Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो ना. फेअर किंवा बायस्ड
हो ना. फेअर किंवा बायस्ड काहीतरी टिप्पणी करायला हवी होती.
अमृता रोस्ट मस्त करते. एक दोन शॉर्ट्स बघितले.
जान्हवीने वर्षाचे पाय दाबणे
जान्हवीने वर्षाचे पाय दाबणे बघून फुग्याला टाचणी लागल्यासारखे वाटले खर तर
जान्हवीची व्हिलन गिरी फेक आहे. अॅक्टिंग ची ऑडिशन
मला तर वाटते वर्षाला पण तिने आधी कल्पना दिली असावी, नाहीतर एकमेकीशी इतके कॉर्डियली अधे मधे कसे बोलतात त्या?! त्यामुळे रितेश ने ते क्लास घेणे वगैरेला माझ्या मते काही फार अर्थ नाही. "जान्हवीने आठवडा गाजवला" हेच काय ते मॅटर करते तिला.
मला वाटतं रितेशला जास्त राग
मला वाटतं रितेशला जास्त राग शासनाच्या निवडसमितिला नकळत नावं ठेवली जान्हवीने त्याचा आला असावा, कदाचित वर्षाला शासनातर्फे एखादे पारीतोषिक रितेशचे बाबा मुख्यमंत्री असतानाही मिळालं असेल. ते जान्हवीचे अति होतं मात्र.
मेधा धाडेने जान्हवीला झोडले
मेधा धाडेने जान्हवीला झोडले आहे. बऱ्याच कलाकारांनी महाराष्ट्र शासन पुरस्कार समितीवर प्रश्नचिन्हे उभं केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे जान्हवीवर.
जान्हवीला जे हव होत तेच
जान्हवीला जे हव होत तेच भाऊंनी छान दिल,तिला तर आता आणखी चेव चढेल.तिची कालची एक्स्प्रेशन्स बघता,मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि निक्कीचि चेहरा फुल पडला होता.ते धक्क्यावर नंतर जे झाल ते तिच फ्रस्ट्रेशन होत.
याउलट तू अजूनही निक्कीची सावली बनूनच फिरत आहेस, अस सांगितल असत तर जान्हवीचा पोपट झाला असता.
निखिलला छान समज दिली,उसगावकरला पण छान समजावल.
बावळट ग्रुपच कौतुक केल पण मला आ्अजूनही तो अख्ख्या असा ग्रुप वाटत नाही,कधीही फुटेल.काल उसगावकर पिकनिक स्पॉटला जायला पटकन तयार नव्हती,म्हणे मी तिथे फार नसते.यिवरूनच कळत आहे,जिथे सरशी तिथे ही जाणार.
आज अक्षय कुमार आणि इतर काही पिक्चर प्रमोशनसाठी येत आहेत,म्हणजे फिल्मीपणाच जास्त असेल.कशाला बोलावतात यांना.
त्या योगिताला जायच तर पाठवा ना घरी.कशाला ठेवत आहेत?
त्या सूरजला बाहेर प्रचंड सपोर्ट आहे ,कशासाठी माहित नाही.
पुढार्याबद्दल काहीही न बोलता चांगली समज दिली भाऊंनी.
त्या एरिनाला पण फार चढवत आहेत,तिला काय मराठी शिकायला आणल आहे का,नॉमिनेशन पासून चक्क वाचवत आहेत,की मुद्दाम वैभवबरोबर पेअर करायला सांगितली आहे,म्हणजे काही काळ राहील.
वैभवला खरतर काल भाऊंनी अरबाजविरुध्द दम दाखव अस सांगून उकसावल.
येत्या आठवड्यात कदाचित बिबॉस दोघांना विरुद्ध टीममध्ये टाकेल.
बाकी निक्कीचा ग्रुप पण असा घट्ट वगैरे वाटत नाही आहे.
