बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात नियम व अटी लागू आहेत. >>> हो का, अरेरे. त्यापेक्षा पंचवीस हजारांचे काहीतरी गिफ्ट असंच द्यायचं होतं.

सूरजला सगळ्यात जास्त मतं मिळाली असे ऐकले >>> हा कोण मलाही माहिती नव्हता. डी पि म्हणाला तो खूप फेमस होता, माझे झीरो followers होते, तेव्हा त्याचे लाखो होते तेव्हा मला अंदाज आला की असावा फेमस.

अभिजित सावंत स्त्राँग खेळाडू का वाटतो म्हणे त्या पुरुषोत्तम दादांना? >>> पुश करायला असेल.

दामलेमध्ये सध्यातरी काही स्पार्क वाटत नाहीये, कलर्सचा माणूस म्हणून फायनल पाचमध्ये असेन हे गृहीत धरलं असावं, अशा लोकांनी सुरुवातीच्या नॉमिनेशला तरी घाबरू नये.

एकही एपिसोड न बघता डायरेक्ट शनिवारची रितेशची शाळा बघितली...नक्की कसा आहे सिझन बघायची उत्सुकता दुसर काय!! रितेश बरा करतोय हॅन्डल...त्याची मान्जरेकरासारखी जरब नाही जाणवत...रितेशसहित मोस्टली सगळ्याच मराठी भयाण आहे...बरेच लोक पुस्तकी,क्रुत्रिम बोलतायत किवा चुकिचे मराठी उच्चार करतायत.
वर्शा उसगावकर गोवन आहेत बहुतेक..त्यामूले मराठी मात्रूभाषा नसेलही पण तरी इतके वर्ष इन्ड्स्ट्रित आहेत तरी इतक पुस्तकी बोलतायत.

वर्षा गोवन असली तरी मराठी शाळेत शिकली आहे, माझ्या माहेरच्या आधीच्या घराजवळच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एक ताई सांगायच्या आम्हाला. त्यांचं माहेर गोव्यात होतं आणि त्यांच्या वर्गात होती वर्षा. अर्थात तरी पुस्तकी बोलायला नको, थोडं कृत्रिम वाटतं. आता तर मुद्दामून करेल, निक्कीसाठी. शोधून शोधून मराठी शब्द वापरेल.

निक्की डोंबिवलीत वाढलीय तरी मराठी असं कसं. नवीन पिढीचे माहिती नाही म्हणावं तरी इथे आजूबाजूला तिच्या वयाची मराठी मुलं आहेत की, असं मराठी ऐकू येत नाही.

रविवारचा एपिसोड तसा बोअरच असतो..... शनिवारी सगळे फायरिंग करुन झालेले असते मग रविवारी उगाच शाळकरी गेम घेत बसतात!! लोकेट घाला आणि फोडाफोडी करा Wink आजपर्यंत कुणाचा तरी राग ती अशी फोडाफोडी करुन कमी झालाय का?
बाकी आर्याचे रॅप भारी, डीपीची कोल्हापुरी शिकवणी आणि उखाणा भारी .
आर्याला आवाज चढवता येतो पण मुद्दे मांडाता येत नाहीत असे दिसले; त्यामानाने त्या ग्रूपमधून अंकिताच त्यातल्या त्यात मुद्दे बरे मांडतीय. योगिताचा आवाज कायमच दमल्यासाराखा किंवा जरा नर्व्हस जाणवतो का कुणाला? डीपी पण बोलताना कायम पान खाऊन बोलल्यासारखा वाटतो!!
काल नेहमीप्रमाणे बिगबॉसने पार्शल ग्रूप पाडले त्यामुळे ग्रूप पडल्या पडल्याच माहित होते की डीपी, योगिता आणि पुरुषोत्तम त्या ग्रूपमधून नॉमिनेट होणार आहेत. दुसऱ्या ग्रूपमध्येच राडा होईल असे वाटलेले पण तिकडून अनपेक्षितपणे वर्षा आणि दामलेने माघार घेतल्यामुळे काहीही राडा झाला नाही आणि बिग बॉसचा अपेक्षाभंग झाला असावा!!
त्या पुढाऱ्याला जरा जास्तच ढील दिली आहे त्यामुळे तो काल फुल्ल सुटला होता पण तो पक्का राजकारणी वाटत आहे.

