Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुकं खोब्रं लसूण खमंग चटणीत्
सुकं खोब्रं लसूण खमंग चटणीत्/वाटणात वापरता येईल. बाकी गुळ आमटीत व इतर.
माबो वर शोधसुविधा वापरताना
माबो वर शोधसुविधा वापरताना मराठीत टाईप का होत नाही? दुसर्या धाग्यावर जाऊन मराठी टायपून कॉपी पेस्ट करून धागा शोढावा लागतो.
यावर एक मीम तर 'बनतेच'.
यावर एक मीम तर 'बनतेच'.
"माबो वर शोधसुविधा वापरताना
"माबो वर शोधसुविधा वापरताना मराठीत टाईप का होत नाही?"
अँड्रॉईड फोन वर प्रमुख IME कळफलक वापरताना तरी असा काही प्रॉब्लेम येत नाही.
लॅपटॉप वरून करताना मला तरी हा
लॅपटॉप वरून शोधताना मला तरी हा प्रॉब्लेम येतो. बाजूला "मराठी" पर्याय निवडून ही.
हो. डेस्कटॉपवर शोधतानाही असंच
हो. डेस्कटॉपवर शोधतानाही असंच होतं.
आपल्याला पायावर काळे पांढरे
आपल्याला पायावर काळे पांढरे पट्टे असणारा किंवा विअर्ड दिसणारा (जो नक्की कोणतातरी रोग कॅरी करत असेल असे बघूनच वाटते) डास चावल्यावर काय करू शकतो? मुळात आपल्या हातात करण्यासारखे काही उरते का? सध्या आजूबाजूला डेंग्यू आणि चिकंगुनियाची वाईट साथ असल्याने काळजीपोटी विचारते आहे.
डास साधाच असेल अगं. चोरी
डास साधाच असेल अगं. चोरी करायला निघाला असेल.
:सॉरी रहावलं नाही:
ते तसले कपडे जेल मध्ये घालतात
ते तसले कपडे जेल मध्ये घालतात मामी.
आपल्याला पायावर काळे पांढरे
आपल्याला पायावर काळे पांढरे पट्टे असणारा किंवा विअर्ड दिसणारा>>> Asian tiger mosquito म्हणतात त्याला. मी पाहिलाय असा मच्छर. पण मला चावायच्या आधी मी त्याला मारले.
जो नक्की कोणतातरी रोग कॅरी करत असेल असे बघूनच वाटते>> हो, करतोच.
तो चावल्यावर चावलेला भाग खाजवू नये. साबणाने धुवून त्यावर थंड वाटेल असे क्रिम लावावे असे नेटवर वाचले.
ते तसले कपडे जेल मध्ये घालतात
ते तसले कपडे जेल मध्ये घालतात मामी>>> काळजीपोटी सुचलेला विनोद
देख रहे हो बिनोद?
डास चावल्यावर निलगिरी तेल किंवा टी ट्री ऑईल लावतात, सूज & खाज कमी होते. किंवा ते लाऊन बाहेर जायचे (मुलांना खेळायला पाठवताना)
उद्या पासून पितॄपक्ष चालू
उद्या पासून पितॄपक्ष चालू होतोय. घरातल्या काहींच्या तिथी माहित नाहीत. तर रोजच जे काही करू त्याचा नैवेद्य दाखवला तर?? की सर्वपित्री अमावस्येलाच एकदाच दाखवायचा?
तिथी माहित नसेल तर
तिथी माहित नसेल तर सर्वपित्रीला नैवेद्य दाखवतात.
सर्वपित्रिमागे आपल्या
सर्वपित्रिमागे आपल्या पूर्वजांनी विचार केलेले शास्त्रीय कारण म्हणजे हा कावळ्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामूळे त्यांना भरपूर अन्न मुबलक प्रमाणात मिळावे हे आहे असे एका WhatsApp मेसेज मध्ये वाचले होते. त्यात किती तथ्य आहे माहीत नाही पण शक्य असल्यास संपूर्ण पितृपक्षात रोजच जे कराल त्यातला एखादा पोळीचा तुकडा कावळ्यासाठी ठेवता आला तर पहा.