नवीन प्रोमो जान्हवीला चक्कर
नवीन प्रोमो जान्हवीला चक्कर आली आहे. तिची चुगली आली बहुतेक आणि ती रितेशने सांगितली अक्षयकुमार समोर. आठवडाभर हिने ह्याला त्याला त्रास दिला, आता तो हायपरपणा उलटला बहुतेक तिच्यावर.
मेधा धाडेने जान्हवीला झोडले
मेधा धाडेने जान्हवीला झोडले आहे. बऱ्याच कलाकारांनी महाराष्ट्र शासन पुरस्कार समितीवर प्रश्नचिन्हे उभं केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे जान्हवीवर.
>> हे सगळं कुठे दिसतं??
रितेश बोलतोय चांगले. तो हे
रितेश बोलतोय चांगले. तो हे ही बोलून गेला काल , की मी बोलतो ते सगळे माझे नाही, बिबॉ ची टीम सगळे अनॅलिसिस करते आणि ते त्याला दिले जाते. ( मेक्स सेन्स) अर्थात तरी पण समोरच्याने बोलल्यवर फॉलो अप प्रश्न आणि रिअॅक्शन्स हे करावे लागतच असेल मॅनेज.
तिची कालची एक्स्प्रेशन्स बघता,मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या >>> +११ आता आज चक्कर आल्याचे नाटक केलेय. पण ते अर्थातच सगळ्यांना कळले असेल.
निकी साइड ला गेल्याचे दिसतेय म्हटल्यावर लगेच ब्रेक मधेच तिने आरडा ओरडा सुरु केला
मला पण इरिना अजिबात क्यूट वगैरे वाटत नाही. तिला फारसे समजतच नसावे काय चाललय. लिंबू टिंबू आहे. पण तिला ठेवणार २-३ आठवडे तरी.
व्हिलन गृपला वाटतय कि त्यांचा
व्हिलन गृपला वाटतय कि त्यांचा गृप छोटा असल्यामुळे अॅज ऑलवेज सिंपथी घेणारा वगैरे असेल, यावेळी पहिल्यांदाच मोठा गृप सिंपथी घेतोय
पिकनिक पब्लिक पडले मध्यमवर्गीय सुसंस्कारी मराठी लोक, त्यांना काल शिक्षा मिळाली तरी कही आचरणात आणता येणार नाहीये रितेशने जे सांगितले ते, अॅग्रेशन / स्टँड घेणे कितपत करतील शंकाच आहे!
अन्किताकडून अपेक्षा आहे पण ती आपली प्रवोचन देत बसते , अभिजीत बघू काय करतोय !
वर्षात आहे हिंमत पण तिला काही फार एन्करेज करत नाहीये रितेश , आता एकच उपाय राहिला, आणा खुर्ची सम्राट आणि फोडा निकीचा गृप ! निकी अभिजीत एकत्रं वि. अरबाझ गृप झाले तर होईल राडा !
वैभवला खूप हिन्ट्स दिल्या कि अरबाजह्शी नड, तो काही करेल असं वाटत नाही !
काल डिपीला बोलले तेही आवडलं.
काल डिपीला बोलले तेही आवडलं. तो, अभिजीत, पॅडी यांना चान्स होता वर्षाला जान्हवीने ( ते खरे खोटे काही का असेना) बोलल्यावर तिथे स्टँड घ्यायचा आणि हिरो बनण्याचा. पण त्यांनी सुवर्ण संधी सोडली.
Villain gang पेक्षा देखील
Villain gang पेक्षा देखील वर्षा उसगावकर डोक्यात जाते. वयाच्या मानाने खूप बिनडोक वाटते. आणि आपलं वय काय आणि आपण किती बालिशपणा करतो ? कोण म्हणालं आठवत नाही, पण वर्षा बाई भांडतच राहते. 'शेवटचा शब्द माझा ' category आहे. त्यासाठी कितीही भांडण करावं लागेल तरी चालेल. बऱ्याच वेळा भांडण उकरून काढते. Extremely annoying आणि अत्यंत cunning आहे. एवढी आवडत नाही की जान्हवीने अपमान केल्यावर देखील न आवडणाऱ्या जान्हवीचा राग आला नाही.
