Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संग्राम बेक्कार, युसलेस
संग्राम बेक्कार, युसलेस प्लेयर आहे एकदम. त्याला ना धड बोलता येत, ना आपला पॉइन्ट नीट मांडता येतो, ना कुणाशी जमवून घेता येते, ना शक्तीचा गेम जमत आणि डोक्याचा पण नाही जमत. पोकळ बॉडी काही कामाची नाही. एका खोलीतून दुसर्या खोलीत भरकन जायचे तर दम लागतो त्याला.
निकीला दाद द्यायला हवी मात्र. तिच्या अंगात ताकद आहे, अॅथलेटिक आहे, आणि हुषारीने स्वतःचा गेम खेळते. अरबाज चे किंवा कुणाचेही ऐकत नाही.
काल तिने अरबाज करवी सगळ्यांना लॉक करून अंकिता आणि पॅडी ला पहिले आउट केले ते फार स्मार्ट होते. कारण तिला व्यवस्थित माहित आहे की नंतर येणारा डिपी, सूरज यांनी त्या दोघांना उडवले नसते. जान्हवी, संग्राम ला ते आनंदाने उडवू शकतील. राहता राहिल अभिजीत, तो वाचला तर तिला चालणारच आहे.
अरबाज.आणि संग्रामने नक्की काय
अरबाज.आणि संग्रामने नक्की काय डील केल ते कळल नाही,पण अरबाजने तर आधीच सांगितल होत की पहिले संग्राम आणि अभिजितला काढायच.
निक्कीने अरबाजला न जुमानता पँडी इणि अंकिताला बाद केल.तिलाही खरतर पहिले जान्हवीला बाद करायच होत.
पण मला एक कळत नाही की संग्राम जर 3वीक्सची गँरेंटी घेऊन आला आहे तर तो तिसरा आठवडा राहणारच ना,मग कँप्टन झाला काय किंवा नाही झाला काय?
म्हणूनच निक्कीने काढल नसाव पहिल्या फेरीत.
टीम बी ला खरतर फार काही कष्टच नाही आहेत ,त्यांना तर फक्त अरबाजलाच बाद करायचे आहे,बाकी त्यांचेच तर राहणार आहेत की.निक्की तशीही नाहीच आहे रेसमध्ये.
तसही बिबॉसला जो हवा आहे तो सदस्य येईपर्यंत टास्क चालूच राहणार. या वेळी तो सदस्य अभिजित असावा.
अरबाज.आणि संग्रामने नक्की काय
अरबाज.आणि संग्रामने नक्की काय डील केल ते कळल नाही,पण अरबाजने तर आधीच सांगितल होत की पहिले संग्राम आणि अभिजितला काढायच.
निक्कीने अरबाजला न जुमानता पँडी इणि अंकिताला बाद केल.तिलाही खरतर पहिले जान्हवीला बाद करायच होत.
पण मला एक कळत नाही की संग्राम जर 3वीक्सची गँरेंटी घेऊन आला आहे तर तो तिसरा आठवडा राहणारच ना,मग कँप्टन झाला काय किंवा नाही झाला काय?
म्हणूनच निक्कीने काढल नसाव पहिल्या फेरीत.
टीम बी ला खरतर फार काही कष्टच नाही आहेत ,त्यांना तर फक्त अरबाजलाच बाद करायचे आहे,बाकी त्यांचेच तर राहणार आहेत की.निक्की तशीही नाहीच आहे रेसमध्ये.
तसही बिबॉसला जो हवा आहे तो सदस्य येईपर्यंत टास्क चालूच राहणार. या वेळी तो सदस्य अभिजित असावा.
