बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे त्या वर्षाताईंना खिचडी कुठल्या डाळीची करतात ते माहित नाही? >>> आपल्याकडे मुगडाळीची फेमस आहे पण काही ठीकाणी करतात तूरडाळीची. गोव्यात आणि उत्तरेकडे माहीती नाही पण गुजराथमधे तुरडाळीची करतात त्यामुळे आमच्या मातोश्री तुरडाळीची करुया म्हणायच्या, आम्ही सर्व मुगडाळीची कर सांगायचो. मग कधीतरी मांडवली व्हायची, हाहाहा. एनिवे वर्षाकडे करत असतील कदाचित.

अंकिता कॅप्टन झाली तो एपिसोड मस्त झाला. ती हुषार आहे असं वाटतंय खरंच...वैभव ला सेफ केलं तिनं .. व्हिलन गँग मधे पण गुडबुक्स मधे आहे... अंकिता, अभिजीत, डीपी दादा सुमडीत पुढे जाउ शकतात.
अंकिता जिंकल्यावर व्हिलन ग्रुप तिला कॅप्ट्न रुम पर्यंत सोडायला आला नाही ते अजिबात आवडलं नाही.. गेल्या वर्षी पण टास्क मधे कितीही भांडणं होउदेत. कॅप्टन जो होईल त्याचा विजय सगळे मिळुन साजरा करायचे...पुढारी ने गळा काढला ते बघुन फसकन हसायला आलं.. \
काल पण अंकिता ने पुढारी शी कामाच्या बाबतीत वाद घातला नाही. मला घरात भांडणं नको म्हणाली. बिबॉ हाउस ला शांतीघर करुनच सोडणार बहुतेक ही Happy
कालचा नॉमिनेशन टास्क पण आवडला. मारामार्‍या नसलेले आणि डोकं वापरायचे टास्क आणायचे ठरवलेत की काय बिबॉ ने.. जोड्या पण मस्त केल्या होत्या... बिबॉ ला हवेत तेच लोक नॉमिनेट झाले...
अंकिता ने फक्त काल तिची दोन मतं देताना घोळ केला असं मला वाटलं... ज्या योगिता मुळे ती कॅप्टन झाली तिला ( आणी पॅडी ला ) मत द्यायला नको होतं.. निखिल आणि सुरज या जोडी सोबत, निकी आणी पुढारी यांना पण मतं मिळालीच होती त्यामुळे ते तसेही नॉमिनेट होणारच होते तर त्यांना मत देउन टाकायचं ना...
वैभव आणी ईरीना चं जुळवायचा प्रयत्न अजिबात आवडला नाही.
निखिल ला घालवा आता या आठवड्यात.. काही कामाचा नाही.

काय हे बिगबॉसचे लोक, १५ लोकात फक्तं १ बाथरुम +१ टॉयलेट ? Uhoh
कोणालाच टॉयलेट्स जास्तं उपयोगी वाटलं नाही ?
एनिवेज, निखिल -योगीता -पॅडी पब्लिक आले नॉमिनेशन मधे, बिबॉ चं काम झालं !
आर्या हॅज लॉस्ट इट, वैभव कुठून शोध्॑ला.. एरीनाही अज्जिबात आवडत नाही, हाकला तिला..एकदम फेक आहे, ना तिला मराठी येत, ना हिन्दी ना इंग्लिश !

हे आपल्याला दाखवण्यापुरते असते!!
काल पॅडी बोलता बोलता बोलला ना की काही अंडी कमी आहेत ते बिग बॉस नंतर भरुन देतील...... म्हणजे बॅक डोअर सप्लाय चालू असेलच ना यांचा Wink

आर्या डेस्परेट झालेली दिसते. शिवाय आधी बिबॉ सीझन्स पाहून काहीतरी उथळ कल्पनाही असतील डोक्यात. त्यामुळे हा ड्रामा ठरवून केलेला दिसतोय. हा अँगल जास्त खेचला तर पकाऊ होणार. मला मज्जा वाटते ते दोघे बॉइज तिच्याशी नुसते बोलले की निकी आणि जान्हवी किती पेटतात ते बघाय्ला. आज करमणुकीचा कार्यक्रम म्हणजे बहुधा पकाऊच असणार.

आज नाच बोअर झाले. अभिजीतचं गाणं झकास. आर्याचं इतकं नाही आवडलं.

अंकीता छान खेळतेय. आर्या बोअर होतेय, रड रड रडते. जान्हवी फार दादागिरी करते, वैभव आणि अरबाजने तिला हवं तसं वागावं असं वाटतं. इरीना बोअर आहे.