दुसरं डोक्यात जाणारं व्यक्तिमत्त्व पुढारी.
गुलिगत चा अर्थ माहित नसलेल्या
गुलिगत चा अर्थ माहित नसलेल्या लोकांसाठी आज सूरजने स्पष्टीकरण दिलं.
गुलीगत ~ गोलिगत ~ गोळीगत ~ गोळीप्रमाणे :हे भगवान:
आजचा एपिसोड चिक्कार म्हणजे खच्चून बोर झाला. अमराठी लोकांना आणून त्यांना सामावून घेण्यासाठी काहीतरी चाललेलं होतं.
रितेश चे मराठी सुद्धा किती घाणेरडे आणि अशुध्द आहे. न ण, ल ळ तर सोडूनच द्या पण इन् जनरलच !! आजही कलर्सने चंद्रकोरीचं चिन्ह घेतलं आहे ला कलर्सने चंद्रकोरीच चिन्ह घेतलं आहे म्हणाला.
जान्हवीला खरंच चक्कर आली असेल
जान्हवीला खरंच चक्कर आली असेल तर ठीक म्हणजे वाईट वाटेल, नाहीतर ती अटेंशन सीकर वाटतेय. काही पब्लिक सहानुभुती मिळणार तिला अजिबातच. ही वाट्टेल ते बोलते, तिचं खरं बाहेर आलं की कसं.
नविन पाहुणा येणार आहे, म्हणजे वाईल्ड एंट्री नाही. तो कदाचित कलर्सचे झोपलेले दोघे दामले आणि योगिता यांना जागं करायला येणार आहे.
हे सगळं कुठे दिसतं?? >>> मोबाईलवर क्रोम ओपन केल्यावर आपोआप न्युज येतात त्यात समजलं.
गुलिगत चा अर्थ माहित नसलेल्या लोकांसाठी आज सूरजने स्पष्टीकरण दिलं. >>> हो. मला अर्थ इथेच स्वरुप यांनी सांगितलेला.
सुरज साफसफाई, टास्कमधे थोडंफार नडणं, झाबुक झुपुक करुन ट्रॉफी नेणार यंदा.
आजचा रिझल्ट युट्युबवर पहाटे वगैरे समजलेला पण लिहीलं नव्हतं त्याबद्द्ल काही.
अन्किता, आर्या थोडफार पॅडीच
अन्किता, आर्या थोडफार पॅडीच जरा बर मराठी बोलतात, वर्षा पिना मारतेच...आणी जान्हवी-निक्की मिळेल तस फूटेज घेत राहतात..सध्या दोघि मधेच ग्रुप लिड करण्यावरुन आणी अॅटेशन साठी स्पर्धा चालु आहे...सुरज काय बोलतो ते कळत का कुणाला? बाकी मडळी इतकी नाइव्ह आहेत की ऑपोझिट ग्रुपचा ड्रामा समजु नये? योगिताला सोमवारीच नारळ द्या.रितेश फार अशुद्ध बोलतो आणी फ्लो पण विचित्रच आहे ...फार एकसुरी करतोय होस्तिन्ग.
आर्याचं मराठीही भयानकच आहे.
आर्याचं मराठीही भयानकच आहे.
अन्किता, वर्षा आणि पॅडी सोडून सगळा आनंदच आहे मराठीचा !
