For a conscious being, to exist is to change, to change is to mature, to mature is to go on creating oneself endlessly.
-Henri Bergson
जगात सगळ्यात काही शाश्वत, कायमस्वरुपी असेल तर तो म्हणजे बदल! आपल्या अवतीभोवती असलेली प्रत्येक गोष्ट कायम बदलत असते, गोष्टच काय तर आपण स्वतःही कायम बदलत असतो. आपली मते, आपले विचार, सवयी, स्वभाव, विचार करण्याची पद्धत ही कायम बदलत असते. कधी कधी हे नकळत होते तर कधी कधी आपण जाणून बुजून, उमजून स्वतःला बदलतो. कधी एखाद्या क्षणी कोणाच्यातरी बोलण्यातून किंवा आपल्याला स्वतःलाच जाणीव होते की आपण किती बदललो.
या मायबोली रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वतःच्या अंतरंगात एकदा डोकवून पाहूया. एक उजळणी करूया स्वतःमधे घडलेल्या चांगल्या-वाईट बदलांची. आपल्यात झालेले वैचारीक, शारीरिक, स्वभावातील बदलांची नोंद करू या. या निमित्ताने आज आपल्याला स्वतःला स्वतःमधील जे दोष दिसत आहेत त्यांचे निरीक्षण करुन ते बदलायचाही संकल्प करूया.
हा उपक्रम आहे आपल्यातील बदल टिपून ते शब्दरुपात उतरविण्याचा. तुम्ही हे लिखाण स्वतःच्या बदलांचा व सद्य स्थितीतील गुणदोषांचा घेतलेला आढावा या स्वरुपात किंवा तुम्ही २५ वर्षे पूर्वीच्या/नंतरच्या स्वतःला लिहिलेले पत्र या स्वरुपात सुद्धा लिहू शकता.
हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.
नियमावली :
१) लेखन कोठेही पूर्वप्रकाशीत नसावे.
२) लेखनासाठी शब्द मर्यादा नाही.
३) धाग्याचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"माझे स्थित्यंतर- {तुमचे नाव / मायबोली आयडी}"
४) प्रत्येक धाग्याला "मायबोली गणेशोत्सव २०२४" अशी शब्दखूण द्यावी
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
https://www.misalpav.com/node
कल्पना छान आहे. याबद्दल वाचायला आवडेल.
>>>>>>For a conscious being, to exist is to change, to change is to mature, to mature is to go on creating oneself endlessly.
-Henri Bergson
सुंदर कोटेशन आहे.
अनोखी कल्पना . नक्कीच वाचेल
अनोखी कल्पना . नक्कीच आवडेल वाचायला
मायबोली गणेशोत्सव २०२४ ही
मायबोली गणेशोत्सव २०२४ ही शब्दखूण देता येत नाहीये.
An AJAX HTTP error occured
HTTP Result Code 403
एरर येते आहे.
मला वाटते ७ सप्टेंबरला एकदम, लेख टाकता येइल का?
सामो तुमचा लेख तयार सुद्धा
सामो तुमचा लेख तयार सुद्धा झाला
@ लेखन उपक्रम, विषय फारच छान. किंबहुना जिव्हाळ्याचा..
मूड आला तर लिहायला आवडेल यावर..
छान उपक्रम. वाचायला आवडेल.
छान उपक्रम. वाचायला आवडेल.
या निमित्ताने आज आपल्याला स्वतःला स्वतःमधील जे दोष दिसत आहेत त्यांचे निरीक्षण करुन ते बदलायचाही संकल्प करूया. >>> झाकली मुठ झाकलेलीच राहू द्या की
>>>>>>>सामो तुमचा लेख तयार
>>>>>>>सामो तुमचा लेख तयार सुद्धा झाला Proud
नाही नाही
अरे मग मायबोली गणेशोत्सव २०२४
अरे मग मायबोली गणेशोत्सव २०२४ ही शब्दखूण देता येत नाहीये.हा शोध कोठून लावलात?
माझा लेख आहे पण इतका बंडल
माझा लेख आहे पण इतका बंडल झालाय ना की मी पुनर्विचार करते आहे. पण तोच लेख टाकायचा क्षीण प्रयत्न करत होते जेव्हा मला ती एरर आली. क्षीण कारण माझा हिय्या होत नव्हता.
छान उपक्रम.
छान उपक्रम.
छान उपक्रम.
छान उपक्रम.
हे वाचायला आवडेल. Following.
हे वाचायला आवडेल.
Following.
विषय फार आवडला. यानिमित्ताने
विषय फार आवडला. यानिमित्ताने अंतर्मुख होता येईल.
माझ्या सारख्यांसाठी अवघड विषय
माझ्या सारख्यांसाठी अवघड विषय आहे.
येऊ द्या.