Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोक्स, आईच्या पंच्याहत्तरी
लोक्स, आईच्या पंच्याहत्तरी निमित्त ऑगस्ट मध्ये काशी अयोध्या जायचं प्लॅन करतोय.
त्या वेळी जाणे योग्य राहील का? क्लायमेट कसे असेल? कोणी लेटेस्ट गेलं असेल तर सांगावं.
स्टे साठी गंगाकिनारी बजेट हॉटेल्स पण सुचवा.
सर्वांचे आभार. Chat with us
सर्वांचे आभार. Chat with us or call me हे दोन्ही पर्याय माझ्या फोनवर पुढे सरकत नाहीत. कदाचित फोन compatibility मुळे असेल. Laptop वर बघते आता.
उत्तरप्रदेशात त्या भागात जुलै
उत्तरप्रदेशात त्या भागात जुलै ऑगस्टमध्ये प्रचंड आर्द्रता असते असे अनुभवले आहे. बाहेर फिरायला नको वाटायचे. मी अयोध्येच्या जवळ बभनानला गेलो होतो ऑगस्टमध्ये एकदा. लखनऊ, वाराणसीलाही या सिझन दरम्यान असाच अनुभव होता.
ऑगस्ट म्हणजे दिल्लीतला कडक
ऑगस्ट म्हणजे दिल्लीतला कडक उन्हाळा. अजिबात नको. अयोध्या २६.७८ अंश अक्षांशावर आहे, दिल्ली २८.७ अक्षांशावर. फारसा फरक नसेल.
१९४७ साली आपल्याला
१९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा यच्चयावत सगळे इंग्रज एकदम भारत सोडून गेले का?
त्यांना कसे शक्य झाले असेल? ते ही जवळपास शंभर वर्षांपासून इथे होते. काही जणांची मुलं, नातवंडं इथेच जन्मली असतील. इथले सगळे पाश, असलीच तर इस्टेट, शेतीवाडी, घरे सोडून त्यांना कसे जाववले?
आणि ब्रिटीश सरकार ने इतक्यांचे पुनरुत्थान केले? नोकर्या, मुलांना शाळा, घरं..?
<<उत्तरप्रदेशात त्या भागात
<<उत्तरप्रदेशात त्या भागात जुलै ऑगस्टमध्ये प्रचंड आर्द्रता असते असे अनुभवले आहे<<
<<अयोध्या २६.७८ अंश अक्षांशावर आहे, दिल्ली २८.७ अक्षांशावर.<<
धन्यवाद लोक्स!
मला पटकन एक माहिती हवी आहे.
मला पटकन एक माहिती हवी आहे.
भारतात परत येताना किती डॉलर कॅश नेता येतात? मी आत्ता पर्यंत समजत होतो की फक्त ५००० च नेता येतात.
काल एका कलिगने सांगितले की तुझ्या कडे सॅलरी स्लिप असेल तर कस्टम्स मधे डिक्लेअर करुन (कोणता तरी फॉर्म भरुन) हवे तेवढे डोलर नेता येतात.
मला कन्फर्म कोणी सांगू शकेल का? मला लपवून वगैरे एकही डॉलर न्यायचा नाहीए. जे लिगली नेता येतील तेवढेच न्यायचे आहेत.
१०,००० डॉलर नेता येतात. १०
१०,००० डॉलर नेता येतात. १०,००१ नाही. CTR (Currency transaction report) फाईल होतो.
बॅंकेतूनच ट्रान्स्फर करा.
दडपून वाटेल तेवढे न्या
दडपून वाटेल तेवढे न्या

बरेच सौर्सेस असं सांगत आहेत
बरेच सौर्सेस असं सांगत आहेत कि इतकी पर्यंत रक्कम असेल तर डिक्लेअर करायची गरज नाही.
Cash and coins: USD 5,000
Cash, coins, and traveler's checks: USD 10,000
पण त्याहून जास्त असेल तर डिक्लेअर करू शकता. त्यावर काही कर/एक्शन वगैरे घेत नाहीत असे बऱ्याच फोरम वर आहे.
