Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्पा बळवंत चौकातील पुस्तक
आप्पा बळवंत चौकातील पुस्तक दुकाने रविवारी बंद असतात का?
आप्पा बळवंत चौकातील पुस्तक
आप्पा बळवंत चौकातील पुस्तक दुकाने रविवारी बंद असतात का?>>> बंद नसतात,आठवडाभर सुरू असतात. साप्ताहिक सुट्टी नसते आजकाल
मंडई parking वगळता abc,
मंडई parking वगळता abc, लक्ष्मी रस्ता, सदाशिव पेठ येथे अजून कोणती जागा आहे का जिथे हमखास पार्किंग मिळते? थोडं चालत जावं लागलं तरी चालेल.
नदीपात्राततली माहिती आहे पण ती बरीच दूर पडेल
लोक अदालत नोटीस आली आहे.
लोक अदालत नोटीस आली आहे.
चार चाकीवर 500 रु दंड. इतरांना त्रास होईल असे वाहन चालवले अथवा पब्लिक प्लेस मध्ये लावले वै.
सोबत फोटो विडिओ नाही. ज्या दिवशीचे वेळेचे चलन आहे तेव्हा असे काही घडल्याचे आठवत नाही. पुरावा मागता येतो का? नसेल पुरावा तर हा आरोप चुकीचा आहे असे लिहिता येईल का?
लोक अदालत मध्ये गेलो तर दंड भरावा लागेल. तिथे 500 रु साठी वकील घेउन जज सोबत कोण वाद विवाद करेल?
तिथे जाउन होयबा मान डोलावून दंड भरून मोकळे व्हा असे वकील लोकं देखील सांगतात.
कोणाचा काय अनुभव?
abc, लक्ष्मी रस्ता, सदाशिव
abc, लक्ष्मी रस्ता, सदाशिव पेठ येथे अजून कोणती जागा आहे का जिथे हमखास पार्किंग मिळते? थोडं चालत जावं लागलं तरी चालेल>>>>>
लक्ष्मी रस्त्याला, सदाशिव पेठला पत्र्या मारूती चौकातले पे ॲंड पार्क जवळ पडेल.
https://maps.app.goo.gl/pg2A1HEVPhDri5UW8?g_st=ic
मोदी गणपती शेजारी सुद्धा pmc
मोदी गणपती शेजारी सुद्धा pmc पार्किंग आहे.
चालायची तयारी,किंवा थोडया अंतरासाठी रिक्षा चालत असेल तर टिळक स्मारक ला पार्क करणे हा एक पर्याय आहे.
तेजो, धन्यवाद
तेजो, धन्यवाद
>> लोक अदालत नोटीस आली आहे
सगळा मेसेज वाचून "हे आणि कसली नोटीस?" असा विचार करतोय तेवढ्यात मलाच एसएमएस आला लोकअदालत नोटिशीचा. त्यात एक challan वर सप्टेंबर २०२२ आणि दुसऱ्यावर एप्रिल २०२४ तारीख आहे. एक दोन मित्रांनाही आलाय एसएमएस. बऱ्याच जणांना तेही आजच असे मेसेज आलेत असा त्याचा अर्थ आहे.
मलाही आलाय मेसेज नोटिशीचा.
मलाही आलाय मेसेज नोटिशीचा. १०००/- च चलन आलय . फोटो असतो पण तो पण नाहीये attach केलेला.
कसं कळणार खर खोटं?
इथे आपला वाहन क्रमांक देऊन
इथे आपला वाहन क्रमांक देऊन बघा, खरंच महाराष्ट RTO ने चलान पाठवलय का ते.
मलाही आलाय, अगदी तंतोतंत खरा
मलाही आलाय, अगदी तंतोतंत खरा होता. मी मुंबई ट्राफीक ॲपवर चेक केले, तसेच दाखवत होते. मग त्याहून दंडाची रक्कम भरून पोचपावती घेतली
Update
Update
त्यांनी पाठवलेल्या sms मधील लिंक वर गेल्यावर चलन पैसे भरणे वेबसाईट ओपन झाली. तिथे काही प्रूफ दिसत नव्हते.
महाराष्ट्र पोलीस इ चलन वेबसाईटवर जाउन mobile नंबर गाडी नंबर चासी नंबर टाकून चेक केले.
चलन आहे. तिथे मात्र फोटो आहेत.
तिथे नो पार्किंग बोर्ड नाही. आणि गाडी रोड च्या एकदम बाजूला दाबून डेंटिस्ट अपॉईंटमेंट घ्यायला गेलो होतो. दहा मिनिटात परत आलो असेल.
तिथे कमर्शियल बिल्डिंग असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने अशाच गाड्या समांतर पार्किंग असतात. नो पार्किंग नो halting अशा सूचना नाहीत तिथे. तशी ग्रीविनन्स complaint देउन वेबसाईट वर दिली आहे. बघू काय होतंय.
Btw, आमच्याकडे उड्डाणपूल म्हणजे बस आणि ट्रकच्या पार्किंगचे अड्डे आहेत. तिथे कधी कारवाई झालेली ऐकले नाही.
किंबहुना मुख्य रस्त्यालगत जुन्या गाड्या खरेदी विक्री च्या गाड्या सर्व्हिस रोड वर असतात तिथेही कधी कारवाई झालेली नाही. टार्गेट असेल म्हणून अशा कॉमन मॅन गाड्या ते ही आतल्या रस्त्यावर असलेल्या चे फोटो काढून चलन लावतात.
