बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मटार करंजी चान्गली आहे..मदतीला कोणी नाहीए म्हणुन मी आपले वेजी पफ पण करंजीसारखा॑ आकार देउन करायच्या विचारात आहे.

मदतीला कोणी नाहीए>>स्प्रिन्ग रोल्स चे कव्हर कुठेही ग्रोसरी शॉप मधे मिळेल.त्या मधे मटार बटाट्याचे जरा खमंग/चटपटीत सारण भरून तळायचे. ते पण छान लागतात.आणि कष्ट कमी.

रविवारी १८-२० जण जेवायला येणार आहेत. साधा सोपा पटकन होणारा मेनु सांगाल का?
आदल्या दिवशी काय तयारी करता येइल? मराठी मेनु हवा. आणी प्रमाणहि सांगाल का?

हाच धागा सुरुवातीपासून सगळा पहिलात तरी खूप वेगवेगळी काँम्बीनेशन्स सापडतील.
पण हा एक टिपीकल मराठी मेनू:
१८-२० जणांचा अंदाज जाणकार देऊ शकतील.
वरण भात
मसाले भात /तोंडली भात
मटकीची उसळ/उत्साह असेल तर वालाचे बिरडे
फ्लॉवर्-मटार बटाटा भाजी/पिवळी बटाटा भाजी
कोथींबीर चटणी/तीळाची/जवसाची कोरडी चटणी
वाटली डाळ/खमंग काकडी
तळण(पापड, कुरडया,मिरगुंड वगैरे)
पोळ्या/पुर्‍या
मट्ठा/टोमॅटोचे सार
गोडात श्रीखंड/बासुंदी(विकतची)

१२ ते १५ माणसांसाठी नाश्त्याला रगडा पॅटीस करायचे आहे. किती लागेल अंदाज येत नाहीये. पॅटीससाठी किती बटाटे उकडावे लागतील? पांढरे वाटाणे किती लागतील? कोणी अंदाज देऊ शकेल का?

~साक्षी.

प्रत्येकी तीन चार पॅटीस असे गृहित धरले तर तीन किलो बटाटे लागतील. वाटाणे एक किलो व त्यात पाव किलो चणाडाळ घातली तर पुरेल. इतर पदार्थ असतीलच ना ?

हाय, उद्या सकाळी दिवाळी फराळासाठी ४-५ फॅमिलीज भेटणार आहोत. दिवाळीचा फराळ आहेच पण त्या सोबत अजुन काय करता येइल? एक जण गोड शीरा, दुसरी कटलेट्स आणणार आहे. मला काहीतरी सुचवा... सगळे मराठीच आहेत Happy

आमच्याकडे फराळासोबत सकाळी दही पोहे असतात कोकणात. माझ्या माहेरी. कधी साखर घालूल गोड तर कधी मिरची वाटून लावून. फराळाच सगळ तेलकट तुपकट असतं म्हणून. आणि गंमत म्हणजे हे पोहे आम्ही सगळे मनापासून खायचो.

आमच्या घरी सुद्धा पोहे असतात. सकाळी कारटे फोडले की आत येवून आधी हे खायचे.
तीन पोहे प्रकार १) गोड दही व पोहे २) ओले खोबरे व गूळ पोहे ३ ) नुसती हिरवी मिरची जिरे वाटून दह्यात पोहे. पोहे नुसते भिजवून कालवायचे. नो फोडणी/टडका हा नैवेद्य असतो.

मग ९ वाजता वगैरे तिखट असा रवा मसाला डोसा.(बहुतेक वेळा हाच करायची आई). त्यात आत लाल मिरवी चटणी, मिक्स भाजी भरून (बटाटा जराही नाही) व काजूची हिरवी मिरची घालून चटणी बाजूला. मूगाचे सांबार.

गोड खावून कंटाळा आला असेल तर तिखट चटणी लावलेला कुरकुरीत डोसा मस्त वाटतो. मी तरी सकाळी ११ वाजता पुन्हा झोपायचे खावून.(कारण आईने जोरजबरदस्ती करून ३:५० पहाटे उठवलेले असायचे बाकीच्यांना. मी काही ३:५० उठलेच नाही कधी. पण घरात इतका गोंधळ असायचा आईचा तेव्हा कुठे ६:३० उठून शेवटी माझी अंघोळ.). Happy

धन्यवाद दिनेशजी,
अजून काही म्हणजे एक गोड पदार्थ आणि फराळाचे सगळे असेलच.

बाकी माझी आई कोकणांतली असल्यामुळे तिच्याकडेही (माझ्या आजोळी) असे पोह्यांचे ३/४ प्रकार असायचे. आता तिच्यामुळे मीही शक्यतो पोह्यांचाच एखादा प्रकार करते.

~साक्षी.