कृत्रिम अकला पण तेच सांगत आहेत:
https://chatgpt.com/share/2954504f-4807-4b09-a76f-eca8c0a3c3d7
https://g.co/gemini/share/830d4aeef5e6
अगदी खूप जास्त/संशयास्पद वाटेल इतकी रक्कम असेल तर कारवाई होऊ शकते म्हणे. याचा अर्थ तिथल्या अधिकाऱ्यावर अवलंबून असणार. त्याला/तिला वाटले तर USD 5000.05 वर सुद्धा तो संशय घेऊ शकतो. तसे झाल्यास तुम्ही "संशयशांती करायला हवी "
असा त्याचा अर्थ असतो (सगळीकडे तसेच असते).
अतरंगी,
अतरंगी,
RBI च्या पानावर खालील माहिती मिळाली.
Q 5. How much foreign exchange can be brought in while visiting India?
Ans. A person coming into India from abroad can bring with him foreign exchange without any limit. However, if the aggregate value of the foreign exchange in the form of currency notes, bank notes or travellers cheques brought in exceeds USD 10,000 or its equivalent and/or the value of foreign currency alone exceeds USD 5,000 or its equivalent, it should be declared to the Customs Authorities at the Airport in the Currency Declaration Form (CDF), on arrival in India.
अतरंगी,
अतरंगी,
RBI च्या पानावर खालील माहिती मिळाली.
Q 5. How much foreign exchange can be brought in while visiting India?
Ans. A person coming into India from abroad can bring with him foreign exchange without any limit. However, if the aggregate value of the foreign exchange in the form of currency notes, bank notes or travellers cheques brought in exceeds USD 10,000 or its equivalent and/or the value of foreign currency alone exceeds USD 5,000 or its equivalent, it should be declared to the Customs Authorities at the Airport in the Currency Declaration Form (CDF), on arrival in India.
दडपून >> हेच आठवलं वरची चर्चा
दडपून >> हेच आठवलं वरची चर्चा वाचून.
वावे
वावे
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
मी सकाळी बऱ्याच वेबसाईट धुंडाळल्या. सगळीकडे CDF मधे डिक्लेअर करून नेता येते असे लिहीले आहे. त्या फॅार्मची कॅापी पण आहे.
आता CTR/CDF मधे डिक्लेअर करून न्यावे की नाही हा यक्षप्रश्न आहे. कस्टम्सचे ऐकिव किस्से फार काही चांगले नाहीत. जनरली लोकं वाईटच किस्से रंगवून सांगतात, पण तरी ऊगाच जास्त कॅश नेऊन मनस्ताप वाढवायचा चान्स घ्यावा का हे ठरत नाहीए.
मी हवे तेवढे डॉलर्स आणु शकतो
मी हवे तेवढे डॉलर्स आणु शकतो का हा किरकोळ प्रश्न आहे, तर मोठा प्रश्न काय असेल?
कीती बुगाटी आणु शकतो?
(मला कोणी असा प्रश्न
(मला कोणी असा प्रश्न पडण्याइतके डॉलर्स देईल का?)
जोक्स अपार्ट, एकदा कधीतरी अशी वेळ आली होती तेव्हा स्थानिक जर्मन बँक कडून ट्रान्सफर केले होते.1000 युरो ला 6 युरो कमिशन पडले होते.
हा आगाऊ आणि भोचक प्रश्न आहे
हा आगाऊ आणि भोचक प्रश्न आहे कल्पना आहे, पण इतकी कॅश नेण्यापेक्षा इतर मार्गाने नेणे शक्य नाही का? शक्य नसेल म्हणूनच विचारले आहे हे ही समजतंय.
पण किरकोळ प्रश्नांना बिनकामाची उत्तरे, किंवा प्रश्नच.
रिया भारतात नाही.
रिया भारतात नाही.
मग एवढे डॉलर्स अतरंगी माझ्यासाठी आणत आहेत.
मुलीच्या मैत्रिणीला बक्षीस / भेट / लिफाफा म्हणून
किल्ली
किल्ली

मी रोज रेल्वेचे जिने चढते तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न येतो पण नंतर विसरते , कि बायका पुरूषांइतक्या फास्ट जिने का चढू / उतरू शकत नाहीत???? काय कारण आहे? अगदी हाडकूळा मुलगा पण सटासट जिने चढतो किंवा उतरतो पण एखादी बाई किंवा मुलगी एक एक पायरी च उतरते. अपवादाने कोणी दोन दोन पायऱ्या चढत उतरत असेल. काय कारण असावे?