बाकी पहिल्या आठवड्यात एलिमिनेशन खर म्हणजे नसायला हवे...... दुसऱ्या आठवड्यात दोन काढले तरी हरकत नाही कारण पहिला आठवडा तर लोक कळण्यातच जातो आणि प्रत्येकजण काही पहिल्या बॉल पासून मारधाड करायला सहवाग नसतो ना!!

बापरे तो छोटा पुढारी काय चुरुचुरु बोलतो आणि किती हजरजवाबी आहे, मला नाही वाटत बोलण्यात त्याला बिगबॉसच्या घरात कोणी काँपिटिशन देईल.. सर्वात मज्जा म्हणजे निखिलने त्याला ‘स्पाइनलेस’ शब्दाची मदत केली आणि त्याने लग्गेच निखिललाच तो टॅग दिला Biggrin
आजच्या एपिसोडचा स्टार तोच होता , पुढच्या वर्षी रितेश बरोबर पाहुणा म्हणून कोहोस्ट करायची क्षमता आहे त्याच्यात !
बाकी रविवरची टास्क अगदीच फालतु असतात, आजचा वार नाही आवडला.
सगळ्या मुलीं मधे यावेळी एरीना वेल ड्रेस्ड आणि सुंदर दिसत होती , वर्षा उसगावकरचा ड्रेस नाही आवडला, एज अ‍ॅप्रोप्रिएट नाही वाटला.
आर्याचं रॅप चांगलं होतं !

पुढारी उलट आता बोअर होतोय, अतिपुर्वी लहान होता तेव्हा न्यूज चॅनेलवर यायचा तेव्हा, ऐकताना मजा वाटायची. त्याला पटकन उत्तर देता येतं, अगदी शब्द खाली पडू देत नाही कोणाचा हा प्लस पॉइंट आहे पण टीका केली की राग येतो लगेच त्याला, diplomatically handle नाही करू शकला सिच्युएशन असं मला कालतरी वाटलं त्या टास्कवेळी. पुर्वीपासून त्याचं ऐकलेलं असल्याने मला त्याच्याबाबतीत तोच तोच पणा वाटतो मात्र.

ओह ओके, मी नाही त्याला पाहिलं आधी, एवढा फेमस आहे का तो ?
इथे खूप हजरजवबी दिसतोय, निगेटिव गृपमधे नसता तर पॉझिटिव वाटला असता Happy

हजरजबाबी आहेच. ते तुझं योग्यच आहे. खूप वर्षांपूर्वी तो पहिल्यांदा राजकारणावर बोलायचा तेव्हा जाम viral झालेला, मजा यायची ऐकायला, मीच त्याचे काही छोटे व्हिडिओज दोन चार grps वर पाठवलेले. डोकेबाजही आहे पण कालतरी चिडका वाटला मला.

काल पुरुषोत्तम दादा शो मधून गेले ,जाताना त्यांनी विठ्ठल नामाचा गजर.केला, त्यावेळी अरबाज पटेल याने नमस्कार केला नाही की तोंडातून शब्द काढला, नुसत्या.हातांची घडी, केवढे.हे.चीप विचार आणि धर्मांध असल्याचा पुरावा , शांतीदूत असेच वागणार.,आता महाराष्ट्राने धडां शिकवावां अश्या लोकांना

चला बिबॉच्या कॅमेराचा उद्देश सफल, त्यांनी बरोबर अरबाझ कडे कॅमेरा नेला Happy
मला काही अरबाझच्या पुळका नाही पण त्याचा धर्म त्याला पाळु देत, दुसर्‍याने आपला धर्माच्या आरोळ्यात सामील व्हावे अशी का अपेक्षा करतात लोक?
त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणारे तरी जर आजुबाजुचे लोक 'अल्लाह हु हु अकबर' म्हणु लागले तर ते सुद्धा म्हणतील का किंवा बसतील का नमाझ पढायला ? मग हा तरी कसा करेल विठ्ठल नामाला नमस्कार ?
असो, मला नाही वाटले कोणी मुद्दाम केले आसे, असं वाटलं कि त्या लोकांना कळलेच नाही पुरुषोत्तम दादा एकटे म्हणणार होते किंवा काय, अभिजीत वगैरेही गप्पच होते, फक्तं कॅमेएराला सरावलेल्या निक्की, जान्हवी वगैरे हात जोडून उभ्या होत्या.
अ‍ॅट लिस्ट बिगबॉस मराठीत हिन्दु मुस्लिम वाद होऊ नयेत अशी आपेक्षा , हिन्दीत झालच आहे हे अनहेल्दी वातावरण गेल्या काही वर्षांपासून , मराठी प्रेक्षक इतके छपरी नसावेत !
मुनव्वर वि. एल्विश यादव , फौजु वि एल्विश वगैरे अग्ली वाद चालु असतात हिन्दीत !