त्यामानाने अक्षयच मराठी बर
त्यामानाने अक्षयच मराठी बर वाटल फॉर द चेन्ज! अक्षय चान्गल बोलतो मराठी...रितेशच हिन्दी चान्गल आहे त्यामानाने
जान्हवी ला हवा होता तसा तिने
जान्हवी ला हवा होता तसा तिने हा आठवडा गाजवला आणि भाउचा धक्का वर तिचीच चर्चा झाली.. रडायचा अटोकाट प्रयत्न करुनही तिला अजिबात रडायला येत नव्हते.उलट मनातुन खुश झालेली जाणवत होतं.. काल बेशुद्ध पडायचं नाटक आणि मग काही वेळापुर्वी बेशुद्ध पडलेल्या जान्हवी ताईंनी मेरे ढोलना वर जोरदार नृत्य सुद्धा केले...
आजपासुन आता निक्की परत लीड घेणार... जान्हवी आणि निक्की ची एकमेकींवर कुरघोडी बघत बघत या सिझनची ट्रॉफी झापुक झुपुक करत सुरज भाउ नेतील आणि बाकी सगळे येडे लोक बघत बसतील असं कालचं चित्र होतं..
जान्हवी कडुन पाय दाबुन घेणार्या वर्षा अजिब्बात आवडल्या नाहित. याचा अर्थ स्पष्ट आहे की जान्हवी जे करतेय ते खोटं आहे हे वर्षाला सुद्धा माहिती आहे. कदाचित त्यामुळे पण बाकी लोक त्या दोघींच्या भांडणात पडले नसतील. वर्षा अचानक आवडेनाशी झाली मला या २-३ दिवसांत... अजुन २० वर्ष तरुण रहाण्याची महत्वकांक्षा आहे म्हणे.. बापरे..
पुढार्याला या आठवड्यात अनुल्लेखाने मारला... निक्की सोबत त्याचा चाललेला येडेपणा बघवत नाही. आधीच ती मराठी बिबॉ मधे न शोभणारे रिव्हिलींग कपडे घालते त्यात हा जाउन तिला ताई ताई करुन मिठ्या मारतो ते बघायला चीप दिसतंय.. काल रितेश ने पण उल्लेख केला जाता जाता.
आज निक्की चा राडा दिसतोय... तिचं सामान पॅडी ने उचललं म्हणुन तिने दंगा घातलेला दिसतोय..
गेल्या आठवड्यात सामान उचलण्यावरुन निक्की आणि पॅडी ची बाचाबाची झालेली.. सेम सीन राखी सावंत आणि निक्की मधे हिंदी बिबॉ मधे होता. तेव्हा पॅडी च्या जागी निकी राखी ला सामान उचलायची विनंती करत होती... काल इन्स्टा वर अचानक या प्रसांगाचा व्हिडिओ बघण्यात आला.. आणि निक्की ने राखी कडुन बर्याच टिप्स घेतल्या हे कळलं...
अक्षय आणि टीम बोअर झालं काल... अभिजीत सावंत आणि अरबाझ टास्क पन बोअर.. अर्बाझ ला काय बोलावं सुचत नव्हतं... मुद्दे च नव्हते त्याच्याकडे उत्तर द्यायला...
योगिता चे काही इन्स्टा व्हिडिओ पाहिले. कसली मस्त नाचते ती.. अशी काय सॅड आहे इथे... चांगली प्लेअर बनु शकेल खरतर ती असं वाटतंय...
अक्षयचे मराठी खरच
अक्षयचे मराठी खरच अपेक्षेपेक्षा चांगले होते..... आणि त्याची स्टाइल बिग बॉस होस्टींगला परफेक्ट आहे...... मराठीवर अजुन काम केले तर तो मस्त होस्ट करेल बिग बॉस!!
तापसी पन्नू मस्त दिसत होती आणि फरदीन किती म्हातारा दिसायला लागलाय!!
रितेशने जान्हवीला झाडले पण तिला शष्प फरक पडला नाही..... ते चक्कर, मेडिकल रुम वगैरे सगळे नाटक असणार...... कारण लगेचच ती पाहुण्यांसमोर अंकिताबरोबर मस्त नाचताना दिसली.