घरी गणपती नंतर बरच सुके खोबर
घरी गणपती नंतर बरच सुके खोबर आणि गुळ उरलाय, त्याचं काय करता येईल?
नवीन Submitted by सरळ on 9 September, 2024 - 06:26
चिक्की बनवा नाहीतर नारळी वड्या.
कावळ्यांचे घरटी बांधणे आणि
कावळ्यांचे घरटी बांधणे आणि अंडी देणे हे पावसाळ्याआधी झालेले असते.
कावळे झाडावर किती उंचीवर घरटे बांधतात यावरून पावसाच्या प्रमाणाचा अंदाज बांधला जातो..
पावसाला चांगली सुरुवात होईतो पिले अंड्यातून बाहेर पडलेली असतात. उडायला शिकतात, हे पाहिले आहे.
उद्या पासून पितॄपक्ष चालू
उद्या पासून पितॄपक्ष चालू होतोय. घरातल्या काहींच्या तिथी माहित नाहीत. तर रोजच जे काही करू त्याचा नैवेद्य दाखवला तर?? की सर्वपित्री अमावस्येलाच एकदाच दाखवायचा? >>>>> https://www.drikpanchang.com/
तारीख माहित असेल तर येथे जाऊन तिथी शोधून काढता येईल.
तारिख माहित नसेल तर
तारिख माहित नसेल तर सर्वपित्री अमावस्येला एकदाच नैवेद्य दाखवा.
काहिंची तारिख माहित आहे पण
काहिंची तारिख माहित आहे पण काहिंची नाही...सर्वपित्रीलाच करेन.
धन्यवाद.....
मला यंदाच्या दिवाळीत मातीचा
मला यंदाच्या दिवाळीत मातीचा किल्ला बनवायची खूप इच्छा आहे पण त्यासाठी मोठे अंगण किंवा जागा नाही.. घरातच पाटावर छोटा किल्ला बनवून तो गॅलरी मध्ये ठेवता येईल का?? या आधी कधी किल्ला बनवला नाहीये..
आज काल किल्ल्यासाठी लागणारे
आज काल किल्ल्यासाठी लागणारे दगड माती मिळणे कठीण झालय. घरी त्याचा राडा पण खूप होइल. कार्डपेपर, पुठ्ठे, कापड, सिमेंटचे पाणी आणि इतर वस्तू वापरून किल्ला करता येइल. काठ्यांवर कापड पसरून सिमेंटच्या पाण्याने त्याला कडकपणा आणून डोंगराचा इफेक्ट सहज आणता येतो. त्याच्यावर कार्डपेपरचा बुरुज आणि माची वगैरे करता येइल.
आजकाल भारतात आधार कार्ड जर
आजकाल भारतात आधार कार्ड जर गव्हरमेंट साईट वर प्री रेजिस्टर करून ठेवले तर ती प्रत घेऊन प्रवास करता येतो. रियल आधार कार्ड हरवायची/चोरी होण्याची शक्यता कमी होते.
त्या बद्दल कुणाला माहिती आहे का? सॉरी खूप ढोबळ लिहिलेय कारण बर्याच आधी वाचलेले पण विसरले.
एम-आधार म्हणून ऍप आहे
एम-आधार म्हणून ऍप आहे ऍंड्रॉईड व ऍपलसाठी. तिथे डालो करा किंवा डिजीलॉकरमध्ये. डिजीलॉकरमध्ये इतर सर्वच डॉक्युमेंटस् उदा. ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे ठेवता येतात.
खोबरं खूप असेल तर लसूण आणि
खोबरं खूप असेल तर लसूण आणि खोबरं एकत्र वाटून त्याची चटणी करा.
नुसतं लसूण खोबरं वाटून फ्रीज मध्ये ठेऊन ते भाजी आमटीत वापरता येते.
गूळ चहात वापरा.
