दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिझोतो बेताला गुडबाय म्हणून दोन्ही तांदूळ मिक्स करून इडलीत वापरून टाकावे.उकडा तांदूळ रिझोतो मध्ये टाकला तर रिझोतो बिघडेल.पण रिझोतो राईस इडली साठी भिजवला तर इडली बिघडणार नाही.फार तर थोडे उडीद जास्त/पोहे हासत/मेथीदाणे असं करावं लागेल.

अनु, त्रिवार सत्यासारखा त्रिवार सल्ला! Lol

Risotto 750rs/kg ने आणला आहे. त्याच्या इडल्या करायला जीवावर येईल. आज दोन्ही rice एकेक चमचा शिजवून परिक्षा करते.

अबाबा
750 रु किलो असेल तर दोन गॅस वर दोन्ही राईस चा रिझोतो कर. जो बिघडेल त्यात खोबरं साखर घालून नारळीभात.
आज रिझोतो उद्या रक्षाबंधन.

दोन्ही तांदूळ नको शिजवून बघायला. एकच शिजवून बघितला तरी पुरे. रिसोतोच्या तांदळाला भरपूर स्टार्च सुटेल.
या वरुन आठवले. लहनपणी वर्षभराच्या साठवणूकीचा तांदुळ, डाळी वगैरेचे नमुने येत. छोट्या वाट्यात शिजवत आणि मग काय खरेदी करायची ते ठरे.

शेवटी दूध का दूध पानी का पानी झालं. एक तांदूळ शिजवला तो जे काही विचित्र शिजला की कळलं त्याचा इडली - डोसा करायचा. स्वातीने लिहिल्याप्रमाणे, दुसऱ्या तांदुळाची परीक्षा करावी लागलीच नाही. Vegitable स्टॉक घरात होताच. आणि थोड्या भाज्या घालून आणि home made cream cheese घालून उत्तम रझोटो झाला. (थोडं कॅलरीज बद्दल guilt आहे, पण रविवार ऐवजी आजच cheat day आहे असं स्वतःला समजावलं)

तांदुळ, डाळी वगैरेचे नमुने येत. छोट्या वाट्यात शिजवत आणि मग काय खरेदी करायची ते ठरे.>>> जे लोक वर्ष भराचे धान्य घेतात, त्यांनी हे करणं अगदी गरजेचं आहे. आपल्या आया, आज्या हुशार होत्या.

वाह वाह.एखाद्या कुशल हंसाने दूध मिसळलेल्या पाण्यातून नुसते दूध ओळखावे, किंवा कचऱ्यातून मोती टिपून काढावे त्याप्रमाणे तू रिझोतो राईस ची खरी पारख केलीस Happy
आता एक फोटो यायला हवा त्या रिझोतो चा.

सत्तु आणि सातु दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत ना? पण दोन्हीही प्रकृतीला थंड मानले जातात का?

सत्तू म्हणजे बहुतेक सात धान्य एकत्र करून केलं जाणारे पीठ असावं. खूप वर्षांपूर्वी एकदा मी एकत्र धान्यांची भाजणी दळायला जवळच्या पिठाच्या गिरणीवर गेलेले, तेव्हा तिथल्या भैय्याने मला सांगितलं की हे आमच्या सत्तू सारखं. ते बहुतेक धान्य भाजत नसावेत. ख खो माहिती नाही. आता ती गिरणी बंद झाली. नाहीतर परत खातरजमा केली असती.

सत्तू(हे दत्तू लिहुन स डिलीट करावा लागला.मॉडर्न आनंदीबाई) म्हणजे उडीद, चणे वेगवेगळे भिजवून, उन्हात वाळत घालून, भाजून मग दळतात. एक प्रकारची मल्टी ग्रेन भाजणीच ती.फक्त भिजण्याची स्टेप जास्त.सध्या हेल्थ फ्रिक्स मध्ये सत्तू बरेच प्रसिद्ध आहे, कमी किमतीत जास्तीत जास्त प्रोटीन म्हणून.