बिग बॉसच्या फक्त कमेंट्स follow करतीये. पहात नाही.
अभिजित सावंत काहीच input देत नाहीये का?
ईथे आणि सोशल मिडियावरही त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाहीये.
क्लिप्स दाखवतात छोट्या छोट्या त्यातही तो कुठे दिसत नाही.

सूरजला एक आठवडा जास्तीचा दिला असेल.तेवढेच पैसे जास्त मिळतील.नंतर काढतील.
निक्की,अरबाज सोडले तर खरतर अजूनही कोणाचाच अंदाज येत नाही आहे.
त्यांच्या तोडीस तोड जर खरच कोणी नाही आल,तर लहान मुलांचे खेळ टास्क म्हणून द्यावे लागतील बिबॉसला.
पकडापकडी,विषाम्रुत डोंगराला आग लागली पळा पळा.असे.
बरेच लोक बोलबच्चन दिसत आहेत
उसगावकर,योगिता, दामले भाऊ,पँडी ,पुढारी हे शारिरीक टास्क कितपत खेळतील माहित नाही.अगदी तो खूनाचा टास्क जरी दिला तरी यांना खून तरी करता येतील का,अस वाटत आहे
कँप्टनशिपला माघार कशी काय घेतात?खरच न बघता आले आहेत की पढवलेल आहे.,काहीच कळत नाही.

काल फार काही नव्हते. एलिमिनेशन असेल असे वाटले नव्हते पण केले! मला पण वर्षा चा ड्रेस तिला सूट झाला नाही असे वाटले.
जान्हवी आणि आर्या चे भांडण फार खेचत आहेत. आता आज जान्हवी निकीच्या नावाने रडताना दिसतेय. माझे क्रेडीट ती घेते वगैरे.
रितेश ने किती समजावलेय सगळ्यांना पण टास्क मधे स्मार्टली खेळणे जमले तरच कॅपट्नशिप चे काही चान्स असतील या दुसर्‍या टीम ला. तसेही त्यांच्यातच काही एकी नाहीये अजून. आणि कुणालाच टास्क मधले पळवाटा, डावपेच जमतील असे वाटत नाहीये अजून तरी. कहीच अभ्यास न करता आलेत वाटते यावेळचे लोक. तो सूरज असाच क्लूलेस. काय करणार आहे तिथे कुणास ठाऊक!!
वर्षाने आधीच कॅप्टनशिप चा त्याग का केला कळले नाही. तो निखिल पण असाच बावळट. त्या अरबाज ला काही गरज नाहीये याच्या पाठींब्याची तसंही. याला काय वाटले याचा त्याग बघून अरबाज त्याला जिगरी दोस्त बनवेल का लगेच Lol
पुढारी बाळाची गत बहुतेक अंकिता म्हणाली तसे ना इथला ना तिथला अशी होणार आहे असे वाटते.

अभिजीत काहीतरी डोकं चालवेल अशी थोडी आशा आहे, अंकितालशी डोकं आहे पण कसा निभाव लागतोय इथे बघायला लागेल , नाहीतर मग आणाच खुर्ची सम्राट आणि होऊ दे राडा Proud

सूरज माठ आहे. कुठल्याच बाबतीत तो चांगला नाही. गरीब टुकार वाटू लागतं तो दिसला की. निखिल ही सेम प्रकार.
मंद असणे ही मिनिमम गरज आहे का तिकडे यायला? परत एकदा मेधा, सई, पुष्की आठवले. आणि अभ्यास तरी कशाला करायला हवा आहे, साधा सेन्स ही नाही का या लोकांकडे!

पहीला गोंधळ आज काही मला कळलाच नाही. पैसे कुठे लपवले आर्याने तेही समजलं नाही, जरा उशीरा बघितलं.

निक्की संतपदी जाता जाता परत मागे फिरली, वर्षा निक्की उगाच झालं. वर्षाचा मुद्दा करेक्ट होता पण ताणतात किंवा मस्त उकसवतात निक्कीला, सफल होतायेत .