लाजो,
तिखट
सुरळीच्या वड्या..तेलकट नाहीत.
मटार करंजी...एकदम खमंग
पांढरा/पिवळा ढोकळा..जरा हेवी होईल पण परत तेलकट नाही
तिखटमिठाच्या पुर्‍या/टोमॅटो पुर्‍या

गोड
ओल्या नारळाच्या करंज्या..फराळात नसतील तर
पनीर आणि नारळ बर्फी
सायो ची मलई बर्फी
भोपळ्याचे घारगे
एखादी खीर

उद्या नवर्‍याचे मित्र सह्कुट्नंब येणार आहेत घरी, एक छोटीशी ख्रिसमस कम न्य इयर पार्टी आहे(खर तर हे आपल कल्चर नाही पन एक निमीत्त एकत्र येण्यासाठी) , म्ह्ण्जे आज ख्रिसमसला नी ३१ डिसे. ला आम्ही स्वतंत्रपणे आपापल्या कुटुंबासमवेत एन्जॉय करणार नी उद्या सगळे फ्रेंडस मंडळी जमुन घरी धमाल करणार नी आम्हा सगळ्यांची पिलावळ पण(म्हण्जे दोन्ही हेतु साध्य मित्र पण नी फॅमिली पण नी मुलांची पन मज्जा).... तर उद्या बेत काय करु? एकुण १०-१२ जण असु, मेन मेन्यु बाहेरुनच ऑर्डर करणार तरीपण घरी जमायच म्हण्जे थोडा घरगुती हलका फुलका आहार असावा अस मला वाटतय. लहान मुल पण आहेत तर काय कराव? आम्ही मालवणी आहोत नी गेस्ट मध्ये कुणीच मालवणी नाही नी त्या सगळ्यांना मालवणी पदार्थांची भयंकर क्रेझ आहे सो मी काही तरी तत्स्म करायचा ठरवते आहे, मागे त्या बायकांनी घावन्यांचा उल्लेख बोलता बोलता केलेला तर तो एक सोपा, झट्पट होणारा आयटम आहे पण समजा ३५-४० घावने केले तर त्या सोबत काय देऊ? एखादी चटणी वा उसळ वा आण्खी काही तरी? की घावने सोडुन आणखी काही पटकन करण्यासारखे आहे का? फार चमचमीत, तेलकट पण नाही नी सगळे खावु शकतील असे काही तरी प्लीज सुचवा ना ? as a starter म्हणुन तरी........... किंवा सध्या मस्त थंडी आहे तर थंडीशी काही संबंधित गरमागरम नी नेहमीपेक्षा वेगळे..............
waiting for response .............

घावनं हा पटकन खायला पाहिजे असा पदार्थ आहे. नंतर ही खावू शाक्तो पण तेवढा छान नाही लागत तो. मला तरी तो नरम गिचका आवडत नाही. Happy तेव्हा सजून नटून गॅस जवळ उभे राहून ते करण्यापेक्षा आधीच एखादा पदार्थ केलेला बरा.

हे ऑप्शन मला बरे वाटतात भारतीय हवे असेल तर...
१) कटलेट (हे भाजीचे न करता, सरळ बटाटा उकडून मध्ये चणाडाळीचे फिल्लिइन्ग करून बदामी आकार देवून शॅलो फ्राय करायचे. वर मस्त छोले(छोल्यात अनारदाना, आमचूर, जीरा ताजे वाटून घालायचे. पंजाबी मसाला बनवायचा(लवंग्,दालचीनी वगैरे वाटून). थंडीत हे गरम छान वाटते. मग बरोबर पुदीना चटणी.
२) उपमा + चटणी
३) रेडीमेड कचोरी चटणी
४) ब्रेड पकोडा चटणी
(इथे ब्रेड पकोडा रेसीपी आहे)
५) गरमा गरम मिसळ पाव
तेलकट चालणार असेल मिक्स पकोडे,पालक पकोडे
नॉन्वेज हवे असेल तर चिकन पकोडा, फ्लॉवर पकोडा(चायनीज सॉस लावून वगैरे) पण वेळखाउ आहे.
नवीन वर्षाच्या आधी एवढे कष्ट म्हणजे पुढले वर्षे कष्टात जाणार्(गमतीने म्हणतेय...)

लगेच उत्तर दिल्याबद्द्ल धन्यवाद मन:स्विनी, पण हे सगळे पदार्थ बाहेरही मिळतात नी थोडेवेळ खाऊ आहेत, मला लहान बाळ अस्ल्याने नी कुणी आधी मदतीला नसल्याने झटपट, सोपा पदार्थाच्या शोधात आहे नी शक्यतो मालवणी स्पेशल. तेल़कट ९९% तरी नकोच, नी घावना एवढ्यासाठीच की तो तेलकट, तिखट नसतो नी माझ्याकडे बिडाचा तवा आहे त्यावर पटापट नी छान कुरकुरीत , पातळ नी पटापट उचलतात त्यामुळे मध्येमध्ये बाळाकडे लक्ष देवुन उभ्याने करण कदाचीत शक्य होईल मला......
तरी अजुन काही असेल तर सुचवा ना...... चुभुद्याघ्या.

