Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोषवी, http://www.maayboli.co
तोषवी,
http://www.maayboli.com/node/10726
हे वाचुन बघ काही प्रयोग करता आले तर..... चांगला झाला तर इथे आम्हालाही कळव...
हालीमची पेज कशी करतात. लहान
हालीमची पेज कशी करतात. लहान मुलांना दिली तर चालेल का?
मलापण उत्तर द्या ना प्लिज....
कुणाला अननसाच्या भाताची कृती
कुणाला अननसाच्या भाताची कृती माहिती आहे का.. असेल तर इथे लिहा. जर थाई प्रकारचा अननसाच्या भाताची कृती माहिती असेल तर तीही लिहा.
उकड्या तांदूळाचे घावन होतील
उकड्या तांदूळाचे घावन होतील की.. जुन्या मायबोलीत पाच वाट्या तांदूळाला प्रत्येकी एक वाटी मूगडाळ, तूरडाळ, चणाडाळ, मसूरडाळ, उडीद डाळ आणि मेथ्या असं प्रमाण दिलं आहे. त्याचे खुप सुंदर घावन होतात.
घावणे करायला आमच्याकडे फक्त
घावणे करायला आमच्याकडे फक्त तांदळाचेच पिठ वापरतात.
बाकी जिन्नस घालुन पिठ करुन जे काही बनते त्याला पोळ्या म्हणतात (मालवणीत पोळयो)
जुयी हालीम म्हणजे अळीव
जुयी
हालीम म्हणजे अळीव म्हणायचंय का ? भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतात हलीम नावाचा बीफ/ मटण अन बर्याच डाळी, बार्ली , गहू इत्यादी घालून शिजवलेला प्रकार असतो. अमेरिकेतल्या देसी ग्रोसरी मधे हलीम मिक्स नावाने डाळी, गहू, बार्ली व मसाला असलेली पाकीटं मिळतात. त्याची बहुतेक खीर होणार नाही.
अळिव असतील तर १-२ तास पाण्यात भिजवून दुधात शिजवून साखर घालून खीर करता येईल. अळीवाचे लाडू वा खीर हे बाळंतीणिला द्यायचे प्रकार आहेत . लहान मुलांना दिलेले मी तरी कधी ऐकले नाहीत.
मला कोणी तिळाच्या वड्या
मला कोणी तिळाच्या वड्या मायक्रोवेव्ह मधे करण्याची रेसिपी प्रमाणासहित देऊ शकेल का ?
गौरी.
धन्यवाद मेधा ... हालीम म्हणजे
धन्यवाद मेधा ...
हालीम म्हणजे अळीवच असतील. बाळंतपणात मी ती खीर खाल्लेली. माझ्या मावशीने मला दिलेली. मस्त दाणे तुपात खमंग परतून नारळाचे दूध आणी गूळ सोबत चवीला वेलची घातलेली.
तीळासारखे त्याचे दाणे असतात आणि खीर तोंडात घेतल्यावर चघळता येत नाही , बुळबुळीत लागते सरळ गिळावी लागते. छान लागते.
पौष्टीक असते म्हणून विचारले लहान मुलांना दिली तर चालेले का ?
बार्ली म्हणजे काय ? म्हणजे गव्हाचा प्रकार आहे का ?
धन्यवाद साधना!
धन्यवाद साधना!
स्ट्फ्ड टॊमेटो कसे करतात?
स्ट्फ्ड टॊमेटो कसे करतात? कुणाला लिंक माहित असल्यास द्याल का?
अळिवात लोह असते भरपुर
अळिवात लोह असते भरपुर त्यामुळे लहान मुलांना द्यायला हरकत नाहि पण वय फार लहान आहे म्हणुन भिति वाटत असेल तर लोह असलेले इतर पदार्थ उदा. खजुर, पालक वगैरे द्यावेत.
चमकी, दिनेशदांनी लिहिलय बघ
चमकी, दिनेशदांनी लिहिलय बघ इथे:
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=731908#P...
मिरगुंड (छोटे छोटे पापड असतात
मिरगुंड (छोटे छोटे पापड असतात न तळुन खायचे) कसे बनवतात
आभारी आहे मंजुडी
देवा देवा, काय लिहिलय. घाई
देवा देवा, काय लिहिलय. घाई नडणार कधीतरी मला
सापडले
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105407.html?1173689579
निकिता, तुमच्या पोस्टच्या
निकिता, तुमच्या पोस्टच्या खाली उजव्या हाताला 'संपादन' लिहिलंय त्यावर क्लिक करून तुम्ही पोस्ट एडिट करू शकता.
मी इथे भाताची एक कृती लिहितो.
मी इथे भाताची एक कृती लिहितो. मला कळत नाही मी वेगळे पान करावे की नको.
१) २ पिवळ्या रंगाच्या ढोबळ्या मिरच्या
२) अर्धी वाटी तांदूळ
# सर्वात आधी तांदूळ धुवून १५ ते २० मिनिट भिजायला घालायचे.
# पिवळ्या ढोबळ्या मिरच्या मध्यम आकाराच्या चिरुन घ्यायच्या. फार बारीक नको.
# नंतर कांदा, आले-लसून, मेथीचे दाणे, मोहरी, उडीदाची डाळ, तीळ, जिरे, बडीशेफ, कढीपत्ता, हळद यांची नेहमीप्रमाणे खमंग फोडणी करुन घ्यायची.