गाडी लावलेली असते त्या
गाडी लावलेली असते त्या रस्त्याकडे असलेली दुकानेच पोलिसांना / टोईंगवाल्याना टीप देतात.
डोंबिवलीत तरी अशीच पद्धत आहे म्हणे
अॅटमॉसफिअर आणि व्हेदर यांत
अॅटमॉसफिअर आणि व्हेदर यांत फरक काय?
Atmosphere = वातावरण
Atmosphere = वातावरण
Weather = हवामान
हे पहा लोकहो
हे पहा लोकहो
https://mahatrafficechallan
https://mahatrafficechallan.gov.in/payechallan/PaymentService.htm
हे एका अधिकृत व्यक्तीने दिलेलं असल्याने फार आधीच बुकमार्क मध्ये होतं
Atmosphere वातावरण मध्ये
Atmosphere वातावरण मध्ये थोडसे बदल म्हणजे जैविक उलथापालथ आणि कायम स्वरुपी जबरी नुकसान. उदाहरण - समुद्राच्या पाण्याचे तापमान २°सेल्सिअस अश्या आपल्यासाठी अतिशय कमी वाटू शकणाऱ्या अंकात बदलले तरी तेथील जीवसृष्टीचा प्रचंड संहार संभवतो. Ppm हे मुळातच टक्केवारीत आकड्या मध्ये इतके क्षुल्लक वाटले तरी काही ppm ने वाढलेले प्रदूषण त्या क्षेत्रातील अख्खी प्रवाळांची जमात कायमसाठी संपुष्टात आणण्यासाठी कारणीभूत ठरते.
Wheather हवामान थोडसं बदलले की होते ते तात्पुरते आणि भरून काढता येण्याजोगे नुकसान. जसे की ओला / सुका दुष्काळ वगैरे.
Climate पण असतं अजून एक
Climate पण असतं अजून एक
होय, परवाचे मेसेजेस अधिकृत
होय, परवाचे मेसेजेस अधिकृत होते. MHPECH वरून आलेले mahatrafficechallan.gov.in हीच लिंक आहे. बँक अकाउंट हॅक वगैरे न करता पैसे काढतात हे लोक
(No subject)
(No subject)
२-३ महिन्यांनी मुंबईहून
२-३ महिन्यांनी मुंबईहून धुळ्याला जायचे आहे. परंतु मुंबई (दादर) ते धुळे अशी एकच ट्रेन दिसते आहे, जी गैरसोयीची आहे. धुळ्याच्या आधी 'चाळीसगाव जंक्शन' आहे तिथपर्यंत जाणाऱ्या अनेक ट्रेन्स दिवसभरात वेगवेगळ्या वेळी आहेत. तरी 'चाळीसगाव' ते 'धुळे' अशी काही MEMU/ DEMU रेल्वे सेवा आहे का? कारण त्या रेल्वेमार्गावर लहान-लहान अनेक स्थानके आहेत, त्यामुळे Memu / Demu रेल्वे असण्याची शक्यता वाटते आहे. कोणाला काही माहिती असल्यास कृपया कळवावे. किंवा या मार्गावर ST बसची सुविधा आहे का? (रिक्षा/शेअर रिक्षा/टमटम/वडाप हे अगदी शेवटचे पर्याय म्हणून वापरेन)
आहेत ना. पण unreserved trains
आहेत ना. पण unreserved trains schedule IRCTC APP मध्ये नसतात.
रेल्वेच्या NTES APP मध्ये चार दिसत आहेत. किंवा साईटवर पाहा national train enquiry system .gov .in
(No subject)
धन्यवाद Srd आणि अni!!
धन्यवाद Srd आणि अni!!
हे national train enquiry system बद्दल नवीन कळले!!!
Uk (stonehouse) येथे राखी
Uk (stonehouse) येथे राखी पाठवायची आहे. कशी पाठवावी?
अमेझॉनवर राखी पॅकेजेस (राखी
अमेझॉनवर राखी पॅकेजेस (राखी आणि काहीतरी गिफ्ट अशी) असतात किल्ली. मी गेल्यावर्षी साबांची राखी कॅनडाला पाठवली. पॅकेज सर्च करताना तिकडचा पिनकोड घालून सर्च कर. म्हणजे तिथे डिलिव्हर होऊ शकणारे आयटम्सच दिसतील.
भारतातही मी आजकाल अशीच पाठवते.
हो भारतात तर मी तशी पाठवते,
हो भारतात तर मी तशी पाठवते, कॉफी मग,कुंकू,चॉकोलेट असं काहीतरी package असतं
हो गं, कॉफी मग आणि पाण्याच्या
हो गं, कॉफी मग आणि पाण्याच्या बॉटल्स देऊन देऊन कंटाळा आला. आता यावर्षी नवीन काय शोधावे विचारात आहे. वैसे कब है राखी?
मी रमाच्या भावांना unicorn ची
मी रमाच्या भावांना unicorn ची राखी देणारे, ते तिचेच भाऊ असल्यामुळे त्यांना आवडतंय युनिकॉर्न.
माझ्या भावांना वारकरी dress द्यायचा विचार आहे आळंदीवरून पाठवायचा.
झब्बा आणि धोती.
धवल रंग.
Pages