पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कोणी तिळाच्या वड्यांची चिक्कीचा गुळ न घालता करता येणारी पाककृती सांगु शकेल का? मला अगदी कडक वड्या नको आहेत.
धन्यवाद!

मंजुडी, अग मऊ तिळाच्या वड्यांसाठी:

१. तीळ आणि दाणे भाजून घे आणि मिक्सरमध्ये फिरवून घे.
२. किसणीने गूळ किसून घे.
३. खलबत्यात गूळ आणि तीळकूट आणि दाण्याचा कूट घालून एकजीव करून घे नाहितर मिक्सरमध्ये. हँड चॉपरपण ह्यासाठी चांगला पडतो.
४. बाहेर ताटात काढून त्यात वेलचीपूड घाल.
५. तुपाचा हात लावून लाडू वळ नाहीतर थापून वड्या पाड.

म्हनजे जरा दाण्याचा लाडवासारखच.

मऊ वड्या करताना गूळ गरम करायची जरुरत नसते. मला असे लाडू मनापासून आवडतात.

वड्या मऊ होण्यासाठी गुळात थोडसं पाणी घाला उकळवताना - छान खुटखुटीत होतात वड्या - आणि मऊही.

सशल, तू रेसिपी 'सार्वजनिक' कर नाहीतर 'आहारशास्त्र, पाककृती' ग्रूपच्या मेंबर्सनाच दिसेल ती फक्त. इथे कशाला पुन्हा पेस्ट केली? मीरा, तुम्ही त्या ग्रूपच्या मेंबर व्हा.

धन्यवाद सशल. छान - मी या वीकएन्ड लाच करुन बघीन. शर्मिला मी आहारशास्त्र ची मेम्बर आहे तरि तो नोड नाही बघु शकले.

मीरा तुमची काहीतरी समजण्यात गडबड होतेय. तुमचे नाव आहारशास्त आणि पाककृती या ग्रूपच्या सदस्यांच्या यादीत नाही सापडले. तुम्ही एकदा http://www.maayboli.com/node/2548 इथे जा आणि उजव्या बाजुला असलेल्या. सामील व्हा वर टिचकी मारा.

काही रेसिपीज, धागे तुम्हाला दिसत असतील. पण ते सार्वजनिक आहेत म्हणून दिसतात. ग्रुपपुरते मर्यादित असतील तर दिसणार नाहीत.

सायलीमी,
आले चिंच चटणी माहितेय. आलम पच्चाडी म्हणतात. ती मस्त लाग्ते खिचडीबरोबर लोणच्यासारखी.

मी एका मैत्रिणी कडे खाल्ली होती. तिला तिच्या कोणीतरी मैत्रीणीने दिली होती. आलं चिंच चट्णी असावी पण त्यात लसूण पण होता.

आता आठवलं, चिंच, गुळ , आलं वाटून घेऊन फोडणी करुन त्यात लसूण परतून घेतला होता आणी मग त्यात वाटण घातलं...अस काहीतरी..नक्की माहित नाही.
पण लसूण नक्कीच मिक्सी मधे घातला नव्हता. आणि डाळ पण नव्हती.
तरी आता करून बघते.

अग सायलीमी , अग ते लोणचं असते. हिच रेसीपी जी मी लिहिली. लसूण तेलात नाही घालत मग वाटताना घालतात जर तो वास आवडत असेल तर. पण मला ते चटणी वाटली. केला बदल मी रेसीपीत. बघ आता तू.

http://www.maayboli.com/node/13205

वड्या मऊ होण्यासाठी गुळात थोडसं पाणी घाला उकळवताना

आर्च ने दिलेल्या रेसिपीत तिने काय कधी उकळले?? सरळ सगळे मिक्स करुन ताटात थापलेय. (आता स्वतः केल्याशिवाय ते ताटात थापलेले एकत्र चिकटुन कसे राहिले ते मला कळणार नाही..)

मैत्रिणींनो, टोफुबद्दल धन्यवाद.. मी मुद्दाम टोफु म्हणुन शोधले नाही, म्हणुन कदाचित आतापर्यंत दिसले नसणार.

काही महिन्यापुर्वी इथे सोया मिल्क कसे बनवायचे ते लिहिले होते (मला वाटते मनुने). आता ते शोधायला ७३ पाने उलटत बसायचे म्हणजे दिव्य आहे.. कोणीतरी पाकॄ. म्हणुन नविन पानावर टाकेल काय??

काळ्या वाटाण्याची उसळ कशी करतात? - मालवणी पध्दत हवी होती.
कुणाला माहित असेल तर प्लीज सांगणार का?

सखि काळ्या वाटाण्याच्या उसळीत कांदा खोबर्‍याचे भाजुन वाटण चांगले लागते.
अमिता नवलकोलची भाजी डाळ घालुन करता येते. तसेच नवलकोल मिस्क भाजी म्हणजे वांग-बटाटा, वाल अश्या भाज्यांमध्ये चांगला लागतो. कोलंबितही नवलकोल छान लागतो. आमटीत घालता येतो.

अमिता, नवलकोलची एक भाजी इथे पण आहे - http://www.maayboli.com/node/7501
इथे भावनाने लिहिलेली रेसिपी आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/92985.html?1180765161 ती अप्रतीम होते Happy

इथे एक काळ्या वाटाण्याची उसळ आहे ती मूळ रेसिपी काळ्या वाटाण्याचीच आहे - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/09/black-chana-usal.html

Pages