क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ काल सकाळ नंतर बिलकुल पाऊस पडला नाहीये” - म्हणजे आज किवी धावांचा पाऊस पाडणार कि काय!!

काल ढगाळ वातावरण होतं (चेक), विकेटमधे दमटपणा होता (चेक), न्यूझिलंडने अचूक आणि भेदक बॉलिंग केली (चेक), टॉस जिंकून बॅटिंग घ्यायचा निर्णय चुकला (चेक) - पण तरिही पहिल्या डावात जेमतेम ३१ ओव्हर्सच इंडियन बॅट्समेन बॅटिंग करू शकले, रन्स नाही झाले तरी टिच्चून उभं रहाण्याची जिद्द नाही दाखवू शकले - यह बात कुछ हज़म नहीं हुईं।

पण तरिही पहिल्या डावात जेमतेम ३१ ओव्हर्सच इंडियन बॅट्समेन बॅटिंग करू शकले, रन्स नाही झाले तरी टिच्चून उभं रहाण्याची जिद्द नाही दाखवू शकले - यह बात कुछ हज़म नहीं हुईं
>>
Exactly

एक कलीग, जो पूर्वी साऊथ झोन कडून खेळाला आहे, क्रिकिन्फो आणि विस्डन मधे एडिटर होता, काल सकाळी स्टेडियम वर जाऊन इंडियाची बॅटिंग पाहून वैतागून दुपारी ऑफिसला आला...

जर त्याला जमत नसेल तर उद्या त्याच्या तिकिटावर जायचा विचार आहे (फक्त सीझन पास विकलेत, डे तिकीट नाहीच आहे)

४ विकेट्स काढल्या आपण, पण नंतर साउदी अन् रचिन नी वाईट फोडलं. १६ ओव्हर मधे ७ च्या रेट नी ११२ ची पार्टनरशिप...

लंच ला ३४५/७

आली हुक्की मारली बुक्की. नशीब मी या टेस्ट मॅचला किवींच्या बाजूने आहे त्यामुळे बरं वाटतंय. मी नुकताच किवी पक्षी बघितला आणि आवडला बोललो चला सपोर्ट करू.

*भारताचा डावाने दारुण पराभव होणार* - इतक्या छातीठोकपणे क्रिकेट सामन्यांबद्दल भाकीत करणं जरा धाडसाचंच !! Wink

गंभीरचे काहीही झाले तर सामना जिंकायचाच प्रयत्न करायचा हे ऐकायला मस्त वाटते. पण त्याच वाक्यात सामना हरायचा नाही अशी पुस्ती जोडलेली वाचायला बरे वाटले असते. उगाच नाहितर आपला इंग्लंड व्हायचा ह्या नादामधे.

कोहली शेवटच्या बॉलवर बाद झाला ह्याबद्दल स्वतःचेच कपाळ बडवून घ्यावे असे वाटते आहे. अजून दोन दिवस बाकी आहेत. उद्याचा पूर्ण दिवस खेळणे जरुरी वाटत आहे. डाउन अंडर अच्या जबरदस्त सिरीजमधे आपण आक्रमक पवित्रा घेण्याआधी विकेट वर टिकून राहणे ह्यावर भर दिला होता ह्याचा विसर पडल्यागत खेळतात आजकाल. गाजराची पुंगी वाजली तर वाजली मोड दिसतोय सगळा Sad भयंकर मनःस्तापाची तयारी ठेवायला लागणार असे दिसते आहे एकंदर.

शर्मा आज फार वाईट पद्धतीनं बाद झाला..
खेळलेला बॉल मागे जाऊन त्यावर बोल्ड झाला
बॅडलक सुद्धा म्हणू शकतो.. किंवा हल्लीचे प्लेअर सॉलिड डिफेन्स करत नाही त्याचा दुष्परिणाम म्हणू शकतो..

लोकहो,
एक लक्षात आले का तुमच्या...

काल मी मांडलेला अंदाज बरोबर चालला होता..
३२० सर्व बाद म्हटले होते. तिथेच किवी थांबणार होते.
पण आठव्या विकेटने घोळ घातला आणि ४०० झाले.

पण त्यानी जास्त मारले तर आपण सुद्धा जास्त मारू म्हटले होते.

आपले दिवस अखेरीस दोन विकेट गमावून १५० म्हटले होते. म्हणजे ३२०-१५०-४६ = १२४ धावांचा लीड शिल्लक म्हटले होते.

