मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा

Submitted by संयोजक on 8 September, 2024 - 06:42

मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा :

यावर्षीच्या सर्व उपक्रम आणि स्पर्धा एकत्र, एकाच ठिकाणी पाहण्यासाठी हा धागा.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या उपक्रम व स्पर्धांच्या लिंकवर क्लिक करा.

मायबोली गणपती प्रतिष्ठापना
https://www.maayboli.com/node/85615

आमच्या घरचा बाप्पा
https://www.maayboli.com/node/85598

बाप्पाचा नैवेद्य
https://www.maayboli.com/node/85599

सांस्कृतिक कार्यक्रमः-

माझी कलाकारी
https://www.maayboli.com/node/85614

लहान मुलांचे उपक्रम:

चित्रकला: माझी आवडती गाडी
https://www.maayboli.com/node/85608

चित्रकला: माझे आवडते कार्टून
https://www.maayboli.com/node/85607

हस्तकला: गणपतीसाठी पताका/ तोरण तयार करणे
https://www.maayboli.com/node/85609

मोठ्यांसाठी लेखन उपक्रम:

शहाणे करुनि सोडावे। सकल जन।।
https://www.maayboli.com/node/85604

माझे स्थित्यंतर
https://www.maayboli.com/node/85595

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: १: दृष्य
https://www.maayboli.com/node/85610

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: २: पाऊस
https://www.maayboli.com/node/85631

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: ३: संयम
https://www.maayboli.com/node/85666

मोठ्यांसाठी कला उपक्रम:

नैसर्गिक संसाधनांमधून गणेश
https://www.maayboli.com/node/85592

पाककृती स्पर्धा:

One Dish Indian Meal
https://www.maayboli.com/node/85583

चटण्या
https://www.maayboli.com/node/85585

आरोग्यवर्धक पेये
https://www.maayboli.com/node/85584

गंमतखेळ

मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स
https://www.maayboli.com/node/85605

जुनी कढई, नवीन उपमा
https://www.maayboli.com/node/85597

गंमतखेळः- कोण कोणास म्हणाले?
https://www.maayboli.com/node/85606

प्रकाशचित्रांचे झब्बू

निसर्गनिर्मित सममिती
https://www.maayboli.com/node/85611

देवघर
https://www.maayboli.com/node/85612

श्रीमंती माझ्या नजरेतून
https://www.maayboli.com/node/85613

माझे शेत/ माझी बाग
https://www.maayboli.com/node/85693

सर्वसिद्धिकर प्रभो!
https://www.maayboli.com/node/85539

गणेशोत्सव विशेष लेख - भारतीय संगीतशास्त्राचे जीर्णोद्धारक - पं. विष्णु नारायण भातखंडे - (हरचंद पालव)
https://www.maayboli.com/node/85673

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ, किल्ली, अनु , आशु Lol
हे असेच वातावरण पाहिजे माबोवर. Happy
स्वतःची विपू बघतीलच असे नाही पण दुसऱ्यांची विपू बघायला कांगारू सारख्या उड्या मारत जातील. Happy

>>>>>>>ह्या स्पर्धांमध्ये नंबर आला तर तुम्हांला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार आहे की अ‍ॅकॅडमी अवॉर्ड की नोबेल प्राईज ?
अगदी अगदी पराग!
मी तर माझ्या चिमूट शशकला मतच दिलेले नाही कोणत्या तरी दुसर्‍याच शशकला दिलय. अरे काय मोठी माडी बांधणारोत आपण. काय ती अस्मितांची (ईगो) मुरुमं. Sad

Lol बघ नं कविन.
मीम Lol

अस्मिता म्हणजे ईगो नाही, ईगो म्हणजे अहंकार. त्यात पुन्हा मुरमं... Happy

अस्मिताची पोस्ट वाचे पर्यंत मला जोक कळलाच न्हवता. असेल म्हटलं सामो आणि अस्मिताचं कुठेतरी वाजलं. आपल्याला काय फटाके वाजलेले ऐकायला मिळाले की झालं. पण कस्चं काय! Proud

बस करा रे अस्मिता पुराण..
घरच्या कटकटीला वैतागून चार घटका मनोरंजनासाठी मायबोलीवर यावे तर इथेही पुन्हा पुन्हा अस्मिता अस्मिता वाचायला लावताय तुम्ही Lol

>>>>>>आपल्याला काय फटाके वाजलेले ऐकायला मिळाले की झालं. पण कस्चं काय! Proud
हाहाहा Happy
अस्मिताला मग इंग्रजी शब्द काय आहे? ईगो म्हणजे अहंकार का? तर अस्मिता म्हणजे काय? अगं जाती धर्माचा बोलबाला झाला की ऐसीवरती बॅटमॅन म्हणायचा अस्मितांची गळवं टचटचा फुटली. याईक्स. त्यामुळे मी मुरमं हा शब्द वापरला.