काल दामले , योगिता वगैरे मंडळी वोटींगमध्ये बॉटमला असणार म्हणून नो एलिमिनेशन!!
बाकी ज्या स्पीडने आणि स्टाईलने रितेश या लोकांना झापतोय.... पाच सहा आठवड्यानंतर आतल्या लोकांना ते एकदम सवयीचे होऊन जाईल आणि मग कुणालाच कशाचेच काही वाटणार नाही त्यापेक्षा सटल हिंट देऊन सर्काझमचा जास्तीत जास्त वापर करेल तर त्याचे होस्टींग अजुन इफेक्टीव्ह होईल!!
अमृता म्हणतेय की अंकिताला बिग बॉस चे घर म्हणजे मठ वाटतोय बहुतेक आणि ती त्या मठाची मठाधिपती!!
डीपी दादा मने जिंकतायत पण खरच त्यादिवशी अरबाझसमोर हटून बसले असते तर लोकांचे अजुन आवडते झाले असते.... चांगली संधी दवडली!!
बाकी त्या एरिनाला उगाच चढवून ठेवलेय..... एक नंबरची फेक वाटतेय ती!!
आर्याबद्दल बोलताना काय ती सिग्नलची मेटाफोर वापरली ती अतिशय गंडलेली होती!!
मला ते सूरज प्रीमियरला जे बोलला ते "झाकपूक झुकपूक" असे ऐकल्यासारखे वाटतेय..... त्याचे या सगळ्यांनी "झापूक झूपूक" काय करुन टाकलय?
नक्की काय आहे ते कुणाला माहित आहे का? Any Suraj fans here?
बाकी त्या एरिनाला उगाच चढवून
बाकी त्या एरिनाला उगाच चढवून ठेवलेय..... एक नंबरची फेक वाटतेय ती!!>>> +१ तिला मराठी शिकायला घेतलय? ?वैभवला तिच्याशी जोडी जमवच असा धाकयुक्त आग्रह दिसतोय.
वर्शाचा आदर वैगरे ठिक आहे पण तीला स्पेशल ट्रिटम्नेट का मिळावी...ती पण कॉन्टस्ट्न्टच आहे ना?जान्ह्ववीच कौतुक झाल्या झाल्या निकी इनसिक्युअर..पुढारीने निक्कीला मिठ्या मारण वैगरे टु मच
जान्हवी कडुन पाय दाबुन घेणार्
जान्हवी कडुन पाय दाबुन घेणार्या वर्षा अजिब्बात आवडल्या नाहित. +123
आणि वरच्या सगळ्या कॉमेंट्स शी अगदीच सहमत !!
जान्हवीला चक्कर नव्हती आली
जान्हवीला चक्कर नव्हती आली किंवा ती बेशुद्ध सुद्धा झाली नव्हती . anxiety झाली होती तिला त्यामुळे पॅनिक अटॅक सारखं झालं होतं . बहुधा आपण जे बोललोय त्याबद्दल निक्की आपलं भरीत करते कि काय विचाराने तिला कापरं भरलं होतं .
निकि विरुद्ध ती जे काही बोलली ते तिला नीट आठवत असून ती नाटक करतेय हे नीटच कळत होतं.
मला अर्धा भाग बोअर झाला . ..
हो पॅनिक अटॅक सारखं थोडं झालं
हो पॅनिक अटॅक सारखं थोडं झालं असेल पण नाटक पण असणार थोडे. निकीने ते चुगली प्रकरण अगदीच थंडपणे घेतले. एक प्रकारे स्वतःवर फोकस घ्यायची संधी सोडलीच त्यामुळे जान्हवीला रडणे, चक्कर वगैरे नाटके करून तिच्यावर फोकस ठेवता आला. तो मस्त चान्स होता, आख्खा ग्रुप फूटेज घेउ शकला असता. आज आरडा ओरडा अन सामान फेकणे वगैरे बोअर आणि बर्यापैकी ऑबव्हियस वाटेल त्या मानाने.