गल्ली चुकली का? हा रिटे प्रश्न आहे का?
हे एक सापडलं गुगलवर:
हे एक सापडलं गुगलवर:
Findings reveal that female individuals use greater hip and knee angular excursion than male individuals to use stairs, particularly during ascent. In addition, female individuals also exert greater muscular activity than male individuals to ascend stairs.
https://www.researchgate.net/publication/311937937_Comparison_of_stair_w...
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले जात असताना कंबरेच्या कपड्यांच्या नाड्यांचा फास इतर कपड्यांना करकचून बसतो. मग ते कपडे सोडवणे हा उपद्व्याप होतो. यावर काही उपाय?
दडपून वाटेल तेवढे ))))
दडपून वाटेल तेवढे ))))
किल्ली
अतरंगी बँक ट्रान्स्फर नसते का होत?
अडाणी प्रश्न असू शकतो हा.
मी महाराष्ट्र सोडून इतर राज्यातही फार गेलो नाहीये.
त्यामुळे अजिबात माहीत नाहीये.
अतरंगी बँक ट्रान्स्फर नसते का
अतरंगी बँक ट्रान्स्फर नसते का होत?>>>
होते पण माझे अकाउंट ब्लॉक झाले आहे. मला कॅश नेणे किंवा एखाद्या मित्राच्या अकाउंट मधे भरुन त्याला ट्रान्सफर करायला सांगणे हे दोनच पर्याय आहेत. म्हणून चौकशी करतोय.....
बाकी सगळे प्रतिसाद नेहमी प्रमाणेच
अरे देवा मी इथे तिरपागडी
अरे देवा मी इथे तिरपागडी उत्तरे देणार होतो. टाईप करून ठेवलेली. पोस्टायच्या आधी धाग्याचे नाव बघितले. वाचलो
काही कपडे वेगळा बोळा करून
एकाच धुण्यात काही कपडे वेगळा बोळा करून धुवायला एक जाळीची पिशवी मिळते. त्यामुळे ते एकमेकांमधे अडकत नाहीत. तशी मिळत असेल तर बघा. सहसा नाजूक कपडे, अंतर्वस्त्र, मोजे वेगळे/ एकत्र रहावेत म्हणून वापरतात. शिवाय नाड्यांची टोकं बांधून ठेवायची.
ही पिशवीच वॉशिंग मशीन मधे घालता येते.
ही बघा -
https://www.amazon.com/Durable-Laundry-Drawstring-Closure-Delicates/dp/B...
थॅंक्यु मानव , लिंक साठी पण
थॅंक्यु मानव , लिंक साठी पण थॅंक्यु.
भरत , अस्मिता ने बरोबर सांगितलं आहे. अशा पिशव्या मिळतात.त्या वापरा मशीन मध्ये. ( मी का वापरत नाही मग? असा प्रश्न पडलाय मला. कारण मी पण धूवून आलेले कपडे असे एकमेकांच्या तंगड्या अडलेले असतात, ते तसेच सोडवत बसते)
मेश बॅग्ज चा खूप फायदा होतो.
मेश बॅग्ज चा खूप फायदा होतो. हुक्स, लटकन वगैरे सुद्ध तुट्तात जर असे कपडे नुसतेच मशिन मध्ये टाकले तर.
शिवाय कमरेला इलॅस्टिक वगैरे असतिल, लेगिन्स असतील तर असे कपडे सुद्धा सैल होतात...
किल्ली
किल्ली
किती डॉलर नेऊ शकतो असा प्रश्न पडण्याएवढे डॉलर्स बाबाच्या आकाऊंटला असताना लेकीला जॉब शोधावा लागतो, हे काही बरोबर नाही.
धन्यवाद. मेशबॅगचा विचार करतो.
धन्यवाद. मेशबॅगचा विचार करतो. नाड्यांची टोकं एकमेकांना बांधायचा उपाय करून पाहतो.
Pages