असो. यार सॉरी Sad मला खुशाल सामोसा म्हण , शिक्षा म्हणुन हाहाहा

अस्मिता Proud
ते तर संयोजकांनी शीर्षकात पाल्याचे पूर्ण नाव लिहा अशी सूचना केल्याने लिहिले होते. नंतर समजले की आपणच जास्तीचा शहाणपणा केला आहे Proud

'अस्मिता' शब्दाला एकच इंग्रजी शब्द नाही माझ्या मते
Self awareness, sense of self, self esteem, self respect हे चार शब्द जवळचे वाटतात. अस्मिता कचकड्याची नसते, अहंकार मात्र असू शकतो.

जाणकारांनी सांगावे.

) नवीन कल्पना , न पटलेले नियम /उपक्रम /स्पर्धा याबद्द्लच्या कुठल्याही प्रतिक्रियांचे आपण स्वागत करतो. त्यातूनच काही चांगल्या गोष्टिही निघतात. संयोजक / अ‍ॅडमीन टीम गेल्या वर्षी आलेल्या कल्पनांचा विचार करतात. >>>
आवडलं

२) पण त्या राबवल्याच गेल्या पाहिजे हे बंधन आपल्याला लावून घेता येणार नाही.

त्या मागे तांत्रिक अडचणी , मायबोली चे धोरण , मायबोलीने ड्रुपलमधे केलेले बदल, मायबोलीचा आकार अशा अनेक अडचणी येतात >>>
समजलं.. पटलं.

संयोजकांचे काम वाढेल असे बदल आपण शक्यतो करत नाही. किंबहुना गेल्या काही वर्षांत त्यांचे काम सोपे होत जाईल असा आमचा प्रयास असतो. >>>
हेही बरोबर आहे.

३) आपल्या स्पर्धांचे नियम्/धोरण/ अंमलबजावणी काही जणांना पटणार नाही. पण त्यात बदल घडवून आणायचा असेल तर पुढच्या वर्षी संयोजन मंडळात या , अडचणी समजून घ्या आणि कदाचित तुमच्या मनासारखे होईलही. पण होणारही नाही.
>>> विचार करण्यासारखे..

पण या सगळ्या गोष्टीत मजा येणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. >>>>
हेही मान्य. मजा उपक्रमातून ही येते आहेच हा एक मुद्दा आहेच.

नाही तर गणेशोत्सवाला कोर्टाचे स्वरूप येईल. >>>
हे तुम्ही एखादा नवीन मांडलेला मुद्दा कसा घेता ह्यावर अवलंबून आहे.

सूचनांना, बदलांना ते सुचवल्याबद्दल सुचविणार्याला असे का लिहिले, आमचं चांगलं चालू आहे का मोडता घातला.. वगैरे भावनिक होऊन आरोप करत सुटायचे ज्यामध्ये बऱ्याचदा मूळ म्हणणं काय ते माहितही नसतं.
किंवा
ठीक आहे हे हे पटलं किंवा नाही पटलं, शक्य नाही / आहे , विचार करता येईल यासारखा approach ही घेता येतो.

पण दंगाच करायचं असेल तर त्याला काहीही निमित्त पुरते.
****

ह्या सगळ्यातून एक समजलेले

निकोप स्पर्धा राबवायला काही तांत्रिक / इतर अडचणी आहेत. त्यामुळे नामधारी स्पर्धा राबविल्या जातात / जातील.

(आणि न बोललेले पण समजलेले -
स्पर्धा घेणे (जशा जमेल तशा) ही आमची परंपरा आहे आणि त्या परंपरांचा आदर करणं (कुठल्याही शंका कुशंका उपस्थित न करता) ही माबो वर असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
तरच इकडचे वातावरण आनंदी/ उत्साही राहील.)

नाही तर गणेशोत्सवाला कोर्टाचे स्वरूप येईल. >>>

आता हा virtual गणेश उत्सव आहे.

परंतु अगदी छोट्या सोसायटीत ल्या गणेश उत्सवात स्पर्धा घेतल्या जातातच की. अगदी थोडक्या स्वरूपातच होतात .

स्पर्धक त्यांची प्रवेशिका सादर करतात, १-३ जाणते परीक्षक नेमतात ते निकाल देतात.
लहान मोठी अस नसतं, स्पर्धा म्हटली की
समान नियम, संधी, निकोप मूल्यमापन हे अपेक्षित आहे.

अगदी लहान मुलांच्या शाळेतही लिंबू चमचा स्पर्धेत सगळी मुले एकाच लाईन वर सुरू करतात आणि प्रत्येकाला एकच अंतिम रेषा असते, लिंबू आणि चमचा समान आकाराचे मिळतात.

तर परत माबो स्पर्धांकडे वळूया.

यात सर्व प्रवेशिकाना समान संधी मिळत नाही हे निरीक्षण आहे. आणि मूल्यमापन तर वाचकच करतो ( त्यात व्यक्ती सापेक्षता आलीच).

असे अनेक मुद्दे निघतात की जे स्पर्धा ह्या प्रकारापासून फारकत घेणारे आहेत.

***

यावर उपाय..

