Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव रमड. धन्यवाद. शिवाय
वॉव रमड. धन्यवाद. शिवाय आदरार्थी संबोधल्याबद्दल बाष्पगदगदीत झाले आहे ते वेगळंच. आजकाल कोण इतका आदर दाखवतं!
ऐकलं ते गाणं. पुन्हा एकदा
ऐकलं ते गाणं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद रमड. डोक्यात घुसलेलं ते गाणं त्यामुळे चैन पडेना.
सातू २ धान्न्यांचे पीठ असते
सातू २ धान्न्यांचे पीठ असते हे माहितच नव्हते. मुलगी लहान असताना सातू पीठ लापशी खाऊ घालायचे.
नाही नाही, सातू हे वेगळं
नाही नाही, सातू हे वेगळं धान्य असतं. ते मी खाल्लं आहे. सत्तू हे हिंदी नावाने जे मिळतं, त्याबद्दल वरचे प्रतिसाद आहेत. सत्तु आणि सातू हे एक नाही, हे मलाही वरचं वाचून कळलं. मी एकच समजत होतो.
सातू म्हणजे जव/ जवस ना ?
सातू म्हणजे जव/ जवस ना ?
सातू म्हणजे बार्ली.
सातू म्हणजे बार्ली. ( ना?)
सातू(श्राद्ध विधीत वापरतो तो)
सातू(श्राद्ध विधीत वापरतो तो) तांदळाच्या तुसासारखा दिसणारा प्रकार होता.बार्ली परदेशी असल्याने बार्ली सातू नसेल.
बाकी सत्तूचे फंडे क्लिअर आहेत.
बरोबर अनु
बरोबर अनु
कंप्युटर जी, लॉक कीजिए
बार्ली म्हणजे मराठीत सातू,
बार्ली म्हणजे मराठीत सातू, हिंदीत जव, संस्कृत मधे यवः . पुरातन काळापासूनचे धान्य आहे.
श्राद्ध विधीत वापरतो तेव्हा वरच्या फोलपटासह वापरतात. शिजवायला वापरतो तो वरचे फोलपट काढलेला असल्याने वेगळा दिसतो.
आमच्या इथे हे फोलपट काढलेल्या बार्लीचे दोन प्रकार मिळतात
१. पॉट बार्ली, फक्त फोलपट काढलेला म्हणजे कमी प्रक्रिया आणि शिजवायला जास्त वेळ
२. पर्ल बर्ली म्हणजे फोलपट काढून पॉलिश केलेला, थोडक्यात अजून प्रक्रिया आणि शिजवायला कमी वेळ.
भारतात मुख्यत्वे आहारात खाण्याऐवजी माल्ट करायला मोठ्या प्रमाणात वापरतात. . मात्र आजकाल बार्ली खा सांगतात त्यामुळे परदेशी धान्य असे वाटू शकते.
ओह ओके.आता कळलं नीट.
ओह ओके.आता कळलं नीट.
रेशनच्या गव्हामधून खूप सारे
रेशनच्या गव्हामधून खूप सारे जव निवडून निघायचे.
राळा म्हणजे काय मग? ते अजुन
राळा म्हणजे काय मग? ते अजुन वेगळे धान्य का?
डायबेटीससाठी खातात म्हणे.
बोबडी वळायला खातात ते! काळे
बोबडी वळायला खातात ते! काळे राळे गोरे राळे!
बार्ली म्हणजे मराठीत सातू,
बार्ली म्हणजे मराठीत सातू, हिंदीत जव, संस्कृत मधे यवः . पुरातन काळापासूनचे धान्य आहे. >>> १००+
यव हा उल्लेख पुराणकथांमध्ये वाचला आहे.
राळयाला कांग पण म्हणतात.
काळे राळे गोरे राळे राळ्यात
काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले.
आता म्हणा
सातु म्हणजे बार्ली हे माहिती
सातु म्हणजे बार्ली हे माहिती नव्हते. माझ्या सासरी नागपूर साईडला सातुच पीठ उन्हाळ्यासाठी बनवतात कारण ते थंड असते म्हणून. त्यात गहू आणि फुटण्याची डाळव असतात. कधी कधी वेलची पण असते. हे दुधात किंवा पाण्यात घालून खातात. मला इथे सिंगापुरला जे मिळालं आहे (मराठी दुकानात) ते पण असंच आहे म्हणजे घटक तेच आहेत.
तर विचारलं का होतं तर ते पीठ आहे बरंच आता त्याचे लाडु करेन म्हणते आहे.
बघु कस काय जमतंय ते.
माहिती दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.
शिवाय आदरार्थी संबोधल्याबद्दल
शिवाय आदरार्थी संबोधल्याबद्दल बाष्पगदगदीत झाले आहे ते वेगळंच >>>
खूप बाष्प झाल्यामुळे पाऊस पडेल आता तिकडे!
