क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सेशन महत्वाचे आहे, 82 ची लीड आहे. अजून किमान 150 रन हवे म्हणजे 230+ चे टार्गेट देता येईल. आता जडेजा आणि आश्विन यांनी प्रत्येकी 50+ रन काढावे.

सर्फराजच्या 150 व पंतचे 100 होण्याचं प्रेशर यामुळे दोघांच्याही खेळाची ओघवती लय बिघडली व त्यात नवीन चेंडूची भर पडली !! त्या दोन विकेट्समुळे आपल्याला आता बचावात्मक पवित्रा घेणं अपरिहार्य

४३३-४
४६२ सर्वबाद
१०७ टारगेट फक्त..
पंत नव्हता जायला हवा होता ९९ वर..
कुठूनतरी तो एक रन त्याला मिळाला असता आणि शतक झाले असते तर मॅच वेगळी असती.
एक ऐतिहासिक विजय थोडक्यात राहणार..

थांबला सामना
बूमराह कडक टाकत होता बॉलिंग
विकेट गेल्या असत्या आज

चमत्कार घडतात क्रिकेटमध्ये. आणि सध्या तर आपण चमत्कार घडवणारेच क्रिकेट खेळत आहोत.
पण इथून त्यांची जिंकायची शक्यता नक्कीच बरेपैकी जास्त वाटत आहे.
थोड्या धावा कमी पडल्या अशी चुटपूट लागेल बहुधा निकालानंतर..

Rain rain go away,
Come again another day.
Little Rohit wants to play;
Rain, rain, go to Spain,
Never show your face again!

*Little Rohit wants to play;* - खरंच, की त्याला मनातून पाऊसच हवाय ? Wink

जेव्हा जेव्हा भारत न्यूझीलंड सामन्यात पाऊस पडतो तेव्हा तेव्हा आपल्याच पदरी पराभव येतो.
2019 वर्ल्ड कप सेमी
टेस्ट चॅम्पियनशिप फायनल
आणि आता हा सामना...
बघूया उद्या काय होते

नवा बॉल घेतल्यावर आपला अ‍ॅप्रोअच मला नक्की कळला नाही. सर्फराज नि पंतचे एकवेळ ठीक आहे कि त्यानी एव्हढा वेळ पिचवर घालवला होता कि त्याना सूट देऊ पण बाकीच्यांचे काय ? डीसीप्लिण्ड अ‍ॅटॅकसमोर परत नांगी टाकली. मॅच सिचुएशन वगैरे बघण्याचे थांबवलेय का पूर्ण ? समोरचे बॉल्रर्स चांगली बॉलिंङ करत असतील तर थोडा पेशन्स असायला हरकत नसावी ना ? सगळ्या जबरदस्त बॅटींग वर पाणी फिरवले. अजून शंभर धावा असत्या तर मजा आली असती.

उद्या पाऊस पडून १५ - २० ओव्हर्स मधे १०० करायची वेळ आली तर धमाल येईल.

“ उद्या पाऊस पडून १५ - २० ओव्हर्स मधे १०० करायची वेळ आली तर धमाल येईल.” - तीच आशा आहे. अगदी बरोबर लिहिलंयस तू - “ मॅच सिचुएशन वगैरे बघण्याचे थांबवलेय का पूर्ण ? ”

And interestingly, the lowest target ever defended successfully in a Test by India is 107 against Australia at the Wankhede in 2004!
योगायोग १०७! आजही त्याची पुनरावृत्ति होइल काय?

थोडी थोडी रिमझिम आहे. प्रेमी युगलांसाठी मस्त हवा आहे. पण आपण सध्या क्रिकेटच्या मूड मध्ये आहोत. सामना सुरु व्हायला थोSSSडा वेळ आहे. टेन्शन दूर करण्यासाठी हे अप्रतिम गाणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=swloMVFALXw

आपल्याला फक्त दोन तास पाहिजे आहेत. ह्या सामन्यात पहिल्यांदाच आपली "हवा" आहे. हवाके साथ साथ, घटाके संग संग...

जिंकलो आरामात. मी बोललो होतो नऊ विकेटने जिंकू. माझा मान राखून ८ विकेटने जिंकले. आता पुढच्या टेस्टला बघू. पुढच्या टेस्टला नक्की कोणाच्या बाजूने जायचं कळत नाही.

Pages