Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मागच्या पानावर राखीसाठी
मागच्या पानावर राखीसाठी प्रश्न विचारला आहे.
मी गेली अनेक वर्षे अनुग्रह तर्फे राखी पाठवते.
https://forms.gle/LHcY1TuW7NzmZ2pA9
दिव्यांग मुलांकडून NGO तर्फे.
ते देशात , परदेशांत सगळीकडे पोस्टाने राखी पाठवतात. राखी अगदी वाजवी किंमत आणि पोस्टाचे दर तर फारच कमी असतात.
राख्या मात्र साध्या आहेत, पण मला चालतात.
सध्या insta वर चारचाकी चे
सध्या insta वर चारचाकी चे मिरर वर पाणी साठून मागचं दिसेनासे होतं त्यासाठी उपाय म्हणून त्यांनी white colgate पेस्ट लावायचा आणि मग वाईप करुन टाकायचा उपाय सांगितला आणि नंतर पाणी कसं थांबत नाही याचा डेमो पण दाखवला. चष्म्यावर पण हा उपाय करून पाहायला हरकत नाही. एक प्रयत्न..
मायबोलीवरचे काही धागे मला
मायबोलीवरचे काही धागे मला दिसू नयेत अशी फेसबुक सारखी 'Hide this post' सुविधा माबोवर आहे का? कधी येणार?
पावसाळ्यात चष्म्याच्या
पावसाळ्यात चष्म्याच्या काचांवर पाणी जमा झाल्याने गाडी चालवताना (टू व्हीलर) भयंकर त्रास होतो आणि बरेच वेळा दिसेनासे होते...
उपाय - https://www.facebook.com/reel/1520073752270010
पियू वॉटर स्पोर्टसला घातलात
पियू वॉटर स्पोर्टसला घातलात तसे क्लिअर गॉगल्स करुन मिळत असतील तर बघ प्रिस्क्रिप्शनचे. अगदी स्विम गॉगलसारखे न दिसता नॉर्मल दिसणारे पण असतील बहुतेक असे.
ओके. ते हेल्मेट आणि हे दोन्ही
ओके. ते हेल्मेट आणि हे दोन्ही बघते.
साबुदाणा शाकाहारी आहे कि
साबुदाणा शाकाहारी आहे कि मांसाहारी ?
आज स्टार बझार सामान मधे भरताना चर्चा ऐकली.
साबुदाणा त्याच्या बनवण्याच्या
साबुदाणा त्याच्या बनवण्याच्या प्रोसेस नुसार नाईलाजाने मांसाहारी.पण आता कंपनीज क्लेम करतात की यंत्र आणि डिहायड्रेटर्स मुळे त्या प्रोसेस बदलल्या आहेत.खरं खोटं जाणून घेण्याची हिंमत नाही.ते किचन चा भटारखाना पाहिल्यासारखं होईल.
आम्ही तसाही कार्ब म्हणून कमी केलाय.उपासाला शिंगाडा राजगिरा पीठ भाकरी दाणे आमटी आणि अगदीच वाटलं तर थोडा बटाटा खातो.
उपासाला शिंगाडा राजगिरा पीठ
उपासाला शिंगाडा राजगिरा पीठ भाकरी दाणे आमटी >>> हे तर पंचपक्वान्न झालं कि मावळ्यांचं.
तुम्ही तुमच्या लॅपटॉपची
तुम्ही तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन कशी साफ करता ? मी चष्मा पुसण्याचे सोल्युशन मारून कापडाने पुसते . हे योग्य आहे का ?
स्क्रीन ला ती कॉलिन सदृश
स्क्रीन ला ती कॉलिन सदृश सोल्युशन्स वापरू नये असं टीव्ही बाबत तरी ऐकलं होतं.स्टॅटिक निर्माण होऊन पिक्सेल खराब होतात.लॅपटॉप स्क्रीन पण अगदी कमी ओल्या किंवा पूर्ण कोरड्या कपड्याने रोज पुसता आली तर बरे.रोज पुसली तर कोरड्या कपड्याने पण नीट पुसली जाते.
ok Mi_Anu.. i will follow
ok Mi_Anu.. i will follow this
पुसायची पण असते का
पुसायची पण असते का
स्क्रीन cleaner liquid मिळतं ते मागवलं आहे आणि तेच वापरते.
पण अनेकदा कोरड्या मऊ कपडाने पुसते. भागतं त्याने
बाबा कॉलेजात असताना
बाबा कॉलेजात असताना चष्म्याच्या दुकानात काम करायचे. ते सांगत की चष्मा सरळ पाण्याच्या धारेखाली धरा व नंतर सॉफ्ट कॉटन किंवा मलमलने पाणी टीपा. मी कुठलेही सोल्युशन वापरात नाही चष्म्यासाठी.
टीव्ही वगैरे पूर्वी म्हणजे ते बॉक्स टीव्ही यायचे त्यावेळी कोलिन वापरायचे. आता सॉफ्ट टीशर्टने कोरडेच पुसून घेते.
मायक्रो फायबर कपड्याने छान
मायक्रो फायबर कपड्याने छान साफ होतात . कापड थोडेसे ओले केले तरी चालेल .