निसर्गात /अन्न साखळीत काहीही
निसर्गात /अन्न साखळीत काहीही निरुपयोगी किंवा विनाकारण नाही असे म्हणतात. मग ढेकूण या प्राण्याचे अन्नसाखळीत काय योगदान?
जगातून सगळे डास एकदाचे नामशेष झाले तर बरं होईल की वाईट?
>>मग ढेकूण या प्राण्याचे
>>मग ढेकूण या प्राण्याचे अन्नसाखळीत काय योगदान?
>>जगातून सगळे डास एकदाचे नामशेष झाले तर बरं होईल की वाईट?
त्यात कबुतर पण अॅड करा. नुसतं खायच प्यायचं सेक्स करायचं आणि बाल्कनी भर हगून ठेवायचं या पलीकडे या महान अवताराचं काहीच योगदान नाहीय अन्नसाखळीत.
अरे असे प्रश्न नका रे विचारू!
अरे असे प्रश्न नका रे विचारू! उद्या ढेकूण वर शोध निबंध लिहून व्हॉअॅला आलेला असेल बघा! असे प्रश्न पडल्याची भोगा आता शिक्षा!
हा विषय निघाला की कोणीतरी हे
हा विषय निघाला की कोणीतरी हे म्हटलेच पाहिजे, तर मीच म्हणुन घेतो:
जगातुन मानव (मी एकटा नव्हे) नाहीसे झाले तर बरे होईल की वाईट?
उद्या ढेकूण वर शोध निबंध
उद्या ढेकूण वर शोध निबंध लिहून व्हॉअॅला आलेला असेल बघा! असे प्रश्न पडल्याची भोगा आता शिक्षा! >>
अगदीच! शिवाय सध्या शिक्षा म्हणून निबंध लिहायला सांगतात.
जगातुन मानव (मी एकटा नव्हे)
जगातुन मानव (मी एकटा नव्हे) नाहीसे झाले तर बरे होईल की वाईट? >>
कुणासाठी बरे की वाईट?
मानवजात नष्ट झाली तर निसर्गाचे मात्र काहीही अडणार नाही, हे मात्र खरे.
ह पा ,
ह पा ,

कुणी मुंबईतील चांगले
कुणी मुंबईतील चांगले डाएटीशियन सुचवू शकेल का जे वेटलॉससाठी ऑनलाईन कन्सल्टेशन देतील? कुणाचा प्रत्यक्ष अनुभव असला तर सजेशन हवे होते.
मुंबई नाही, पण डॉक्टर नितीन
मुंबई नाही, पण डॉक्टर नितीन गुप्ते यांच्याशी मी स्वतःच बोलले आहे. ते पुण्यात असतात, पण परदेशातूनसुद्धा लोक "डिस्टन्स प्रोग्राम " करतात. त्यांची वेबसाईट आहे, तिथे फोन नंबर पण आहे. माझ्या तीव्र टाचदुखीमुळे मी काहीच नाही केलं, पण नुसतं फोनवरून बोलले तरी खूप मस्त वाटलं. फेसबुकवर पण ते लिहितात. 40+ वर्षांची प्रॅक्टिस आहे त्यांची. एकदा चौकशी करून बघ.
S2 fitness kalyani nagar पण
S2 fitness kalyani nagar पण बरंच लोकप्रिय आहे.डायट+फिटनेस, नुसतं डायट असे वेगवेगळे प्रोग्राम आहेत.ऍप वर रोज फोटो टाकावे लागतात खाल्लेल्या पाळलेल्या डायट चे.
अर्थात सर्वांचे अश्या सर्व्हिसेस रिव्ह्यूज वाचून जे व्यक्ती डायट/प्रोग्रॅम मनाला सर्वात जवळचं वाटेल ते घ्या.
धन्यवाद प्रज्ञा . https:/
धन्यवाद प्रज्ञा . https://www.drnitingupte.com/ बघते.
आणि अनु धन्यवाद. हीच https://www.s2classes.in/ वेबसाईट असावी ना?
हो.मला वाटते आधी नुसता डायट
हो.मला वाटते आधी नुसता डायट प्लॅन घेऊन बघ.त्यांची स्टाईल,रोजचं रिपोर्टिंग, बरेच रिमाईंडर आणि बाकी पटले तर दुसऱ्या महिन्यात वर्क आऊट+डायट.वर्क आऊट ला चांगले पर्याय युट्यूब वर भारंभार आहेत.योग्य हार्टबिट, योग्य बर्न आणि आपल्या आवडीला योग्य(जंप नको/स्क्वॅट नको/सर्व चालेल पण पाठीत वाकणं नको इत्यादी, आणि तरीही योग्य प्रमाणात वर्क आऊट देणारा)
थँक्स अनु
थँक्स अनु
Pages