मुलांनो,
काय ऐकतोय मी हे? आजकाल तुमचा स्क्रीन टाईम फार वाढलाय म्हणे ? तुम्ही उठसुठ मोबाईल टिव्हीवर कार्टून्स बघण्यात दंग असता.
असं नाही चालायचं. चला बाजूला व्हा पाहू त्या स्क्रीन पासून आणि जा पाहू जरा बाहेर मैदानात खेळायला.
काय म्हणता? आज खेळायला कोणीच नाही? रोज रोज तेच तेच खेळून कंटाळा आलाय?
जाऊ द्या, आजच्या दिवस घरातच खेळा. नाहीतर मग एक काम करता का? गाडीचे चित्र काढून रंगवून झाले असेल किंवा मग गाडीचे चित्र काढायचे नसेल तर तुम्हाला दुसरा विषय देऊ का?
इतका वेळ कार्टून्स बघण्यात घालवलात ना? मग आता एक काम करा त्याचेच एक छान चित्र काढून मला पाठवा पाहू. बघू या तरी आज काल पृथ्वीवर कोणते नवीन कार्टून्स आलेत ते!
चला तर मग घ्या परत ते कागद, पेन्सिल आणि रंग आणि " माझे आवडते कार्टून" काढा आणि रंगवा.
धाग्याचे शीर्षक खालीलप्रमाणे असावे.
चित्रकला उपक्रम : माझे आवडते कार्टून - तुमचा मायबोली आयडी - छोट्यांचे पूर्ण नाव
नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
४) चित्र स्वतः काढून रंगवलेले असावे. रंग कोणतेही वापरा.
५) चित्रं गणेश चतुर्थीपासून, ७ सप्टेंबर २०२४ (भारतीय प्रमाण वेळ) ते १७ सप्टेंबर २०२४ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
६) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२४" अशी शब्दखूण द्यावी
छोट्या दोस्त मंडळींनो, पाठवताय ना मग तुम्ही काढलेली छान छान चित्र ?
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
कौस्तुभने ( चिरन्जीव ) १०
कौस्तुभने ( चिरन्जीव ) १० वर्षापुर्वी माबो गणेशोत्सवात काढलेले .