डीपि आणि अंकीता बरोबर बोलत होते निक्की, वर्षा दोघींना अ‍ॅट्यिट्युड आहे.

निक्की आणि अभिजीतची फ्रेंडशिप निक्कीकडून खरी वाटू लागली आहे, तिला अभिजीतचा राग येत नाही.

बाय द वे आर्याचे दहा हजार कोणी कसे चोरले, मी नाही बघितला तो सीन.

मला आवडतोय हा season...आजचा एपिसोड पण मस्त entertaining वाटला....पुढाऱ्याला चॅनेल head बनवल्यावर कित्ती आनंद झाला होता...जसं काही एखादी निवडणूक जिंकला...खूप हसलो आम्ही तेव्हा...इरिनाचा dance खूप आवडला...आणि surprisingly पुढाऱ्याने चक्क निकिविरूद्ध निर्णय दिला...निकी सगळ्यांसाठी उभं राहून टाळ्या वाजवत होती...दोन्ही ग्रुप साठी...आवडलं तिचं हे gesture...निकीच्या तोंडात खूप जोर आहे...पण मनाने निर्मळ वाटते ती...मीरा,अपूर्वा सारखी नाही वाटत... खरी डोक्यात जाते ती जान्हवी....अतिशय विचित्र बाई आहे...आज वर्षा चक्क निकी अँड ग्रुप मध्ये जाऊन बसल्या आणि दुसरा ग्रुप त्यांची मस्करी करत होता...

निक्कीपेक्षा जान्हवीच डोक्यात जातेय. जान्हवीला हेच हवंय, ती जेलस बहुतेक निक्कीवर कारण मागच्या आठवड्यात निक्कीचीच चर्चा आहे म्हणाला ना रीतेश आणि जान्हवीला शॅडो म्हणाला तिची त्यामुळे यावेळी ती पेटली आहे एकदम. बेकार वाटतेय. मला ती आवडतंच नाही.

आर्या अगदीच अनॉयिंग निघाली, शेवटी एम.टी.व्ही ची पैदाईश.. फेक लव्ह मार्गाने गेली इतरां सारखी !
हे आपल्याला अचानक वाटले पण आधीपासूनच चालु असावे , फक्तं बिबॉने दाखवले नव्हते या आधी !
अन्किताने बरोबर झापले तिला !
अजिबात इंटरेस्ट नाहीये पब्लिकला फेक लव्ह ट्रँगल बघण्यात Uhoh
आता सगळ्यांचे डिफरन्सेस दिसतायेत . डीपी, अंकिताला वर्षा उसगावकरही फारशी आवडत नाही आणि दुसर्‍या गृपमधे तर आहेतच भांडाभांडी.. जेन्युइन ब्रोमान्स फक्तं विशाल अरबाझचा #वैभाझ Proud
डान्सेस मधे चक्क योगीता निखिल बेस्ट होते, योगीताच्या पर्सनॅलिटीला इतके रिव्हिलिंग कपडे कम्फर्टेबल दिसत नव्हते पण !
अरबाझ - निक्की दिसत छान होते पण नुसते उंटा सारखे ताडताड नाचत होते Rofl
अभिजीत मस्तं गायला पण मला उगीच वाटले कि तो आणि आर्या दोघेही लिपसिंक करत होते !

अभिजीत मस्तं गायला पण मला उगीच वाटले कि तो आणि आर्या दोघेही लिपसिंक करत होते !.....
सहमत.मलाही तसच वाटल.
ती आर्या नक्की कुठल्या प्रकारचा गेम खेळत आहे ते काही कळत नाही.
कोणावरही कधीही भडकते.ही शेवटपर्यंत राहिल का?
निखिल आणि योगिताचा डान्स मस्त होता.
पुढार्याने निदान खोट का होईना पण आर्याच कौतुक करायला हव.होत.
वोटिंग मध्ये सगळ्यात शेवटी आहे तो.
पण आता संचालकच असल्यामुळे त्याच्या निकूताईच्याच टीमला जिंकवेल आणि कँप्टनशीपसाठी उमेदवार पण त्यांच्याच टीमचे येतील.
यावेळी टाईम एक तासाचा केल्यामुळे फार कमी दाखवल जात आहे.

मला तर आता वाटते कि पॅडीने बरोब्बर ओळखले होते आर्याला , वैभव अरबाझला काळी तीट वगैरे लावली हे पण त्याचेच निरीक्षण होते Happy
रितेशभाऊंनी मान्य करायला हवय आता पॅडीचं जजमेन्ट !