१. वरील कोणत्याही मुद्द्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आहे तसे चालू ठेवायचे.
२. उपक्रमच ठेवायचे कारण त्यातूनही तेव्हढीच मजा येते, प्रतिसाद मिळतो
३. सहज शक्य असेल तर सगळ्या प्रवेशिका गटवार एकत्र कुठेतरी सहज मिळतील असे बघणे , ज्यामुळे समान संधीच्या जवळपास कुठेतरी पोहोचता येईल
४. स्पर्धा. न म्हणता popularity किंवा people's choice award यासारखे बिरूद देता येईल... माबो करणं यासाठी उत्तम नाव नक्कीच सुचेल.

आता हे सर्व या वर्षीच्या स्पर्धांसाठी निश्चितच नाही.. पण पुढील स्पर्धांसाठी यातील पर्यायांचा विचार करता येईल. अर्थात ह्या शक्यता सुचविली आहे.. आग्रह नाही.

**"

ह्या स्पर्धांमध्ये नंबर आला तर तुम्हांला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार आहे की अ‍ॅकॅडमी अवॉर्ड की नोबेल प्राईज>>>> माझ्या माहिती प्रमाणे नोबेल किंवा ज्ञान पीठ पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा घेत नाहीत ती बक्षिसे नाहीत ते पुरस्कार आहेत.

>>> आणि न बोललेले पण समजलेले
हे 'कुणीही न बोलताही हट्टाने ठरवून ऐकलेले' वाटते आहे. Proud

स्पर्धांमध्ये परीक्षकांचा (मग ते नेमलेलं मंडळ असेल किंवा खुलं मतदान) बायस अध्याहृत असतो. स्पर्धेत भाग घेतानाच हे माहीत आणि मान्य असायला हवं.

दाखल्यादाखल...

रिया हे आयडी आहे आणि त्यांनी शशक लिहिली आहे हे मला काल प्रवा एका कॉमेंट मधून समजले.
कारण स्पर्धा / मतदान हा फॉरमॅट युजर फ्रेंडली नाही आहे .

एका शशक चे ३ विभाग.
प्रत्येक विभागात १०-१२ किंवा त्याहून जास्त प्रवेशिका. एकूण ३०-४० प्रवेशिका.
त्यात मतदानाच्या पानावर लिंक्स टाकता येत नाहीत (ही एक मर्यादा)
मला ५ मिनिट फ्री मिळाली, मतदानाचा धागा वर दिसला.. बरीच मोठी लिस्ट दिस्त्ये.. बघू एखाद आठणीतल दिसतंय का, मारू टिचकी झालं मतदान.
माझ्या आठवणीत राहिले ते म्हणजे ओळखीचे आयडी की जे सतत वर होते (१-२ पानावर), आणि ते वर होते म्हणून वाचले गेले किंवा ओळखीत/ लक्षात राहिले, हे दुष्ट चक्र आहे.

कारण माझ्या १०-१५ मिनिटांच्या फावल्या वेळात मला तितकच जमतं.

>>> र्थात ही एक शकुळ्याता सुचविली आहे.. आग्रह नाही.
आग्रह नसताना तुम्ही इतक्या पोस्ट्स टाकल्यात, आग्रह असता तर काय केलं असतंत?! Lol

नोबेलची कमेंट काय अर्थाने/ स्पिरिट मध्ये होती ते जाणून न घेता कीस पाडायचाच असेल तर.. .
>> माझ्या माहिती प्रमाणे नोबेल किंवा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा घेत नाहीत ती बक्षिसे नाहीत ते पुरस्कार आहेत >> पूर्ण चुकीची माहिती आहे.

नोबेल पारितोषिक (आता पुरस्कार म्हणा का स्पर्धा युअर चॉईस) मिळायला आधी नॉमिनेट व्हावं लागतं. शांतता पुरस्काराला तर सेल्फ नॉमिनेशनही चालतं. इतर विषयांत नॉमिनेटर्स नॉमिनेट करतात. मग कमिटी निर्णय घेते. ज्यात काय गोंधळ चालतात याच्या सुरस आणि रम्य कथा नेट वर पुष्कळ मिळतील.

ज्ञानपीठाचीही तीच गोष्ट. विद्यापिठे, साहित्यिक, संस्था, रिव्ह्युअर नॉमिनेट करतात.
आता एका महानकलाकृतीला कोणी नॉमिनेटच केलं नाही तर ती कलाकृती स्पर्धेत येत नाही आणि अर्थात ज्ञानपीठ मिळत नाही.

बाकी सगळं ठिके पण रीया हा एक आयडी तुम्हाला माहीत नाही? हे काही बरोबर नाही Proud

आज भी आजुबाजूवाले संकेतस्थळ पर कोई आयडी पॉप्युलर हो जाता है तब जुजा लोग कहते है हात छुपाले बेटा वरना रीया राखी लेके आयेगी Lol (हे फनी हाहा नसून अक्राळ विक्राळ हाहा आहे)

Pages