तसही मेन नॉनव्हेज जेवण बाहेरुन्च आणणार आहोत, त्यामुळे घरच जेवण किंवा माझ्या घरि येणार म्हणुन एक आदरातिथ्य म्हणुन एखाद दुसरा पदार्थ बस.....

शिल्पा मस्त घवणे बनव. सोबत खोबर्‍याचि चटणी आणि कोणतिहि उसळ बनव. मस्त बेत आहे. स्विट म्हणुन तांदळाचि खिर पण बनवु शकतेस. सोप्प आहे.
आणि शिवाय तु चिकन मागवणारच आहेस. भारतात असलिस तर जमल्यास मालवणि चिकन मागव. एकदम फक्क्ड काँबिनेशन. घवणे आणि मालवणि चिकन. (चला मझा पण विकेंड्चा मेन्यु ठरला).
सोलकडि पण फार लोकांना आवडते.

मालवणी मेनूत कांद्याची खेकडा भजी, कोलंबी किंवा अंड्याची भजी / वडे, गावठी चण्याची झणाझणीत उसळ त्यावर कच्चा कांदा टॉमेटो, कोथंबीर टाकून चाट प्रमाणे..., कांदा लसूण मसाल्यात तळसलेली उकडलेली अंडी/ बेबी पोटॅटो वर कोथंबीर घालून वैगेरे करता येइल.
घावना बरोबर मालवणी मसाला वापरून केलेली काळ्या वाटाण्याची उसळ किंवा मश्रूम्ची भाजी होते.

थन्स, अगदी योगायोगाने दोघिंच्याही सल्ल्याचा उपयोग होणार आहे, मी घावणे (थोडे साधे थोडे गोड गुळचुन शिवरुन म्हणजे मुल पण खातील आवडने), खोबर्‍याची चटणी नी काळ्या वाटाण्याची उसळ (किती छान आहे कॉम्बीनेशन एरव्हीसुद्धा) करणार आहे. बाकीच जेवण बाहेरुनच आहे ते प्रत्येकाच्या चॉईसवर आहे काय मागवाय्च ते. बघु. पुन्हा thanks all . Merry Christmas & नववर्षाच्या हार्दिक शुभच्छा...............:)

३१ च्या संध्याकाळी वाईन ट्राय करायची आहे... ह्यातले ओ का ठो माहीत नाही... एखाद्या पार्टीत चाखली आहे तेवढीच.. तर काय ट्राय कराव? त्याबरोबर पनीर टिक्का, नुडल्स आणि डेझर्ट म्हणून ब्राऊनी चालेल की आईस्क्रीम?

इथे छान माहिती आहे नवशिक्यांसाठी वाईन ह्या विषयाबद्दल. अगदी कुठली प्यावी ते पण सुचवलंय.
गरम ब्राउनीवर गार आइसक्रीम आणि वर एखादा हॉट चॉकलेट सॉस घेऊन खाल्लं की मस्त डिझर्ट!

धन्यवाद म्रुण्मयी.. उद्या नीट वाचीन ती साईट... सिझलिंग ब्राऊनी माझा अगदी आवडता प्रकार... पण ते वाईन नंतर चांगली लागेल का हे माहीत नव्हत...

शनिवारी लेकीचं बोरन्हाण आणि हळदी-कुंकू आहे. १५ बायका आणि २५ मुलं आहेत
मोठ्यांसाठी
१ मिसळपाव
२. तिळकुटाचे लाडू

लहानांसाठी
१. पास्ता
२. तिळकुटाचे लाडू

असा बेत ठरवला आहे? आणखी काहीतरी अ‍ॅपेटाईझर ठेवायचे आहे. काय ठेवता येईल? आणि गोड पदार्थ कोणता ठेवता येईल?

गोड: मूगाचा शिरा. झणझणीत मिसळ व थंडीत तूपातला शिरा. Happy लहान मुले मुगाचा शिरा आवडीने खातात्.(मी तरी लहानपणी वाडगाभर खायची) Proud

मूगाची /लिलवा कचोरी, अळूवड्या... अ‍ॅपेटायझर म्हणून जाईल जर वेळ असेल तर.

कचोरी बेक करून सुद्धा होतील.

रोज काय कराव,गोन्धल होतो,अजुन शिक्तोय, कुपया एका माणसासाठि लगेच करत येणारि, योग्य, सोप्पि पाक क्रुति सुचवा, शक्यतो वेज.

खिचडी, उपमा, बिसी बेळे भात, पास्ता अन बाटलीमधला सॉस, चित्रान्ना, . पोंगल हे सगळे एकट्यासाठी करण्याजोगे, सोपे वन डिश प्रकार आहेत. हिरवी चटणी करुन ठेवलेली असली तर सॅंडविचेस, भाजणी तयार असेल तर थालिपीठे हे सुद्धा जमण्यासारखं आहे.

Pages