आर्या अगदीच अनॉयिंग निघाली, शेवटी एम.टी.व्ही ची पैदाईश.. फेक लव्ह मार्गाने गेली इतरां सारखी !>>> +११
वैभव आणि अरबाज बहुतेक उगीच हिरोगिरी करायला तिची समजूत काढत होते बहुतेक.
मुळात त्यांचेही निकी-इरिनासोबत काहीच लव बिव दिसत नाहीये. त्यांना आणि जान्हवीलाही पुरेपूर माहित आहे की निकी वेळ आली की त्यांना गुलिगत धोकाच देणार Happy
यावेळी एकूण भाऊचा धक्काला भरपूर मटेरियल आहे!
डान्सेस चा कंटाळा आला मला. कोणाच्याच मूव्ज काही भारी नव्हत्या फक्त निखिल चे होम ग्राउंड असल्यामुळे अ‍ॅक्टिंग वगैरे बरे करत होता.. योगिता अवघडलेली वाटली. ते कपडे तिला अजिबात सूट होत नव्हते हे एक कारण असेल. गाण्यात लिप सिंक बद्दल सहमत. आर्या तर १००% लिप्सिंक. किंवा लाइव गायलेही असतील पण इतके वाईट की त्यांनी एपिसोड्मधे ओरिजिनल च दाखवायचे ठरवले असेल Happy

करमणुकीचे कार्यक्रम बरे होते..... मुख्य म्हणजे एकसुरी नव्हते..... आता आज काय ते रोस्ट वगैरे असेल..... अंकिता आणि डीपीच्या सूत्रसंचालनाने मजा आली!!
बाकी ते लव्हस्टोरी वगैरे प्रकार काय खरे नाहीत..... आधीच्या लव्हस्टोऱ्यांचे काय झाले? त्यातल्या किती टिकल्या? नाही म्हणायला अमृता आणि प्रसादचे लग्न झाले पण बिग बॉसमध्ये ती लव्हस्टोरी पुरेशी फुलण्याआधीच अमृता बाहेर पडली होती!!

बाय द वे; एरवी भांडभांड भांडणाऱ्या आर्या आणि जान्हवी; जान्हवीच्या डान्सच्या आधी अगदी नॉर्मल बोलताना दिसल्या एकमेकींशी!!

डीपी खूप टॅलेन्टेड आहे, पण त्याचं फुटेज कट करतात, अनसीन अनदेखा मधे जास्तं दिसतो !
प्रोमो मधे डीपी वर्सेस पुढारी दिसलं, मज्जा आली, दोघे एक शब्दं खाली पडु देत नाहीत.. फॉर अ चेन्ज सैतानी बायांची कॅट फाइट बघण्या ऐवजी डीपी - पुढारी वाद आवडला Happy

हो डिपी फनी आहे. बर्‍याच क्लिप्स दिसतात अनसीन मधे. एकात तो कॅमेर्‍यासमोर बायको ला सांगतोय "हिंदी आणि साउथ चे सिनेम्यात काम केलेली हिरॉइन हितं माझं ताट घेऊन समोर उभारली बघ. मला म्हणती खावा की. बघ बघ " अन निकी पण ताट पुढे करून त्याला हसत म्हणते "खावा की" Happy
निकीच्या मेक अप चे रोस्ट करतोय अशी पण एक क्लिप आहे तीही फनी आहे. त्याला बराच सपोर्ट पण दिसतो आहे सोमि वर. सूरज ला तर फारच सपोर्ट दिसतोय सेलिब्रिटी ते कॉमन लोक सगळेच.
एकूण डिपी, सूरज, वर्षा हे पब्लिक सपोर्ट वर बरेच पुढे जाऊ शकतात. त्यांचा खेळ कसाही असो.
आणि गेम समजून खेळल्यामुळे अभिजीत, निकी, अरबाज ,जान्हवी आणि अंकिता हे पुढे जातील असे वाटते.

मला पॅडीचं आज जास्त आवडलं आणि डान्स नागिन फार आवडला नाही.

डीपी मस्त आहे, त्याचे अनदेखा अनसीनमधले मस्त असतात. लिपस्टीकचं तर भारी आवडलं.

अंकीता आता आवडायला लागली आहे, पॅडीशी बोलताना सुरजबद्द्ल छान बोलली.

वर्षा नाटकी अंदाजात का होईना मस्त इरीटेट करत होती जान्हवीला. पहील्यांदा निर्लज्ज वरुन चर्चेत घुसून जान्हवीला मस्त भडकवलं, नंतर जान्हवी स्वतः चुकीचं बोलली (तिने केलेल्या स्टेटमेंटचा मला राग आला, वर्षाने शांतपणे घेतलं, तिच्या डोक्यात जो अर्थ होता तो चुकीचाच होता, रितेश यावर बोलणार की नाही काय माहिती) . निक्की, जान्हवीला insecured केलंय वर्षाने हे नक्की. त्या दोघी तावातावाने भांडतात, ही शांतपणे बोलते.