जान्हवीची निक्कीला बाजुला करुन व्हिलन ग्रुपची लिडर व्हायची वाटचाल सुरु झालेली आहे.

वर्षा शांतपणे बोलण्यात एक्सपर्ट होत चाललीय. बिग बॉस म्हणाले दोघींच्या जिभेला धार आहे, एकदम करेक्ट. बाय द वे बिग बॉस विळी भोपळा म्हणाले की विळा भोपळा (विळा भोपळा म्हणतात ना) ते समजलं नाही नीट पण विळी किंवा विळा दोघेही धारदार.

पुढारी एक नं चिडका बिब्बा आहे. तो त्याचा मायनस पॉइंट आहे. हे आर्याने बरोबर ओळखलं आहे बहुतेक, पॅडीनेही ओळखलं आहे .

आज पॅडीही भारी वाटला. सुरजने जान्हवीला कृतीतून मस्त भडकवलं, सफल झाला, अंकीता समजावत होती पण पॅडी शांत बसून नंतर सुरजला म्हणाले मुद्दाम केलंस का, तर हो म्हणाला तो, ते म्हणाले करेक्ट होतं, मला आवडलं ते कारण समोरच्याला भडकावून त्याची व्हिलन बाजू उठावदार केली. अंकीता मुद्दे मस्त मांडू लागली आहे. योगिता मात्र फार प्रभाव पाडत नाहीये. अंकीताचा रडूबाईपणा योगिताकडे ट्रान्सफर झालाय.

निक्की अरबाझला लवस्टोरी करायला पाठवलं आहे का, निक्कीला अभिजीतबद्द्ल सॉफ्ट कॉर्नर आहे. अभिजीतने मस्त आरडाओरडा करुन निक्कीला संतपदी पोचवायचा प्रयत्न केला, तिला वाटलंच आपल्या ग्रुपचं चुकलं. व्हिलन गँगची चुक होतीच, झोपल्यावर समोरच्यावर attack करणे बरोबर नव्हतं. अभिजीत, पॅडी बरोबर होते. मुद्दा ताणला असता तर व्हिलन gang ला शिक्षा मिळाली असती.

उद्या बिग बॉसला हवा तसा राडा होणार आहे.

मंद असणे ही मिनिमम गरज आहे का तिकडे यायला? परत एकदा मेधा, सई, पुष्की आठवले. आणि अभ्यास तरी कशाला करायला हवा आहे, साधा सेन्स ही नाही का या लोकांकडे!
<<<
निखिल सर्वात माठ , बुळचट आहे , वैभवही तसाच.. सगळी मुलं अरबाझच्या प्रेमात आहेत Proud
अंकिता, वर्षा, अभिजीत, आर्या यांच्याकडून डोकं चालवतील अशी आशा आहे थोडी, बघुया !
त्या सिझन १ ला समोरचा सेलिब्रिटी गृप अगदीच काही माहित नसलेला होता त्यामुळे या तिकडीचा प्रभाव जाणवला.
हिन्दीमधे मेघाला नाही जमले त्यांच्या लेव्हलला जाणे !

या वेळेस बघत नाहीये , पण १-२ क्लिप्स पाहिल्या , अभिजित सावंत , वर्षा उसगावकर आणि रितेश देशमुख भयाण मराठी बोलत होते , असंच आहे का या वर्षी ?

अमेरिकेत कुठे बघता लोकहो?
मी सध्या यु टुय्बवर दाखवतात ते बघतीय! भारतातले काही चॅनेल दिसणारं पॅकेज घेतलं आहे.
आता कुठे काय बघावे हा प्रश्न आहे.

शुगोल कलर्स मराठीचे ऍप डाउनलोड करा किंवा वेबसाईट वर बघा .. थोडे मागचे एपिसोड्स दिसतात फ्री, पण दिसतात ... म्हणजे काल मला रविवार चा एपिसोड दिसला ... आज कालचा दिसेल . आणि तुम्ही अमेरिकेत आहात म्हणजे खरंतर तुम्हाला वेळेचा बेनिफिट आहे .
मी भारतात आहे , माझ्याकडे कलर्स चे ऍप नाही त्यामुळे मी पण शिळे भाग बघते. फार चतुर लोक आहेत हे महिना फक्त ३० रुपये म्हणतात आणि सब्स्क्रिप्शन करताना दर महिना ३० रुपये २०३४ पर्यंत थेट ... दहा वर्ष ? मी तितकं जगणार आहे का ते हि माहिती नाही मला . आणि या एका कार्यक्रमासाठी मी काही पैसे घालवणार नाही ते पण दहा वर्ष .