संग्राम बोडयबिल्डिंग करत होता
संग्राम बोडयबिल्डिंग करत होता, अजूनही आहेच खरं तर पण imspiring वाटत होता, आता मात्र पार उतरला मनातून, अरबाजने एका हाताने त्याला पिन करून ठेवलेलं! एक तर ह्याच्यात दमच नाही (कसला दम लागत होता त्याला धावल्यावर) किंवा मग अरबाज निकीविरुद्ध जायचं नाही असं त्याने / बिबॉ ने ठरवलं असेल.. काहीही असो, त्याच्या इमेजची माती झालीय हे नक्की
निक्की रॉकींग, तिच चमकतेय
निक्की रॉकींग, तिच चमकतेय यावेळी. बाकी अभिजीत चोराच्या मनात चांदणे म्हणाला निक्कीसाठी, ते तिला काहीच समजलं नाही. अभिजीत बोलण्यात हुशार आहे. आज संग्रामच्या बाजूने निक्की होती आणि जान्हवीही होती. जान्हवी संग्रामवरुन बी टीमला बोलली. संग्रामचा काहीही कोणाला उपयोग नाही.
बाकी कितने अजीब रिश्ते है यहापे, असं म्हणावं लागेल.
आजचा एपिसोड हॅपनिंग वाटला मला. अरबाझ भारीच खेळला, डीपीही छान खेळला. सेकंड राऊंडला जान्हवी आणि संग्रामला डीपी बाद करणार हे ठरवलं डीपीने आणि त्यात अरबाझ सामील होता, तरी जान्हवीसमोर गोल गोल बोलत होता, डीपी बिनधास्त म्हणाला हाही सामील होता.
एकंदरीत या.सिझन मध्ये कोणीही
एकंदरीत या.सिझन मध्ये कोणीही कधीही पलटत आहे,दिवसागणिक गणित बदलत आहेत,आज हे एकत्र तर उद्या ते.हे आधीच्या चार सिझन मध्ये नव्हत,हे कदाचित या सिझनच वेगळपण असाव.
बाकी निक्कीच विसरण्याच कारण मलाही पटलेल नाही,वडिलांची शपथ वगैरे अगदी घेतली असेल,पण तिने मुद्दाम केल आहे असच वाटत.
संग्राम तीन आठवडे असल्याने त्यालाफार काही फरक पडेल अस वाटत नाही,फारतर फुस्का बार म्हणून बाहेर येईल किंवा बिबॉस बर्यापैकी एका आठवड्यात इमेज सुधारून मग पाठवणी करतील.
पण वजन जास्त असेल तर लवचिकता कमी होते,त्यात चाळीस वय असेल तर अरबाजसारख सफाईने नाहीच जाता येणार.पण मग पहिल्या आठवड्यात मी तुझ्यासाठी आलो आहे हे कशाला छातीठोकपणे सांगायच?
आज पँडी वर्षाला इतक सांभाळून बाजूला करत होता तरी या मँडम त्याच्याच नावाने ओरडत होत्या.
वर्षाला पाठवा आता घरी,कंटाळा यायला लागला तिचा.
सोमिवर अरबाजच बाहेर जाईल अशी चर्चा आहे,का वाटत आहे,लोकांना अस,त्याला कस काढतील?बिबॉसला कँप्टन अभिजित नको आहे,डीपी पण नको आहे,मागच्या वेळचा टास्क रद्द केला होता.मग अरबाज हवा आहे का?
ती वडलांची शपथ उगाच घेतली, ती
ती वडलांची शपथ उगाच घेतली, ती शपथ खोटी. स्वतःची घे शपथ, खोट्यात फॅमिली कशाला.
यावेळी वर्षाताई जायला हवी, अरबाझला नाही काढणार, शक्तीचे गेम तो एकटाच भारी खेळतो. काढलं तरी सिक्रेट रुममधे ठेवतील आणि नंतर त्याची आणि जान्हवीची जोडी जमवतील ( खरे मित्र मैत्रीण टाईप ).
बाकी अरबाझ निक्की स्वतःवर फोकस घेतातच, पॅडीदादा योग्य सांगत होते सर्वांना. निक्कीचं नाव जरी घेतलं तरी जान्हवीची एवढी तणतण होते, बघायला मजा येते. सारखा निक्की जप सुरु एकीकडे.