निकीला आता हे नक्की समजले असेल की जान्हवी तिला साइड ला टाकू शकते.
दुसर्या ग्रुप मधे काहीही एकी , बाँडिंग काहीच नाहीये. त्यामुळे हे निकीच्या ग्रुप चे लोक हवेतच बिबॉ ला.
बाकी वर्षा आणि पुढारीबद्दल वरच्या सगळ्यांना +१
अरे कसली माठ मंडळी भरली आहेत
अरे कसली माठ मंडळी भरली आहेत या पिकनिक गॅंगमध्ये!! शक्तीचे टास्क वगैरे बाजुला राहू द्या फक्त मराठी बोलायच्या टास्कमध्येही हे माती खातायत!!
पिकनिक गँगला डोकं कमीच आहे,
पिकनिक गँगला डोकं कमीच आहे, मालवणी भाषा ही मराठीची बोली भाषा आहेना. ती का नाही चालणार. इतर ग्रामीण शब्द येत होते की बोलण्यात. प्रमाण मराठी हवं हा रुल कुठे होता. पिकनिक गँगला बाळाचे लंगोट स्वतःकडे लपवता नाही आले. अंकीताने इंग्लिश शब्द वापरले ते चुक होतं.
योगिताची अवस्था बघवत नाहीये, तिच्यासारख्यांनी यायला नको होतं. इथे जर यायचं तर स्वभाव चांगला असला तरी टफ असायला हवं. भांडता येत नसलं तरी किमान चांगल्या शब्दात विरोध व्यक्त करायला हवा, मत मांडायला हवं. कॉन्ट्रँक्ट अटी अशा असतील की खूप दंड भरायला लागेल, तो ताकदीच्या बाहेर असेल, म्हणून योगिता रिक्वेस्ट करतेय. तिचा स्वभाव असा नाहीये की ती कोणालातरी मारुन, रुल ब्रेक करुन बाहेर जाईल. बिग बॉस पाठवा तिला घरी.
जान्हवी फारच खोटारडी आहे, पब्लिक प्रोमो बघितल्यापासून नाट्क आहे हे म्हणत होतं. पब्लिक सहानुभुती तिला तरी अजिबात मिळणार नाही. शासनाच्या पुरस्कारांना नावं ठेवली हा पॉइंट ऑलरेडी विरोधात गेलाय. ती, निक्की, अरबाज यापैकी कोणीतरी रनर अप होऊ शकतो, विनर नाही.
एकीकडे योगिताचं एवढं डीटेल्स
एकीकडे योगिताचं एवढं डीटेल्स मधे का दाखवतायेत असं वाटलं . तिने एक जबरदस्त हिट सिरीयल दिली आहे कलर्सला. इथे तिचा टी आर पी साठी उपयोग नाही (आकांड्तांडव, मारामारी करुन बाहेर पडणाऱ्या गटातली ती वाटत नाही), बाहेर तिचा सौरभ नवरा बिग बॉस मधल्या भाषेबद्द्ल टीप्पणी करतोय, तो त्याच सिरीयलचा हिरो होता. तसं कलर्स चॅनेलसाठी दोघांचं योगदान आहे. काही महिन्यांपुर्वीच लग्न झालंय त्यांचं. मला आवडतात दोघेही. तिच्या तोंडून वदवून घेतलं की इथे काय चालते ते तिला माहिती होतं पण आल्यावर प्रत्यक्ष राहिल्यावर तिला त्रास होतोय, ती फार डाउन झालीय. कलर्सला नक्की काय करायचं आहे. कलर्सची ती असल्याने ते गुपचुप votes कमी दाखवून बाहेर काढू शकले असते पण असं न करता सौरभला आणायचे आहे का वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून.