पुढारीचा कंटाळा यायला लागलाय. तो निक्कीचा हरकाम्या झालाय आणि समोरच्या grp वर दादागिरी करतो.

सुरज गुलीगतच्या त्या एका स्टेपवर आणि घरात कामं करून जिंकणार बहुतेक. ते शब्द फनी आहेत मात्र मला समजले नाहीत. स्टेपही फनी.

रक्षाबंधन टास्क पुढच्या शुक्रवारी हवा होता, कॅडबरी अॅड साठी लवकर घेतला बहुतेक.

मी पाहिला नाही एपिसोड पण कुठल्या तरी review मध्ये ऐकलं की जान्हवी व उ ला म्हणाली की लाज वाटत नाही का मुलांसमोर केस उडवत चालता. :o हे खरं असलं तर फारच अवघडे. म्हणजे जरी बिगबॉस ने स्क्रिप्ट दिली असली तरी आपल्याला हे बोलायला चांगल वाटतंय का याच भान नसावं का?की मिळणारा पैसा इतका महत्वाचा आहे की त्यापुढे बेसिक मॉरल पण गुंडाळून ठेवले जातात अस मनात आलं.

ती जे वाक्य बोलली त्याचा आशय मलातरी असा वाटला की मुलं दिसली की तुम्ही इंप्रेशन मारता, त्यांचं लक्ष जावं तुमच्याकडे, मला तरी आवडलं नाही मग वर्षाने शांतपणे उत्तर दिलं की मी माझ्या नवऱ्याबरोबर खुश आहे, मग म्हणे तुम्हीच चुकीचा अर्थ घेता. मी तसं म्हटलंच नाही.

जान्हवी सिक आहे. मुद्दामही करत असेल, यावेळी रितेशने म्हणावं की पूर्ण आठवडा तू गाजवलास, तुझीच चर्चा होती. बोलताना निक्कीपेक्षाही खालच्या लेवलला जाते ती.

बापरे आज काय भयानक तो वर्षा आणि जान्हवीचा डान्स.. वर्षाला अज्जिबातच नाचता येत नाही का ?
पुढार्‍याने सगळेच डिसिजन हस्यास्पद दिले , आता खाणार बोलणी विकेन्डला Proud
निक्की वर्सेस लसुण अर्गुमेन्टला हहपुवा झाली Rofl
जान्हवीने यावेळी बोलणी खायची तयारी केली आहे, मुद्दामच विकेन्डला फुटेज मिळावं म्हणू भांडली कि अशीच आहे ती ? निक्की मात्रं आता अजिबात बोलत नाही वर्षा उसगावकरला !
वर्षा उसगावकरचा पेशन्स आणि थंड पणानी रिअ‍ॅक्ट करण्याच्या क्वालिटीला सलाम, काssssही फरक पडत नाही तिला !
बाकी अरबाझ का रडत होता ? बहिणभाऊ राखी पौर्णिमा विषय चालु असताना तो आणि वैभव का मिठी मारून का रडले ? Uhoh
अरबाझने ब्रोमान्स मधे बाजी मारली आहे.. वैभव, पुढारी यांच्याशी स्पेशल जवळीक आहे !
राखी सीनला सगळे ग्लिसरीन टाकून बसले होते !

वर्षा एका जागेवरच उभी राहून अ‍ॅक्शन्स करत होती Lol
जान्हवीने सगळे मुद्दाम चालवलेले आहे असेच मला आता जास्त जास्त वाटते आहे. तिला चांगले माहित असणार वर्षा ला उर्मटपणाने बोलल्याचा काय परिणाम होणार ते. तिची स्ट्रॅटेजी व्हिलन होऊन पुढे जाण्याची असावी. म्हणूनच मागच्या आठवड्यात निक्कीला बोलणी बसलीतेव्हा ती जेलस झाली होती. बर्‍याचदा म्हटली पण होती की तिचीच चर्चा होते आहे. म्हणून तिने या आठवड्यात जास्त दंगा करून चर्चा होईल ( म्हणजे वीकेन्ड ला जास्त फुटेज ) याची सोय केली. निकी आता बरीच सेन्सिबल वाटते आहे.
अरबाझने ब्रोमान्स मधे बाजी मारली आहे >>> Lol खरंय.
राखी सीनला सगळे ग्लिसरीन टाकून बसले होते >>हो ना २ आठवडे पण नाही झाले घरात आल्याला. इतके काय रडण्यासारखे काय आहे. Happy
बाकी पॅडी कशाला रडला उगीच! त्या पुढार्‍याचा कय गेम असेल तो असेल , त्याने याला काय इतके वाईट वाटले कळले नाही. तसेही ठीक ठाकच होते त्याचे मिमिक्री स्किट, फार ग्रेट नव्हतेच.