निक्कीला दिलेली शिक्षा तिच्या पथ्यावर पडतेय जणू, तिला नको असलेल्या लोकांना कॅप्टनशिपमधून काढू शकते ती. जान्हवी नकोच असते तिला. अर्थात तिने नाही काढलं पण डीपीने काढलं. एक मात्र आहे अरबाझच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हतं.
तो एक youtuber सांगत होता की
तो एक youtuber सांगत होता की बिग बॉसवर फार मोठं संकट आलंय, त्यामुळे दोन eviction होतील. एकतर अरबाज निक्की किंवा अरबाज वर्षाताई. काय संकट आलंय काय माहिती. कोणीतरी केस टाकली का, हाहाहा.
निक्की खेल गई.... अरबाज
निक्की खेल गई.... अरबाज कितीही चिडला तरी त्याला गुंडाळता येतं हे तिला बरोब्बर कळलंय...
संग्राम ला या आठवड्यातच बाहेर पाठवा.. काही कामाचा नाही... जान्हवी सुधरलेली इमेज परत खराब करुन घेणार... संग्राम ची बाजु घेण्याच्या नादात वेड्यासारखी बोलत होती.
काल पॅडी आणि अभिजीत शी बोलताना संग्राम ची त त प प होत होती. काहीही बोलत होता...
आता अजुन कोणी वाईल्ड कार्ड येइल असे वाटत नाही.
काल सोमीवर कुठेतरी अशी कमेंट वाचली की "संग्राम वाईल्ड कार्ड नाही तर चाईल्ड कार्ड आहे" हा हा हा... फार हसले मी..
निक्कीने या आठवड्यात संग्राम
निक्कीने या आठवड्यात संग्राम आणि अभिजीतशी संवाद साधला आणि मी तुमचा विश्वास मिळवायचा प्रयत्न करेन असं म्हटलं. आणि अरबाझला या दोघांना कॅप्टनसी टास्कमधून बाद करायचं असताना त्या दोघांना ठेवत अंकिता आणि पॅडीला काढलं. कारण काय तर मी विसर
लेली आणि संग्राममध्ये लीडरशिप क्वालिटीज दिसतात. ते तिच्यावर उलटल्यावरसुद्धा संग्राम आणि अरबाझनी डील केली होती असं दाखवत सगळ्यांना संग्रामवर सोडलं.निक्की की झप्पी मिळाली की अरबाझ पाघळतो.
अरबाझला अभिजीतला हरवून कॅप्टनसी मिळवून दाखवायची आहे का?
हाउअसमेट्सनी वर्षाला ती बोलते त्या शब्दांचा अर्थ विचारून हैराण करावं. त्याने पलायन केलं म्हणे.
बॉडी बिल्डर, वेट लिफ्टर्स, मल्ल या प्रत्येकाच्या फिटनेसचा प्रकार वेगळा असावा. बॉडी बिल्डर कमीतकमी फॅट आणि जास्तीतजास्त मसल्स ठेवतात. यामुळे वेग आणि दमसास कमी होत असावेत. प्रत्यक्ष ताकदही वाढत असेलच असं नाही. या सगळ्या मुळे संग्राम अरबाझसमोर उताणा पडला, हे त्यालाही अनपेक्षित असल्याने त्याचा आत्मविश्वास खच्ची होऊन गेम बिघडला. त्यात रितेश आणि हाउसमेट्स कडून अपमान.
हा आठवडा तो नॉमिनेटेड नाही, त्यामुळे पुढच्या आठवड्यात तीन हप्ते भरले की काढतील.
प्राणी ओळाखायच्या टास्कमध्ये निक्की आणि अभिजीत अशी जोडी होती ना? ती अनाउन्स झाल्यावर कॅमेराचा फोकस अरबाझवर आणि त्याचा चेहरा त्रासलेला.
निकी खरच भारी खेळली, ती
निकी खरच भारी खेळली, ती जान्हवीला कणभरही फुटेज देत नाही तिने कितीही आरडाओरडा केला तरी निर्विकार चेहरा ठेवते !