मोस्टली योगिताला evict करतील विकेंडला असं वाटतंय.
योगिताला पाठवतील असंच मला
योगिताला पाठवतील असंच मला वाटते.
निकीला किती घाबरतात सगळ्या मुली. योगिता तिच्या तमाशाला घाबरून रडलीपार
आजचा खेळ ग्रुप बी महा बावळटपणाने खेळले. डोके न वापरता. बाळाची लंगोटी घेऊन येताना ते अडवतायत म्हटल्यावर जागा का बदलली नाही? खबदाडात बेडरूम मधे कशाला थांबली ती अंकिता?! अन कशाला ते मुद्दाम मालवणी बोलायचे? अंकिता सगळ्यात जास्त चुका करत होती.
लंगोटी लपवत का नाहीत हेही मला सुरुवातीलाच वाटले. ग्रुप ए ने ते डोके लावले. आर्या जरा तरी डोके चालवत होती मार्क कापण्याच्या बाबतीत.
>>आर्या जरा तरी डोके चालवत
>>आर्या जरा तरी डोके चालवत होती मार्क कापण्याच्या बाबतीत.
हो पण तिने पण माठपणा करुन वर्षाला बोर्डवर लिहायला दिले...... मॅक्सिमम माठपणा केला पिकनिक गॅंगने काल..... निक्कि आणि अरबाझ या लोकांना हातोहात गंडवत होते...... तरी काही काही गोष्टी त्या पुढाऱ्याच्या आणि वैभवच्या नजरेतुन निसटल्या.... अंकिता तर एकदोनदा लंगोट 'चेंज' करुया असे पण म्हणाली
मला जामच बोअर व्हायला लागलं
मला जामच बोअर व्हायला लागलं कालपासून, दोन टोकं आहेत दोन्ही कडे. एक आरडाओरडा, कपटी गँग पण डोकं शाबुत असलेली आणि दुसरी मठ्ठ पिकनिक गँग. पाठीमागे बसून गप्पा छाटत बसतात.
निक्कीला संशय आहेच जान्हवीवर, तिच्या डोक्यात काहीना काही सुरु आहे. विश्वास नाही ठेवणार ती जान्हवीवर. आर्यालाही विचारत होती ती, नंतर आर्यावर चिडली असली तरी ती ते सोडून देणार नाही. तिचा विश्वास रितेशने जे सांगितलं त्यावर असणार. समजेल नंतर.
इरीनालाही पाठवा लवकर.
आणि टास्क पण काय दिव्य एकाच
आणि टास्क पण काय दिव्य एकाच बाळाला सतत हगवण आणि दुसऱ्या बाळाला भूक ?
निकी एक नंबर कांगावखोर बाई आहे .
मला जामच बोअर व्हायला लागलं
मला जामच बोअर व्हायला लागलं कालपासून, दोन टोकं आहेत दोन्ही कडे. एक आरडाओरडा, कपटी गँग पण डोकं शाबुत असलेली आणि दुसरी मठ्ठ पिकनिक गँग. पाठीमागे बसून गप्पा छाटत बसतात.
<<<<
अगदी खरय , टिम ए ने अॅग्रेशन दाखवत व्हिल्॑न म्हणून स्थान पक्कं केलय पण टिम बी मधून एकही हिरो बनायच्या लायकीचा दिसत नाहीये सध्या, किती घाबरतात सगळे निक्कीला !
आजच्या टास्क मधे तर इतकी माती खाल्ली टिम बी ने,काही स्ट्रॅटेजी नाही, प्रयत्नं नाहीत इतकच काय मराठी बोलण्यात टिम ए शी हरले यापेक्षा अजुन लज्जास्पद काय असु शकतं
अन्किता पण आता आवडेनाशी होतेय , योगीता तर युसलेस, पाठवा तिला घरी !
पॅडीने तेवढा जरा आज अॅक्टिव्ह दिसला !
Pages