अमितव तुमच्या पोस्टशी पूर्ण सहमत आहे .

सुरज भोळा वगैरे नाही त्याला काहीच म्हणजे काहीच कळत नाही ... अगदी ठार . एक बेसिक सेन्स असायला हरकत नाही तो हि नाहीये त्याच्याकडे.
आर्याचे रॅप मला काही आवडले नाही . बिग बॉस माझे नवरे आहेत म्हणणं , आणि आपण सगळे मिळूनजेवण बणवणार आहोत म्हणणं , खास करून ण चा तिचा उच्चार माझ्या डोक्यात जातो . तिला इतकी मेडल्स मिळाली ते हि तिला आवडलं नव्हतं , रडायच्या घाईला आली होती.
जान्हवीच्या चेहऱ्यावरचे सततचे उद्दाम भाव आणि दुसऱ्याला कस्पटासमान समजणं मला आवडत नाही , त्यामुळे ती पण आवडत नाही .
निक्की राईचा पर्वत करते . स्वतःला खूप स्टायलिश समजते आणि तशी रहाते सुद्धा पण ते मराठीबिग बॉस मध्ये शोभत नाही .
निखिल महामंद आणि मूर्ख माणूस आहे ज्याला पाठीचा कणा , स्वतःचा मेंदू आणि अक्कल यातलं काहीच नाहीये .
अरबाज तर अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही . बैल माणूस .
मला इरिना, डीपी , पुढारी, अंकिता आवडतात .
योगिता पण बावळट वाटते . तिच्या आवाजाबद्दल वर कोणीतरी लिहिलं आहे त्याबद्दल इ सहमत आहे.

एका टास्क मध्ये ती जान्हवी ला बोलता बोलता म्हटली इथे स्टॅटर्जी ने खेळावे लागते वगैरे ... मी धन धान्य झाले तो शब्द ऐकून .

आज त्या चुडैल जान्हवी पुढे चक्क निक्की पॉझिटिव वाटली , सेन्सिबल वाटली Proud
विकेन्डचा फिडबॅक करेक्ट घेतला तिनी , वर्षा उसगावकर बरोबरच्या वादातही निकीच बरोबर वाटली आणि श्ब्दांवरही कंट्रोल केला तिनी.
बाकी निकीने आठवडा गाजवला हे ऐकून तिचा गृप जेलस दिसला!
मला तो पुढारी अजुनही आवडतोय, काय स्पष्ट बोलतो आणि हसवतोय , निकी आणि पंढरीनाथपुढेही झुकला नाही.
अभिजीतलाही कंठ फुटलाय , चांगला खेळतोय आता..मुख्य म्हणजे निकी आणि त्याला बोलताना बघून अरबाझ चिडतोय Happy
आर्याने बॅकफुट घेत्॑ला का आता Uhoh गृप लिडर आता अभिजीत दिसतोय !
वर्षा उसगावकर स्वतः मधेच बिझी दिसतेय , योगीताला घरी पाठवा आता, काहीही जमत नाही तिला..क्राय बेबी !

स्टॅटर्जी मी पहिल्यांदा बिग बॉसमध्येच ऐकला.... बहुतेक पहिल्या सीझनला तो भूषण कडू वापरायचा तो शब्द आणि मग बिग बॉसमध्येच अनेक जणांकडून ऐकला Happy