आजचा दिवस /ओव्हरॉल आठवडाच डीपीने गाजवला , पॅडीही शब्दांनी काय हाणतो एकेकाला , प्रचंड शार्प आहे !
संग्रामला मस्तं सुनावले अन्किता पॅडी आणि अभिजीतने , पूर्ण फ्लॉप शो झाला त्याचा.. जान्हवीनेही माती खाल्ली आहे या आठवड्यात !
या वीकमध्ये खरतर सूरजचाही
या वीकमध्ये खरतर सूरजचाही नंबर लागायला हरकत नाही,पण त्याला काढणार नाहीत.
संग्रामच्या हाताला फ्रॅक्चर
संग्रामच्या हाताला फ्रॅक्चर झाले का? तर कठीण आहे सगळे, यामुळे संग्रामला बाहेर जावे लागू शकते. मग या आठवड्यातील एलिमिनेशन रद्द होऊन वर्षा आजी वाचतील आणि पुढील आठवड्यात धनंजयला नॉमिनेशन मध्ये आणून घराबाहेर काढतील.
किंवा यांना प्रेक्षकांचा सो कॉल्ड आदर असेल आणि गेल्या धक्क्यावर रितेशने जसे बोलला होता की प्रेक्षकांच्या मतांचा आदर करतो वगैरे वगैरे तर मग या आठवड्यात दोन लोक घराबाहेर जातील ज्यामुळे यांचा प्लॅन फिस्कटेल.
जान्हवी आणि संग्रामचा संवाद
जान्हवी आणि संग्रामचा संवाद बघितला, अनसीन अनदेखा मधे. जान्हवी सांगत होती त्याला माझ्या मुलाचा खर्च खूप आहे म्हणजे मीच करते, तो मागत नाही, तो गुणी आहे. शाळेचा खर्चही खूप आहे पण मी कपडे खूप आणते त्याला. एका अॅक्ट्रेसच्या मुलाने शाळेत असं वेगळं असावं असं वाटतं मला. संग्राम म्हणाला माझ्या मुलांचा शाळेचा खर्च एवढा नाही, मुलांना तो नॉर्मल वागतोय, स्पेशल नाही. मुलांना एखादी गोष्ट नाही मिळणार ही सवयही हवी असं तो म्हणाला.
जान्हवी आणि संग्रामचा संवाद
.
बी टिमला एकदाही बझर वाजवता
बी टिमला एकदाही बझर वाजवता आला नाही!!!! नेहमीचाच गेम. पॅडी दादानी मस्तं रिंगणात घेतलं र्वषा ताईंना, संधि शोधत होताच!
पूर्ण आठवडा अरबाज निक्कीने
पूर्ण आठवडा अरबाज निक्कीने गाजवला, बेस्ट प्लेयर्स. आपल्या आवडो न आवडोत, फुल मार्क्स त्यांना. आज बिग बॉस दोन तास होतं.
सरबत टास्कमध्ये निक्की जान्हवी खूप प्यायलया सरबत, अरबाजला कॅप्टन करण्यात निक्कीचा सिंहाचा, जान्हवीचा वाघाचा आणि वर्षाताईचा शेळीचा वाटा. आता अरबाज, निक्की, जान्हवी, वर्षाताई grp ए झाला.
तो पंचवीस हजार बक्षीस मिळण्याचा टास्क अंकीता, पंढरीनाथदादा जिंकावेत वाटत होतं, मस्त जिंकले. दादा बेस्ट अगदी चपळ. वर्षाताई, डीपित ताई सांगताना वेळ लावत होत्या, डीपि चपळ होते. जान्हवीची मजा येते, ती सारखी वाकडी तिकडीच होत असते (सॉरी), निक्की अरबाजपेक्षा कमी वेळेत तिने आणि सुरजने पूर्ण केल्यावर, तिला वाटलं आपण जिंकलो, नंतर पचका झाला.
