूकडा मीठ लावून चघळल्यास भूक चांगली लागते. आल्याचा रस त्यात तेवढाच लिंबाचा रस मिसळून, त्यात चवीपूरती साखर आणि मीठ घालून ठेवायचे. हे मिश्रण, पाणी घातले नसेल तर व्यवस्थित टिकते. या मिश्रणाचा एक चहाचा चमचा घेतला, तर भूक नीट लागते. (हे मिश्रण बाजारात तयार मिळते )
जोपर्यंत गोळ्या चालू आहेत, तोपर्यंत भूक कमीच लागते. हळूहळु वाढेल, अँटीबायोटिक्स चालू आहेत का ? तो कोर्स संपला कि, ताक (त्यात चवीला हिंग व मीठ ) पिणे चांगले. पण एकंदर मिताहारच चांगला.

त्या मस्टर्डचे काय करायचे? लेट्युस घालायचे का? <<< मस्टर्ड चे लेट्युस घालता येत नाही >> मिल्या, अरे ते दोन वेगळे प्रशन आहेत बाबा. हॉट डॉग मध्ये खाली घालायचे का लेट्यूस? का ते फक्त बर्गर मध्ये घालतात?

माझी काय आयडिया होती सान्गु का, लांबडे बन्स व सॉसेजेस आणायचे. बन्स अर्धे कापुन अमुल बटर लावून तव्यावर भाजुन घ्यायचे. सॉसेज मावेकरून मग तव्यावर हलके पर्तून त्या बन मध्ये ठेवायचे. वरून स्मूथ मस्टर्ड, मायो व केचप झिग झॅग डिझाइन करून घालायचे(चित्रातल्या परमाने. ) आमचा टार्गेट ऑ. भाजी खात नाही. सब सॅ.वि मधील भाज्या पण फेकून देतो म्हण्जे तो खर्च वाचलाच. मग टिश्युमध्ये बांधून सर्व करायचे. ( हे मला खेडेगावातील न्हावी फोटो बघून शारुख अमिताभ सारखे केस कापून देतो तसे वाटते आहे. ह्या ह्या. ) तरी बरे पिकल्स म्हणून आंब्याचे लोणचे आणले नाही विकत.

आभारी आहे दिनेशदा.
पथ्य सध्या काहीच नाही. मिताहार चांगला. पण ताकद वाढायला काहीतरी खाल्ल पाहीजे आणि जे खातील ते मनापासुन खाल्ल तर अंगाला लागेल.

अश्या फास्ट रिकव्हरीसाठी कोहळा फार उत्तम. कोहळ्यापासून केलेले कुष्मांड्पाक नावाचे औषध मिळते. कोहळ्याची खीर, मटकी घालून केलेली भाजी, सार करता येते. सध्या बाजारात कोनफळ मिळत असेल, तेही उत्तम. त्याचे काप, भजी, भाजी व खीर करता येते. थंडी असल्याने, मेथीचे लाडू, खीर, तिळाचे लाडू, उडदाचे लाडू (पचनशक्ती वर ताण पडणार नसेल तर ) करता येतील.
रोज नवा पदार्थ, पण घरच्या घरी केलेला, तणाव नसलेले वातावरण, छंद जोपासना, असे घटक नक्कीच मदत करतात. त्याना आवडत असलेला पदार्थ, जास्त आरोग्यपूर्ण रितीने करता येईल.

अश्विनीमामी
इथे मुलांच्या पार्टीसाठी हॉट डॉग असले तर असे करतात

लांबडे बन्स, एका बोलमधे थोडं पाणी घालून त्यात ठेवून एक दीड मिनिट मावे केलेले हॉट डॉग्स ( इथे चिकनचे, चिकन-टर्की-पोर्क चे, पूर्ण बीफचे, किंवा चक्क व्हेगन हॉटडॉग पण मिळतात ) , केचप, मस्टर्ड व रेलिश यांच्या स्क्वीझ बाटल्या. बन्स मधून चिरलेले असतात. त्यात एक एक हॉट डॉग ठेवायचा, वर ज्याला पाहिजे तसं मस्टर्ड, रेलिश व केचप घालून द्यायचं. मी तरी सोबत पिकल्स कधी पाहिले नाहीत.

कधी कधी चिली डॉग्स (chili dog) म्हणजे हॉटडॉग वर चिली नामक बीफ खिमा सदृश्य प्रकार घालून खातात.

ग्रिल केलेल हॉट डॉग असतील तर काही लोकं सावरक्राउट ( sauerkraut) पण घालतात.

..

मला काही करायला सोपे, पण तरीही पौश्टीक असे मेनू सांगू शकाल का प्लीज?जसे मिश्र पिठाची चपाती, साग चना, दही कोशिंबीर अशा मेनूमधे जवळपास सगळे हवे ते आहारघटक मिळतात्...असे अजून काय करता येइल?

कोहळ्याची खीर नेहमीप्रमाणेच. म्हणजे त्याच्या बारिक फोडी वा किस तूपावर परतून शिजवून घ्यायचा. मग दूध घालायचे, उकळायचे व साखर घालायची. कोहळा मात्र नेहमी जून बघून घ्यायचा. मॅश करुन बाळाला अवश्य देता येईल.

एक बाळबोध प्रश्न

चिकन लॉलीपॉप करताना कच्चेच पिठात घोळून तळतात .... पण पुर्ण शिगतात का असे Uhoh

सायीचे दही लावुन लोणी करताना लोण्याचा गोळा तयार होत नाही. साय घुसळल्यावर लोणी वर तरंगते पण सगळ एकजीव होऊन लोण्याचा गोळा तयार होत नाही. गरम पाणी टाकायचे असते का घुसळताना?
काय चुकतेय नक्की ?

प्र्र - अग त्याला थंड पाण्याचा हबका मार गरम पाण्याने लोणी पातळ होइल.

बहेर थठेवलेस तर ४-५ दिवसान्पेक्षा जास्त नाही राहणार चान्गले.वास येतो खवट ,फ्रिज मधे ठेव.

धन्स!

मला कोणी Micowave oven किंवा baking oven मध्ये बटाटेवडे कसे बनवायचे सांगु शकेल का ?

जुई, हो. Happy छोटे तुकडे असतील तर, आणि चिकन तसे लवकर शिजते.

>>मला कोणी Micowave oven किंवा baking oven मध्ये बटाटेवडे कसे बनवायचे सांगु शकेल का ?
कशाला ते? नको. Sad तळलेलेच चांगले. Happy
मिनोतीची एक कमी तेलातली आप्पेपात्रात करायची रेसिपी आहे.

कोहळा घेताना तो आकाराने मोठा असावा. मोठा म्हणजे आठ इंच व्यास वगैरे. बिया पिवळसर रंगाच्या व कडक असाव्यात. कापून तूकडा घेतला तर हे कळतेच. जून कोहळाच औषधी असतो. साखरेचा त्रास नसेल तर पेठा खावा. (नागपूरमधे एकदा संत्रा बर्फी घेतली होती. अगदी संत्र्यासारखी लागत होती चवीला, पण ती कोहळ्यापासून केली होती. )

अनू, कर्टूल्याची भाजी अगदी सोपी. इथे असणारच कृति. बारीक काप करुन तेलात हिंग हळदीच्या फोडणीवर परतायचे. चवीप्रमाणे तिखट मीठ घालायचे. हि भाजी कमी होते, म्हणुन भिजवलेली चणा डाळ घालतात. ओले खोबरेही घालतात.

Pages