हो मायक्रोफायबरने चांगले
हो मायक्रोफायबरने चांगले पुसले जाईल. पण मायक्रोफायबर रुमाल आणले की नवरा गाडीच्या काचा, हेल्मेट इत्यादी पुसण्यासाठी ढापतो. लेक तिचा व्हाईटबोर्ड ते जमिनीवर पडलेले रंग या रेंजमधले काहीही पुसायला ते घेऊन टाकते. यातून काही उरलेच तर घरातलेच कोणीतरी ते नीट जपून ठेवते, जे कल्पांतापर्यंत मिळत नाही. जुन्या टी शर्ट बद्दल कुणाला असे आकर्षण नसते. ते सापडतात वेळेवर.
जुने कपडे घेण्याऱ्या संस्था
जुने कपडे घेण्याऱ्या संस्था कोणाला माहित आहेत का ? मुंबईतील हव्या आहेत .
https://shareatdoorstep.com/
https://shareatdoorstep.com/
हे आपल्याकडचे जुने कपडे घेऊन त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या सेवाभावी संस्थेला नेऊन देतात. कपडे न्यायचा खर्च आपण द्यायचा. डन्झो किंवा तत्सम लोक येतात. कोणत्या संस्थेला दिले ते आपल्याला कळवतात.
https://goonj.org/
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
संपर्क करते त्यांना .
जुन्या टी शर्ट बद्दल कुणाला
जुन्या टी शर्ट बद्दल कुणाला असे आकर्षण नसते. ते सापडतात वेळेवर.
नवीन Submitted by माझेमन on 6 August, 2024 - 04:00
जुने कपडे घेण्याऱ्या संस्था कोणाला माहित आहेत का ? मुंबईतील हव्या आहेत .

>>>>>>>>>यातून काही उरलेच तर
>>>>>>>>>यातून काही उरलेच तर घरातलेच कोणीतरी ते नीट जपून ठेवते, जे कल्पांतापर्यंत मिळत नाही.

घर बदलताना अशा गायब वस्तू आमच्याकडे सापडतात.
घरी गणपती नंतर बरच सुख खोबर
घरी गणपती नंतर बरच सुके खोबर आणि गुळ उरलाय, त्याचं काय करता येईल?
वेगळं की एकत्र केलेलं?
वेगळं की एकत्र केलेलं?
सुख शिल्लक राहिल्या बद्दल
सुख शिल्लक राहिल्या बद्दल अभिनंदन. इकडे पाठवता येतं का बघा.
गुळ खोबऱ्यासाठी युक्ती सांगतीलच लोक.
मा.प्रु ... वेग-वेगळ आहे
मापृ :).. वेग-वेगळ आहे आशु२९
गुळाचा गणपती करता आलं तर बघा
गुळाचा गणपती करता आला तर बघा आणि गणपती स्पर्धेत धागा काढा बरं! खोबर्याचा मोदक आरास करा. किंवा चटणी करा आणि चटणी स्पर्धेत भाग घ्या. एका गुळ खोबर्यात दोन स्पर्धा!
सुकं खोबरं, पिठीसाखर व
सुकं खोबरं, पिठीसाखर व भाजलेली खसखस गर्कन मिक्सरला फिरवून घ्या. त्या मिश्रणाच्या करंज्या किंवा तळणीचे मोदक करा.
किंवा
लसूण, लाल मिरची, मीठ घालून चटणी करा. वाटताना तेल सुटेलच.
किंवा
कांदा, आलं, लसूण किंचीत तेलात भाजून खोबऱ्यासकट वाटून घ्या. या मिश्रणात योग्य प्रमाणात मीठ घालून हे वाटण अर्धा किलोपेक्षा जास्त असेल तर फ्रीजमध्ये ठेवून वापरा. कडधान्याच्या उसळीत, चिकन, मटणमध्ये साधी फोडणी झाली की एका मोठ्या लिंबाएवढे वाटण घालायचे, तिखट, हळद घालून परतायचे. मग जो मेन इनग्रेडीयंट असेल तो घालून परतायचे व कढत पाणी गरजेनुसार घालून शिजवायचे.
खोबरे आणि गुळ शिल्लक कसे
खोबरे आणि गुळ शिल्लक कसे राहतात म्हणते मी ( एक कोकणी )
किट्टु हाहाहा
किट्टु हाहाहा
खोबरे आणि गुळ शिल्लक कसे
खोबरे आणि गुळ शिल्लक कसे राहतात म्हणते मी>> ++१११
मी गेल्या वर्षी उरलेलं ओल्या नारळाचं सारण ड्ब्यात भरून डीप फ्रीज केलं कारण साबा म्हणाल्या. असंच भाजीत घालून नाहीतर बेस्ट म्हणजे नुसतं खाऊन मीच एकटी संपवू शकत होते तरी अगदी जड मनाने तो हलका डबा डीप फ्रिजात ठेवला होता. यंदा सारण उरल्याची बातमीच लागू नाही दिली. आता अगदी १ चमचा उरलेलं दिसलं तेव्हा जनतेला समजलं.
सुक्या खोबर्याचा कीस किंवा तुकडे, ओलं खवणलेलं खोबरं किंवा नारळाचे तुकडे हे पदार्थ मी नुस्तेच खाऊ शकते!
Pages