नाचगाणी मला बोअर झाली, पण स्पर्धक खुश झाले. नंतर जान्हवी, pady दादा काही बोलले म्हणून सुरज रूसला. अभिजीतने छान समजूत काढली त्याची.
उद्या वीकएंड वार नाही का, पत्रकार परिषद आहे. संग्राम दुखापतीच्या कारणाने बाहेर जाईल बहुतेक. बिग बॉस सुस्कारा सोडेल, हाहाहा. लागलं ते वाईट झालं. अभिजीतने स्वत:ची काळजी घ्यायला हवी, त्यालाही बोटाला लागलं आहे.
अशी अफवा आहे की हिंदी बिबॉस
अशी अफवा आहे की हिंदी बिबॉस सिझन लवकरच चालू होत आहे,त्याच्यावर मराठी टीआरपीचा परिणाम होऊ नये,जसा मराठी सिझन तीन मुळे त्यावेळचा हिंदी सिझन फ्लॉप गेला.होता ,तस होऊ नये म्हणून हा सिझन लवकर संपवणार आहेत.कारण पत्रकार एवढ्या लवकर कधीच येत नाहीत.
बाकी,आज टीम बीला नो सिंपथी.अरे ,एकदाही बझर वाजवता येऊ नये.
अरबाज खरच डिझर्व्ह करतो कँटनशीप नेक्स्ट वीकची.
पण मला वाटत , किल फक्त निक्की नाही तर अरबाज नेही गेम केला.फुल प्लँन होता.थोडा वेळ भांडले,मग जान्हवीला अरबाजने लगेच घोळात घेतल,डीपी कडून जान्हवीला बाहेर काढल,म्हणजे कँप्टनशीपसाठी जान्हवी आपल्या बाजूने,वर्षाला तर आधीच घोळात घेतल होत.आणि सगळ त्यांच्या प्लँनप्रमाणे झाल.पूर्ण मामा बनवल.अगदी जान्हवीरा सुध्दा.
तसच निक्की अरबाज जिंकणार नाही याचीही खबरदारी घेत आहे,स्वत:ला तिने त्याचा विक पॉईंट आणि त्याचा अँगर इश्यू हा मायनस पॉइंट ठेवल आहे,त्याला निगेटिव्ह दाखवायच असेल की ही अभिजित कार्ड खेळून त्याजा अँगर लोकांना दाखवते,मग टास्कमध्ये पुढे जाण्यासाठी त्याच्या विक पॉईंट चा वापर करते.
पण एवढ होऊनही मराठी बिबॉस ही जिंकणार नाही ऑर जिंकवणार नाहीत.
आज संचालक अभिजीत आणि संग्राम
आज संचालक अभिजीत आणि संग्राम महामूर्ख वाटले !
निकी आहे चपळ पण द्यायचे कि पॅडीच्या बाजुने डिसिजन, कशाला निकीने बझर वाजवला असे जाहिर केले ? खेळा कि बायस्ड, हु केअर्स !
लोकांना त्या फालतु निकी जान्हवी बायकांबाबत फेअर डिसिजन देणे नकोय , काय झालं असतं ? विकेन्डला ऐकावं लागलं असतं पण कॅप्टन तर डिपी झाला असता !
टिम बी मधे एकालाही निकीला पकडून ठेवायची हिंमत नाही का ?
सर्वात मोठी लुजर आणि तोंडावर पडली ती वर्षा , असलेली इज्जत पूर्णपणे गमावून बाहेर जाणार ती वर्षाच !
अभिजीतला कशाला नाचवलं बिबॉने ? हिडीस नुसता, १% सुद्धा फनी नव्हतं !
बी टीम कसली मठ्ठ आहे राव.