# नंतर चिरलेल्या मिरच्या फोडणीत घालायच्या आणि नीट एकजीव करुन घायच्या.
# आच मंद करुन घ्यायची. शक्य होईल तेवढी मंद करुन घ्यायची.
# पातेल्यावर एक झाकण ठेवावे.
# आता या भाजीला पाणी सुटले की त्यात फक्त तांदूळ घालायचे. पाणी घालायची नाही. खरे तर भाजीच्या पाण्यात तांदूळ बसतील इतकेच तांदूळ अंदाजे भिजवायचे.
# आता झाकण न घालता मंद आचेवर हा भात शिजू द्यायचा. भात शिजत आला की साजूक तूप कडेने सोडायचे.
# हा भात चवीला तर छान होतोच, शिवाय रंग वगैरे पण एकदम छान दिसतो आणि पाणी घातले नाही म्हणून भाताला एक वेगळीच चव येते.
# बासमतीचा तांदूळ उत्तम.
अशीच कृती तुम्ही कुठल्याही भात्-भाजी साठी वापरू शकता. फक्त एकदच की त्या भाजीला भरपूर पाणी सुटायला हवे. उदा: पानकोबी, पालक, मेथी, शेपू वगैरे वगैरे.
मंद आच आणि पातेल्याचे बुड जाड असले की भाज्यांमधून जास्तीत जास्त पाणी बाहेर येतं. फ्रीज मधील भाजी आधी एक तास बाहेर ठेवावी.
कशी वाटली ही कृती तुम्हाला हे मला जरुर जरुर कळवा.
बी, ह्या धाग्याच्या माहितीतला
बी, ह्या धाग्याच्या माहितीतला शेवटचा परीच्छेद नीट वाच आणि नविन पानावर तुझी ही पाकृ लिही बघू...
बी ही क्रुती ड्च अवन नावाच्या
बी ही क्रुती ड्च अवन नावाच्या जाड बुडाच्या भांड्यात करावी. मंद आचेवर.
माझ्या कडे खालील गोष्टी आहेत.
माझ्या कडे खालील गोष्टी आहेत.
जिलेटिन, क्रीम, दूध, हर्शे चॉकोलेट पावडर, साखर, अंडी. कॉफी. वॅनिला इसेन्स. हे मिळून एक गोड पदार्थ होतो पण नक्की कोणता? काही लिन्क द्या. व प्रमाण. आठ्वत नाहीये.
मेथीची नेहमीपेक्षा वेगळी भाजी
मेथीची नेहमीपेक्षा वेगळी भाजी सुचवा.पनीर,मटार पण आहेत.
काल मी २ किलो पपई आणली..
काल मी २ किलो पपई आणली.. खुप्च सपक निघाली .. कुणीच खात नाही.. काय करता यीइल ?
ज्युस... चाट मसाला साखर
ज्युस... चाट मसाला साखर मिरपूड घाल. मी काल तेच केलं.
माझ्याकडे ओपन केलेला
माझ्याकडे ओपन केलेला स्ट्रोबेरी विथ जुस चा कॅन आहे. खुप थोडया स्ट्रोबेरीज वापरल्या गेल्या आहेत. आणखीन काय काय करु शकतो? प्लीज काही तरी सुचवा. फेकायची इच्छा होत नाहीया.
कुणी सांज्याच्या पोळीची कॄती
कुणी सांज्याच्या पोळीची कॄती (for dummies) सांगाल का?
अमया, त्या स्ट्रॉबेरिचा सॉस
अमया, त्या स्ट्रॉबेरिचा सॉस करता येइल्.कॉर्न सिरप घालून सोपी रेसिपी आहे नेट वर .मी नेहमी करते.केक किन्वा व्हानिला आइस्क्रीम बरोबर चान्गला लागतो.
श्रावणी
श्रावणी -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/03/blog-post_23.html - ही आहे मेथी मटर मलाई
http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/08/blog-post_3008.html - ही आहे डाळ मेथी
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/07/methiche-pithale.html - हे आहे मेथीचे पिठले
अमया,
स्ट्रॉबेरी मिल्क्शेक किंवा लस्सी पण करता येईल. आईस्कीमवर टॉपिंग म्हणुनदेखील चांगले लागेल.
आदिती, लालूला विचार. मला तिनेच सांगितल्या होत्या कशा करायच्या ते
किंवा इथे टिप्स आहेत बघ - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91367.html?1186424096
मी लिहिलेली लालूच्या पद्धतीने केलेल्या सांज्याची रेसिपी इथे आहे - http://www.maayboli.com/node/7188
मिनोती, खरंच काय? मला आठवत
मिनोती, खरंच काय?
मला आठवत नाही. सांजाची पोळी नावाच्या पदार्थाच्या टिप्स मी दिल्या असणं जरा कठीण वाटतंय.
मामी, बरेच काही होईल. पुडिन्ग, पाय फिलिन्ग, मैदा घेतलात तर केक.
धन्यवाद मिनोती, आशु,
धन्यवाद मिनोती, आशु, आईस्क्रीम टॉपींगची आयडीया मस्तच !!
धन्यवाद मिनोती. आता करून बघते
धन्यवाद मिनोती. आता करून बघते आणि मग माझं काय चुकलंमध्ये शंका विचारते
धन्यवाद. तिरामिसू होइल का
धन्यवाद. तिरामिसू होइल का बघते.
Pages