सत्तू मध्ये फुटाणे आणि गहू कॉम्बिनेशन वाचले आहे. कधी कधी बार्ली पण असते. सात धान्य बहुतेक ट्रॅडिशनल रेसिपी असावी.
सत्तूचे पीठ पाण्यात मिक्स करून उन्हाळ्यात पितात. उष्णता कमी करते म्हणे. पराठेही करतात. तो सरबत सदृश प्रकार काही मला आवडला नाही. पराठ्याची टेस्ट चांगली होती पण फार कोरडे वाटले. अजून काही रेसिपी मिळाली तर ट्राय करणार आहे. मला कमीत कमी कष्ट घ्यावे लागतील आणि एक-दोन डिशमध्ये जास्तीत जास्त फूड ग्रुप इन्क्लूड होतील अश्या ऑप्टिमाईझ्ड रेसिप्या शोधत असते मी.

मी वाचलं त्याप्रमाणे सातू हे गहू आणि फुटाणे यांचं मिश्र पीठ आहे बाबी सत्तू हे चिकपी फ्लार आहे. पण सत्तूदेखील थंड असतं का ते कळलं नाही. कोणाला माहिती आहे का?

आभा, बार्लीचे सत्तू थंडावा देते म्हणे.
मी कुठलेच सातू, सत्तू कधीच ट्राय केले नाहीये. आमच्याकडे उन्हाळ्यात धणे-जीरे पाणी नाहीतर सब्जाचे बी असे. त्याशिवाय बार्ली वॉटरची बाटली बाबा आणून ठेवायचे. पण हे सगळे मोठ्या माणसांसाठी. आम्ही मुलं मस्त ताडगोळे हादडायचो.

सत्तू हे काही उत्तर भारतीयांकडून ऐकलंय.
सातू नक्की कशात वापरतात. फक्त पाचव्या शिवामुठी साठी वाहतात हे माहितेय.

ऋतुराज,
मी सातू/बार्ली (पर्ल बार्ली) कुकरमधे भातासारखे शिजवून घेते आणि नूडल्/पास्ता ऐवजी सूपात वापरते.
बार्लीचे डोसे पण छान होतात. १/२ कप उडीद डाळ : १.५ कप पर्ल बार्ली. तांदळाच्या ऐवजी बार्ली, बाकी सर्व नेहमीच्या डोश्याप्रमाणेच.

आमच्याकडे डाळी आणि धान्य मिळुन सात पदार्थ भाजुन दळून आणुन सातूचे पीठ बनवत. मारवाडी लोक सुद्धा अशाच प्रकारे बनवत थोडा फरक असे, त्याला सत्तु म्हणत.
दूध साखर घालुन कालवून खायचे किंवा गुळ/साखर पाणी घालुन त्याचे लाडु बनवत. पण लाडु लगेच संपवावे लागतात, नाहीतर फार कडक होतात.

दूध साखर घालुन कालवून खायचे किंवा गुळ/साखर पाणी घालुन त्याचे लाडु बनवत. >>>> +१

सत्तुच्या पिठात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर व तिखट, मीठ कालवून खातात बिहारी लोक.

सत्तूच्या पिठाची ताकातली उक्कड पण छान लागते. पौष्टिक असते

भाजूनच करतात का सत्तू, तरीच गिरणीवाला भैय्या म्हणाला, इसके जैसाही (भाजणी) हमारे यहा करते है .

अनु मोबाईलवर मलाही दत्तू लिहून द खोडून स लिहावा लागतोय.

एक जुन्या मराठी कृष्णधवल सिनेमातील गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आठवतायत. पण ते पूर्ण गाणं कुठे गुगल करून सापडेना. युट्युबावरही नाही.

गाणं आहे - नेमेचि येते जुने चक्र बाळा, हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा

पूर्ण गाण्याच्या ओळी आहेत का कोणाकडे? सिनेमा कोणता आठवतोय का? जर युट्युबवर नाही तर मग हे कुठे मिळेल का?

Pages