बी टीम कसली मठ्ठ आहे राव. पहिल्या फेरीत निकी वेगात पळतंय कळलं तेव्हा दुसऱ्या फेरीत अंकिता ने तिला पकडून पॅडी ला पळू द्यायचं ना. कसले लोक हे. अजिबात बीबॉ जिंकायला लायक नाहीत
आणि सुरज काय काल रुसून बसला होता. जा म्हणावं आता घरी. काहीही मुद्दा. अंकिता त्याच्यावर वैतागली तेच ठीक वाटलं मला. अभिजित उगीच चॉकोलेट वगैरे देऊन समजावत बसला. कुक्कुलं बाळ आहे का ते ?
बीबॉ 70 दिवसात बंद होणार अशा बातम्या येत आहेत. आज थेट पत्रकार आलेत. असं असेल तर या आठवड्यात दुखापतीमुळे संग्राम आणि वोट ने वर्षा जाणार.
पण एवढा सो कॉल्ड प्रचंड
पण एवढा सो कॉल्ड प्रचंड टीआरपी असताना,केवळ हिंदी बिबॉससाठी 70दिवसात खेळ आटपणे,तो ही दोन वर्षांनंतर आलेल्या सिझनचा, हे कितपत योग्य आहे,जर ही अफवा खरी असेल तर.
कोणी म्हणत आहे,रितेश बिझी आहे शूटिंग मध्ये,म्हणून आज पत्रकार परिषद,पण ती इतक्या लवकर कधीच नसते.
रितेशला जमत नसेल तर आणा ममांना,झाले रितेशचे दिवे ओवाळून. आता एकसुरी वाटत आहे.
तसही ममां नसायचे तेव्हा त्या महाइरिटेट करणार्या सिध्दूला आणायचे की.
खर काय ते कळत नाही,पण संग्राम जाणार हे तर निश्चित.
पण घरातल्या बी टीमवाल्यांना अरबाज जाऊ शकतो ,अगदी सोमिवर पण काहींच म्हणण आहे की तोच जाऊ शकतो,अस का वाटत आहे.
मला तर सूरज आणि वर्षा दोघांना गेलेल बघायला आवडेल.
बिबॉसचा विनर अजूनही ठरत नाही का?
अरबाज अभिजितवर जळतो अस निक्कीच म्हणाली,मग अरबाज आणि अभिजितला टॉप 2मध्ये ठेवून अभिजितला विनरही करू शकतो बिबॉस.
काल किती तो फुटेज अभिजितला.
खरच बीभत्स वाटत होत ते.काही गरज नव्हती.
फेल्वर्स ओळखायच्या खुणा
फ्लेवर्स ओळखायच्या खुणा मला कळल्या नाहीत. या लोकांनी इतक्या पटापट कशा ओळखल्या?
कालच्या एपिसोडवरच्या इथल्या बहुतेक कमेंट्सशी सहमत. संग्राम जाऊ दे.
फक्त ७० दिवसांत गुंडाळून चॅनेल स्वतःची नाचक्की करून घेणार नाही असं वाटतं.
यांना वाइल्ड कार्डपण मिळत नाहीत का? आरोह दोन सीझनमध्ये वाइल्ड कार्ड होता. हिंदीवाली राखी .
ऊअफवा पसरत आहेत सोशल मिडियावर
ऊअफवा पसरत आहेत सोशल मिडियावर खरय पण कलर्सने कुठेही ऑफिशिअल अनाउन्सम्नेट केली नाहीये ७० दिवसच्या शो ची !
हो कारण ,तस.असत तर पहिले नवीन
हो कारण ,तस.असत तर पहिले नवीन शोची निदान अँड तरी आली असती.