राखी सीनला सगळे ग्लिसरीन टाकून बसले होते >>हो ना २ आठवडे पण नाही झाले घरात आल्याला. इतके काय रडण्यासारखे काय आहे.
>>> Nikki lost her brother to Covid in pandemic.

निखिल, योगिता आणि आर्या अगदीच निष्पभ्र आहेत...योगितावर तर कॅमेराही जात नाही कधी...तिच नुकतच लग्न झालय ना? मग इथे कस काय आली? अगदिच रडु रडु असते.
निक्कीला एकही मिनिट लाइमलाइट सोडायचा नसतो..गेम पुरेपुर कळलेली तीच एक आहे बहुधा..तिच्यासारखच शेरास सव्वा शेर वाइल्ड कार्ड आणायला हव बीबॉने..
वर्षा उसगावकरचा पेशन्स आणि थंड पणानी रिअ‍ॅक्ट करण्याच्या क्वालिटीला सलाम, काssssही फरक पडत नाही तिला >>> +१ इन्ड्स्ट्रितला इतक्या वर्षाचा अनुभव कामास येत असावा त्याच्या...पण त्याचीही छाप पडत नाही...आराम करायला आल्यासारख्या वाटतात.
मी अगदी सगळे एपिसोड बघितलेले नाहीत आत्ताच्या विकमधले २-३ बघितलेत..

योगिताला रहायचं नाहीये, मुळात तिने यायला नको होतं. तिला माहीती आहे की कसं असतं. विशाल सिझनला ती आणि सौरभ तेव्हाचा तिचा हिरो आणि आत्ताचा नवरा आले होते की विशालसाठी. ती रडत होती, मला जाऊद्या ना घरी.

वर्षाने जान्हवी आणि पुढारीकडून पाय चेपुन घेतले आवडलं नाही मला. कशाला करुन घ्यायचं.

रितेश भारी घेतोय शाळा. आज जान्हवीला बोलेपर्यंत बघितलं. पुढचं बघितलं नाहीये, आता रिपिट सुरु आहे, ते बघतेय. अरबाझ, वैभव सर्वांना मस्त झोडलं. पिकनिक गँगलाही काय चुकतंय ते सांगितलं.

‘हा आठवडा तुम्ही गाजवलात“ या एका वाक्यानी(काँप्लिनेटने) जान्हवीच्या सगळ्या क्लास वर पाणी पडलं, she got what she wanted sidelining Nikki she became the poster girl in lead !
याशिवाय तुमचे मुद्दे बरोबर असतात पण भाषा वाइट आहे हे निक्कीला सांगितलेले जान्हवीला कॉपी पेस्ट कशाला ?
नक्की कुठले मुद्दे बरोबर असतात तिचे ?
ती नक्की हे सगळं मुद्दाम करत होती, नाहीतर आज सुरवातीला वर्षा उसगावकरला मसाज कशाला देत होती ?
सूरजला आजही खूप स्तुति आणि प्रोत्साहन मिळालं , कितपत हिन्ट घेतो काय माहित कि असाच फार मुद्दे न मांडता डायरेक्ट विनर होतो काय माहित !
योगीताला नाही जमते , पाठवा तिला घरी आणि आणा एखादा तडकता भडकता वाइल्ड कार्ड !
तो उत्क्या तिथे भीक मागतोय कलर्स कडे मला वाइल्ड कार्ड पाठवा म्हणून Happy

निक्की आणि ग्रुपच्या सतरंज्या उचलणाऱ्या पुढाऱ्याला काहीच नाही बोलला रितेश.
<<<<
त्याला इग्नोअर केलेलं पाहून त्यालाच घालवतायेत कि काय असं वाटतय Uhoh
तो टिकला पाहिजे राव, मस्तं बडबड करून एन्टरटेन करतो !
btw, वर्षा उसगावकरला तिच्या संचालनाबद्दल अ‍ॅप्रिशिएट नाही केले, अनबायस्ड होती हे पण नाही म्हंटले रितेशने.
हे लोक अजुन तिथेच भाऊच्या धक्क्यावर दंगा करतायेत कि वर्षाच्या बायस्ड डिसिजनने अन्जिता कॅप्टन झाली !

Pages