आणि आज दिवस अखेरीस बरोबर 125 धावांचा लीड शिल्लक आहे.

विकेट दोनच म्हटल्या होत्या. तेही बरोबर येणार होते. गधड्या कोहलीने अंदाज चुकवला शेवटच्या चेंडूवर..
पण हा एक विकेटचा चुकलेला अंदाज खूप त्रासदायक आहे. आज मस्त झोप आली असती जर कोहली नाबाद असता..

असो, आता उद्या यांनी मजा केली तर परवाच्या मजेची सुद्धा सोय होईल. विकेंड धमाल होईल Happy

रात्री सुमारे ११:३० पासून बऱ्यापैकी पाऊस पडतोय.
चिन्नास्वामी मैदानाचं आऊटफिल्ड २५ मिनिटात वळतं अशी ड्रेनेज सिस्टीम आहे (अशा पावसा नंतर बंगलोर च्या रस्त्यातलं साचलेलं पाणी मात्र बरेचदा पूर्ण दिवसभरात ही ड्रेन होत नाही)

<<<(अशा पावसा नंतर बंगलोर च्या रस्त्यातलं साचलेलं पाणी मात्र बरेचदा पूर्ण दिवसभरात ही ड्रेन होत नाही)>>>

पाउस पडल्यामुळे खेळच होणार नसेल, तर रस्त्यावरचे पाणी दोन तासात वाहून गेले तरी जाणार कुठे, खेळच नाही.
त्या उलट खेळ चालू असेल तर पब्लिक पोहत पोहत सुद्धा जाईल खेळ बघायला याची खात्री आहे बंगलोर मुन्शिपाल्टीला.

* तर पब्लिक पोहत पोहत सुद्धा जाईल खेळ बघायला याची खात्री ..* - ...... मैदानात आपली होडी शिड तट्ट फुगवून चालत असेल तरच !! Wink

पाऊस आला.. श्या

त्या आधी चुम्मा अर्धशतक झाले
५५ चेंडूत ५२!

बाकी सरफराजने काय मस्त लेट कट मारले आज. त्याच्यामुळे बरेच काही लोप पावलेल्या गोष्टी बघायला मिळू लागल्या आहेत. स्पिनरला डॉमिनेट करने सुद्धा कायम ठेवले आहे.
जे तो डोमेस्टिक मध्ये करतो तेच तो इंटरनॅशनल मध्ये सुद्धा करणार. निदान भारतात कसोटी खेळताना तरी त्या लेव्हलचा प्लेअर आहे तो. मजा आली आज मॅच बघायला.

कल खूप चांगले खळेले. रोहित, विराट आणि सरफराजने डाव सावरला. विराट ची शेवटच्या चेंडूला विकेट जाणे फारच धक्कादायक होते. ते नसते झाले तर आज त्याचे शतक झाले असते असे वाटते. चुम्माचे अर्धशतक मस्तच. मध्ये त्याने थोडी घाई केली आणि 35 च्या आसपास असताना विकेट जाते की काय असे वाटले. पहिल्या डावातील 5 डक ते या डावातील 4 अर्धशतक (त्यातील एक शतक) ही भरीव कामगिरी आहे. यशस्वीने तो पुढे येऊन आक्रमक शॉट नसता खेळला तर त्याचेही अर्धशतक नक्की झाले असते.

८० ओवर ४००-३

३५६ चा लीड डोक्यावर घेऊन आणि एक दिवस पावसाने वाया गेला असतानाही सामना अनिर्णीत ठेवायचा विचार न करता तिथून सुद्धा जिंकू शकतो असा विचार करून ८० ओवर मध्ये ४०० धावा मारणे निव्वळ धडाकेबाज.

त्यात कप्तान ओपनिंग येवून 63 बॉल 52 मारून सगळ्यांसाठी हा एप्रोच सेट करून जातो..
कॅप्टन इनिंगची व्याख्याच बदलली आहे जणू Happy

गेला सरफराज १५० मारून
नवीन बॉल आल्यापासून कम्फर्टेबल वाटत नव्हता..
आता एक सावध पार्टनरशिप हवी.. किमान ६०-७०

अरे सिक्स बघा पंतचा...
स्पिनरला मारावे तसे गुडघ्यावर बसून साऊदीला मारले आणि बॉल स्टेडियम रूफवरून बाहेर.
आणि हा शॉट खेळताना तो 90 वर होता..

Pages