मला तरी अभिजीत सावंत किंवा
मला तरी अभिजीत सावंत किंवा सुरज विनर झालेले आवडतील. आभिजीत इतका शांत संयमीआहे. बी टीम मधील लोकच बर्याचदा त्याला बोलताना दिसतात. पण तो कुठलाच राग मनात ठेवत नाही. मी अशी टीम कधीच सोडली असती. अनेक लोक त्च्जळतात पण तो खरंच विचारी आहे. आयुष्यात आलेल्या अपयशाने जमिनीवर आहे. माणुसकी आहे.सर्वांनाच बेसिक रिस्पेक्ट देतो. ताऊन सुलाखंन निघाल्यिमुळे बराचसा समतोल आहे. अंकिता हुशार आहे वाटलेलं पण ती प्रचंड जळते आभिजीतवर. फारच केविलवाणे दिसते ते. खूप अपेक्षा होत्तिया तिच्याकडून पण तिला तर काहीच प्लॅन करता येत नाही. पॅडी मात्र अनेक वर्ष काम केल्यामुळे हुशार आहे. माणसांना चांगलेच ओळखतो. फक्त अंकिताला समजून सांगत नाही. पण अनेकांना चांगली साथ देतो.
अभिजीत किंवा पॅडीदादा जिंकले
अभिजीत किंवा पॅडीदादा जिंकले तर आवडतील. निक्की दुसरी येण्याइतकी तिची कामगिरी आहे, जान्हवीपेक्षा. सुरज पाचात असेल पण तो चमक दाखवत नाहीये. त्यामुळे जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत.
कालची नाचगाणी सुरु झाली आणि मी आपली वाचत बसले. शेवटचं समजून टीव्ही बंद करणार होते पण पुढे होतं बिग बॉस. आज निलेश साबळे आणि पत्रकार परीषद आहे.
सत्तर दिवसांत आटोपणार असतील तर आज अरबाझही बाहेर जाऊ शकेल, खरंतर हा विक तो छान खेळला. संग्राम आणि वर्षा जायला हवेत.
बोअर होती पत्रकार परिषद.
बोअर होती पत्रकार परिषद. कोणी वेगळं काही बोललं नाही.
संग्रामला काँट्रॅक्टबद्दल बोलल्यामुळे एव्हिक्ट केलं असं वाटतंय. फ्रॅक्चर एक्सरेतून कळतं आणि तो करायला एवढा वेळ लागत नाही.
तसंच दोन्ही वेळा संग्रामच्या नो रिअॅक्शन्सवरून त्याला जे सांगितलं जातंय ते आधीच माहीत होतं, हे प्रेक्षकांसाठी आहे, असं वाटलं.
अरबाझ शेवटी जान्हवीबरोबर गेम खेळला. जो तिच्यासोबत असतो , तो बाहेर जातो असं तो म्हणाला. सांगताना टीम बी वर ढकललं.
चला संग्राम गेला एकदाचा. खुप
चला संग्राम गेला एकदाचा. खुप डिस्टर्ब वाटला जाताना.
बाकि जान्हवी ला रडताना दाखवुन बिबी सिम्पथी देत आहेत.
दोन नवीन मालिकांचे प्रोमोज
दोन नवीन मालिकांचे प्रोमोज दिसताहेत. तुळजाभवानीचा गेला आठवडाभर दिसतोय. ही ३ ऑक्टोबरपासून सुरू होते आहे.
दुसरा आज सैराटच्या कॉपीकॅट मालिकेचा प्रोमो आला. नायिका रिंकूची कॉपी.
अफवा खरी असू शकते.एका
अफवा खरी असू शकते.एका रिअँलिटी शोची पण अँड आली आहे.केदार शिंदेचाच आहे.
पण आता या सिझनमध्ये फार काही आहे अस वाटतही नाही.तेच तेच परत होणार.
जान्हवी आता मला जाऊ द्या ना घरी अस म्हणायला लागली.
निक्कीलि हा प्रश्न कुठल्याही पत्रकाराने विचारला नाही की धक्क्यावर अगदी छातीठोकपणे सांगितल होत की टीम ए मधल्या कोणालाही ट्रॉफी उचलून देणार नाही.पण काल अरबाजला म्हणाली की ट्रॉफी उचलायची आहे.
विनर अभिजित किंवा सूरजपैकीच होईल अस वाटत आहे.
खरतर सिझन संपायला आला असेल.तर अजूनही कोणीही विनिंग मटेरियल वाटत नाही.
Pages