छोटेखानी किल्ला आम्ही करतो.
मोठ्या पाटावर दगड व्यवस्थित रचून घ्या, ते पडणार नाहीत ना याची खात्री करून घ्या. वर महाराजांच्या आसनासाठी सपाट दगड अथवा पेवर ब्लॉक चा तुकडा ठेवा. आता या सगळ्यावर एक चांगल गोणपाट, पोत चिखलात नीट भिजवून टाका. ओलं असताना थोडा फार आकार उंच, सखल भाग एखादी गुहा वैगरे करता येईल. मध्ये पायऱ्यांसाठी जागा करा वाटल्यास. नंतर एक दोन दिवस पूर्ण सुकल्यावर कार्ड बोर्डचे बुरुज, मंदिर, शामियाना, घरे बनवून लावा. कागदाची किंवा वाळलेल्या गवताची झाडे करा. शेतीसाठी बारीक हिरवी लोकर कापून त्याचे शेत करा. कुंपणासाठी माचिस किंवा आयिस्क्रिम काड्या वापरा. आधी छोट्या बाटल्यांचा झकणात हाळीव पेरून ते ठिकठिकाणी ठेऊ शकतो.
आजकाल भारतात आधार कार्ड जर
आजकाल भारतात आधार कार्ड जर गव्हरमेंट साईट वर प्री रेजिस्टर करून ठेवले तर ती प्रत घेऊन प्रवास करता येतो. रियल आधार कार्ड हरवायची/चोरी होण्याची शक्यता कमी होते.>>>>>>
माझेमन यांनी सांगितल्याप्रमाणे डिजीलॉकरमध्ये ठेवा.
फक्त डिजीलॉकर मधील डॉक्युमेंट एस टी मध्ये ग्राह्य धरले जातात हा माझा अनुभव.
थँक्यु माझेमन & ऋतुराज
थँक्यु माझेमन & ऋतुराज
धन्यवाद ऋतुराज. आणि माधव.
धन्यवाद ऋतुराज. आणि माधव.
ऋतुराज. तुमच्या किल्ल्याचे फोटो टाकाल का जमल्यास?
फक्त डिजीलॉकर मधील डॉक्युमेंट
फक्त डिजीलॉकर मधील डॉक्युमेंट एस टी मध्ये ग्राह्य धरले जातात हा माझा अनुभव. >>> RTO ऑफिसमधे पण मला सांगितले होते की डिजीलॉकर मधील डॉक्युमेंटस आम्ही स्विकारतो. मग मी आधार कार्ड, PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, कारचे RC, डिजीलॉकरवर अपलोड करुन ठेवली आहेत.
<सर्वपित्रिमागे आपल्या
<सर्वपित्रिमागे आपल्या पूर्वजांनी विचार केलेले शास्त्रीय कारण म्हणजे हा कावळ्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामूळे त्यांना भरपूर अन्न मुबलक प्रमाणात मिळावे हे आहे असे एका WhatsApp मेसेज मध्ये वाचले होते> लोकसत्तेने पक्षीमित्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की प्राणी आणि पक्षी कच्चे अन्न खातात. शिजवलेले, तळलेले फार अन्न त्यांच्यासाठी चांगले नाही. त्यामुळे कावळ्यासाठी पान ठेवायचे तर ते त्याच्या घासापुरतेच ठेवा. खखोमाना.
>> डिजीलॉकर
>> डिजीलॉकर
आधार, ड्रायविंग लायसन्स, PAN या सर्व ठिकाणी जर एकच फोन नंबर तुम्ही दिला असेल तर हि सर्व (आणि इतरही बरीच) डॉक्युमेंट्स डिजीलॉकर फोन नंबर च्या आधारे त्या त्या पोर्टलवरून retrieve करतो. आपल्याला अपलोड करावे लागत नाही. पण एखादे डॉक्युमेंट खूप जुने असेल (जे ऑनलाईन उपलब्ध होत नाही) ते मात्र आपल्याला स्कॅन करून अपलोड करावे लागते.
Pages