वीकेंड वार शनिवार चा एपिसोड रितेश जरा चाचपडत होता असं वाटलं पण रविवारी सेट झालेला वाटला.
ममां च्या आरड्याओरड्यापेक्षा शांतपणे झापणारा रितेश जास्त आवडला. सलमान ची स्टाईल वाटली जरा.
कोणाचेच कपडे आवडले नाहीत... ईरीना चे त्यातल्या त्यात बरे.. निक्की ने घातलेला ड्रेस भयंकर होता मराठी बिबॉ साठी... असो..
जान्हवी खरच व्हिलन वाटतेय.. शिवानी सुर्वे सारखी.. रागावर ताबा नाही अजिब्बात... आर्या खरच बालीश वाटतेय.. पण रॅप आवडलं मला.. ऐनवेळी कागद पेन हातात नसताना असं रॅप रचणं अवघड आहे खरतर.... छान केलं... मागच्या आठवड्यात कुठलातरी एपिसोड संपताना पन तिने काही हिंदी ओळी रचलेल्या ऐकवल्या त्या आवडल्या होत्या..
काल सोमवारी अभिजीत सावंत साहेब जागे झालेले दिसले.. कचर्‍याच्या डब्या वरुन जान्हवी ने उगीच सीन बनवला..
निक्की गुड बुक्स मधे जायचा प्रयत्न करतेय... जान्हवी अशीच वागली तर निक्की हिरो बनायला वेळ लागणार नाही..
काल आर्या, योगिता कुठेच दिसल्या नाहीत... योगिता ला पाठवा घरी... कशाला आलिये रडत बसायचंय तर...
कोकण गर्ल भांडायचं नाही हा अप्रोच घेउन का आलिये कळत नाही.. काल पण सुरज ला समजवायला गेली.. त्या ऐवजी जान्हवी वर आवाज चढवायचा ना की इतक्या फालतु गोष्टी साठी कशाला इतका इश्श्यु करतेस म्हणून,.... भांडल्याशिवाय इथे काहीही होउ शकत नाही हा इतिहास आहे... इथे काय हळदीकुंकू आहे का ?

अरबाझ ला जान्हवी पेक्षा निक्की च महत्व माहित आहे त्यामुळे तो निक्की ला नाही सोडणार..
अरबाझ- निक्की विरुद्ध जान्हवी-वैभव असे झाले तर ? मज्जा येइल..... Wink

अनसीन अनदेखा मधे डीपी दादा खुप मज्जा करतात ते एपिसोड मधे दाखवत नाहीत.
वर्षा पण जुने लक्षा चे, किंवा तिच्या चित्रपटाचे किस्स्से सांगते ते ऐकायला मस्त वाटलं...

Btw, ती जान्हवी मॅरीड आहे आणि ८ वर्षाचा मुलगा आहे हे ऐकून आश्चर्य वाटलं , लहान दिसते तशी.असेलही म्हणा !

इथे भारतात जिओ सिनेमा अ‍ॅप वर आहेत सगळे भाग. रु. २९/- मध्ये मोबाईल ओन्ली आणि ८९/- मध्ये २ का तीन स्क्रीन्स आणि ४के पर्यंत क्वालिटी असे प्लॅन्स आहेत. १० वर्षे वगैरे काही कुठे दिसलं नाही मला तरी...

रोज रात्री नवाच्या भागात फारच अ‍ॅड्स असतात त्यापेक्षा दुसर्‍या दिवशी तोच भाग पाहीला की एकही अ‍ॅड नसते.

बिबॉस अरबाज आणि अभिजित मध्ये झुंज लावणार हे नक्की.
आज कँप्टन्सी टास्क आहे,त्यामुळे धक्काबुक्की, मारामारीला उधाणच येईल.प्रोमो मध्ये ती अंकिता जीवाच्या आकांताने ओरडताना दिसत आहे,बिबॉस काहीतरी करा वगैरे,तिला अजूनही कळलेल नाही का,बिबॉसला हेच हव असत,मग खुर्ची सम्राट मध्ये बाई काय करणार आहेत ते कळत नाही.
कँप्टन अपेक्षेप्रमाणे निक्की किंवा अरबाचज होतील कारण मग निक्की /उसगावकर किंवा अरबाज /अभिजीत असा सामना बिबॉसला दाखवता येईल.
सध्या तरी असे सिंगल सामनेच बघावे लागणार आहेत अस दिसत आहे.
जान्हवी फार फारच नाटकी वागायला लागली आहे,तिला मात्र भाऊंनी ममांसारखा जोरात आवाज चढवून सांगायला हव की बाई गं,तूच सगळ्यात नाटकी होत आहेस.
आज आता बघू, कँप्टन्सी टास्क कसा होतो ते.

अँक्ट राईडर वाला जर खरा असेल तर त्यानुसार चक्क अंकिता कँप्टन झाली आहे म्हणजे निक्कीचि ग्रुप हरला.
अस असेल तर मग मजा आएगा सिझन मैं
म्हणजे रड्या ग्रुपला जिंकवायच अस ठरवल आहे का बिबॉस ने

Pages